Tuesday, April 6, 2021

१००० युवकांना आगामी निवडणुकांमध्ये युवक काँग्रेसकडून संधी दिली जाणार - शिवराज मोरे

कराड
 महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आगामी जिल्हा परिषदपंचायतसमितीमहानगरपालिकानगरपालीकानगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यातील १००० युवकांना संधी देणार आहे. यासाठी युवक काँग्रेसकडून  एक गुगल फॉर्म  तयार करण्यात आला आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांनी पूर्ण अर्ज भरणे आवश्यक आहे. या लिंकवरील फॉर्म भरलेल्या अर्जामधून १००० युवकांना आगामी निवडणुकांमध्ये युवक काँग्रेसकडून संधी दिली जाणार आहे. 

या उपक्रमाची घोषणा काही दिवसांपूर्वी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी व प्रदेश उपाध्यक्ष तथा या उपक्रमाचे राज्य समन्वयक शिवराज मोरे यांनी केली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या नोंदणी ची मुदत वाढविली असल्याचे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी सांगितले.

या उपक्रमाबद्दल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले कि, युवक हे देशाचे भविष्य आहेत. युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हि नुसती घोषणा नसून ती सत्यात उतरवणे आवश्यक आहे व यासाठीच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने  सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली "सुपर 1000" हा अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रम घोषित केला आहे कि ज्यामध्ये जे युवक राजकारणाला करिअर समजतात तसेच राजकीय नेत्यांना दोष देण्यापेक्षा स्वतः राजकारणात उतरून एक परिवर्तन घडविण्याची हिंमत ठेवतात. अश्या महत्वाकांक्षी युवकांसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सुपर 1000 हे व्यासपीठ खुले केलेले आहे.

आत्तापर्यंत पहिल्यांदाच युवकांना राजकारणात एका उपक्रमाद्वारे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी युवक काँग्रेस हि एकमेव आहे. सुपर 1000 या उपक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी एक गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये काही प्रश्न उमेदवारांना विचारले गेले आहेत त्या प्रश्नांच्या आधारे त्या उमेदवाराचा राजकारणाकडे बघण्याचा कल व त्याची पार्श्वभूमी समजून येईल. नोंदणी झालेल्या फॉर्म मधून फक्त 1000 युवक राज्यभरातून निवडले जातील ज्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी दिली जाईल.

सुपर 1000 च्या माध्यमातून जे उमेदवार निवडले जातील त्यांना निवडणुकीसाठी प्रशिक्षण सुद्धा युवक काँग्रेसच देईल. निवडलेल्या उमेदवारांना बूथ व्यवस्थापन, मीडिया ट्रेनिंग, भाषण कौशल्य आदी निवडणुकीला उपयुक्त असे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

युवक काँग्रेस हा फक्त पक्ष नसून एक संघटना आहे जी युवकांच्या हक्कासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना न्याय दिला आहे व आता सुद्धा सुपर 1000 हा उपक्रम युवकांच्या हक्काचे व्यासपीठ उभे केले आहे. तरी या महत्वाकांक्षी उपक्रमात जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन शिवराज मोरे यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment