कराड
सध्या कोरोनाचे मोठे संकट आपणा सर्वांसमोर उभे ठाकले आहे तरीही घाबरून न जाता व गाफील ही न राहता या संकटाचा आपण मुकाबला करूया नगरपरिषद प्रशासनाची यंत्रणा या संकटाशी सामना करण्यासाठी सज्ज आहे शासनाच्या नियमांचे पालन करा सॅनिटायझर मास्क सोशल डिस्टन्स चा अवलंब करा गाफील राहू नका असे आवाहन कराडच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांनी शहरातील नागरिकांना व्हीडिओ च्या माध्यमातून केल आहे सध्याच्या कोरोना संकट काळात जनतेला आधार देण्यासाठी त्या पुन्हा लोकांसमोर आल्या आहेत
नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे या शहराने निवडून दिलेल्या नगराध्यक्षा आहेत.त्यांची ही पहिलीच राजकीय इनिंग असली तरी त्या समाजकारणाच्या मैदानात यशस्वी झाल्या आहेत त्यांनी कोरोना संकटात केलेलं काम विसरून चालणार नाही एका कोरोना मृतदेहावर चक्क अंत्यसंस्कार करून त्यांनी आपल्या कार्याचा वेगळेपणाही दाखवून दिला होता... एक महिला नगराध्यक्षां कोविड मृतदेहावर अंत्यसंकार करते हे सम्पूर्ण राज्यातील पहिलेच उदाहरण ठरले होते आणि म्हणूनच त्यांचं त्यावेळी राज्यभर कौतुकही झालं होतं...
स्वतः त्या कोरोना पोसिटीव्ह झाल्या होत्या, त्यावर मात करून काही दिवसातच लोकांसाठी कोरोनाशी लढताना पुन्हा त्या दिसल्या... शहराला सॅनिटायझिंग करणे असो.. रुग्णांना सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करणे असो, किंवा विलीगिकरण कक्षाच्या निर्मितीपासून ते रुग्णाला डिस्चार्ज मिळेपर्यंत त्याच्या कुटुंबियांना धीर देणे असो...अशा सर्वच जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पेलल्याचे शहराने पाहिले ...नेमकं त्याचवेळी त्यांच सम्पूर्ण कुटुंबही कोरोना बाधीत झाल होत...आपल्या कुटुंबाबरोबर शहराचीही काळजी घेताना त्याना त्याहीवेळी सर्वांनीच पाहिलय...
स्वतःला कर्तव्यात झोकून देत काम करणं म्हणजे नेमकं काय असत...हे त्यांच्या कामाच्या झपाट्यातून वेळोवेळी त्यांनी दाखवून दिलय... कोरोनाचा प्रभाव अधिक वाढला असताना मी मी म्हणणारे त्यावेळी फारसे बाहेर दिसत नव्हते... अशा परिस्थितीत याच "अध्यक्षा' कोरोनाशी लढताना दिसल्या... संकटकाळात आपले कर्तव्य धाडस आणि निष्ठा याच्या जोरावर जनतेच्या सेवेस वाहून घेऊन कशाप्रकारे काम केल जात... याचे "त्या' उत्तम उदाहरणच ठरल्या...
आज शहरातील जनतेच्या स्वास्थ्यासाठी त्यांनी पुन्हा आवाहन केले आहे... सध्या कोरोनाची दुसरी लाट असताना लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे... याच जाणिवेतून त्यानी शहरवासीयांना वरील आवाहन केल आहे... संकटकाळात घरात न बसता लोकांसाठी ग्राउंडवर उतरून काम करण्याच्या त्यांच्या कर्तव्यदक्षतेची याचनिमित्ताने पुन्हा चर्चा सुरू आहे.
No comments:
Post a Comment