लसीच्या वाटपावरून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप झडत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्राकडून त्यावर उत्तर देण्यात आलं होतं. लस वाटपाच्या या मुद्द्यांवरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकार मदतीत दुजाभाव करत असल्याचा आरोप केला होता. चव्हाण यांचा आरोप भाजपाने खोडून काढला असून, चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवून लोकांची दिशाभूल केली आहे, असा दावा भाजपाने केला आहे.
भाजप नेते केशव उपाध्ये यांनी याबाबत ट्विट केले आहे.पृथ्वीराजबाबांसारख्या अभ्यासू व्यक्तीने अशी ओढून ताणून टीका करावी हे वैफल्यग्रत म्हणावे लागेल असेही त्यांनी म्हटले आहे
No comments:
Post a Comment