Wednesday, June 30, 2021

पालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवूनच यादवांचा उपोषणाचा स्टंट...यादवांमुळेच "बजेट' अडकले... नगराध्यक्षांचा पलटवार...

वेध माझा ऑनलाइन
कराड
 नगरपरिषदेची निवडणुक लवकरच होणार आहे शहरातील आघाड्या व पक्ष सक्रीय झाले आहेत. पण राजेंद्र यादव यांच्या आघाडीला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस,लोकशाही आघाडी यांनी कुठल्याही बाबतीत अजिबात विचारात घेतलेले नाही.यामुळे त्यांचा जळफळाट होत असून, गेली साडेचार वर्षे गायब असणारे,नगरपरिषदेच्या कोणत्याही बाबतीत सक्रीय नसणारे राजेंद्र यादव  यांची सध्या राजकीय परिस्थिती बरी नसल्यानेच मी काहीतरी करतोय हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यामुळेच ते माझ्यावर नाहक बिनबुडाचे आरोप करत आहेत त्यांच्या आडमुठेपणामुळे कराड शहराचा अर्थसंकल्प मंजूर झालेला नाही. माझ्यावर आरोप करून  कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस,लोकशाही आघाडी यांची सहानभूती मिळवून त्यांच्याशी जवळीक साधण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.त्यामुळेच बजेट सारख्या अभ्यासपूर्ण विषयावर यांनी निष्कारण राजकारण सुरु केले असून मी काहीतरी करतोय दाखवण्याचा व्यर्थ व केविलवाणा त्यांचा प्रयत्न आहे आणि अशा  मानसिकतेतून त्यांनी बेताल आरोप करून उपोषणाचा इशारा दिला आहे... असा पलटवार शहराच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांनी राजेंद्र यादव यांच्या आरोपाला  प्रत्युत्तर देत पत्रकाद्वारे केला आहे...दरम्यान...आम्ही जि उपसूचना दिली आहे त्यानुसारच अंदाजपत्रक लिहले गेले पाहिजे नाहीतर बघा...अश्या प्रकरची दमदाटी कर्माचा-यांना झाल्यामुळे अंदाजपत्रक रखडले त्यामुळे ठेकेदारांना बिले वेळेवर देता आली नाहीत. या सर्वाला राजेंद्र यादव व जनशक्ती आघाडीच कारणीभूत आहे असेही नगराध्यक्षानी या पत्रकात म्हटले आहे.... 

पालिकेचे गटनेते राजेंद्र यादव यांनी शहराच्या बरेच महिने अडकुन राहीलेल्या बजेटला नगराध्यक्षा सौ शिंदे याना जबाबदार धरत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निवेदनाद्वारे मागणी केली होती व  उपोषणाचा इशाराही दिला होता त्याला नगराध्यक्षा सौ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे
सौ शिंदे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, नगरपरिषदेचे अंदाजपत्रक हे स्थायी समितीच्या ४ मिटिंग होऊन त्यामध्ये चर्चा करून यांनी मंजूर केले. स्थायी समितीमध्ये १० पैकी ९ सदस्य हे जनशक्ती आघाडीचे आहेत. या सदस्यांनी मंजूर केलेलेच अंदाजपत्रक मा.मुख्याधिकारी यांनी जनरल सभेपुढे सादर केले होते. परंतु सभा सुरु झाल्यानंतर यांनीच स्थायी समितीमध्ये मंजूर केलेल्या अंदाजपत्रकाची सूचना आम्हाला मंजूर नाही आशी भूमिका घेतली. व या सूचनेवर राजकीय भाषण देऊन काही मुद्दे मांडले. पण लेखी स्वरुपात कोणतीही उपसूचना जनशक्ती आघाडीकडून  मिटींगमध्ये दिली गेली नाही. त्यांनी ४ दिवसानंतर तयार केलेली उपसूचना वार्ताहर परिषद घेवून सादर केली. खरे म्हणजे तर उपसूचना हि लेखी स्वरुपात अंदाजपत्रक सभेमध्ये द्यायला पाहिजे होती.
२५ फेब्रु.२०२१ रोजी अंदाजपत्रक सभा झाली मी प्रशासनाला २६ फेब्रु.२०२१ रोजी पत्रे देवून  कोणत्याही प्रकारची उपसूचना जनशक्ती आघाडीकडून प्राप्त झाली आहे का ? याची विचारणा केली परंतु याबाबत कोणतीही उपसूचना आली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले .त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना १० मार्च २०२१ रोजी पत्रे देवून याबाबतची वस्तुस्थिती कळवली होती या १० मार्चपर्यंत सुद्धा लेखी उपसूचना जनशक्ती आघाडीकडून मिळाली न्हवती. त्यामुळेच मी एकमताने सूचना मंजुरीचा अहवाल  जिल्हाधिकारी यांना सादर केला.
 अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर राजेंद्र यादव व जनशक्ती आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयात   तक्रार दाखल केली, यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी बापट यांनी २५ फेब्रु च्या मिटिंगमध्ये जे झाले आहे त्याचे ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंग, लिहली गेलेली चर्चा या सर्व गोष्टींची पडताळणी करूनच बजेट सादर करावे अशी सुचना केली. त्याप्रमाणे मुख्याधिकारी यांनी संबधित कर्मचा-यांना तशा सूचना केल्या,व त्याप्रमाणे कर्मचा-यांनी लिखाणही सुरु केले,पण जनशक्ती आघाडीतील काही सदस्यांनी नगरपरिषदेच्या तळमजल्यावर असणा-या केबिन पैकी एका केबिनमध्ये संबधित अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून घेऊन, आम्ही जि उपसूचना दिली आहे त्यानुसारच अंदाजपत्रक लिहले गेले पाहिजे नाहीतर बघा..... अश्या प्रकरची दमदाटी कर्माचा-यांना केली. त्यामुळे सदर प्रक्रिया थांबली व अंदाजपत्रक रखडले त्यामुळे ठेकेदारांना बिले वेळेवर देता आली नाहीत. या सर्वाला राजेंद्र यादव व जनशक्ती आघाडीच कारणीभूत आहे. अंदाजपत्रक हे फेरविचार होऊन परत मिटिंग घेवून त्यामध्ये सादर करण्याची मुख्याधिकारी यांच्याकडे आमची मागणी आहे.

अंदाजपत्रकासंबधी प्रशासनावर व माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे अत्यंत चुकीचे आहेत,प्रशासन व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात राजेंद्र यादव यांनी ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंग,  प्रोसेडींग, मध्ये बदल करण्यात आलेला आहे असा चुकीचा व धादांत  खोटा आरोप केला आहे. वस्तुस्थिती पाहता मिटिंग झाल्यानंतर २ ते ३ दिवसातच ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंग, लिहली गेलेली चर्चा हे सर्व  जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवण्यात आली आहे. त्यामुळे त्यात बदल करणे छेडछiड करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.आणि प्रोसेडींग मध्ये खाडाखोड हा फार मोठा गुन्हा समजला जातो, हे मागील अनुभवावरून कराडकराना माहिती आहे. यामुळे माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. आणि यामध्ये नाहक प्रशासनाला खोट्यानाट्या आरोपांचा सामना करवा लागत आहे हे अत्यंत खेदजनक आहे. प्रशासनावर कोण दबाव टाकतय हे यामधून सिद्ध होत आहे.
सध्या जनशक्ती आघाडी कोण चालवत आहे हा संशोधनाचा विषय आहे. गेल्या साडेचार वर्षातील आपले अपयश झाकण्याचा,मी काहीतरी करतोय हे दाखवण्याचा राजेंद्र यादव यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. पण कराडची  जनता हुशार आहे. गावाने तुम्हाला चांगलच ओळखलेल आहे, त्यामुळे तुमच्या या राजकीय स्टंटबाजीचा काहीही उपयोग होणार नाही.राजकीय हेतूने केलेल्या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही.जिल्हाधिकारी यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी माझी त्यांना विनंती राहील असेही सौ शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

        

804 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 20 बाधितांचा मृत्यू



  सातारा दि.30 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 804 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 20 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 37 (8579),  कराड 188 (27691), खंडाळा 31 (11788), खटाव 78 (19586), कोरेगांव 54(16805), माण 32 (13191),  महाबळेश्वर 3 (4281), पाटण 70(8502), फलटण 67 (28418), सातारा 208 (40516), वाई 21 (12670) व इतर 15 (1340) असे आज अखेर एकूण 193367 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (193), कराड 5 (813), खंडाळा 0 (149), खटाव 4 (490), कोरेगांव 0 (383), माण 1 (261), महाबळेश्वर 0 (45), पाटण 2 (199), फलटण 0 (282), सातारा 6 (1237), वाई 1 (334) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4386 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                                                0000

नगराध्यक्षांवर फौजदारी गुन्हा दाखल करा...गटनेते राजेंद्र यादव यांची मागणी...अन्यथा आमरण उपोषण...

कराड
वेध माझा ऑनलाइन
कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला व शासनाला खोटी माहिती देऊन फसवणूक केली आहे. तसेच विद्यमान सभागृहाची दिशाभूलही केली असल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी यशवंत जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव उद्या (गुरुवार) पासून आमरण उपोषण करणार आहेत.

राजेंद्र यादव यांनी जिल्हाधिकारी सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, दि. 25 फेब्रुवारी 2021 रोजी झालेली सभा व नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आजपर्यंत चालु असलेले कागदपत्रांचा खेळ पाहता नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन व सर्व नगरसेवक आणि सभागृहाची दिशाभुल केली आहे. पदाचा गैरवापर करून सभाग्रहातील बहुमताचा अनादर त्या करत आहेत. त्यासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन करून जिल्हाधिकारी सिंह यांनी समज देणे गरजेचे आहे. 
स्वतः च्या सहीच्या अधिकाराची भिती घालुन प्रशासनाला वेटीस धरतात तसेच ठरावात, प्रोसेडीग व मिनिट बुकमध्ये अदलाबदल करणे संबंधीत सभेची ऑडीओ, विडीओ रेकॉरडिंग गायब करणे, त्यात पाहिजे ते बदल करून रेकॉरडिंग ठेवणे. याचप्रमाणे बजेट संदर्भातील ऑडिओ विडीओ रेकॉरडिंगमध्ये सुध्दा बदल केलेले आहेत. साडेचार वर्षामध्ये वेळोवेळी नगराध्यक्षांचा संबंधीत नगरपरिषदे संदर्भात केलेला खोटारडेपणा, शासनाची फसवणुक, सभाग्रहाची दिशाभुल, लोकशाहीमध्ये बहुमताचा अनादर व स्वताचा मनमानी कारभार या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करून योग्य तो निर्णय घेणेबाबत जनशक्ती आघाडीने दाद मागितली आहे.
नगराध्यक्षा यांनी स्वत: ठराव तयार न करता अंदाजपत्रक जिल्हाधिकारी सिंह यांनी न दिल्यामुळे रखडले आहे. नगराध्यक्षांच्या या खोटारडेपणा व अमुटेपणामुळे शहराचा विकास थांबला आहे. त्याचबरोबर नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान देखील होत आहेत. कोरोना सारख्या महामारीमध्ये बजेट मंजुर नसलयाने महत्वाचे निर्णय घेणेस व विकास कामांसाठी खर्च करणेस नगरपरिषद प्रशासनास अडचण निर्माण होत आहे.
गेली 3 ते 4 महिने बजेट नगराध्यक्षांच्या मनमानीमुळे व खोटारडेपणामुळे अडकून पडले आहे. संबंधीत विषयामध्ये जिल्हाधिकारी यांनी त्वरीत निर्णय घेणे अपेक्षीत होते. वारंवार जिल्हा प्रशासनाकडे मागणी करून देखील अद्यापही कोणताही निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन घेण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी ३० जुलै पर्यंत निर्णय न घेतल्यास  नगराध्यक्षा तसेच पालिका प्रशासन यांच्या विरोधात आमरण उपोषण करणार असून कामकाजदेखील होऊ देणार नाही, असा इशारा गटनेते राजेंद्र यादव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Tuesday, June 29, 2021

डॉ नचिकेत वाचसुंदर याना मातृशोक

कराड 
येथील धन्वंतरी आयुर्वेद चे संचालक आयुर्वेदाचार्य डॉ नचिकेत वाचासुंदर यांच्या मातोश्री उर्मिला प्रभाकर वाचासुंदर यांचे दिनांक 28 जून रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्या ८० वर्षांच्या होत्या,
 त्यांचे राष्ट्र सेविका समिती, महिला मंडळ, श्रीयश महिला बचत गट याच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान होते . 
त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातू , नातसून असा परिवार आहे..

Monday, June 28, 2021

780 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 21 बाधितांचा मृत्यू

 सातारा दि.29 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 780 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 21 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 37 (8542),  कराड 286 (27503), खंडाळा 18 (11757), खटाव 51 (19508), कोरेगांव 61(16751), माण 29(13159),  महाबळेश्वर 3(4278), पाटण 39(8432), फलटण 32 (28351), सातारा 167 (40308), वाई 44 (12649) व इतर 13 (1325) असे आज अखेर एकूण 192563 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (192), कराड 7(808), खंडाळा 0 (149), खटाव 2 (486), कोरेगांव 1 (383), माण 0(260), महाबळेश्वर 0 (45), पाटण 1 (197), फलटण 2 (282), सातारा 6 (1231), वाई 2(333) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4366 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                                                0000

जिल्ह्यात 20 शासकीय रुग्णालयांमध्ये मेडीकल ऑक्सिजन निर्मिती होणार

सातारा दि.28 (जिमाका):  कुपर कार्पोरेशन प्रा.लि यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी केलेल्या करारानुसार सातारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये जनरेटर सेट बविण्याचे काम पूर्ण केले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा यांच्याशी केलेल्या करारानुसार अगदी नाममात्र भाडे तत्वावर जनरेटर सेट बसवून प्रशासनाला मदत केली आहे. अजुनही 5 जनरेटर सेट बसविणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.
             जिल्ह्यामध्ये 20 ठिकाणी शासकीय रुग्णालयांमध्ये मेडिकल ऑक्सिजन निर्मितीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मेडिकल ऑक्सिजन निर्मिती होणार असून भविष्यात येणाऱ्या कोविड विषाणूच्या तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणारे संच कुपर कार्पोरेशन प्रा.लि. यांनी बसविले आहेत. 
          फारुख एन कुपर आणि कुपर कॉपरेशन प्रा लि. यांनी केलेल्या या कामाची सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उल्लेखनीय बाब असून भविष्यात अशीच भरीव मदतीची अपेक्षा आहे. 
 0 0 00

497 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 9 बाधितांचा मृत्यू...

सातारा दि.28 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 497 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 9 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 15 (8505),  कराड 106 (27265), खंडाळा 16 (11739), खटाव 73 (19457), कोरेगांव 35(16690), माण 23(13130),  महाबळेश्वर 12(4275), पाटण 22(8393), फलटण 36 (28319), सातारा 135 (40241), वाई 17 (12605) व इतर 7 (1312) असे आज अखेर एकूण 191931 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (192), कराड 3(801), खंडाळा 0 (149), खटाव 3 (484), कोरेगांव 0 (382), माण 1(260), महाबळेश्वर 0 (45), पाटण 1 (196), फलटण 0 (280), सातारा 1 (1225), वाई 1(331) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4345 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                                                0000

सुभाषकाका पाटील यांच्या पत्रकार परिषदेची शहरात चर्चा... यावेळी तुम्ही पालिकेत एन्ट्री कराच..."लोकशाही' मानणाऱ्या जनतेची काकांना हाक...

वेध माझा ऑनलाइन
अजिंक्य गोवेकर
कराड
 दोन दिवसांपूर्वी लोकशाही गटाची पत्रकार परिषद झाली त्यामधून माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील संबोधित करणार ही पत्रकारांसाठी महत्वाची बातमीच होणार होती कारण अनेक नेते पत्रकार परिषदेत बोलतात... मात्र अभ्यासू बोलणे आणि वेळ पडली तर आपले सहकारी असोत किंवा विरोधक त्यांना शहराच्या भल्यासाठी खडे बोल सूनवणारे सुभाषकाकासारखे हातावरच्या बोटाईतकेच दिसून येतात... शहराची अचूक नाडी जाणणारे सुभाष काकांसारखे नेते कमी आहेत... त्यामुळे काका रिटायर्ड होऊ नका तुमची शहराला गरज आहे...यावेळी पुन्हा पालिकेत या...अशी  हाक "लोकशाही' मानणाऱ्यांकडून आता येत आहे...जिल्ह्यातील कोविड ची परिस्थिती हाताबाहेर जातेय असे वाटताच अजितदादांना जिल्ह्यात कोविड कंट्रोल करण्यासाठी बोलावण्यात आले...त्याच धर्तीवर पालिकेला बक्षीस मिळवण्याच्या नादात शहरातील रखडलेली अनेक कामे व अडकून राहिलेलं बजेट अशा अनेक विस्कटलेल्या कारभाराची स्थिती पुन्हा सुधारण्यासाठी काका पालिकेत हवेत असे आता "लोकशाही' मानणारे बोलताना दिसत आहेत...

दोन दिवसांपूर्वी शहरातील लोकशाही आघाडी गटाची पत्रकार परिषद झाली लोकशाहीचे मावळते अध्यक्ष सुभाषकाका पाटील यांनी लोकशाही आघाडीचे नूतन अध्यक्ष जयंतकाका पाटील यांच्यासह नवीन बॉडी ची घोषणा केली
यावेळी त्यांनी शहराच्या कारभाराविषयीची आपली मते आपल्या हटके स्टाईलने
मांडली...त्यामध्ये त्यांनी नाव न घेता काही "सेवकांना' चपराक देत नगरसेवक पदाची जबाबदारी काय असते...लोक मेहेरबान का म्हणतात...त्याचा अर्थ काय...हे सांगत नगरसेवक व गटनेत्याने रोज पालिकेत हजर असणे गरजेचे आहे असे सांगितले...गटनेता म्हणून सौरभ पाटील यांचे कौतुक करताना, दुसरीकडे गटनेता लोकांमधून निवडून येऊन सभागृहात असला पाहिजे हे देखील त्यांनी आपल्याच गटाच्या गटनेत्यांची निवड करताना  सांगितले हे विशेष...आणि  हे काकाच बोलू शकतात...स्पष्ट आणि परखड...लेकी बोले सुने लागे' या उक्तीप्रमाणे हेच बोलणे ते इतरांनाही उद्देशून बोलले का ? हा प्रश्न आहेच... पार्टी मीटिंग ची शिस्त सांगून त्याबाबतचे महत्वही त्यांनी त्यावेळी विशद केले... कोविड सारख्या महामारीत सहा ,सहा... महिने गायब होऊन केवळ निवडणूकीपूरते लोकांसमोर येणाऱ्या व शहर अडचणीत असताना जबाबदारी झटकणाऱ्यां नेते म्हणवणाऱ्यांचे कानदेखील त्यांनी उपटले... स्पष्ट आणि धडधडीत बोलणारा असा नेता एखादाच......

त्यांनी 2016 साली आमचं गणित चुकलं आता आम्हाला कोणी गृहीत धरू नये असे सांगून...लोकशाही गटाचे याच्याशी जुळणार की त्याच्याशी जुळणार...या शहरात सुरू असलेल्या चर्चेला त्यांनी विराम दिला...पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले...कारभाराचा तमाशा झालाय असे स्पष्ट सांगत चुकीच्या पुढारपणावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवत आत्तापर्यंत शहरात योग्य कामकाज झाले नाही हेही त्यांनी बोलून दाखवले...नगराध्यक्षांवर तर त्यांनी थेटच टीका केली... महत्वाचे म्हणजे माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव याच्या नगराध्यक्षा पदाच्या कारकिर्दीचे त्यांनी आवर्जून कौतुक केले...काही दिवसांपूर्वी जनशक्तीचे अध्यक्ष अरुण जाधव व शारदाताई जाधव यांचे फोटो आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या फ्लेक्स वर झळकले होते त्यातून जाधव गटाची भविष्यातील पालिका निवडणुकीतील भूमिका स्पष्ट झाली अशी चर्चा असतानाच आता सुभाषकाकांनी शारदाताईंच्या नगराध्यक्षापदाच्या कारकिर्दीचे कौतुक केल्याने पालिकेच्या निवडणुकीत भविष्यात हे दोन गट एकत्र येणार असल्याबाबत काकांनीच बोलता बोलता संकेत दिले की काय..? अशीही चर्चा त्यानंतर सुरू झाली आहे... या दोन गटाच्या माध्यमातून कराड दक्षिण-उत्तर चे आमदार एकत्र येतील असे मानले जातंय...असो...
सुभाष काका हे शहराचा सखोल अभ्यास असणारे नेते आहेत  झालेल्या पत्रकार परिषदेत तमाशा शब्द वापरून कारभाराचे वाभाडे काढताना त्यांनी शहराचा कल जाणून घेऊनच हे वक्तव्य केले असावे... त्याचवेळी आता आमच्याकडून लोकांना अपेक्षा आहे आम्हाला कोणी गृहीत धरू नये असेही त्यांनी ठामपणे बोलून दाखवले... स्पष्ट बोलून विरोध करणे किंवा समर्थन करणे हा त्यांचा स्वभाव... त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रशासन आणि राजकारण यांचा समतोल राखत विकासकामे केल्याची अनेक उदाहरणे आहेत त्यांच्यावर विरोधकांकडून अनेकवेळा टिकादेखील झाल्या आहेत...वचक असणारे नेते म्हणून ते शहराला परिचित आहेत... त्यांच्या अभ्यासाची खऱ्या अर्थाने आता शहराला गरज असल्याचे मत व्यक्त होताना दिसतय... आणि आत्ताचा कारभार पहिला तर ते खरही आहे...अशीही चर्चा आहे...

Sunday, June 27, 2021

सहकार पॅनेलला विजयी करा... डॉ सुरेश भोसले

वेध माझा ऑनलाइन
रेठरे बुद्रुक : जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने 2015 साली कृष्णा कारखान्यात सत्तेवर आल्यानंतर, आम्ही अनेक अडचणीतून मार्ग काढत कृष्णा कारखान्याला आणि कारखान्याच्या सभासदांना पुन्हा वैभवाचे दिवस आणले आहेत. आता येत्या काळात आपल्या कृष्णा कारखान्याच्या साखरेचा ब्रँड देशभर पोहचविण्याचे आमचे उद्दिष्ट असून, त्यासाठी सभासदांनी आपले पाठबळ भक्कमपणे आमच्या पाठीशी उभे करून, सहकार पॅनेलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. 

जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे आयोजित प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद नामदेव धर्मे होते. 

व्यासपीठावर ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले, कारखान्याचे व्हॉईस चेअरमन व उमेदवार जगदीश जगताप, धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, दयानंद पाटील, गुणवंतराव पाटील, विलास भंडारे, लिंबाजी पाटील, संभाजीराव पाटील, दत्तात्रय देसाई, संजय पाटील, जे. डी.मोरे,
शिवाजी पाटील, बाजीराव निकम, सयाजी यादव, बाबासो शिंदे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, सौ. जयश्री पाटील, सौ. इंदुमती जाखले आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, आम्ही सत्तेवर आलो तेव्हा कारखाण्याची स्थिती अत्यंत वाईट होती. कामगारांना द्यायला पैसे नव्हते. तोडणी वाहतुकीसाठी पैसे नव्हते. डिस्टलरी बंद होती. अशा अडचणीच्या काळात आम्ही कारखाण्याची जबाबदारी स्वीकारली. आज 6 वर्षानंतर तुम्हाला दिसेल की आम्ही कारखाना सुस्थितीत आणला आहे. यंदाच्या एफआरपी रकमेतील तिसरा हफ्ता सभासदांनी मागितल्यास ती रक्कम दुसऱ्याच दिवशी देण्याची आमची तयारी आहे. 
2010 साली मनोमिलनाचा शब्द पाळायचा म्हणून कार्यकर्त्यांनी आग्रह केला तरी आम्ही त्यावेळी पॅनेल उभे केले नाही. पण त्यावेळी पॅनेल टाकले असते तर अविनाश मोहितेंचा उदय झालाच नसता आणि कारखान्याचे एवढे नुकसान झाले नसते. 

सभासदांची आणि कारखाण्याची कुठलीही फिकीर दोन्ही विरोधकांना नाही. विरोधकांनी खोट्या सह्या करून कोट्यवधींचे कर्ज उचलले. ज्यांनी कर्ज काढले नाही अशा 784 लोकांना बँकेच्या नोटीसा आल्याने या लोकांचे जीवन उद्धवस्त झाले आहे. हा गुन्हा दाखल झाला असून, यातील दोषी असणारे विरोधी गटाचे लोक जामीनावर बाहेर आहेत. ज्यांना या प्रकरणात शिक्षा झाली ते जामीनावर बाहेर असलेले लोक आता तुमच्यासमोर मते मागायला येत आहेत, हे लोकांनी लक्षात घ्यावे. 

आप्पा 30 वर्षे चेअरमन होते. मदनदादा 10 वर्षे चेअरमन होते. मी 12 वर्षे चेअरमन आहे. या काळात कारखाना खासगी झाला का? जेव्हा कारखाना चांगला चालत नाही त्यावेळीच तो खासगी होतो. किंबहुना तो विरोधकांच्या काळातच खासगी झाला असता, असे वाटते. सततच्या सत्तांतरामुळे कारखाण्याची मोठी अधोगती झाली. पण आता कारखान्याला स्थिरता मिळवून देण्याची गरज आहे. यासाठी सहकार पॅनेलला पाठबळ द्या, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले. 

डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, गेल्यावेळी आम्ही मोफत साखरेचा शब्द दिला होता तो नक्की पूर्ण केला. यावेळी आम्ही शब्द देतोय की आता ही मोफत साखर घरपोच करू. अनेकांना हे शक्य वाटत नाही. पण तुम्ही सुरेशबाबांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेल निवडून द्या. या दिवाळीच्या आधी प्रत्येकाच्या घरात साखरेचे पोते आम्ही घरपोच करतो. 

जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास तोपर्यंत कृष्णा कारखाना खासगी होणार नाही. तो सहकारीच राहील, हा आमचा शब्द आहे. आज आम्ही अनेक सहकारी संस्था चालवितो. पण त्यातील एक तरी संस्था खासगी झाली का? हे दाखवून द्या. कोरोनाच्या काळात एकही पैसा न घेता कृष्णा हॉस्पिटलने काम केले. सुरेशबाबांनी स्वतः कोरोना उपचारात सहभाग घेतला. पण आमच्या चुलत्यांनी मात्र डॉक्टर असतानाही दवाखाना बंद करून रेठऱ्यात राहणे पसंत केले. अशी त्यांची कामगिरी असून, लोकांना ती चांगली माहिती आहे. विरोधक आमच्यावर वैयक्तीक टीका करतात, पण कारखान्याच्या कारभाराबाबत मात्र बोलत नाहीत. कारण त्यांच्याकडे बोलायला मुद्देच नाहीत. स्वार्थासाठी मनोमिलन करणारे आज एकमेकांवर बोलायला लागले आहेत. असल्या स्वार्थी लोकांपासून सभासदांनी सावधान राहावे आणि पारदर्शक काम करणाऱ्या सहकार पॅनेलला मतदान करावे, असे आवाहन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.

मदनराव मोहिते म्हणाले, की २०१० साली अपघाताने सत्तेवर आलेल्या अविनाश मोहितेंनी कारखाना चालवायला चक्क गडी ठेवला. त्याने कारखान्याचे मोठे वाटोळे झाले. या लोकांनी ७८४ लोकांना कर्जात ढकलले. या कर्ज प्रकरणातून व कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठीच त्यांना सत्तेची हाव आहे. अशा लोकांना कारखान्यापासून दूर ठेऊन, कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सहकार पॅनेलला विजयी करा.

यावेळी माजी संचालक संपतराव थोरात, माणिकराव जाधव, जि. प. सदस्या सौ. श्यामबाला घोडके, सरपंच सौ. सुवर्णा कापूरकर, शेतीमित्र अशोकराव थोरात, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, संग्राम पाटील, संचालक पांडुरंग होनमाने, व्ही. के. मोहिते, ब्रम्हानंद पाटील, मनोज पाटील आदींसह सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. 


सहकार पॅनेलला रेकॉर्डब्रेक मतदान करा -देवराष्ट्रे येथील प्रचारसभेत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे आवाहन...

वेध माझा ऑनलाइन
देवराष्ट्रे : कृष्णा कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने माणुसकीचा जिव्हाळा जपला आहे. त्यांच्या काळात कृष्णा कारखान्याची मोठी प्रगती झाली असून, शेतकरी सभासदांच्या ऊसाला चांगला दर मिळाला आहे. म्हणूनच उत्तम प्रशासक असणाऱ्या डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलला कडेगाव तालुक्यातील सभासदांनी रेकॉर्डब्रेक मतदान करावे, असे आवाहन माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

व्यासपीठावर चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले, उमेदवार बाबासो शिंदे, शिवाजी पाटील, महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, सांगली जि. प. सदस्या शांताताई कनुंजे, सभापती मंगलताई क्षीरसागर, कृष्णा कारखान्याचे संचालक ब्रिजराज मोहिते, पांडुरंग होनमाने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की गेल्या ६ वर्षात अनेक अडचणींतून मार्ग काढत आम्ही कृष्णा कारखान्याला प्रगतीपथावर आणले आहे. येत्या काळात कारखाना एक नंबरला नेण्याचे आमचे उद्दिष्ट असून, याकामी आपल्या सर्व सभासदांचे पाठबळ आवश्यक आहे. यासाठी सहकार पॅनेलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे. 

कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, की घाटमाथ्यावर संपतराव देशमुख (आण्णा) यांच्यापासून नेहमीच देशमुख कुटुंब आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. पृथ्वीराजबाबा व संग्रामभाऊ यांचे कार्यकर्ते आमच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याने, सहकार पॅनेलचा विजय निश्चित आहे. 

यावेळी शिवराज जगताप, के. के. मोहिते, शेतकरी संघटनेचे नेते विलास कदम, केशव पाटील, कृष्णत मोकळे, अशोक पाटील,  हणमंतराव जाधव, भारत पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


977 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 15 बाधितांचा मृत्यू


  सातारा दि.27 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 977 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 15 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 25 (8490),  कराड 255 (27159), खंडाळा 38 (11723), खटाव 95 (19384), कोरेगांव 97(16656), माण 48(13107),  महाबळेश्वर 18(4263), पाटण 53(8371), फलटण 91 (28283), सातारा 217 (40106), वाई 25 (12588) व इतर 15 (1305) असे आज अखेर एकूण 191435 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (192), कराड 4(798), खंडाळा 0 (149), खटाव 2 (481), कोरेगांव 2 (382), माण 3(259), महाबळेश्वर 0 (45), पाटण 1 (195), फलटण 0 (280), सातारा 2 (1224), वाई 1(331) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4336 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                                                0000

Saturday, June 26, 2021

सातारा जिल्ह्यात 1005 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 18 बाधितांचा मृत्यू

  सातारा दि.26 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1005 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 18 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 25 (8465),  कराड 246 (26904), खंडाळा 38 (11685), खटाव 158 (19289), कोरेगांव 73(16559), माण 56(13059),  महाबळेश्वर 20(4245), पाटण 37(8318), फलटण 69 (28192), सातारा 224 (39893), वाई 44 (12563) व इतर 5 (1290) असे आज अखेर एकूण 190462नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (192), कराड 8(794), खंडाळा 0 (149), खटाव 1 (479), कोरेगांव 0 (380), माण 1(256), महाबळेश्वर 1 (45), पाटण 1 (194), फलटण 0 (280), सातारा 4 (1222), वाई 1(330) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4321कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                                                0000

कराड पालिकेच्या घंटागाडीवर काम करणाऱ्या युवकाचा खून...शहरात खळबळ

कराड/ येथील नगर पालिकेच्या घंटा गाडीवर काम करणार्‍या यूवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे गोवारे-चौंडेश्‍वरीनगर येथे डोक्यात दगड घालून या युवकाचा खून करण्यात आला आहे  किरण लादे (वय 27) असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही 

सबंधित घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोचले. येथील बुधवार पेठेत या खून झालेल्या युवकाचे राहते घर आहे हा युवक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घंटा गाडीवर कामाला होता. नुकताच त्याचा पगारदेखील झाला होता अशी चर्चा आहे खुनाचे कारण व खुन्याचा शोध पोलीस घेत आहेत

पृथ्वीराजबाबांनी टोचले पटोलेंचे कान ; पृथ्वीराजबाबा म्हणाले ...राज्यातील आघाडी सरकार पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल...इंडियन एक्सप्रेस ला दिली मुलाखत...

वेध माझा ऑनलाइन
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कान टोचले आहेत. पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर प्रतिक्रिया देताना तीन पक्षांची आघाडी तोडण्याचा काँग्रेसचा कुठलाही विचार नाही, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसचा महाविकास आघाडीला पाच वर्षे पूर्णपाठिंबा राहिलं असंही त्यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

चव्हाण म्हणाले, "तीन पक्षांच्या युतीनं जे महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आहे, ते काँग्रेस तोडणार नाही. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, महाविकास आघाडी सरकार आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. भाजपला सरकारबाहेर ठेवण्यासाठी ही आघाडी तयार झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बाजूने या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा प्रश्नच येत नाही."

Friday, June 25, 2021

चारचाकी वाहनासाठी MH 11- DA ही मालिका सुरु ;

सातारा दि. 25 (जि.मा.का.) : चारचाकी वाहनासाठी MH 11-DA  ही 1 ते 9999 क्रमांकापर्यंतची नवीन मालिका 29  जून 2021 रोजी  उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरु करण्यात येणार असून इच्छुक वाहन धारक या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमानुसार फी भरुन आरक्षित करु शकतील तसेच चारचाकी मालिकेतील क्रमांक इतर वाहनांसाठी हवा असल्यास नियमानुसार तिप्पट फी भरुन नोंदणी क्रमांक देण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  विनोद चव्हाण, यांनी कळविले आहे.
पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्याकरिता पुढीलप्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. ' प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'  या तत्वानुसार नोदणी क्रमांक काटेकोरपणे नेमून देण्यात येतील.   अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार नियम 1989 च्या नियम 5 अ मध्ये विहीत केलेल्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल.  आकर्षक नोंदणी क्रमांक संगणकीय वाहन 4.0 या प्रणालीवर देण्यात येत असल्यामुळे अर्जासोबत आधार कार्ड  ई-मेल आयडी,  मोबाईल नंबर,पिनकोड नंबर देणे बंधनकारक आहे.
एकापेक्षा अधिक अर्जदारांनी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज केल्यास अशा प्रकरणात अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जादा रकमेचे डीमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सादर करणे आवश्यक आहे. जो अर्जदार सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करेल त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. उर्वरीत अर्जदारांना धनाकर्ष त्वरीत परत देण्यात येतील. आकर्षक नंबर आरक्षित केल्यानंतर 30 दिवसांच्या आत वाहन धारकांनी वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक आहे, असेही श्री. चव्हाण, यांनी कळविले आहे.
0000

814 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 25 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.25 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या 
रिपोर्टनुसार 814 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 25 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 14 (8430),  कराड 213 (26684), खंडाळा 47 (11647), खटाव 77 (19131), कोरेगांव 51(16486), माण 47(13003),महाबळेश्वर 3 (4225), पाटण 66(8281), फलटण 49 (28123), सातारा 189 (39769), वाई 48 (12519) व इतर 10 (1285) असे आज अखेर एकूण 189583 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 2 (191), कराड 10(786), खंडाळा 2 (149), खटाव 1 (478), कोरेगांव 0 (380), माण 2(255), महाबळेश्वर 0 (44), पाटण 0 (193), फलटण 0 (280), सातारा 8 (1218), वाई 0(329) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4303 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                                                0000

Thursday, June 24, 2021

राज्यात पुन्हा लागू होणार कडक निर्बंध...?डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होऊ नये म्हणून घेतली जाणार खबरदारी ? तिसऱ्या लाटेचीही आहे भीती...

कराड
वेध माझा ऑनलाइन
राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रुग्ण आहेत. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होऊ नये तसेच डेल्टा प्लस व्हेरियंट तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ शकतो, हा धोका ओळखून राज्य सरकार निर्बंध कडक करण्याच्या तयारीत असल्याचं समजते.

कोरोना रुग्णांचे साप्ताहिक प्रमाण आणि ऑक्सिजन बेडची व्याप्ती या दोन निकषांच्या आधारे राज्यातील जिल्ह्यांची पाच लेव्हलमध्ये विभागणी करण्यात आली होती.
दर आठवड्याला परिस्थितीनुसार निर्बंध कमी जास्त प्रमाणात लागू करण्याचे धोरण सध्या राज्यात आहे. सध्याच्या निर्बंध शिथिलीकरणाच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात असून हे निकष अधिक कठोर करण्यात येणार आहेत असे समजते तसेच गर्दी टाळण्यासाठी नियम अधिक कठोर करून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांच्या वेळाही कमी करण्यात येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे

879 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 23 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.24 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या 
रिपोर्टनुसार 879 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 23 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 18 (8416),  कराड 266 (26471), खंडाळा 46 (11600), खटाव 54 (19054), कोरेगांव 62(16435), माण 73(12956),महाबळेश्वर 6 (4222), पाटण 65(8215), फलटण 77 (28074), सातारा 170 (39580), वाई 32 (12471) व इतर 10 (1275) असे आज अखेर एकूण 188769 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 0 (189), कराड 9(776), खंडाळा 0 (147), खटाव 2 (477), कोरेगांव 1 (380), माण 0(253), महाबळेश्वर 0 (44), पाटण 1 (193), फलटण 1 (280), सातारा 9 (1210), वाई 0(329) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4278 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                                              0000

Wednesday, June 23, 2021

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले...या सरकारला कसलाही धोका नाही...आ पृथ्वीराज चव्हाणांनी दिली खात्री...

वेध माझा ऑनलाइन
शिवसेना आणि भाजपाची युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीच्या निमित्ताने नवं राजकीय समीकरण पहायला मिळाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करत राज्यात सत्ता मिळवली. दरम्यान काँग्रेस आणि शिवसेनेतील वैचारिक मतभेदावरुन नेहमीच विरोधक दोन्ही पक्षांवर निशाणा साधत असतात. राज्यातही अनेकदा दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेसोबतच्या संबंधांवर आपले स्पष्ट मत मांडलं आहे.
शिवसेनेसोबत असणाऱ्या वैचारिक मतभेदासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “तुम्ही त्याकडे हवं तसं पाहू शकता. पण हे सरकार एका विशिष्ट ध्येयाने तयार करण्यात आलं आहे. आम्ही शिवसेनेची विचारसरणी सहन करु शकतो, पण भाजपाला अजिबात नाही”.दरम्यान भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्याच्या दृष्टीकोनातूनच आमचे हे सरकार स्थापन करण्यात आले आहे या सरकारला कसलाही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधी शिवसेनेपासून सावध भूमिका घेतात का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी, “हे खरं नसून दिल्लीत युती झाल्याची माहिती दिली. शिवसेनेच्या पार्श्वभूमीमुळे थोडीशी भीती होती, पण आम्ही राष्ट्रीय नेतृत्वाला संमत केलं”.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात आलं आहे का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी नकार दिला. “अजिबात नाही. भाजपाला बाहेर ठेवण्याच्या दृष्टीकोनातूनच हे सरकार स्थापन करण्यात आलं होतं. त्यांनी राज्यात सर्व गोंधळ घातला होता. आमचं उद्दिष्ट अद्यापही तेच आहे. काँग्रेस काही जिल्ह्यांमध्ये इतकी मजबूत नसून आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.
पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असावा असं तुम्ही म्हटलं आहे असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “काँग्रेस महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर आहे. जर काँग्रसेची पहिल्या क्रमांकावर येण्याची इच्छा असेल तर त्यात चुकीचं काय?. जर आमच्या आमदारांची संख्या जास्त असेल तर आमचा मुख्यमंत्री होईल. आतापर्यंत अशीच पद्धत राहिली आहे”.

महाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक ; आज ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस

मुंबई, दि.२३: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने आज सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांकाची नोंद करीत ६ लाख २ हजार १६३ नागरिकांना लस दिली. एकाच दिवशी एवढ्या संख्येने लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. लसीकरणाची विक्रमी कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. 
काल एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना  लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविला होता.

लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. आतापर्यंत सुमारे २ कोटी ९१ लाखांहून अधिक  लस मात्र राज्यात देण्यात आल्या आहेत. 
आज दिवसभरात ६ लाख २ हजार नागरिकांचे लसीकरण झाले.  सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. 

अजय जाधव..२३.६.२०२१

कराड पालिकेने प्रीतिसंगम बागेत वावर असणाऱ्या वटवाघलांचा बंदोबस्त करावा ; सातारा जिल्हा मनसेची निवेदनाद्वारे मागणी...

वेध माझा ऑनलाइन
कराड
 सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच  वटवाघळापासून निपाह या नवीन पसरत असलेल्या व्हायरसचा धोका उदभवत असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे निरीक्षण आहे त्याच पार्शवभूमीवर येथील म न से च्या वतीने प्रीतिसंगम बागेत मोठ्या प्रमाणात वावर असणाऱ्या  वटवाघलांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नगरपरिषदेकडे केली आहे

महाराष्ट् नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष ऍड.विकास पवार, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, शहर अध्यक्ष सागर बर्गे,जिल्हा संघटक नितीन महाडिक,शहर उपाध्यक्ष अमोल हरदास,सतिश यादव यांनी आज या मागणी बाबतचे निवेदन  मुख्याधिकारी रमाकांत डाके याना आज दिले .
 येथील प्रीतीसंगम बागेत फार मोठया प्रमाणात वाटवाघलांचा त्याठिकाच्या असणाऱ्या मोठ्या वृक्षांवर वावर दिसतो. वटवाघलांमुळे अनेक रोग पसरतात असे तज्ञांचे मत आहे. त्यातच आता वाघळांमुळे निपाह या नवीन व्हायरसचा प्रसार होत असल्याचा धोका वैद्यकीय तज्ञ बोलून दाखवत आहेत जिल्ह्यात महाबलेशवर येथे नुकतेच याबाबतच्या झालेल्या परीक्षणात ते स्पष्टही झाले आहे आणि म्हणूनच शहराचे आरोग्य जपण्यासाठी खबरदारी म्हणून येथील प्रीतिसंगम बागेतील वाटवाघलांचा आत्तापासूनच बंदोबस्त पालिकेने करावा अशी मागणी मनसे ने केली आहे....

आशा स्वयंसेविकांना 1 जुलैपासून 1500 रुपयांची वाढ- आरोग्यमंत्री राजेश टोपे...

 मुंबई, दि. 23 : राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना 1 जुलै 2021 पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि 500 रुपये कोविड भत्ता असे 1500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर केला. ‘आशां’ना विशेष भेट म्हणून स्मार्ट फोन देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेअंती आशा आणि गटप्रवर्तकांचा संप मागे घेत असल्याची घोषणा कृती समितीचे अध्यक्ष एम.के. पाटील यांनी यावेळी केली. उद्यापासून राज्यातील आशा स्वयंसेविका कामावर हजर होतील, असेही त्यांनी सांगितले.

            सुमारे आठवडाभरापूर्वी विविध मागण्यांसंदर्भात आशा स्वयंसेविकांनी संप पुकारला होता. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या होत्या. राज्य शासनाने आशा स्वयंसेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला असून त्याचा राज्यातील 68 हजार 297 आशा सेविका आणि 3 हजार 570 गट प्रवर्तक यांना लाभ होणार आहे.

            आज आरोग्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी आरोग्य आयुक्त डॉ.रामास्वामी, सहआयुक्त डॉ.सतीश पवार, कृती समितीचे शुभा शमीम, राजू देसले, शंकर पुजारी, आशा सेविकांच्या प्रतिनिधी सुमन कांबळे आदी उपस्थित होते.

            बैठकीत झालेल्या चर्चेबाबत सविस्तर माहिती देताना आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले, आशा सेविकांच्या संपाबाबत तीन बैठका घेतल्या. यावेळी झालेल्या चर्चेअंती आशा सेविकांना 1 जुलै 2021 पासून अचूक संकलन व सादरीकरणासाठी एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि 500 रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 1 जुलैपासून आशा सेविकांना 1500 रुपयांची वाढ मिळणार आहे. तर गट प्रवर्तकांना 1200 रुपये निश्चित मानधन वाढ आणि 500 रुपये कोविड भत्ता असे एकूण 1700 रुपयांची वाढ मिळणार असून त्यासाठी राज्य शासन प्रतिवर्ष 202 कोटी रुपये खर्च करणार आहे.

            पुढच्या वर्षी जुलैमध्ये आशांना 500 रुपयांची वाढ देण्याचा निर्णय देखील करण्यात आला असून आशांच्या कामाचा त्यांना मिळणारे मानधन या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी ‘यशदा’ मार्फत समिती स्थापन करण्यात येईल. त्यामध्ये संघटनेचा प्रतिनिधी असेल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आशांना स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे प्रोत्साहन भत्ता दिला जातो. आर्थिक परिस्थितीनुसार हा भत्ता देण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना शिफारस केली जाईल, असे सांगतानाच कोरोनावरील लसीकरणासाठी गर्दीचे व्यवस्थापन करण्याकरिता आशांना 200 रुपये अतिरिक्त भत्ता दिला जाईल. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात आशांकरिता ‘निवारा केंद्र’ उपलब्ध करुन देण्याबाबत यंत्रणेला सूचना देण्यात येतील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

            आशांना मिळणाऱ्या मानधनाचा लेखी तपशिल देण्याकरिता लेखी चिठ्ठी देण्यात येईल. एएनएम आणि जीएनएम या संवर्गात शिक्षणाकरिता 2 टक्के आरक्षण आशांसाठी असून या पदांच्या कंत्राटी सेवेसाठी त्यांना प्राधान्य दिले जाईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोना काळात आशा व त्यांच्या कुटूंबियांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचाराची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

            आशांनी केलेले काम उल्लेखनिय असून त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने नेहमीच कौतुक केले आहे. गेल्या वर्षी राज्य शासनाने आशा आणि गटप्रवर्तकांना 2 हजार रुपयांची वाढ केली आहे. राज्यात संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आशांनी ग्रामीण भागात अधिक प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

            यावेळी कृती समितीच्या वतीने श्री.पाटील, डॉ.डी.एल. कराड यांनी आरोग्यमंत्री आणि शासनाचे आभार मानत संप मागे घेत असल्याची घोषणा केली.

००००

अजय जाधव/विसंअ/23.6.21

830 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 16 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.23 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 830 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 16 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
           तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 19 (8398),  कराड 160 (26205), खंडाळा 17 (11554), खटाव 98 (19000), कोरेगांव 82 (16373), माण 87 (12883), महाबळेश्वर 2 (4216), पाटण 59 (8150), फलटण 36(27997), सातारा 224 (39409), वाई 33 (12439) व इतर 13 (1265) असे आज अखेर एकूण 187889 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 1 (189), कराड 1 (767), खंडाळा 0 (147), खटाव 1 (475), कोरेगांव 3 (379), माण 1(253), महाबळेश्वर 0 (44), पाटण 1 (192), फलटण 1 (279), सातारा 5 (1201), वाई 2(329) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4255 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Tuesday, June 22, 2021

वेध माझा ऑनलाइन
कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या न्याय व हक्कासाठी मी कारखान्याच्या निवडणुकीत उतरलो आहे. यशवंतराव मोहिते व पतंगराव कदम या गुरु व शिष्याचे नाते सर्वांना माहिती आहे. भाऊंचे विचार कुठेतरी डावलले जात असल्याची लोकभावना ऐकल्यानंतर मी त्यांचे विचार पुन्हा कारखान्यात रुजवण्यासाठी निवडणुकीत उतरलो आहे. असे सांगून सत्ताधारी मंडळींवर लोकांची तीव्र नाराजी आहे. सत्ताधाऱ्यांचे ऊस तोडीचे राजकारण, मयत सभासदांच्या वारसांना डावलण्याची भूमिका सभासदांना पसंत नाही. त्यामुळे त्यांची सत्ताच येणार नाही. त्याच धर्तीवर ऊसतोड देणार नाही. कामावरून कमी करतो या त्यांच्या भीतीला घाबरु नका. असे मत राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. विश्वजित कदम यांनी व्यक्त केले.

यशवंतराव मोहिते रयत पॅनेलच्या प्रचारार्थ मालखेड, बेलवडे बुद्रुक व कालवडे (ता. कराड) येथील दौऱ्यात ते बोलत होते. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, जखिणवाडी गावचे आदर्श सरपंच नरेंद्र नांगरे पाटील, उमेदवार मनोहर थोरात, गणेश पाटील, प्रशांत पाटील, बापूसाहेब पाटील, शंकरराव रणदिवे, मालखेडचे सरपंच इंद्रजित ठोंबरे, उपसरपंच युवराज पवार, बेलवडे बुद्रुकचे भारत मोहिते, विकास मोहिते, कालवडेचे सरपंच सुदाम मोटे, बाबुराव मोटे, संताजी थोरात, भानुदास थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. कदम म्हणाले, यशवंतराव मोहिते यांनी कृष्णाकाठी सहकारास जन्म दिला. शेती ही जात व शेतकरी हा धर्म मानून कृष्णाकाठी त्यांनी नंदनवन फुलवले. एकेकाळी कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून कराड तालुक्यातील अर्थकारण चालायचे. परंतु गेल्या दहा वर्षात ही आर्थिक घडी विस्कटली आहे. भाऊंच्या घरच्या मंडळींनी भाऊंच्या विचारांशी फारकत घेतली. हे मान्य करता येईल. परंतु दुसऱ्या काही शक्तींनी भाऊंचा विचार संपवला. हे चित्र बदलले पाहिजे. सभासदांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत, हीच माझी भूमिका आहे. यासाठी रयत पॅनेलच्या प्रचारात मी उतरलो आहे.

ते म्हणाले, गेल्या दहा वर्षात पक्ष आणि व्यक्ती बघून कृष्णा कारखान्यात कारभार झाला आहे. त्यातून सभासदांना ऊसतोड न देणे, मयत सभासदांच्या वारसांना शेअर्स देताना दुजाभाव केला जात आहे. गेल्या पाच वर्षात 8 हजार सभासदांना सभासदत्व देण्यापासून डावलले गेले. यामागे सत्ताधारी मंडळींचा वेगळा डाव आहे. भाऊंचे विचार पुन्हा कारखान्यात आणण्याची लढाई लढायची आहे. व ती जिंकायची आहे, त्यासाठी सज्ज रहा. असेही ते शेवटी म्हणाले. गीतांजली थोरात यांनी प्रास्ताविक केले. बी. वाय. थोरात यांनी आभार मानले.
-----------------------
कालवडे : येथील प्रचार बैठकीत बोलताना ना. विश्वजित कदम, बाजूस उमेदवार व पदाधिकारी.
----------------------

पृथ्वीराज चव्हाण होणार नवे विधानसभा अध्यक्ष...? राज्यात पुन्हा चर्चा...संग्राम थोपटे,प्रणिती शिंदे यांच्याही नावाची चर्चा...घडामोडीना वेग...


वेध माझा ऑनलाइन
कराड / विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, सातारा जिल्हा काँग्रेसचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे. चव्हाण, थोपटे यांच्यासह प्रणिती शिंदे यांच्या नावाचाही त्यामध्ये समावेश आहे. सध्या या चर्चेबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेगराज्यात 2019 ला महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नव्हता. परंतु, विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. अध्यक्षपदासाठी त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे भाजपामधून काँग्रेसवासी झालेल्या नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदावर वर्णी लागली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी पटोलेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे दि. 4 फेब्रुवारीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरीचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष असलेले नरहरी झिरवाळ हे हंगामी विधानसभा अध्यक्ष आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभा अध्यक्षपदासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांचे नावही चर्चेत आहे. तथापि, या संदर्भात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

788 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 18 बाधितांचा मृत्यू

  सातारा दि.22 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 788 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 18 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
           तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 24(8379),  कराड 195 (26045), खंडाळा 32(11537), खटाव 86(18902), कोरेगांव 77(16291), माण 86 (12795), महाबळेश्वर 3 (4214), पाटण 38 (8091), फलटण 74 (27961), सातारा 139 (39185), वाई 25 (12406) व इतर 9 (1252) असे आज अखेर एकूण 187058 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
  जावली 1(188), कराड 3(766), खंडाळा 0 (147), खटाव 2 (474), कोरेगांव 3 (376), माण 1(252), महाबळेश्वर 0 (44), पाटण 2 (191), फलटण 1 (278), सातारा 3 (1196), वाई 2(327) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4239 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Monday, June 21, 2021

461 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 17 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.21 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 461 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 17 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
           तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 18(8355),  कराड 108 (25850), खंडाळा 10(11505), खटाव 37(18816), कोरेगांव 42(16214), माण 13 (1212709), महाबळेश्वर 1 (4211), पाटण 45 (8053), फलटण 22 (27887), सातारा 141 (39112), वाई 22 (12381) व इतर 2 (1243) असे आज अखेर एकूण 186336 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
  जावली 2 (187), कराड 7(763), खंडाळा 0 (147), खटाव 0(472), कोरेगांव 1(373), माण 1(251), महाबळेश्वर 0 (44), पाटण 2 (189), फलटण 0 (277), सातारा 3 (1193), वाई 1(325) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4221कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Sunday, June 20, 2021

भोसलेंनी "कृष्णेच्या' सत्तेतून स्वतःचा स्वार्थ साधला... विंग येथे रयत पॅनेलच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ना विश्वजीत कदमांचा घणाघात...

वेध माझा ऑनलाइन
कराड, प्रतिनिधी : कृष्णेच्या सभासदांना ऊस दरासाठी परिवर्तन हवे आहे. ज्यांनी आजपर्यंत कारखान्याच्या सत्तेतून स्वतःचा स्वार्थ साधला. व सभासदांना केवळ दिवास्वप्ने दाखवली. त्यांना रयत पॅनेलची शिट्टी वाजवून या निवडणुकीत घरी बसवा. कामावरून काढून टाकतो. असा डोस देणाऱ्यांची संस्था चाळीस एकरात आहे. पण भारती विद्यापीठ चारशे एकरात आहे. याची त्यांना जाणीव असावी. असा अप्रत्यक्ष टोला सुरेश भोसले व अतुल भोसले यांना नाव न घेता लगावत सभासदांनी काळजी करू नये, मी तुमच्या पाठीशी आहे. अशी ग्वाही राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. विश्वजित कदम यांनी दिली. तर कृष्णा कारखान्यात सर्व उच्चांकी घडतेय, असे म्हणणारे सत्ताधारी ऊसदर देण्यात मागे का आहेत. ऊस दराबाबत मग कारखाना कामकाजात कोरोना झाला आहे का? असा सवाल डॉ. इंद्रजित मोहिते यांनी यावेळी उपस्थित केला.

विंग (ता. कराड) येथे यशवंतराव मोहिते रयत पॅनेलच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ना. कदम व डॉ. मोहिते बोलत होते. कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड उत्तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष अविनाश नलवडे, कराड दक्षिण महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विद्याताई थोरवडे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, निवासराव थोरात, धनाजी बिरमुळे, सदस्या मंगल गलांडे, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, वैशाली वाघमारे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, विंगच्या सरपंच शुभांगी खबाले, आदित्य मोहिते, रामराव नांगरे- पाटील, कृष्णेचे माजी संचालक जयसिंगराव कदम, हणमंतराव पाटील, विलासराव पाटील, राजेंद्र चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर, सर्व उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.

ना. कदम म्हणाले, काही मंडळींनी सत्ता व स्वतःचे खिसे भरण्यासाठी व कारखाना पोकळ करण्याच्या भूमिकेने भाऊंचे विचार सोडले. सभासदांनी पुन्हा एकदा इंद्रजित बाबांच्या नेतृत्वावर विश्वास टाकावा. निश्चित तुमचे भविष्य उज्वल होईल. ही निवडणूक परिवर्तनाची लढाई आपण ताकदीने व हिम्मतीने लढायची आहे. 

डॉ. इंद्रजित मोहिते म्हणाले, गेल्या अकरा वर्षात भाऊंच्या विचारांना इजा पोहचवली आहे. विद्यमान संचालक मंडळाने १५ बिले दिली. यावर कोण बोलतय का? कारखान्याच्या मालकीच्या संस्था गिळंकृत केल्या. व खाजगी झाल्या आहेत. पण आपण विकेंद्रित सहकारी संस्था उभारू. कृष्णा कारखान्याचा सांभाळ करत तो वाढवायचा व प्रगतीपथावर न्यायचा आहे. यासाठी रयत पॅनेलला बहुमताने निवडून द्या.

ते म्हणाले, येत्या पाच वर्षात कारखाना सहकारी तत्वावरील कारखाना राहिला पाहिजे. हा आमचा आग्रह आहे. तो कारखाना सहकारी न राहता कोणत्या तरी एका खाजगी कारखान्याचे दुसरे युनिट होवू नये. किंवा एखाद्या चालबाज लेखणी बहादराच्या मालकीचा होवू नये, याची काळजी करावी.
मनोहर शिंदे म्हणाले, मतदानापासून वंचित ठेवणारे विद्यमान संचालक मंडळ आहे. सभासदांनी इंद्रजित मोहिते यांच्या कारभाराची तुलना इतरांशी करावी. कारखान्याला वेळ देणारे आणि अभ्यासू असलेल्या इंद्रजित बाबांना साथ द्यावी.
अशोकराव यादव यांनी प्रास्ताविक केले. शंकरराव खबाले यांनी स्वागत केले. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले. अधिकाराव गरुड, इस्लामपूरचे माजी नगरसेवक संपतराव पाटील, राजेंद्र चव्हाण यांची भाषणे झाली. अशोकराव यादव यांनी आभार मानले.

750 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 22 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.20 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 750 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 22 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
           तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 28(8337),  कराड 186 (25784), खंडाळा 34(11495), खटाव 149(18779), कोरेगांव 43(16172), माण 42 (12696), महाबळेश्वर 1 (4210), पाटण 44 (8008), फलटण 34 (27865), सातारा 159 (39071), वाई 21 (12359) व इतर 9 (1241) असे आज अखेर एकूण 186071 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 0 (185), कराड 8(756), खंडाळा 0 (147), खटाव 3(472), कोरेगांव 1(372), माण 1(250), महाबळेश्वर 0 (44), पाटण 2 (187), फलटण 1 (277), सातारा 5 (1190), वाई 1(324) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4202कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

जिल्ह्यात सरासरी 6 मि.मी. पाऊस...आतापर्यंत सरासरी 235.8 मि.मी.पावसाची नोंद...

 सातारा, दि.20 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरापासून  सरासरी एकूण 6 मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 235.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
            जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 5.0 (252.1) मि. मी., जावळी- 21.6 (397.8) मि.मी., पाटण-7.6 (327.1) मि.मी., कराड-7.9 (274.0) मि.मी., कोरेगाव-2.5 (163.7) मि.मी., खटाव-1.5 (111.8) मि.मी., माण- 0.6 (72.5) मि.मी., फलटण- 1.2 (82.9) मि.मी., खंडाळा- 5.0 (142.8) मि.मी., वाई-9.1 (253.9) मि.मी., महाबळेश्वर-8.0 (703.9) मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.
            कोयना धरणात आजअखेर 34.58 टीएमसी  (34.54 टक्के) एवढा उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण क्षेत्रात झालेल्या पावसाची आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी 45 (773) मि.मी. आहे.
0000

Saturday, June 19, 2021

756 जणांना दिला आज डिस्चार्ज

सातारा दि.19 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 756 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमूने – 971490*
*एकूण बाधित – 185270*
*घरी सोडण्यात आलेले – 173080*
*मृत्यू -4182*
*उपचारार्थ रुग्ण-8549*
00000

सातारा जिल्ह्यात 895 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 16 बाधितांचा मृत्यू

  सातारा दि.19 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 895 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 16 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
           तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 42 (8309),  कराड 231 (25598), खंडाळा 38 (11461), खटाव 46 (18630), कोरेगांव 84 (16129), माण 37 (12654), महाबळेश्वर 3 (4209), पाटण 65 (7964), फलटण 68 (27831), सातारा 226 (38915), वाई 43 (12338) व इतर 12 (1232) असे आज अखेर एकूण 185270 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 0 (185), कराड 6 (748), खंडाळा 1 (147), खटाव 4 (469), कोरेगांव 2 (371), माण 0(249), महाबळेश्वर 0 (44), पाटण 1 (185), फलटण 0 (276), सातारा 2 (1185), वाई 0(323) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4182 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

राजारामबापू दूध संघाचे चेअरमन विनायक पाटील यांचा सहकार पॅनेलला जाहीर पाठिंबा

वेध माझा ऑनलाइन
ताकारी, ता. १९ : राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांचे निकटवर्तीय, राजारामबापू दूध संघाचे चेअरमन व महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे माजी अध्यक्ष विनायक पाटील यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला. ताकारी (ता. वाळवा) येथे झालेल्या एका बैठकीत श्री. पाटील यांनी सहकार पॅनेलचे युवा नेते डॉ. अतुलबाबा भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत, सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी रेठरे हरणाक्ष – बोरगाव गटातील उमेदवार जितेंद्र पाटील, जे. डी. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आपला पाठिंबा जाहीर करताना विनायक पाटील म्हणाले, की वाळवा तालुक्यातील राजकारणात आम्ही नेहमीच जयंत पाटील साहेबांचे नेतृत्व मानतो. तर कृष्णा सहकार कारखान्याच्या बाबतीत आम्ही डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वाला पसंती देत आलो आहोत. अगदी आप्पासाहेबांच्यापासून आमचे भोसले कुटुंबियांशी सलोख्याचे संबंध राहिले आहेत. सर्वसामान्य सभासदाचे अडलेले कुठलेही काम त्वरीत करण्यात डॉ. सुरेशबाबा व डॉ. अतुलबाबा नेहमी तत्पर असून, सहकार पॅनेलच्या नेतृत्वाखालीच कृष्णा कारखान्याची प्रगतिशील वाटचाल शक्य आहे. म्हणूनच ताकारीसह या भागातील सर्वांनीच सहकार पॅनेलच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, की विनायकअण्णा हे ना. जयंत पाटील साहेबांचे विश्वासू शिलेदार असून, त्यांनी आपल्या सक्षम नेतृत्वाने राजारामबापू दूध संघाला नावारूपाला आणले आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे सहकार पॅनेलला मोठे बळ प्राप्त झाले आहे. सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पासाहेबांनी नेहमीच कृष्णा कारखाना राजकारणापासून अलिप्त ठेवला आहे. तोच वारसा जपत सभासदहित हा एकमेव उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन आम्ही कार्यरत आहोत आणि इथन पुढेही कार्यरत राहू. 
यावेळी सरपंच अर्जुन पाटील, शशिकांत पाटील, जगन्नाथ पाटील, शिवाजी पाटील, नानासाहेब महाडिक पतसंस्थेचे चेअरमन प्रा. प्रदीप पाटील, सुभराव पाटील, माजी उपसरपंच रवींद्र पाटील, सुभाष पाटील, सागर पाटील, जे. जे. पाटील व सर्व सभासद उपस्थित होते.

जिल्ह्यात सरासरी 37 मि.मी. पाऊस**आतापर्यंत सरासरी 227.1 मि.मी.पावसाची नोंद...

सातारा, दि.19जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज शुक्रवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 37 मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 227.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
            जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 42.5 (244.4) मि. मी., जावळी- 71.7 (367.2) मि.मी., पाटण-55 (319.5) मि.मी., कराड-31.4 (266.1) मि.मी., कोरेगाव-25.4 (161.2) मि.मी., खटाव-19.4 (110.3) मि.मी., माण- 11.6 (71.9) मि.मी., फलटण- 11.8 (81.7) मि.मी., खंडाळा- 46.6 (137.8) मि.मी., वाई-49.4 (244.8) मि.मी., महाबळेश्वर-73.4 (643) मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.
            कोयना धरणात आजअखेर 32.79 टीएमसी  (32.75 टक्के) एवढा उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण क्षेत्रात झालेल्या पावसाची आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी 143 (728) मि.मी. आहे.
0000

Friday, June 18, 2021

शिवसेना-राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येऊन लढणार...जयंत पाटील यांनी मिळवला राऊत यांच्या सुरात सूर...

वेध माझा ऑनलाइन
महाविकास आघाडी आगामी निवडणुका एकत्र आणि जोमाने लढेल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला केलं. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने स्वबळाची भाषा करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढेल असं पटोले सातत्याने सांगत आहेत. त्यावर  शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये सगळेच स्वबळावर लढत असतील तर या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्र हिताचा विचार करुन एकत्र लढावं लागेल, असं म्हटलंय. त्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना माध्यमांनी विचारलं असता त्यांनीही राऊतांच्या सुरात सूर मिसळल्याचं दिसत आहे. 

‘महाविकास आघाडीत 3 पक्ष आहेत. या 3 पक्षांनी एकत्र राहावं याला सगळ्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्र राहतील. त्या दृष्टीने सामनाने मत व्यक्त केल्याचं दिसत आहे आणि महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसत आहे, असं जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आतापासूनच व्यक्त केली जात आहे. कारण, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी भाजप स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलंय. तर नाना पटोलेही सातत्याने स्वबळाची भाषा करताना दिसून येत आहेत.

अजितदादांनी दिले माणुसकीचे दर्शन ; राज्यात झाली चर्चा...

वेध माझा ऑनलाइन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज शुक्रवारी दुपारी बीड येथील दौरा आटोपून उस्मानाबाद जिल्ह्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात येताच यावेळी  ऑफ ऑनर देण्यासाठी पोलिस कर्मचारी थांबले होते. प्रोटोकॉलनुसार पोलिसांकडून उपमुख्यमंत्री पवार यांना मानवंदना देण्यात येणार होती.
मात्र ज्या वेळेस पवार यांचा वाहनांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. त्या वेळेला मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला होता.  पोलीस पावसापासून बचाव व्हावा म्हणून आडोशाला थांबले होते. अजित पवार यांच्या गाडीचा ताफा येताच सर्व पोलिस कर्मचारी मानवंदना देण्याच्या तयारीला धावले. त्याचवेळी पवार मोटारीतून खाली उतरले. पाऊस जोरात येतोय असे अजितदादांच्या निदर्शनास आले. त्यामुळे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी पावसात भिजू नका, असे सांगत आतमध्ये आडोशाला जायचा सल्ला दिला

 पवार यांच्या या मानुसकीच्या दर्शनाची चर्चा पोलिसांच्या वर्तुळासह सम्पूर्ण राज्यात झाली. अखेर मानवंदना न स्वीकारतात अजित पवार जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप आढावा बैठकीला गेले.

रोटरी क्लब ऑफ कराड व रत्ननिधी चारिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय पुस्तकांचे मोफत वाटप... एवढ्या मोठ्या प्रमाणात मोफत पुस्तकांचे वाटप करण्याचा हा भारतातील दोन नंबरचा व महाराष्ट्रातील पहिला उपक्रम...

वेध माझा ऑनलाइन
कराड
रोटरी क्लब ऑफ कराड व रत्ननिधी चारिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.रोटरी चे गव्हर्नर हरीश मोटवाणी  यांच्या शुभहस्ते याचं वाटप करण्यात आले. 
यावेळी क्लब  प्रेसिडेंट रो. गजानन माने, सेक्रेटरी डॉ. रो. शेखर कोगणुळकर उपस्थित होते. 

कोरोना चे सर्व नियम पाळून फक्त 5 शाळांना प्राथमिक स्वरूपात या पुस्तकांचे  वितरण करण्यात आले. व बाकीच्या इतर शाळांना ही पुस्तकं शाळांमध्ये पोच करण्यात येणार आहे. 
कराड शहर व तालुक्यातील 123 शाळांमध्ये या पुस्तकाचं वाटप करण्यात आले
. एका शाळेमध्ये 70 संदर्भ पुस्तकांचा संच देण्यात आला.  या पुस्तकांचा लाभ दर वर्षी सर्वसाधारण 33 हजार विद्यार्थ्यांना होणार आहे .शालेय व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच संदर्भ पुस्तकांची आवश्यकता असते यामध्ये या संदर्भ पुस्तकांची कमतरता रोटरी ने पूर्ण केली आहे, मुंबईच्या रत्न निधी चॕरीटेबल ट्रस्ट च्या सहकार्यातून 123 शाळा आणि महाविद्यालयांमधील ग्रंथालयांना ही पुस्तक भेट म्हणून देण्यात आली आहेत.
या संदर्भ पुस्तकांमध्ये इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयोगात येणाऱ्या पुस्तकांचा समावेश आहे. 
एवढ्या मोठ्या  प्रमाणात विक्रमी पुस्तक वाटप करण्यासाठी क्लब चे लिटरसी डायरेक्टर व प्रोजेक्ट चेअरमन रो. जगन पुरोहित, झोनल फंक्शन लिटरसी डायरेक्टर रो. किरण जाधव रो. धनंजय जाधव,रो. रो.राजू खलीपे, रो.प्रवीण परमार,रो. जगदीश वाघ, रो. राजेश खराटे, रो. प्रबोध पुरोहित, रो चंद्रकुमार डांगे,रो.रणजीत शेवाळे, अमित भोसले, संजीवनी निकम, अमेया वाघ यांनी परिश्रम घेतले.

आज सातारा जिल्ह्यात 810 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि.18 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 810 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 *एकूण नमूने - 960228*
*एकूण बाधित - 184371*
*घरी सोडण्यात आलेले - 172324*
*मृत्यू -4166*
*उपचारार्थ रुग्ण-8410*

अत्यावश्यक नसलेली दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरु ठेवण्यास परवानगी- जिल्हादंडाधिकारी

सातारा दि. 18 (जिमाका) : कोविड बाधीत रुग्णांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची टक्केवारीच्या निकषानुसार सातारा जिल्हयाचा तिसऱ्या स्तरामध्ये समाविष्ट होत असलेने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 19/06/2021 रोजीचे 00.00 वा पासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

आर्थिक, सामाजिक क्रिया कलाप यावर खालील प्रमाणे निर्बध लागू करण्यात येत आहेत.

   सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वानुसार सातारा जिल्हयामध्ये आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 5.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5.00 वाजलेपासून ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात येत आहे. त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस संचार करण्यास मनाई करण्यात येत आहे.
  सातारा जिल्हयातील सर्व शाळा, महाविदयालये, कोचिंग क्लासेस पुर्णपणे बंद राहतील. तथापि, ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल. तसेच वैदयकीय महाविदयालये, नर्सिंग कोर्सेस चालू ठेवण्यास परवानगी असेल.  
अत्यावश्यक बाबीची दुकाने, आस्थापना या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 9.00 ते सायं 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास परवानगी असेल. मात्र मेडिकल, औषधांची दुकाने सकाळी 9.00 ते रात्रौ 8.00 वाजेपर्यंत चालू राहतील. तथापि, हॉस्पीटल मधील मेडिकल, औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी असेल. अत्यावश्यक नसलेली दुकाने,आस्थापना ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 09.00 ते सायं. 04.00 वा पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मॉल,  सिनेमागृहे (एक किंवा अनेक पडदी)/ नाटयगृहे इ. पुर्णपणे बंद राहतील.
 सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते सायं 04.00 या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंटस्‍ यांना आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 07.00 ते रात्रौ 08.00 या कालावधीत घरपोच पार्सल सेवा चालू ठेवण्यास परवानगी असेल. लॉजिंग, बोर्डींग चालू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच लॉजिंग मध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना सकाळी 07.00 ते सायं 04.00  या कालावधीतच रेस्टॉरंट मध्ये सेवा देता येईल व त्यानंतर त्यांचे वास्तव्य असलेल्या रुम मध्ये सेवा पुरविणे बंधनकारक असेल.
  सार्वजनिक जागा/खुली मैदाने/ चालणे/सायकल चालविणे साठी आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 या वेळेत परवानगी असेल. सर्व खाजगी कार्यालयांना सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी असेल. शासकीय/निम-शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देणेत येत आहे.  खुल्या जागेतील क्रिडा विषयक बाबी या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 या वेळेत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र कोणत्याही क्रिडासंबंधी स्पर्धा आयोजित करणेस मनाई असेल. चित्रीकरण - आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरण व वास्तव्य करणे बंधनकारक राहील. कोणतेही गर्दीचे व गर्दी होईल, असे चित्रीकरण करता येणार नाही. तसेच आयसोलेशेन बबलच्या बाहेर सायंकाळी 05.00 नंतर कोणालाही संचार, प्रवास करता येणार नाही. सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक/प्रार्थना स्थळे, करमणुक कार्यक्रम, मेळावे हे जागेच्या इत्यादी पुर्णपणे बंद राहतील. तथापि सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारीक / धार्मिक सेवा करता येतील. यावेळी कोणत्याही बाहेरील भक्तांस प्रवेश असणार नाही. मात्र शासकीय कार्यक्रमांसाठी जागेच्या 50% क्षमतेने आयोजीत करणेस परवानगी असेल.   सातारा जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करणेस मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात, एक हॉल, कार्यालयामध्ये एकच लग्न समारंभ दोन तासापेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीत 25 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी/वाढपी इ. सह) मर्यादेत लग्न आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील दि. 02/03/2021 च्या आदेशा मधील अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. याबाबत उल्लंघन झाल्यास संबंधित व्यवस्थापन यांचेकडून प्रथम वेळी रक्कम रुपये 25000/- दंड तसेच दुसऱ्या वेळी भंग झाल्यास रक्कम रुपये 1,00,000/- व फौजदारी कारवाई करावी. तसेच  कोविड -19 च्या अनुषंगाने निर्गमीत अटी व शर्तीचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधाचा भंग करणाऱ्या कुटूंबास रक्कम रु 25,000/- इतका दंड आकारला जाईल. शासनाचे दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही. तोपर्यत संबंधित मालमत्ता बंद राहील.
जास्तीत जास्त 20 नातेवाईक/ नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यविधी व दशक्रिया विधी करणेस परवानगी असेल.


बैठका/निवडणुक - स्थानिक संस्थांच्या, सहकारी संस्थाच्या सर्वसाधारण सभा या ज्या ठिकाणी सभा होणार अशा ठिकाणच्या मर्यादेच्या 50 टक्के क्षमतेने घेणेस परवानगी असेल.  सर्व बांधकामांना परवानगी असेल. ज्या मजुरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी असेल त्यांनी बांधकाम करणेस हरकत नाही तथापि, ज्या मजूरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी नसेल अशा मजूरांनी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत बांधकाम ठिकाण सोडावे
शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व  त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवांची दुकाने आठवडयाचे सर्व दिवशी सायं. 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास परवानगी असेल. तसेच शेती विषयक (मशागत) करणेची सेवा करणेस आठवडयाचे सर्व दिवशी सायंकाळी 04.00 वा पर्यत परवानगी असेल. 

 ई-कॉमर्सच्या वस्तू तसेच सेवा नियमितपणे चालू ठेवण्यास परवानगी असेल. व्यायामशाळा, केश कर्तनालय, सौदर्य केंद्रे, स्पा, वेलनेस सेंटर ही आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने फक्त अगोदर भेटीची वेळ (prior Appointment) ठरवून तसेच विना-वातानूकुलीत (Non AC) जागेसाठी सायंकाळी 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास परवानगी राहील.सार्वजनिक परिवहन बसेस सेवा या 100 टक्के क्षमतेने चालु ठेवण्यास परवानगी राहील. कोणत्याही प्रवाशास उभे राहून प्रवास करणेची परवानगी नसेल. मालवाहतूक वाहनामधून वाहन चालक, मदतनीस, क्लिनर किंवा इतर असे एकुण जास्तीत जास्त 3 व्यक्तीस प्रवासास परवानगी असेल. खाजगी वाहने, टॅक्सी, बसेस,  लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा आंतर जिल्हा प्रवास नियमीत सुरु राहील – परंतू सदर वाहनामधून स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्हयामधून येणाऱ्या प्रवाशास ई पास बंधनकारक असेल. उत्पादन क्षेत्र - निर्यातभिमुख यंत्रणा की ज्यामध्ये सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग  ज्यांना निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता आहे अशा यंत्रणा नियमितपणे चालू ठेवण्यास परवानगी असेल.  जीवनावश्यक वस्तू उत्पादन घटक (कोणत्याही वस्तूसाठी कच्चा माल / पॅकेजिंग तयार करणार आवश्यक वस्तू आणि घटक, वस्तू आणि संपूर्ण पुरवठा साखळी), सतत प्रक्रिया उदयोग की जे तातडीने थांबवता येत नाहीत आणि आवश्यक वेळ दिल्याशिवाय पुन्हा सुरु होवू शकत नाहीत. राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण यांचे अनुषंगाने महत्वाच्या घटकाची निर्मिती करणारे उदयोग.  डाटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर, आयटी क्षेत्रातील गंभीर पायाभूत सुविधांना सहाय्य करणारे प्रदाता - अशा यंत्रणा नियमितपणे चालू ठेवण्यास परवानगी असेल. उत्पादन -  उत्पादन क्षेत्रातील इतर उत्पादन  घटक जे आवश्यक, ‍निरंतर प्रक्रिया किंवा निर्यात देणाऱ्या घटकाअंतर्गत येत नाहीत अशा यंत्रणा 50% कर्मचाऱ्यांचे मर्यादेत चालू ठेवण्यास परवानगी असेल. सदर कर्मचारी यांची हालचाल TRANSPORT BUBBLE मध्ये असणे बंधनकारक राहील.


    शिवभोजन थाळी योजना चालू ठेवण्यास परवानगी असेल

सर्वसाधारण मार्गदर्शक सुचना -
  ज्या आस्थापनांना सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देणेत आली आहे., त्या आस्थापनावरील कर्मचारी यांना त्यांचे घरी पोहोच होणेसाठी सायं 05.00 वाजेपर्यंत प्रवास करणेस परवानगी असेल.  स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्हयामधून येणाऱ्या प्रवाशांना वैयक्तीक स्वतंत्र पास असणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या वाहनांना स्वतंत्र पासची आवश्यकता असणार नाही. कोविड-19 व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा 100% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह चालू राहतील. इतर सरकारी कार्यालयांबाबत सबंधित विभाग प्रमुख हे कर्मचाऱ्यांच्या आवश्यक जास्तीच्या उपस्थिती बाबतचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने घेवू शकतील.

अत्यावश्यक सेवांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल -
रुग्णालये,निदान केंद्रे (Diagnostic Centers), दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने (Pharmacies) औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस,सॅनिटायझर, मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण.  व्हेटरीनरी हॉस्पिटल्स, अॅनिमल केअर शेल्टर्स व पेट फुड शॉप्स. वनविभागाने घोषित केल्यानुसार वनाशी संबंधित सर्व कामकाज.  किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी कन्फेक्शनरी, मटन,  चिकन, अंडी,  मासे दुकाने,  इत्यादींची सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने.  कोल्ड स्टोरेज आणि गोदाम सेवा.

सार्वजनिक वाहतूक -
 विमान, रेल्वे, टॅक्सी, ऑटो आणि सार्वजनिक बस.  राज्य व स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम / सातारा जिल्हयाचे पश्चिम  भागातील खाजगी व्यक्तींची मान्सूनपूर्व कामे. स्थानिक प्राधिकरणाद्वारे सर्व सार्वजनिक सेवा.  भारतीय रिझर्व्ह बँक आणि आरबीआयने नियुक्त केलेल्या आवश्यक सेवा. सेबीच्या सर्व कार्यालये बाजारातील मूलभूत सुविधा संस्थांसारख्या स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉझिटरीज, क्लियरिंग कॉर्पोरेशन आणि इतर मध्यस्थी सेबीकडे नोंदणीकृत आहेत. दूरसंचार सेवांच्या दुरुस्ती / देखभालीसाठी आवश्यक सेवा. माल वाहतूक, पाणीपुरवठा सेवा.  शेती संबंधी उपक्रम, बियाणे, खते, उपकरणे व त्याची दुरुस्ती यासह कृषी क्षेत्राचे अखंड  निरंतरता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असणारी कृषी संबंधित क्रियाकलाप आणि त्याशी संबंधित संलग्न उपक्रम. सर्व वस्तूंची निर्यात-आयात.  ई-कॉमर्स (केवळ आवश्यक वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यासाठी),  अधिकृत मीडिया. पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने;  गंभीर पायाभूत सुविधा आणि सेवांना आधार देणारी डेटा सेंटर क्लाउड सर्व्हिसेस/आयटी सेवा सरकारी आणि खाजगी सुरक्षा सेवा. विदयुत आणि गॅस पुरवठा सेवा. ATM,s ,पोस्टल सेवा, कस्टम हाऊस एजंट्स ,परवानाकृत मल्टि मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर  जे लस ,   जीवनरक्षक औषधे , फार्मास्युटिकल उत्पादनांच्या हालचालीशी संबंधित आहेत. कोणत्याही अत्यावश्यक सेवेसाठी कच्चा माल, पॅकेजिंग सामग्रीची निर्मिती करणारे घटक. व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी पावसाळ्याच्या हंगामासाठी साहित्याच्या उत्पादनामध्ये गुंतलेली यंत्रणा. मालवाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज, स्पेअर पार्ट, पंक्चर दुकाने. सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सकाळी 07.00 वा. ते दुपारी 02.00 वा. पर्यंत सुरु राहतील. बाजार समित्यांच्या ठिकाणी फक्त घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांनाच तेथे जावून माल घेता येईल, कोणत्याही वैयक्तीक व्यक्तीस बाजार समितीच्या ठिकाणी प्रवेश नसेल या शर्तीसह सुरु राहतील. याबाबत नियंत्रण करण्याची जबाबदारी त्या त्या स्थानिक नागरी, ग्रामीण प्रशासन संस्थेची असेल. स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या कोणत्याही सेवा.

सूट देणेत आलेल्या बाबी / आस्थापना(Exemption Category)

केंद्रीय, राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व वैधानीक प्राधिकरणे व संस्था सहकारी, पीएसयू आणि खाजगी बँका अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कंपनींची कार्यालये, विमा, वैद्यकीय हक्क सबंधित सेवा. उत्पादन, वितरण व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक असणारी फार्मास्युटिकल कंपनीची कार्यालये. रिझर्व्ह बॅंकेने स्टँड अलोन प्राइमरी डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टम ऑपरेटर आणि आरबीआयच्या नियमन केलेल्या बाजारपेठेत कार्यरत वित्तीय बाजारातील सहभागींसह घटक आणि मध्यस्थ, सर्व नॉन-बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन. सर्व सूक्ष्म वित्त संस्था. न्यायालये, न्यायाधिकरण किंवा चौकशी आयोगांचे कार्य चालू असल्यास वकिलांची कार्यालये.

वर्तमानपत्रे / मासिके/ नियतकालिके
  वर्तमानपत्रे / मासिके/ नियतकालिके छपाईस व वितरणास परवानगी असेल.

आयसोलेशन बबल' म्हणजे कामकाजासाठी ऑनसाईट निवासस्थान किंवा जवळपासची सोय. समर्पित वसाहतींद्वारे ज्यात हालचाली समर्पित परिवहन सेवेद्वारे केली जातात, ज्यात जास्तीत जास्त 10% व्यवस्थापकीय कर्मचारी बाहेरून येतात.  "ट्रान्सपोर्ट बबल" म्हणजे सार्वजनिक वाहनातून नव्हे तर समर्पित परिवहन सेवेतील बाहेरील कर्मचार्‍यांची हालचाल.

दंड- सार्वजनिक ठिकाणी / सार्वजनिक वाहतूक या ठिकाणी विना मास्क असणाऱ्या व्यक्तींकडून 500/- रु दंड आकारणेत यावा.  रेस्टॉरंट, हॉटेल बाबतीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी 1000/- रु दंड आकारणेत यावा. तसेच सदर आस्थापनेकडून र. रु. 10,000/- इतका दंड आकाराला जाईल. सदर कारवाई नंतरही वारंवार सदर नियमांचे उल्लंघन झाल्यास केंद्र शासनाकडून जोपर्यंत कोरोना विषयक कायदा अस्तित्वात असेल तोपर्यंत सदरची आस्थापना बंद केली जाईल. अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक, कर्मचारी किंवा ग्राहक यांनी वरील नियमांचे पालन न केलेस त्यांचेवर  र.रु  500 /-  इतका दंड आकाराला जाईल आणि जर एखादा ग्राहक कोव्हीड- 19 विषयक नियमांचे पालन करीत नसताना सबंधित दुकानातून जर सदर ग्राहकास सेवा दिली जात असेल तर सदर दुकानावर र.रु.1,000/- इतका दंड आकारला जाईल. वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झाल्यास केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड– 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना/दुकान बंद केले जाईल. विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तिंच्या बाबतीत अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांचेकडील आदेश क्रमांक नैआ/कावि/1358/2021 दिनांक 12/05/2021 नुसार रक्कम रुपये 500/- दंड आकारणेत यावा.
 CONTAINMENT ZONE बाबत संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे ज्या ज्या वेळी स्वतंत्र आदेश काढून CONTAINMENT ZONE जाहीर करतील व सदर क्षेत्रामध्ये जे निर्बंध लागू करतील ते आदेश CONTAINMENT ZONE क्षेत्रास लागू राहतील.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशाम नमुद केले आहे.

जिल्ह्यात सरासरी 28.7 मि.मी. पाऊस आतापर्यंत सरासरी 188.0मि.मी.पावसाची नोंद

सातारा, दि.18जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज शुक्रवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 28.7 मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 188.0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 
जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 41.4(201.9) मि. मी., जावळी- 57.1 (304.5) मि.मी., पाटण-31.9 (251.5) मि.मी., कराड-28.1 (233.7) मि.मी., कोरेगाव-29.2 (135.8) मि.मी., खटाव-11.0 (90.9) मि.मी., माण- 2.7 (59.9) मि.मी., फलटण- 5.5 (69.9) मि.मी., खंडाळा- 13.5 (91.2) मि.मी., वाई-39.9 (195.4) मि.मी., महाबळेश्वर-73.9 (563.2) मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. 
  कोयना धरणात आजअखेर 30.00 टीएमसी  (29.97 टक्के) एवढा उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण क्षेत्रात झालेल्या पावसाची आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी 142(585) मि.मी. आहे. 
0000

716 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 19 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.18 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 716 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 19 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
           तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 39 (8267),  कराड 166 (25363), खंडाळा 45 (11423), खटाव 43 (18584), कोरेगांव 75 (16045), माण 63 (12617), महाबळेश्वर 1 (4206), पाटण 47 (7899), फलटण 56 (27763), सातारा 140 (38689), वाई 33 (12295) व इतर 8 (1220) असे आज अखेर एकूण 184371 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 0 (185), कराड 3 (742), खंडाळा 0 (146), खटाव 3 (465), कोरेगांव 3 (369), माण 0(249), महाबळेश्वर 0 (44), पाटण 4 (184), फलटण 0 (276), सातारा 5 (1183), वाई 1(323) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4166 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Thursday, June 17, 2021

अविनाश मोहितेना पाठिंबा ही भूमिका खेदजनक ; ऍड उदयसिह पाटील यांना विश्वजीत कदामांचा टोला...

वेध माझा ऑनलाइन
कराड
ऍड उदयसिह पाटील हे मला बंधुतुल्य आहेत. काँग्रेसचे ते नेते आहेत. त्यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत जाहीर केलेली भूमिका त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. मात्र ती खेदजनक असल्याचे मत राज्याचे कृषी राज्य मंत्री ना.विश्‍वजीत कदम यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

कृष्णा कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. आज अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. त्यानुसार आज पॅनल जाहीर झाली आहेत. ही निवडणूक तिरंगी होणार हेही आज स्पष्ट झाले आहे. त्याच पाश्‍वभूमीवर रयत पॅनलची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ना कदम बोलत होते.
यावेळी कृष्णेचे माजी चेअरमन इंद्रजित मोहिते, काँग्रेसचे मनोहर शिंदे,राजेंद्र यादव,पै.नाना पाटील, शिवराज मोरे यांचेसह परिसरातील अनेक काँग्रेसजन यावेळी उपस्थित होते.

ना.कदम पुढे म्हणाले, कृष्णेच्या शेतकरी सभासदांच्या उज्वल भवितव्यासाठी कारखान्याची  उभारणी दिवंगत आदरणीय यशवंतराव मोहितेंच्या थोर विचाराने झाली. त्या विचारांची जोपासना करत इंद्रजीत मोहिते आपली वाटचाल करत आहेत. त्यांच्या प्रयत्नाने सभासदाना योग्य न्याय मिळेल आणि कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे राहणीमान उंचावेल त्यामुळे या निवडणुकीत रयत पॅनलच्या पाठीशी प्रत्येक शेतकरी सभासदाने मागे उभे राहिले पाहिजे यातूनच दिवंगत आदरणीय भाऊंच्या विचाराची खर्या अर्थाने जोपासना होणार आहे.

यावेळी इंद्रजित मोहिते म्हणाले मदनदादा मोहिते हे कारखान्याचे जाणते नेते आहेत. त्यांनीही कारखान्याचे नेतृत्व केले आहे. मागील वेळी ते आमच्याबरोबर होते आता ते आमच्याबरोबर नाहीत. ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे. मात्र सर्वसामान्य शेतकरी आमच्या पाठीशी आहे.

अविनाश मोहितेंच्या ‘त्या’ 58 कोटीच्या कर्जाची आठवण करून देताना इंद्रजितबाबा म्हणाले ते कर्ज सामान्य शेतकर्‍यांच्या व तोडणी कामगारांच्यावर अन्याय आहे. तोडणी वाहतूकदाराना अडवणूक करून केलेली ही फसवणूक आहे.
अविनाश मोहितेंच्या काळात कारखान्याची झालेली दुरावस्था सांगणारा व्हीडिओ इंद्रजितबाबांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये...वर्षाला कामगारांना पगार दिल्याचे खोटे दाखवून 5 कोटींचा चुराडा केल्याचे त्यात म्हटले आहे 30 कोटीचा डिस्ट्रीलरीसाठी दाखवलेला एकूण हिशोब मिळत नाही. तांब्याचे असणारे कारखान्याचे भंगार त्यांच्या काळात विकले गेले.केवळ उधळपट्टी केली गेली. शेतकर्‍यांचे फंड त्याच काळात रोखण्यात आले. पगार उशिरा झाले. फरक देता आला नाही. बोनस उशिरा दिला.कारखाना विस्ताराचे नाटक केले गेले. दारू विक्रीचे कॉन्ट्रॅक्ट चुकीच्या लोकांना देऊन कारखान्याचे अतोनात नुकसान केले. उत्तम चाललेला कारखाना अडचणीत आणला. असे अनेक आरोप इंद्रजितबाबानी त्या व्हिडीओमध्ये केले आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा हे आरोप केवळ आरोप नाहीत, तर वस्तूस्थिती असल्याचा पुनरुच्चार केला.



820 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 27 बाधितांचा मृत्यू

  सातारा दि.17 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 820 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 27 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
           तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 54 (8228),  कराड 205 (25197), खंडाळा 37 (11373), खटाव 61 (18541), कोरेगांव 84 (15970), माण 56 (12554), महाबळेश्वर 8 (4205), पाटण 39 (7852), फलटण 43 (27707), सातारा 188 (38549), वाई 43 (12262) व इतर 2 (1212) असे आज अखेर एकूण 183655 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 0 (185), कराड 2 (739), खंडाळा 0 (146), खटाव 5 (462), कोरेगांव 1 (366), माण 2(249), महाबळेश्वर 0 (44), पाटण 4 (180), फलटण 2 (276), सातारा 11 (1178), वाई 0(322) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4147 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

*टिप : सकाळी दिलेल्या आकडेवारीत पोर्टलवर काही आकडे डब्बल असल्यामुळे 9 बाधित कमी झाले आहेत*

जिल्ह्यात सरासरी 46.8 मि.मी. पाऊस-आतापर्यंत सरासरी 143.2 मि.मी.पावसाची नोंद

सातारा, दि. 17 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 46.8 मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 143.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 
जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 40 (146.6) मि. मी., जावळी- 80.1 (230.9) मि.मी., पाटण-82.3 (170.3) मि.मी., कराड-98.9 (203.7) मि.मी., कोरेगाव-20.4 (104.4) मि.मी., खटाव-15.1 (78.0) मि.मी., माण- 4.6 (57.2) मि.मी., फलटण- 2.8 (64.1) मि.मी., खंडाळा- 6.8 (77.5) मि.मी., वाई-18.7 (128.4) मि.मी., महाबळेश्वर-143 (389) मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. 
  कोयना धरणाची धरणात आजअखेर 26.54 टीएमसी  (26.51टक्के) एवढा पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण क्षेत्रात झालेल्या पावसाची आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी 251 (443) मि.मी. आहे. 
0000