Monday, April 5, 2021

आधी म्हणाले रोजगाराचे पैसे खात्यात टाका, आता पृथ्वीराज चव्हाण म्हणतात…वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय सर्वसामान्यांना दिलासादायक...

कराड 
काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचं अभिनंदन केलं. उद्धव ठाकरे यांनी वीकेंड लॉकडाऊनबाबत घेतलेला निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक आहे, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना व्यक्त केले.

दोन दिवस अगोदरच त्यांनी लॉक डाऊन लावायचा असेल तर लोकांच्या खात्यावर पैसे टाका असा सल्ला राज्य सरकारला दिला होता त्यानंतर फक्त दोनच दिवस उलटून गेले तोच सध्या राज्यात पडलेल्या विकेंड लॉक डाऊन बद्दल बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वीकेंड लॉकडाऊन लावण्याचा घेतलेला निर्णय सर्वांशी सल्लामसलत करुन घेतला आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे हाल होणार नाहीत. हा निर्णय सर्वसामान्यांना दिलासादायक असल्याचेही मत चव्हाणांनी व्यक्त केले आहे.मात्र आपण सरकारला लोकांच्या खात्यात पैसे टाका या दिलेल्या सल्याचे पुढे काय झाले...याबाबत ते काहीच बोलले नाहीत. त्यांनी दोन दिवसात दोन वेगवेगळ्या केलेल्या स्टेटमेंटची सध्या कराडात सुरू चर्चा आहे.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते?

राज्यात लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत सत्ताधाऱ्यांमध्ये मत-मतांतरं असल्याचं म्हटलं जात होतं. त्यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं होतं. आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला होता. तसेच चव्हाण यांनी ठाकरे सरकारकडे पाच मागण्याही केल्या होत्या.

No comments:

Post a Comment