Tuesday, February 28, 2023

अजित पवार यांनी केला मोठा गौप्यस्फोट ; म्हणाले ...एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीवेळी भाजपमध्ये काय घडामोडी घडत होत्या...वाचा बातमी...

बंध माझा ऑनलाईन - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत भाजपवर जोरदार हल्ला करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीवेळी भाजपमध्ये काय घडामोडी घडत होत्या, याबाबत अजित पवारांनी विधानसभेत खळबळजनक दावा केला आहे. जेव्हा महाराष्ट्रात सत्तांतर झालं तेव्हा सगळ्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं वाटत होतं पण काय झालं? भाजप आमदारांना बंड करायचं होतं, पण देवेंद्र फडणवीस बोलले वरून आदेश आहेत, असं काही करू नका. वरच्या दोन माणसांना कळलं तर काही खरं नाही. तेव्हाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही आपण भेटलो तेव्हा त्यांनीही हे काय झालं? असा प्रश्न मला विचारला. फडणवीस म्हणाले मी मंत्रिमंडळात जाणार नाही, यानंतर कुणाच्या डोळ्यात पाणी आलं हे आपल्याला माहिती आहे... गिरीश महाजन,...असं अजित पवार म्हणाले.

80-85 लोकांनी आपण बंड करायचं का? असं काही म्हणाले. शेवटी देवेंद्रजी म्हणाले असं काही करू नका. त्या दोघांना कळालं तर आपला सुपडा साफ होईल. वरचे आदेश सगळ्यांनी गपगुमाने ऐकले, असंही अजित पवार म्हणाले.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. बालेकिल्ल्यातही तुमचा पराभव झाला. 6-8 महिन्यात दिवा लावला असता तर पदवीधर आणि शिक्षकांनी तुम्हाला निवडून दिलं असतं. केंद्रात तुमची सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, तरी दुसऱ्यांवरच डोळा. तुमचे करा ना तयार, समोर बघितलं तर 40-50 जण आपल्यातलेच गेले आहेत, असा टोला अजित पवारांनी भाजपला लगावला.

पुण्याच्या निकालानंतर आणखी एक गौप्यस्फोट
' पुण्याचा निकाल काय लागेल मला सांगता येत नाही. पुण्यामध्ये गिरीश महाजन यांच्यासह सगळ्यांना 3-4 दिवस बसावं लागलं. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना किती दिवस बसावं लागलं. तिकडे काय काय घडलं? आज मी बोलणार नाही. एकदा निकाल लागू द्या, मग सांगतो पुण्यामध्ये चिंचवडमध्ये कुठे काय घडलं. कोण सापडलं, कोण काय करत होतं. मतदानाला जाऊ नका कोण सांगत होतं. मतदानाला जा सांगत असताना कोण काय सांगत होतं, हे त्यावेळेस सांगेन, ' असं म्हणत अजित पवारांनी मोठ्या गौप्यस्फोटाचे संकेत दिले आहेत

कसब्यात भाजपला धक्का? रविंद्र धंगेकर विजयी होणार... चिंचवड भाजप राखणार; स्ट्रेलिमा आणि रिंगसाईड रिसर्चचा एक्झिट पोल व्हायरल ;

वेध माझा ऑनलाईन - कसब्यात भाजपला धक्का बसणार आणि रविंद्र धंगेकर विजयी होणार...आणि चिंचवडमध्ये मात्र भाजप गड राखणार असा स्ट्रेलिमा आणि रिंगसाईड रिसर्चचा एक्झिट पोल व्हायरल झाला आहे कसब्यात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर विजयी होतील आणि चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप जागा राखतील असं या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे. 
 
स्ट्रेलिमा या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये कसब्यात भाजपला धक्का मिळणार आहे. या ठिकाणी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून काँग्रेसचे रविंद्र धनगेकर हे 15,077 मताधिक्यांनी विजयी होतील असं सांगितलं आहे. तर चिंचवडची जागा भाजप राखणार असून त्या ठिकाणी अश्विनी जगताप या 32,351 मतांनी विजयी होतील. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना 93,003 मतं तर अपक्ष उमेदवार 60,173 मतं मिळणार असल्याचं सांगितलं आहे. 

स्ट्रेलिमा या संस्थेचा एक्झिट पोल काय सांगतोय?
कसबा पेठ
हेमंत रासने - 59,351
रविंद्र धंगेकर - 74,428 
चिंचवड
राहुल कलाटे - 60,173
नाना काटे - 93,003
अश्विनी जगताप- 1,25,354

भाजपच "चिंचवड"राखण्याची शक्यता , "रिंगसाईड रिसर्च "चा अंदाज..
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत "रिंगसाईड रिसर्च "चा एक्झिट पोल समोर आला आहे . या पोलनुसार ही जागा भाजपच जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लागलेली चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुक अनेक कारणांनी गाजली. भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप , महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे आणि अपक्ष राहुल तानाजी कलाटे यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. तीनही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. या निकालाविषयी 'रिंगसाईड रिसर्च'चा एक्झिट पोल समोर आला आहे. या पोलनुसार ही जागा भाजपच जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

"रिंगसाईड रिसर्च " : एक्झिट पोल  
रिंगसाईड रिसर्च या संस्थेने केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणातून चिंचवड विधानसभेची जागा भाजप जिंकेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे..

एकूण मतदान : 5,68,954
झालेले मतदान : 2,87,145 (50.47 टक्के)

रिंगसाईड रिसर्च च्या सर्वेक्षणानुसार उमेदवाररनिहाय झालेल्या  मतदानाच्या टक्केवारीची विभागणी :
अश्विनी लक्ष्मण जगताप (BJP) : 45% - 47 टक्के
नाना काटे (NCP) : 31 टक्के - 33 टक्के
राहुल कलाटे (IND) : 18 टक्के - 20 टक्के
इतर  : 2 टक्के - 4 टक्के
एकूण - 100 टक्के
भाजपचे विजयी मताधिक्य : 12 टक्के - 16 टक्के

( टीप सदर बातमी "रिंगसाईड रिसर्च"या जनमत चाचणी करणाऱ्या संस्थेच्या अंदाजावर आधारीत आहे. )

 




शिंदेंचा आणखी एक धक्का ; संजय राऊत यांची होणार उचलबांगडी ? संसदेत हालचाली सुरू : काय आहे बातमी?

बंध माझा ऑनलाईन -  केंद्रीय निवडणूक आयोगाने ( शिवसेना पक्ष ) आणि निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने विधान परिषदेसाठी आपल्या गटातील आमदाराचे नाव प्रतोद म्हणून सुचवल्यानंतर दुसरा मोठा निर्णय शिंदे गटाने घेतला आहे. शिवसेनेच्या संसदीय गटाच्या नेतेपदावरून उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय राऊत  यांची उचलबांगडी करण्यात येणार आहे. संजय राऊत यांच्याऐवजी लोकसभा खासदार गजानन किर्तीकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. 

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. राज्यात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिंदे गटाने विधीमंडळातील आणि संसदेतील पक्ष कार्यालय ताब्यात घेतले आहे. 
उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी शिवसेनेनं परिषदेत विप्लव बजोरिया यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली. विधानपरिषदेत उद्धव ठाकरे आमदार आहेत आणि सभागृहात प्रतोदचा व्हिप हा महत्वाचा असतो.  त्यामुळे आता विप्लव बजोरियांचा व्हिप हा उद्धव ठाकरेंना मान्य करावा लागणार का, अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे दिल्लीतही शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे. 

संजय राऊतांची उचलबांगडी
शिवसेना शिंदे गटाकडून संसदीय पक्षाच्या नेतेपदावरून संजय राऊत यांची  उचलबांगडी करण्यात येणार आहे. राऊत यांच्या ऐवजी गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसे पत्र संसदेच्या संबंधित समितीला दिले असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. लोकसभेत शिंदे गटाकडे 13 खासदार आहेत. तर, 5 खासदार ठाकरे यांच्या बाजूने आहेत. तर, राज्यसभेतील तिन्ही खासदार ठाकरे गटाकडे आहेत. यामध्ये संजय राऊत, अॅड. अनिल देसाई आणि प्रियांका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. हे तिन्ही खासदार उद्धव यांच्यासोबत आहेत. आता, संसदीय नेता बदलल्यास ठाकरे गटाच्या खासदारांना शिंदे गटाचा व्हीप मानवा लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.

संसद भवनातील शिवसेनेच्या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवले ;

वेध माझा ऑनलाईन - निवडणूक आयोगानं धनुष्यणबाण  चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानंतर शिंदे गटात उत्साहाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या अडचणी मात्र आणखी वाढल्याचं पहायला मिळतय. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर आता शिंदे गटाकडून संसद भवनातील शिवसेनेच्या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे याचे फोटो देखील हटविण्यात आले आहेत. 

संसद भवनातील तिसऱ्या मजल्यावर शिवसेनेचं हे कार्यालय आहे. शिंदे गटाने आणखी एक मोठा धक्का ठाकरे गटाला दिला आहे. निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळताच शिंदे गटाकडून संसद भवनात असलेल्या शिवसेनेच्या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. आता तिथे फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो ठेवण्यात आले आहेत. मात्र अद्याप यावर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.

Monday, February 27, 2023

कराड नगरपरिषदेचे तोडलेले जॅकवेलचे वीज कनेक्शन पुन्हा जोडण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आदेश ; शिंदे गटाचे युवा नेते रणजित (नाना) पाटील यांनी पालकमंत्र्यांशी बोलून तातडीने केला पाठपुरावा ; पाठपुराव्याला यश ;

वेध माझा ऑनलाईन - कराड नगरपालिकेचे वीज बिल थकल्याने महावितरणने काल सोमवारी कराड नगरपालिकेच्या मुख्य वारूंजी जॅकवेलचा वीजपुरवठा तोडला होता.  त्यामुळे आज शहरातील  सकाळचा पाणीपुरवठा होण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती मात्र प्रसंगावधान जाणून कराड शहरातील शिंदे गटाचे युवा नेते रणजित पाटील नाना यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांच्याशी तातडीने आज सकाळी याविषयी माहिती दिली त्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी ताबडतोब महावितरणला तोडलेला वीजपुरवठा पुन्हा चालू करायला सांगितल्याचे स्वतः रणजित पाटील यांनी वेध-माझा शी बोलताना सांगितले आहे त्यामुळे शहरावरील पाण्याचे संकट आता टळले आहे 

कराड नगरपरिषदेच्या चोवीस तास पाणी पुरवठा योजनेसाठी वारुंजी येथील मुख्य जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो महावितरणची त्यासाठीची यावर्षीची बिले अद्याप नगरपालिकेने दिली नसून त्याची रक्कम लाखों रुपयात असल्याचे समजते दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काल सोमवारी सायंकाळी वारुंजी जॅकवेलचे विद्युत कनेक्शन तोडले होते त्यानंतर  पाण्याच्या शुद्धीकरणासह सर्व प्रक्रिया ठप्प झाली होती. यामुळे आज मंगळवारी सकाळी पाणीपुरवठा होण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती मात्र शहरातील युवा नेते रणजित पाटील यांनी याविषयीचे प्रसंगावधान जाणून  जिल्ह्याचे पालकमंत्री ना देसाई यांच्यामार्फत हा प्रश्न सोडवला आहे त्यामुळे शहरावरील पाण्याचे संकट दूर होण्यास मदत झाली आहे

कराड नगरपालिकेचे लाखो रुपयांचे वीज बिल थकल्याने महावितरणने सोमवारी कराड नगरपालिकेच्या वारूंजी जॅकवेलचा वीजपुरवठा तोडला

वेध माझा ऑनलाईन - कराड नगरपालिकेचे वीज बिल थकल्याने महावितरणने आज सायंकाळी सोमवारी कराड नगरपालिकेच्या मुख्य वारूंजी जॅकवेलचा वीजपुरवठा तोडला. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून मंगळवारी सकाळचा पाणीपुरवठा होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

कराड नगरपरिषदेच्या चोवीस तास पाणी पुरवठा योजनेसाठी वारुंजी येथील मुख्य जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो महावितरणची त्यासाठीची यावर्षीची बिले अद्याप नगरपालिकेने दिली नसून त्याची रक्कम लाखों रुपयात असल्याचे समजते दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी वारुंजी जॅकवेलचे विद्युत कनेक्शन तोडले. त्यानंतर  पाण्याच्या शुद्धीकरणासह सर्व प्रक्रिया ठप्प झाली आहे. यामुळे मंगळवारी सकाळी पाणीपुरवठा होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे शहरात एकूणच या सर्व प्रकाराबाबत संताप व्यक्त होत होतो आहे



कराड नगरपरिषदचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना मातृशोक

वेध माझा ऑनलाईन - कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मातोश्री सौ.सुनिता दिलीप डाके (वय-  61) यांचे आज सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पलूस येथील त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. 

सौ सुनीता डाके यांचे स्वतःचे शिक्षण कमी असले तरीही आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देण्यासाठी त्या नेहमीच आग्रही राहिल्या चिरंजीव रमाकांत डाके कराडचे मुख्याधिकारी आहेत तर मुलीने डी.एड शिक्षण पूर्ण केले आहे. 
दरम्यान आज सौ. सुनिता दिलीप डाके यांच्यावर पलूस (ता. पलूस) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यांच्या पश्चात एक मुलगा व 2 मुली, नात, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन  1 मार्च रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी पलूस येथील स्मशानभूमी येथे होणार आहे.

Sunday, February 26, 2023

व्हीप पाळणार नाही ; ठाकरे गटाची भूमिका ; व्हीपवरून राडा होण्याची शक्यता !

 वेध माझा ऑनलाईन -  शिवसेनेच्या व्हिपवरुन  अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी काल (26 फेब्रुवारी) आमदारांना व्हिप जारी केला होता आणि व्हिप न पाळल्यास दोन आठवड्यात कारवाई करु, असा इशाराही दिला होता. मात्र शिवसेनेचा व्हिप मिळाला नाही आणि मिळाला तरी पाळणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. व्हिप न पाळल्यास दोन आठवड्यात कारवाईचा विचार करु, असा इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे. सर्व आमदारांना अधिवेशनाला पूर्ण वेळ हजर राहण्याचा व्हिप बजावला आहे. सध्यातरी कारवाई होणार नसली तरी ठाकरे गटाच्या आमदारांची चिंता वाढली आहे.

व्हिप बजावला तरी पाळणार नाही : सुनील प्रभू
ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू म्हणाले, आम्हाला व्हिप बजावला तरी पाळणार नाही. न्यायालयाच्या आदेशाचा पालन केले नाही तर तो न्यायालयाचा अपमान होईल. गरज पडल्यास आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ. सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे.

शिवसेनेकडून ५५ आमदारांना बजावण्यात आला व्हिप ;

वेध माझा ऑनलाईन - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही शिवसेनेकडून सर्वच्या सर्व ५५ आमदारांना सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी व्हिप बजावण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासंदर्भातला हा व्हिप असून, ठाकरे गटाच्या आमदारांनाही हा व्हिप लागू होणार आहे. पुढील दोन आठवडे या संदर्भात कोणतीही कारवाई करणार नाही, अशी माहिती शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा येथे शिवसेनेच्या चाळीस आमदारांची रविवारी बैठक झाली.   त्यात अर्थसंकल्पातील रणनीतीवर चर्चा झाली. शिवसेनेच्या आमदारांना व्हीप बजावण्याचा निर्णय घेण्यात आला.  अधिवेशनाला उपस्थित राहावे, यासाठी हा व्हिप असून, जरी कोणी त्याचा भंग केला, तरी त्या आमदार विरोधात कारवाई केली जाणार नाही, असे गोगावले यांनी माध्यमाना सांगितले.   
शिंदे गटाकडे ४० आणि ठाकरे गटाकडे १५ असे शिवसेनेचे विधानसभेत ५५ आमदार आहेत. व्हिप कोणी कोणावर बजावावा, हा शिवसेनेत वादाचा मुद्दा बनला आहे. या संदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे पुढचे दोन आठवडे कोणीही म्हणजे शिंदे आणि ठाकरे गटाने व्हिप बजावू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत

गडकरी यांची भाजपमध्ये घुसमट ; भविष्यात त्यांना आणखी बाजुला करण्यात येईल ; ,शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक दावा

वेध माझा ऑनलाईन - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. गडकरी यांची भाजपमध्ये घुसमट होत आहे. भविष्यात त्यांना आणखी बाजुला सारण्यात येईल, अशा त्यांच्या गटात अफवा आहेत, असे वक्तव्य खैरे यांनी केले. ते शिवगर्जना मोहिमेअंतर्गत ते नागपुरला आले होते. यावेळी पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.

काय म्हणाले चंद्रकांत खैरै -
गडकरी हे उद्धव ठाकरे यांना भेटत असतात आणि फोनवरदेखील ते बोलत असतात. ते भाजपमधील चांगले नेते आहेत. महाराष्ट्रातील खासदारांची कामे करणारे ते एकमेव मंत्री होते. मात्र, त्यांना काम करू दिले जात नाही. त्यामुळे मराठवाड्यातील 17 हजार 500 कोटींची कामे त्यांना करू दिली गेली नाही आणि त्यातून मराठवाड्याचे नुकसान झाले,असा आरोपही त्यांनी केला. तसेच संघ परिवार असल्याने गडकरी यांना पूर्णत: बाजूला करण्यात आलेले नाही, असेही खैरे यावेळी म्हणाले.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने केली अटक ; मोठी बातमी

वेध माझा ऑनलाईन - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केलीय. दारु घोटाळा प्रकरणी सीबीआयने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. आठ तासांच्या चौकशीनंतर मनीष सिसोदियांवर अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, मनीष सिसोदियांची सीबीआयकडून चौकशी सुरू असताना आपच्या अनेक नेत्यांनी सीबीआय मुख्यालयाबाहेर आंदोलन केलं. मात्र मुख्यालयाबाहेर कलम १४४ लागू झाल्याने जवळपास ५० नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

आम आदमी पक्षाने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या वक्तव्याचे पोस्टर जारी केले होते. दोन पानांच्या या पोस्टरवर मनीष सिसोदिया यांचा फोटोही छापण्यात आला होता. खोट्या गुन्ह्यांची आम्हाला भीती वाटत नाही. आम्हाला तुरुंगात जाण्याची भीती नाही. आम्ही भगत सिंह आणि बाबासाहेबांचे अनुयायी आहे आणि आम्ही मृत्यूशी सामना करायलाच निघालोय असं सिसोदियांनी म्हटलं होतं.
मनीश सिसोदिया यांना अबकारी धोरण प्रकरणी सीबीआय़कडून चौकशीला बोलावण्यात आलं होतं. तेव्हाच त्यांनी स्वत:च्या अटकेची शक्यता व्यक्त केली होती. तसंच तपास यंत्रणांना आपण सहकार्य करू असेही ते म्हणाले होते.


Saturday, February 25, 2023

नारायण राणे यांनी दिला अजितदादांना थेट दमच...म्हणाले...अजित पवाराचे पुण्यात येऊन बारा वाजवीन, माझ्या नादाला लागू नका ;

वेध माझा ऑनलाईन - विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील चिंचवडमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर बोचरी टीका केली होती. पवारांच्या या टीकेला मंत्री राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणे यांनी थेट दमच देत अजित पवाराचे पुण्यात येऊन बारा वाजवीन, माझ्या नादाला लागू नका, अशा शब्दात इशारा दिला. कोल्हापूर दौऱ्यावर आले असता आज, शनिवारी त्यांनी अजित पवारांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. 

यावेळी बोलताना राणे म्हणाले की, अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळत मला माहीत नाही. ज्या प्रकारचा राजकारणी आहे त्याबद्दल बोलू नये. मी सलग सहावेळा निवडून आलो आहे. महिला असेल, पुरुष असेल उमेदवार हा उमेदवार असतो असेही ते म्हणाले. तर, जे लोक काम करतात त्यांचा पक्ष टिकतो, बाकीचे संपून जातात, असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला, ठाकरेंकडे राहिलं काय? कुठलंही अस्तित्व नाही. पक्षातून गेलेले लोक आपल्याबद्दल काय म्हणतात, अडीच वर्षात आपण काय केलं ते पहा म्हणावं असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राणेंवर टीका करताना काय म्हणाले होते अजित पवार...
चिंचवडमध्ये बोलताना अजित पवार यांनी मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. शिवसेनेला सोडून गेलेले कसे पराभूत झाले हे सांगताना त्यांनी राणेंना तर वांद्रेत बाईनं पाडलं असं म्हणाले होते. वांद्रे पोटनिवडणुकीत 2015 मध्ये काँग्रेस उमेदवार नारायण राणेंचा शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी पराभव केला होता. त्यामुळे अजित पवार बाईनं पाडलं म्हणत राणेंना डिवचले होते.

ब्राह्मण समाज कधीच काही मागत नाही हेच त्यांचे वैशिष्ट्य ; देवेंद्र फडणवीस

वेध माझा ऑनलाईन - मागणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे असे म्हणत ब्राह्मण समाज कधीच काही मागत नाही हेच त्यांचे वैशिष्ट्य असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच ब्राह्मण मंडळी समाजात गोडवा निर्माण करतात असेही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. कसबा पेठ पोटनिवडणुकीला एक दिवस बाकी असताना फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे कसब्यातील ब्राह्मण मतांवर परिणाम होईल का हे आता बघावे लागणार आहे

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मी अनेक कार्य़क्रमांमध्ये सहभागी होत असतो. अनेक संघटना काम करत असतात. परंतु या सगळ्यांमध्ये ब्राह्मण संघटनेत अधिक काम होत असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे ही संघटना कोणतीच मागणी करत नसल्याचे ते म्हणाले.

ब्राह्मण समाजाने नेहमीच समाजाला देण्याचे काम केले आहे मात्र त्याबदल्यात काही मागण्याची त्यांची अपेक्षा कधीच नसते आम्ही केवळ देण्याचे काम करतो. ही जी देण्याची परंपरा कायम ठेवत मागण्याऐवजी देणारे कसे बनावे यासाठी  येणाऱ्या नवीन पिढिला तयार केले पाहिजे. हीच ब्रह्मोद्योगची अपेक्षा असून याच दृष्टीने याची सुरुवात करण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

.ते पुढे म्हणाले, देशाच्या लोकसंखेच्या तुलनेत ब्राह्मण कमी असतील. परंतु त्यांच्यामध्ये एक क्षमता आहे, असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

पोलिसांना हाताला धरून भाजपने मतदारसंघात पैसे वाटले ; महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप ; कसबा पेठ पोटनिवडणुक प्रचार थांबला ; वातावरण तापले ;

वेध माझा ऑनलाईन - कसबा पेठ पोटनिवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर कसब्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. काल पोलिसांसोबत कसबा मतदारसंघाच्या काही भागात भाजपने पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. तसेच याचा निषेध करण्यासाठी कसबा गणपती समोर उपोषण करण्याचा निर्णय धंगेकर यांनी घेतला आहे.

भाजपने लोकशाहीचा गळा घोटला
रविंद्र धंगेकर म्हणाले, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांचे पालन केले आहे. परंतु भाजपच्या कर्यकर्त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत पैशांचे वाटप केले आहे. स्वत: गिरीश महाजन हे गुन्हेगारांना सोबत घेऊन मतदारसंघात फिरत होते. असे असताना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षीत होते. माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जात आहे. यासंदर्भात पोलिसांना निवेदन देऊन देखील कारवाई झाली नाही. भाजपने लोकशाहीचा गळा घोटला असून संविधान टिकवण्यासाठी आपण उपोषण करत असल्याचे रविंद्र धंगेकर यांनी सांगितले.
रविंद्र धंगेकर म्हणाले, काल प्रचार संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सात वाजले तरी मतदारसंघात होते. हा कोणता न्याय आहे? मी कोणाला घाबरत नाही. भाजप आता घाबरले आहे.जर पोलीस संरक्षणात पैशांचे वाटप होत असेल आणि निवडणूक आयोग याकडे डोळेझाक करत असेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा.न्याय जनता देईल, मी जनतेच्या दरबारात बसलो असल्याचे रविंद्र धंगेकर यांनी सांगितले.

 


हो मी गद्दारी केली ; मंत्री गुलाबराव पाटील यांची कबुली ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन - गुलाबराव पाटील गद्दार झाला म्हणतात. मी गद्दार झालो नाही, तर एक मराठा चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. ते जळगावात एका कार्यक्रमात बोलत होते. 

जळगावातील बिलखेडा गावात विविध विकासकामं आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी पाटील यांनी विरोधकांच्या गद्दारीच्या आरोपावर थेट कबुलीच दिली. विरोधाला विरोध करायचा पण मतदार संघात काही काम करायचं नाही. बिलखेडेत साधी एक मुतारी हे लोक बांधू शकले नाहीत आणि भाषणं ठोकतात, असा जोरदार हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केला. 
"तुम्ही काय आमच्यावर टीका करता. शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहेत? असे म्हणत जर कोणत्याही गोष्टीत तुम्ही जातीवाद करत असाल, तर होय मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी त्याग केला. एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली", असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. आज हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतो हा तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार असल्याचंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील असो की शिंदे गटाचे इतर आमदार यांच्यावर गद्दार म्हणून टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या टीका करणाऱ्यांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Friday, February 24, 2023

भाजपमध्ये घ्या म्हणत रामराजेंचे फडणवीसांच्या दारात हेलपाटे ; फडणवीस तयार नाहीत म्हणून आता मुख्यमंत्री शिंदेंची घेतली भेट ; . रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी केला गौप्यस्फोट

वेध माझ ऑनलाईन -  रामराजे हे भाजपमध्ये घ्या, म्हणून फडणवीस यांच्या दारात हेलपाटे मारतायत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचा गौप्यस्फोट खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी केला.फलटण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

  ते पुढे म्हणाले, मला जनतेच्या हिताची कामे करायची आहेत श्रेयवादात पडायचे नाही दरम्यान धोम-बलकवडीच्या माध्यमातून तालुक्यात चारमाही वाहणारा कालवा लवकरच आठमाही होणार आहे. महाबळेश्वर येथील सोळशी प्रकल्पाच्या माध्यमातून तेथे दोन टीएमसीचे धरण प्रस्तावित असून, त्यास केंद्र व राज्य सरकार अनुकूल आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेला, तर धोम- बलकवडीचा तालुक्यातील कालवा बारमाही वाहील. अन्य भागासही पाणी उपलब्ध होईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
खा. रणजिंतसिंह नाईक- निंबाळकर म्हणाले, “महाबळेश्वरच्या पायथ्याशी देवसरे गावाजवळ सोळशी नदीवर धरण प्रस्तावित आहे. या धरणातील पाणी बोगद्याद्वारे वाई तालुक्यातील धोम जलाशयामध्ये सोडण्यात येणार आहे. नीरा-देवघर प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे आगामी काळासाठी आणखीन काय हवेय का? अशी विचारणा केली होती. त्यावर आपण त्यांच्याकडे सोळशी प्रकल्पाची मागणी केली. या प्रकल्पाचा अभ्यास जलतज्ज्ञांनी केला आहे. या प्रकल्पातील पाण्यामुळे फलटण तालुक्यातील धोम बलकवडीचे कालवे बारमाही वाहतील. या प्रकल्पातील पाणी धोम- बलकवडीच्या माध्यमातून कोरेगाव व माण-खटाव तालुक्यांसही मिळणार आहे. 

Thursday, February 23, 2023

कराड जनता बँकेच्या इमारतींचा होणार लिलाव ; वाचा बातमी

वेध माझा ऑनलाइन ; कराड जनता सहकारी बँकेच्या येथील रविवार पेठेतील मुख्य शाखेसह वाईतील शाखेच्या इमारतींचा लिलाव अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी जाहीर केला आहे. यापूर्वी दोन वेळा हाच लिलाव जाहीर करण्यात आला होता. मात्र, त्याला काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तिसऱ्यांदा दोन्ही इमारतींचा लिलाव जाहीर केला आहे. त्या दोन्ही लिलावातून तब्बल 4 कोटी 44 लाखांचा निधी उभा राहणार आहे.

तीन वर्षांपूर्वी कराड जनता बँकेची दिवाळखोरी रिझर्व्ह बँकेने जाहीर केली. बँकेवर त्यापूर्वीच आर्थिक बंधने आली होती. बँकेचे व्यवहार पुन्हा संशयास्पद वाटल्याने बँकेची थेट दिवाळखोरी जाहीर झाली. त्यापूर्वी बँकेच्या संचालक मंडळासह 30 जणांविरोधात 310 कोटींचा अपहार केल्याची तक्रार सभासद आर. जी. पाटील यांनी केली होती. त्याच्या पोलिस तपासाचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याबाबत ईडीकडेही तक्रार दाखल असून, त्याही यात्याद्वारे तपास सुरू आहे. बँकेच्या शासकीय ऑडिटला स्थगिती आहे, अशी स्थिती असतानाच बँकेच्या इमारती आता लिलावात काढण्यात आल्या आहेत. येथील रविवार पेठेतील मुख्य शाखेच्या इमारतीचा लिलाव जाहीर झाला आहे. रविवार पेठेत बँकेच्या मालकीची 185.53 चौरस मीटरच्या जमिनीवर 816.92 चौरस मीटरचे बांधकाम आहे. त्याच्या लिलावाची किंमत 3 कोटी 17 लाख इतकी जाहीर झाली आहे. वाईत गणपती आळीत बँकेच्या मालकीची 206.78 चौरस मीटरची इमारत आहे. त्याची किंमत 1 कोटी 17 लाख इतकी लिलावात जाहीर केली आहे. ऑनलाइन पद्धतीने निविदा देण्याचे आवाहन केले आहे. त्या निविदा 10 मार्च रोजी फोडण्यात येणार आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणतात ...ठाकरे माझे शत्रू नाहीत ...ठाकरेंना राज्यभर सहानुभूती मिळत असल्याने, ठाकरेंनाच मित्र म्हणत फडणवीसांची नवी खेळी?; राज्यभर चर्चा सुरू ;

वेध माझा ऑनलाईन - उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्यापासून ठाकरे-फडणवीसांमध्ये संघर्ष सुरु झाला. कालांतराने हा संघर्ष शिगेला पोहोचला आणि याच संघर्षातून शिवसेनेत फूट पडून ठाकरेंचं सरकारही कोसळलं. त्यानंतर ठाकरे आणि फडणवीसांमध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोप होत आहेत, पण हे सगळं घडत असलं, तरी आपण शत्रू नसल्याचं सांगत फडणवीस वारंवार ठाकरेंविरोधात संघर्ष केवळ राजकीय असल्याचं सांगत आहेत. एकूणच राज्यातील सध्याच्या राजकिय घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत लोकांच्या मनात प्रचंड सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला आहे त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचे मत बनले आहे या सर्व भानगडीमागे भाजप असल्याची राज्यभर चर्चा आहे आणि त्याचेच परिणाम भाजप ला यापुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत सोसावे लागतील म्हणून ठाकरेंनाच मित्र म्हणून काही लोकांच्या मनातील आपल्या बद्दलची निर्माण झालेली तिडीक व विरोधाची भावना सॉफ्ट करण्याची यातून फडणवीस खेळी खेळत असल्याचे जाणकार सांगत आहेत

दरम्यान, फडणवीसांनी पुन्हा एकदा ठाकरेंसोबत केवळ वैचारिक विरोध असल्याचं सांगितलं. राजकारणात वैचारीक विरोध असतो, उद्धव ठाकरे किंवा आदित्य माझे शत्रु नाहीत. वैचारिक विरोधक झालोय, कारण त्यांनी दुसरा विचार पकडलाय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाने आता टोक गाठलं आहे. रोजच दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चढत असतानाच राज्याच्या राजकारणात नवे ट्विस्ट येत आहेत. 
एकूणच राज्यातील सध्याच्या राजकिय घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत लोकांच्या मनात सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला आहे त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचे मत बनले आहे त्याचे परिणाम भाजप ला देखील होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत सोसावे लागतील की काय? अशी भाजप च्या नेतृत्वाला शंका आहे म्हणून यापुढे ठाकरेंनाच मित्र म्हणून लोकांच्या मनातील आपल्या बद्दलची झालेली भावना सॉफ्ट करण्याची यातून फडणवीस खेळी खेळत असल्याचे जाणकार सांगत आहेत

राष्ट्रवादीच्या तीन नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर, राजकीय चर्चेला उधाण

वेध माझा ऑनलाईन - मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयासमोर पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे एकापाठोपाठ एक भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लावण्यात आल्याचं आज पहायला मिळालं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयासमोर भावी मुख्यमंत्री या आशयाचे नेत्यांचे पोस्टर लावण्याचा सिलसिला आज देखील सुरु आहे जयंत पाटील, अजित पवार यांच्यानंतर आज सुप्रिया सुळे यांच्या नावाचे बॅनर झळकले. 

आधी जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लावण्यात आल. त्यानंतर अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री अस पोस्टर लावण्यात आल. आणि आता पहिल्या महिला मुख्यमंत्री अस सुप्रिया सुळे यांच पोस्टर झळकल आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयासमोर पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे एकापाठोपाठ एक भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लावण्यात आल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामुळे पक्षात आत्तापासूनच रस्सीखेच सुरु तर झाली नाही ना अशी चर्चा रंगू लागली होती.. 
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 16 फ्रेब्रुवारी रोजी मुंबईतील नेपियन्स रोड परिसरात महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे जयंत पाटील यांचे पोस्टर लावण्यात आले होते. महत्त्वाची बाब म्हणजे हे पोस्टर कुणी लावले, त्या कार्यकर्त्याचे नाव देखील खाली लिहिण्यात आले होते. पण अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या पोस्टर खाली कुणाचे नाव लिहिण्यात आलेले नाही. 
सलग तीन महत्त्वाचे नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर राज्याच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर लावण्यात आल्यामुळे सोशल मीडियात प्रमुख नेत्यांमध्ये आगामी काळातील राजकारणाचा कानोसा घेत मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच तर सुरु नाही ना ? अशी चर्चा जोरदार रंगू लागली होती. माध्यमांनी देखील या घटनेची दखल घेत काही पक्षात काही आलबेल तर नाही ना अशी शंका उपस्थित केली होती. या सगळ्या घटनेची गांभीर्याने दखल घेत अखेर राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाच्यावतीने जाणीवपूर्वक अज्ञाताकडून हा संपूर्ण प्रकार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आणि कार्यालयाच्यावतीने तत्काळ पोलीस ठाण्यात आज्ञाताविरोधात सीसीटीव्ही फुटेज सह तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. 
या संपूर्ण प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला असता या प्रकरणी माहिती घेण्यात येत असून विरोधी पक्षाचं तर हे काम नाही ना अशी शंका मनात येत असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. शिवाय लवकरच पोलीस तपासात हे कृत्य कुणाचं आहे आणि त्यांचा उद्देश काय आहे हे देखील उघड होईल असं ही सांगण्यात आलं आहे. 


त्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई व्हायला हवी... मी ही केस हरेन... किंवा जिंकेन यासाठी मी उभा नाहीय, तर घटनात्मक नैतिकता टिकण्यासाठी मी इथे उभा आहे ; कपिल सिब्बल यांनी केला भावनिक शेवट ;

 वेध माझा ऑनलाईन - राज्यातील सत्तासंर्घषावर आज सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयामध्ये कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. आज सिब्बलांनी बहुमताची चाचणी आणि राज्यपालांच्या भूमिकेवर युक्तीवाद केला आहे. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पीएस नरसिंह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे

राज्यपालांनी या काळात जी भूमिका घेतली त्यावरून सिब्बल आणि चंद्रचूड यांच्यात चर्चा झाली. बहुमत नाही हे राज्यपालांना कसे कळले तसा कोणताही प्रस्ताव आलेला नव्हता, असा सवाल सिब्बल यांनी केला. यावेळी सरन्यायाधीशांनी विरोधक किंवा बंडखोर त्यांच्याकडे गेले असतील तेव्हाच कळू शकते, असे म्हटले. एकदा एखाद्या व्यक्तीला अपात्र ठरवले की, कलम 193(3) नुसार त्याची जागा रिक्त होते. समजा आमदारांच्या एका गटाला अपात्र ठरवले तर सभागृहाचे संख्याबळ अपात्रतेच्या प्रमाणात घटते, असे सरन्यायाधीश म्हणाले. यानंतर हे गणित मांडण्यात आले. यामध्ये अपात्रतेची नोटीस बजावलेली असताना राज्यपालांनी असे का केले, असा सवाल सिब्बल यांनी केला. 

मी हे किंवा ते गृहीत धरतो असे राज्यपाल म्हणू शकत नाहीत. ही घटनात्मक प्रक्रिया आहे. त्यांनी सरकार पाडणे रोखायचे आहे. यावर न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा यांनी तुम्ही म्हणता की घटनात्मकदृष्ट्या दखल घेणे अनुज्ञेय आहे? असा प्रश्न विचारला. राज्यपाल सरकार पाडण्यात मदत करू शकत नाहीत, असे उत्तर सिब्बल यांनी दिले. तसेच मी ही केस जिंकेन किंवा हरेन, यासाठी मी इकडे उभा नाहीय, तर घटनात्मक नैतिकता टिकण्यासाठी मी इथे उभा आहे, असं म्हणत कपिल सिब्बल यांनी भावनिक युक्तिवाद करत भावनिक शेवट केला. 

त्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई व्हायला हवी- सिब्बल
मविआकडे १२३ संख्याबळ आणि विरोधकांकडे १०६ संख्याबळ आहे. आमच्याकडे आजही संख्याबळ आहे, असे सिब्बल यांनी सांगितले. शिंदेंच्या बंडखोरीमुळे तुमच्याकडे बहुमत नव्हते, असे सरन्यायाधीशांनी सिब्बलांना सांगितले. शिवसेनेकडे ५५ पैकी ३८ आमदार बाजुला गेले. यामध्ये १६+२२ ना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे शिवसेनेकडे १७+ राष्ट्रवादीकडे ५३ आहेत. तर काँग्रेसकडे ४४ संख्या आहे. यावर सिब्बल यांनी त्यात जायची गरज नाहीय, कारण आधी त्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई व्हायला हवी होती असे सांगितले. 


  

Wednesday, February 22, 2023

सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगालाही नोटीस ...2 आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई नाही ; ...तोपर्यत व्हीप जारी करणार नाही ; शिंदे गटाची कोर्टात ग्वाही...

वेध माझा ऑनलाईन - केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी करण्यास कोर्टाने होकार दिला आहे.  यावेळी कोर्टाने शिंदे गट आणि ठाकरे गटाला नोटीस बजावली आहे. 2 आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.  2 आठवडे ठाकरे गटासाठी व्हीप जारी न  करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत या प्रकरणी 1 आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून नीरज कौल यांनी युक्तिवाद केला.

यावेळी  ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी करण्यास कोर्टाने होकार दिला आहे.  यावेळी कोर्टाने शिंदे गट आणि ठाकरे गटाला नोटीस बजावली आहे. 2 आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.  2 आठवडे ठाकरे गटासाठी व्हीप जारी न  करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.  मात्र, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी 1 आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. कोर्टाने शिंदे गट आणि ठाकरे गटाला नोटीस पाठवली असून 2 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहे.

सुप्रीम कोर्टाने काय दिले आदेश ?
कोर्टाची शिंदे गटाला नोटीस, 2 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश
ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टातच होणार सुनावणी
शिंदे गट व्हीप जारी करणार नाही
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार
बँक अकाऊंट, मालमत्ता ताब्यात घेण्याच्या निर्णयावर स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार
सुनावणी सुरू असेपर्यंत मशाल चिन्ह ठाकरे गटाकडे राहणार
व्हीप जारी करणार नाही, शिंदे गटाची कोर्टात ग्वाही
केस फक्त चिन्हाची आहे, त्यामुळे स्थगिती देऊ शकत नाही - कोर्ट
सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगालाही नोटीस
2 आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करणार नाही
ठाकरे गट आणि शिंदे गटाला नोटीस
नोटीशीला उत्तर देण्यासाठी दोन्ही गटाकडे 2 आठवड्यांची मुदत

पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली ; शरद पवारांचे पुण्यात मोठं वक्तव्य ;

वेध माझा ऑनलाईन - पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. ते चिंचवडमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी सरकार बदलायचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्याचा एक फायदा झाला, तो म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली असे पवार म्हणाले. राष्ट्रपती राजवट उठल्यानंतर काय झालं ते तुम्ही पाहिलं असेल, असंही पवार म्हणाले. 

...तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? 
तुम्हाला या शपथविधीबाबत माहित होते का? असाही प्रसारमाध्यमांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावेळी पवार म्हणाले की, जर असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? असा सवालही पवारांनी यावेळी केला. राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असा सवालही शरद पवारांनी उपस्थित केला. 
ज्या पक्षावर अन्याय झाला त्याच्या बाजूने जनता जाते राजकारणात मतभेद असतात, संघर्ष होतो. मात्र सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेणं असं कधीच झालं नाही. आता मी ही काँग्रेसमधून बाहेर पडलो. मात्र मी असं काही केलं नसल्याचे शरद पवार म्हणाले. निवडणूक आयोगाने आम्हाला सुचवलं मग त्यांनी हात आणि आम्ही घड्याळ घेतलं. पण इथं वैशिष्ट्य निवडणूक आयोगाचे आहे की, पक्षाचे नाव आणि चिन्ह देऊन टाकलं. देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नसल्याचे शरद पवार म्हणाले. अशावेळी ज्या पक्षावर अन्याय झाला त्याच्या बाजूने जनता जाते. सध्या मी राज्यात फिरतोय, त्यातून जनता उद्धव ठाकरेंच्या बाजूने हे दिसतंय. याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसतील असेही शरद पवार म्हणाले.
निवडणूक आयोग कोणाच्या सांगण्यावरुन बोलतोय असा प्रश्न देखील निर्माण होत असल्याचे शरद पवार म्हणाले. यामागे कोणती तरी शक्ती आणि त्यांचं मार्गदर्शन असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. जे झालं ते चुकीचं झालं असल्याचे पवार म्हणाले.  न्यायालयावर आमचा विश्वास आहे. त्यामुळं सध्या मी न्यायालयाच्या कामकाजावर भाष्य करू शकत नसल्याचे शरद पवार म्हणाले.  आणि त्यांच्यावर आमचा विश्वास आहे.


Tuesday, February 21, 2023

शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ठाकरे कुटुंबियांशिवाय ; एकनाथ शिंदे मुख्य नेतेपदी ;

वेध माझा ऑनलाईन - निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक मुंबईत झाली या बैठकीत सुरूवातीलाच काही महत्त्वाचे ठराव पास करण्यात आले आहेत, ज्यात शिवसेनेने पुन्हा एकदा भूमिपूत्रांच्या नोकऱ्यांबाबतचा ठराव संमत करून घेतला आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ठाकरे कुटुंबियांशिवाय झाली आहे.

शिवसेना कार्यकारिणी बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

1) चर्चगेट रेल्वे स्टेशनला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देणे.
2) राज्यातील भूमीपूत्रांना 80% नोकरी देणे. सर्व प्रकल्पात भूमीपूत्रांना 80% नोकरीमध्ये स्थान देणार.
3) मराठी भाषेला अभीजात भाषेचा दर्जा देणार.
4) स्वातंत्र्यवीर सावकरकरांना “भारतरत्न” देणे. लोकसभा गट नेते खासदार राहुल शेवाळे यांनी सर्वात प्रथम लोकसभेत ही मागणी केली होती.
5) UPSC आणि MPSC च्या मराठी मुलांना भक्कम पाठिंबा देणे.
एकनाथ शिंदेंचाही निर्णय झाला
या बैठकीत एकनाथ शिंदे यांना मुख्य नेतेपदी कायम ठेवण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. तसंच शिवसेनेचे सर्व अधिकार मुख्य नेता म्हणून एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत. या बैठकीत शिवसेनेच्या संसदीय दलांच्या नेत्यांची घोषणा करण्यात येणार आहे. गजानन किर्तीकर यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड केली जाणार आहे, तर लोकसभा ग्रुप लीडर म्हणून राहुल शेवाळे असतील. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला संपूर्ण अधिकार देण्यात येणार आहेत. 1998 साली बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार कार्यकारिणी स्थापन होणार आहे. 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख म्हणून कार्यकाळ संपला आहे.

मोठी अपडेट ; आमदारांना अपात्र ठरविण्याचा अधिकार अध्यक्षांनाच आहे. कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही ; ठाकरे-शिंदे प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता...वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन - दहाव्या सूचीनुसार आमदारांना अपात्र ठरविण्याचा अधिकार अध्यक्षांनाच आहे. कोर्ट त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे. यामुळे ठाकरे-शिंदे प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

शिंदे गट परराज्यात गेल्यानंतर ठाकरे गटाने आधी १३ आमदारांच्या अपात्रतेचा प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्षांकडे पाठविला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करून त्यावर निर्णय घेण्यास दिला नव्हता. यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. यावर खंडपीठाने तुमचे सर्व बरोबर मानले तर हा निर्णय आधीच्या की आताच्या अध्यक्षांनी घ्यायचा, असा सवाल न्यायालयाने विचारला. 
नबाम रेबिया केस मीच लढविली होती. तिथे न्यायालयाने हस्तक्षेप करत उलथवलेले सरकार पुन्हा स्थापन करण्यात आले होते. अध्यक्षांनी सात दिवसांत अपात्रतेचा निर्णय घ्यावा, तो मान्य नसेल तर कोर्टाकडे यावे. झिरवाळ यांना कोर्टाने रोखले होते. कोर्टाने रोखले नसते तर त्यांनी निर्णय घेतला असता, असे सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. 
कोर्टाने आज सिब्बल यांना युक्तीवाद संपविण्यास सांगितला आहे. तसेच उद्याचा दिवस कोर्टाने शिंदे गटाच्या वकिलांना दिला आहे. यामुळे येत्या काही दिवसांतच यावरील सुनावणी संपवून सर्वोच्च न्यायालय शिंदे-ठाकरे वादावर निकाल देण्याची शक्यता आहे.

आज बारावीच्या पहिल्याच इंग्रजी विषयाच्या पेपरमधील प्रश्नपत्रिकेत मोठी चूक ; प्रश्नाऐवजी चक्क उत्तर छापून आल्याचा घडला धक्कादायक प्रकार; बोर्डाकडून करण्यात आला खुलासा ;

वेध माझा ऑनलाईन - आज पासून महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीसाबी परीक्षा सुरु झाली. आज पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर घेण्यात आला. मात्र या पेपरमध्ये प्रश्नपत्रिकेत मोठी चूक झाल्याचं निदर्शनास आलं आहे. या प्रश्नपत्रिकेत एका प्रश्नऐवजी चक्क उत्तर छापून आल्याचं धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रश्नऐवजी उत्तर छापून आलेलं बघून विद्यार्थीही चकीत झाले. मात्र आता यावर बोर्डाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

इयत्ता 12वी आजच्या इंग्रजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत Q3 च्या A3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी उत्तर छापलं गेलं. हे बघून विद्यार्थीही काहीसे चक्रावून गेले. मात्र विद्यार्थ्यांच्या आणि बोर्डाच्या ही बाब लगेच लक्षात आली.
बोर्डाने प्रथमदर्शनी चूक मान्य केली आहे. पण नियामकाचा अहवाल आल्यानंतर ज्यांनी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला त्यांनाच ग्रेस मार्क देण्याचा निर्णय होईल अशी माहिती देण्यास आली आहे. तसंच बोर्डाकडून याबाबत खुलासा करण्यात आला असून त्रुटींबाबत योग्य निर्णय जाहीर केला जाईल असं स्पष्टीकरण बोर्डाने जाहीर केलं आहे.

Monday, February 20, 2023

पार्श्वगायक सोनू निगमला आमदार पुत्राची मारहाण ; तक्रार दाखल ;

वेध माझा ऑनलाईन - चेंबुरमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट संपल्यानंतर स्टेजवरून खाली उतरत असताना गायक सोनू निगमला धक्काबुक्की  झाल्याचा प्रकार घडला आहे. सेल्फी घेण्यावरून हा प्रकार घडला होता. या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मुलावर धक्काबुक्कीचा  आरोप आहे. सोनू निगमने या घटनेनंतर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. धक्काबुक्की करत  दुखापत केल्याचं आणि चुकीच्या पद्धतीने अडवल्याप्रकरणी त्याने तक्रार केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

चेंबूर फेस्टिव्हलमध्ये सोनू निगम परफॉर्म करत होता. पोलिसात दाखल तक्रारीनुसार आमदाराच्या मुलाने सोनू निगमच्या व्यवस्थापक सायरा यांच्याशी गैरवर्तन केलं. त्यानंतर सोनू निगम स्टेजवरून खाली येत असताना आधी सोनू निगमच्या सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केली. त्यानंतर सोनू निगमलासुद्धा धक्का दिला. डीसीपी हेमराज सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव स्वप्निल फातर्पेकर असं आहे.
सोनू निगमने या हल्ल्यानंतर बोलताना म्हटलं की, कॉन्सर्टनंतर स्टेजवरून खाली येत असताना एका व्यक्तीने मला पकडलं आणि त्याने हिर आणि रब्बानी यांना धक्का दिला. ते दोघेही मला वाचवण्यासाठी आले होते. मी पायऱ्यांवर पडलो. मी याची तक्रार दाखल केली आहे. लोकांनी जबरदस्तीने सेल्फी आणि धक्काबुक्की पुन्हा करू नये यासाठी मी तक्रार केलीय. जर काही लोखंडाच्या सळ्या असत्या तर रब्बानीचा मृत्यू झाला असता अशा पद्धतीने त्याला धक्का दिला होता. व्हिडीओत दिसतं की मीसुद्धा खाली पडलो असतो.

माझा विनायक मेटे करण्याचा काही जणांचा डाव ; काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा गंभीर आरोप

वेध माझा ऑनलाइन - काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्यानंतर आता 'माझ्या लेटर पॅडचा दुरुपयोग होत असून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील कारेगांव येथे महाविकास आघाडी तर्फे आयोजित कृतज्ञा सोहळा पार पडला. यावेळी अशोक चव्हाण यांनी मोठा खुलासा केला.

माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिपदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्रे तयार केले असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पोलिसांत केली आहे. एवढेच नव्हे तर आपल्यावर पाळत ठेवली जात असून, घातपात घडविण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. या प्रकारावर खुलासा करत अशोक चव्हाण म्हणाले की,माझ्या लेटर पॅडचा दुरुपयोग होत असून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा गंभीर आरोप चव्हाणांनी केला.

उद्धव ठाकरेंनी मला विमानातून उतरवलं नियतीने त्यांना गादीवरून उतरवलं ; उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीचा माणूस ; भगतसिंग कोश्यारी यांची स्फोटक मुलाखत ; वाचा सविस्तरपणे...

वेध माझा ऑनलाईन - भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचं राज्यपालपद सोडल्यानंतर एका वृत्त वाहिनीला स्फोटक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख संत माणूस असा केला आहे, तसंच उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं, हा नियतीचा खेळ असल्याची टीकाही भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे.

'उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसताना त्यांना जबरदस्तीने तिकडे बसवण्यात आलं. उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बळीचा बकरा बनवलं. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे कधीच योग्य नव्हते, त्यांनी पक्ष सांभाळायला हवा होता,' असा टोलाही भगतसिंग कोश्यारी यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी मला विमानातून खाली उतरवलं, विधात्याने त्यांना सत्तेतून खाली खेचलं, असा घणाघात कोश्यारी यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीचा माणूस आहे, त्यांनी यापासून लांब राहावं, अशी प्रार्थना मी देवापुढे करतो. कोणाच्या तरी सांगण्यावरून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, त्यांनी संघटना चालवायला पाहिजे होती. उद्धव ठाकरेंना सुळीवर चढवण्यात आलं. मला त्यांच्यावर दया येते,' असं भगतसिंग कोश्यारी म्हणाले.
'उद्धव ठाकरेंनी मला विमानातून उतरवलं, प्रभूने त्यांना गादीवरून उतरवलं. मी त्यांना सत्तेतून खाली उतरवलं नाही,' असं टीकास्त्र भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंवर सोडलं.

शिवसेनेच्या निष्ठांवत मेळाव्यातील भाषणादरम्यान चंद्रकांत खैरना अश्रू अनावर ; भाषण सोडून निघून गेले ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन - औरंगाबादमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निष्ठावंत एकनिष्ठ मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये भाषण करत असताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना अश्रू अनावर झाले. चंद्रकांत खैरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी आणि शिवसेनेवर आलेल्या परिस्थितीवर भाष्य करत होते, तेव्हाच खैरे भावुक झाले आणि त्यांना रडू कोसळलं.
अश्रू अनावर झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांना व्यासपीठावरून उठून बाहेर जावं लागलं. निष्ठावंत एकनिष्ठ निर्धार मेळाव्यात चंद्रकांत खैरे शिवसैनिकांसमोर नतमस्तक झाले. शिवसैनिकांचे आभार मानण्यासाठी चंद्रकांत खैरे गुडघ्यावर बसून नतमस्तक झाले, यानंतर शिवसैनिकांकडूनही उभं राहून खैरेंना प्रतिसाद देण्यात आला.

उद्धव ठाकरे हे सध्या सगळ्यात मोठ्या राजकीय संकटातून जात आहेत. पहिले मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, मग सत्ता गेली. आमदार-खासदार सोडून गेले. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्हही एकनाथ शिंदेंना मिळालं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर औरंगाबादमध्ये शिवसैनिकांचा निष्ठावंत एकनिष्ठ मेळावा पार पडला.

उद्धव ठाकरे आणखी अडचणीत ; सेना भवनही जाणार ?

वेध माझा ऑनलाईन - आमदार, खासदारानंतर शिवसेना पक्ष तसंच धनुष्यबाण चिन्ह गेल्यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत सापडले आहेत. त्यातच आता ठाकरेंचा पाय आणखी खोलात गेला आहे. शिवाई ट्रस्ट विरोधात धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ट्रस्टच्या मालमत्तेचा राजकीय वापर केल्याचा आरोप यशस फर्मकडून करण्यात आला आहे. यशस फर्मच्या योगेश देशपांडे यांनी शिवाई ट्रस्टविरोधात धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
शिवाई ट्रस्टविरोधात तक्रार दाखल झाल्यामुळे ठाकरेंच्या हातातून सेनाभवनही जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, कारण सेनाभवनचा मालकी हक्क शिवाई ट्रस्टकडे आहे.

तक्रारकर्त्याचे सवाल
शिवाई ट्रस्ट पब्लिक ट्रस्ट आहे, पण तुमच्या अधिकृत वेबसाईटच्या तांत्रिक अडचणींमुळे आम्हाला शिवाई ट्रस्टबाबत फार माहिती मिळू शकली नाही.
शिवाई ही पब्लिक ट्रस्ट आहे, मग मागची इतकी वर्ष याचा राजकीय कारणांसाठी वापर कसा केला जाऊ शकतो?
अशाप्रकारचा वापर ट्रस्टच्या धोरणाविरोधात असेल तर ट्रस्टींचं निलंबन करून प्रशासकाची नेमणूक का केली जाऊ नये?
आतापर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई ट्रस्टींकडून का घेतली जाऊ नये?
आम्ही पाठवलेलं हे पत्र जनहितासाठी असून हीच आमची तक्रार समजावी आणि पुढची कार्यवाही करावी, अशी तक्रार यशस फर्मकडून धर्मदाय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

सेनाभवन नेमकं कुणाच्या मालकीचं?
दरम्यान शिवसेना भवन नेमकं कुणाच्या मालकीचं आहे असा सवाल उपस्थित झाला आहे. याला कारण ठरलं आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेला आरोप. शिवसेना भवन शिवाई ट्रस्टचं आहे का आणखी कुणाचं? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. यासोबतच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे, ज्यातल्या कागदपत्रांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव दिसत आहे.
'शिवसेनाभवन शिवाई ट्रस्टच्या मालकीच आहे. त्या ट्रस्टवर कधीही बाळासाहेबांनी आपलं नाव टाकलं नव्हतं मात्र उद्धव ठाकरेंना या ट्रस्टवर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी नाव टाकलं का? असा सवाल देशपांडे यांनी उपस्थितीत केला आहे.
आधीच स्मारकात घरच्यांची नाव टाकली आहेत, त्यात हे देखील समोर येत आहे, तर उद्धव ठाकरे फक्त प्रॉपर्टी जमा करत होते. त्यांच लक्ष फक्त प्रॉपर्टी जमा करण्यात आहे. बाळासाहेब यांनी सांगितलं सर्व करता येतं पण गेलेलं नाव करता येत नाही, असा टोलाही देशपांडेंनी ठाकरेंना लगावला.

Sunday, February 19, 2023

कराडच्या सोमवार पेठेतील हाटकेश्वर रिक्षा गेट व मित्रपरिवाराच्या वतीने महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा ; हजारो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ ;

वेध माझा ऑनलाईन - कराडमध्ये सोमवार पेठेतील हाटकेश्वर रिक्षा गेट व मित्रपरिवाराच्या वतीने तेथील रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला  

काल महाशिवरात्रीच्या निमित्ताने सकाळी मंदिरात महादेवाची पूजा व अभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी रांग लावली होती अबाल वृद्ध व महिलांनी दर्शनाचा लाभ घेतला दिवसभर भक्तिगीते व भजनाचा देखील भाविकानी लाभ घेतला महाशिवरात्री निमित्त या रिक्षा गेटच्या वतीने दरवर्षी महाप्रसादाचे आयोजिन केले जाते  आजही याठिकाणी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता शहर व परिसरातील हजारो भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला 
दरम्यान हाटकेश्वर रिक्षा गेट व मित्रपरिवाराच्या सदस्यांनी मिळून देवळाची रंग रंगोटी करून देवळाला लाईटच्या माळांनी सजवण्यात आले होते यामुळे या देवालयाचे रुपडे खूपच देखणे दिसत होते बहारदार मांडव घालून देवळाचा परिसर देखील उत्सवासाठी शानदार पद्धतीने सजवण्यात आला होता 
या रिक्षा गेटचे नंदू पुजारी हे भाविक दरवर्षी येथील सर्व भक्तांच्या सहकार्याने हा उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या हिरीरीने सहभागी होताना दिसतात मात्र यावर्षी ते पायी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी 2 महिन्यांपूर्वी गेले आहेत त्यामुळे त्यांची अनुपस्थिती आज याठिकाणी प्रकर्षाने जाणवली 
दरम्यान हा  उत्सव यशस्वी करण्यासाठी कुंमार घोगडे बाळासाहेब घोंगडे दिनेश जोशी योगेश जोशी प्रसाद इनामदार पिंटू जाधव शाह काका अण्णा काठाले विक्रम गरुड पाटील वाचमन खतीब चाचा इकबाल खैरतखान प्रवीण बोगाळे नरपत महाराज शहबाज खैरातखान हरी कुंभार  रणजित लाटकर सचिन पावसकर सुधीर घाटे सुनील कुलकर्णी तसेच अनेक भक्तभाविकानी परिश्रम घेतले

Saturday, February 18, 2023

आता एकनाथ शिंदेंचे पुढचे टार्गेट... आदित्य ठाकरे ...शिंदेंची पुढची स्टॅटजी काय ?

वेध माझा ऑनलाईन - शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना पुढचा धक्का दिला आहे. यावेळी एकनाथ शिंदेंच्या रडारवर आदित्य ठाकरेंची युवासेना आहे.

एकनाथ शिंदे यांनी युवासेना-युवती कार्यकारिणीची नियुक्ती केली आहे. या कार्यकारिणीमध्ये 10 युवतींचा समावेश आहे. शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रात एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मुख्यनेते म्हणून करण्यात आला आहे.

युवासेना-युवती कार्यकारिणी
डॉ.प्रियंका पाटील, पूजा टांकसाळकर, प्रज्ञा बनसोडे, स्नेहल कांबळे, शर्मिला येवले, शर्वरी गावंडे, क्षितीजा कांबळे, पूजा लोंढे, श्वेता म्हात्रे, शिवानी खानविलकर या 10 जणींचा कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदेंची पुढची स्ट्रॅटेजी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांची पुढची स्ट्रॅटेजीही ठरली आहे. येत्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाची बैठक बोलवतील. या बैठकीमध्ये सगळ्यात आधी पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या जातील. या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांना नेमकं कोणतं पद दिलं जातं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना मुख्यनेते हे पद आहे.
23 जानेवारी 2023 ला उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुखाचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपला होता. त्यामुळे शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका या प्रलंबित आहेत, याच निवडणुका घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना सगळ्यात आधी बैठक बोलवावी लागेल

शिवसेना भवन आणि "सामना' चा ताबा शिंदेंकडे जाणार का ? काय सांगतात कायदेतज्ज्ञ ?

वेध माझा ऑनलाईन - शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्यात आल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर आता शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखा आणि सामना वृत्तपत्राचा ताबाही एकनाथ शिंदेंकडे जाणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी या वास्तूंची मालकी आणि कायदेशीर बाजू महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

मुंबईमध्ये शिवसेनेच्या जवळपास 480 पेक्षा जास्त शाखा आहेत. दादर शिवाजी पार्कसारख्या प्राईम लोकेशनवर शिवसेना भवन आहे. शिवसेना भवन आणि शिवसेनेच्या शाखा या शिवाई ट्रस्टच्या मालकीच्या आहेत. शिवाई ट्रस्टचं मुख्य कार्यालय शिवसेना भवनमध्येच आहे. शिवाई ट्रस्टवर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, सुभाष देसाई, अरविंद सावंत आणि दिवाकर रावते हे ट्रस्टी आहेत.
शिवसेनेचं मुखपत्र असलेलं सामना हे वृत्तपत्र आणि मार्मिक हे साप्ताहिक प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडच्या अंतर्गत येतं. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार या कंपनीवर सध्या दोन बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत. संजय रामचंद्र वाडेकर आणि विवेक तातोजीराव कदम या दोन व्यक्ती प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत. 2018 पर्यंत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे डायरेक्टर पदावर होते, पण नंतर त्यांनी राजीनामा दिला. प्रबोधन प्रकाशनमध्ये वाडेकर आणि कदम हे डायरेक्टर असले तरी कंपनीचे सर्वाधिक शेअर ठाकरे कुटुंबाकडेच असल्याचं सांगितलं जातं.
शिवसेनेच्या मुंबईतल्या शाखा, शिवाजी पार्क जवळ असलेलं शिवसेना भवन, प्रभादेवीचं सामना कार्यालय या एकूण मालमत्तेची सध्याची किंमत शेकडो कोटींच्या घरात आहे, पण ही मालमत्ता शिवाई ट्रस्ट आणि प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर आहे.
शिंदे गटाने शिवसेना आणि मुंबई महापालिकेतल्या शिवसेना कार्यालयावर दावा केल्यानंतर आता त्यांचा मोर्चा शिवसेना भवन आणि सामना कडे वळणार का? असं प्रश्न उपस्थित केला जातोय, पण कायदेशीरदृष्ट्या शिंदे गटाला शिवसेना भवन आणि सामना वर ताबा मिळवता येणार नाही.
शिवसेना भवन, मुंबईतल्या शिवसेना शाखा आणि सामना जर शिवसेना पक्षाच्या नावावर असता तर शिंदेंना यावरही दावा करता आला असता. पण शिवसेना भवन ट्रस्टच्या नावावर आणि सामना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यामुळे शिंदे गटाला यावर दावा करता येणार नाही, असं कायदेतज्ज्ञ सांगतात.

ठाकरेंच्या गटातील दोन खासदार आणि दहा आमदार आमच्याकडे येतील; शिंदे गटाचा दावा

वेध माझा ऑनलाईन - शिवसेनेच्या नावावरील कार्यालय आम्हाला मिळायला हवे. काल आम्हाला निवडणूक आयोगाने अधिकृतपणे शिवसेना दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षाचे प्रमुख आहेत असे सांगतानाच ठाकरेंच्या गटातील दोन खासदार आणि दहा आमदार शिवसेनेत येतील असा दावा शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. 

दोघेही शिवसेनेचेच आहेत, शिवसेनेच्याच नावावर आणि चिन्हावर ते लढले आहेत. यामुळे त्यात वेगळे असे काही नाही. दसऱ्यालाच ते सोबत येणार होते. परंतू काही कारणाने ते होऊ शकले नव्हते. मोठ्या प्रमाणावर आमदार, खासदार ज्या बाजुने जातात त्याच्या बाजुने निर्णय दिला जातो. पुढचाही न्यायालयाचा निर्णय आमच्याबाजुने लागेल असा विश्वास आहे, असे खासदार कृपाल तुमाने यांनी म्हटले आहे. 
हा पक्ष शिंदेंच्या नेतृत्वात पुढे जाणार आहे. बाळासाहेब ठाकरेंचे आशिर्वाद आमच्या सोबत नसते तर हा विजय झालाच नसता. आम्ही हा पक्ष पुढे घेऊन जाणार आहोत, असे शिंदे म्हणाले. 
निवडणूक आयोगाकडे गेलेल्या कागदपत्रांनुसार आयोगाने लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषदेचे ठाकरे आणि शिंदे गटाचे बलाबल किती याची माहिती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये शिंदे गटाकडे विधानसभेत ५५ पैकी ४० आमदार आहेत. तर ठाकरे गटाकडे ५५ पैकी १५ आमदार आहेत. तर विधान परिषदेचे शिंदेंकडे शून्य आणि ठाकरेंकडे १२ पैकी १२ आमदार आहेत. 
दुसरीकडे लोकसभेत १९ खासदारांपैकी शिंदे गटाकडे १३ आणि ठाकरे गटाकडे ४ खासदार आहेत. ठाकरे गटाने सहा खासदार असल्याचा दावा केला होता. परंतू आयोगाकडे ४ खासदारांचीच प्रतिज्ञापत्रे आली आहेत. यामुळे दोन खासदार तटस्थ राहिले की ते देखील शिंदे गटाच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा सुरु झाली आहे. राज्यसभेत मात्र शिंदे गटाकडे एकही खासदार नाहीय. तिकडे तीनपैकी तीन खासदार हे ठाकरे गटाकडे आहेत. 

अभिनेत्री कंगना राणावतचे ट्विट चर्चेत ; उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका ; काय म्हणाली ?

वेध माझा ऑनलाईन - राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे गटात चिन्हावरून सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर काल केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला. या निकालात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्याने उद्धव ठाकरे यांच्यावर धनुष्यबाण गमावण्याची वेळ आली आहे. या निर्णयावर अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

कंगनाने ट्वीटमध्ये म्हंटले आहे की, “देवतांचा राजा इंद्रसुद्धा दुष्कर्म केल्यावर स्वर्गातून खाली पडतात, मग हा तर फक्त एक नेता आहे, जेव्हा त्याने माझे घर अन्यायाने तोडले होते, तेव्हाच मला समजलं होतं की लवकरच त्याची सत्ता जाईल, देवता चांगल्या कर्मांनी पुन्हा वर जाऊ शकतात, परंतु स्त्रीचा अपमान करणारे लोक कधीच पुन्हा वर उठू शकत नाही, आता परत कधीच तो (उद्धव ठाकरे) या परिस्थितीतून वर येऊ शकणार नाही,” असं ट्वीट कंगना राणौतने केलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने हंगामी आदेशामध्ये शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षनाव आणि ‘ढाल-तलवार’ या निवडणूक चिन्हाचे वाटप केले होते. मात्र, शुक्रवारी आयोगाने अंतिम निकाल देताना, शिंदे गटाचे हंगामी पक्षनाव आणि निवडणूक चिन्ह तातडीने गोठवण्यात आल्याचे स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मशाल चिन्ह देखील जाणार! समता पक्षाचा मशाल चिन्हावर दावा.....

वेध माझा ऑनलाईन - शुक्रवारी निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्यात आलं आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल या चिन्हाचाच वापर करावा लागणार आहे. मात्र इथेही ठाकरे गटाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत.  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देण्यात आलेलं मशाल चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी समता पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. आज सकाळी 10 वाजता समता पक्षाचे शिष्टमंडळ याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगात जाणार आहे. समता पक्षाचे अध्यक्ष उदय मण्डल यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेणार आहे.

काय आहे नेमका वाद? 
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले होते. दोन्ही गटाकडून शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आला होता. दोन्ही गटाकडून दावा करण्यात आल्यानं निवडणूक आयोगानं अंतिम निकाल येईलपर्यंत पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं.

समता पक्षाचा दावा 
शुक्रवारी निवडणूक आयोगाने निर्णय दिला. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाला मशाल याच चिन्हाचा वापर करावा लागणार आहे. मात्र आता मशाल या चिन्हावर देखील समता पक्षाने दावा केल्यानं ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. आज सकाळी दहा वाजता याच पार्श्वभूमीवर समता पक्षाचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे जाणार आहे.

Friday, February 17, 2023

उड्डाणपूल पाडण्यासाठी बॅरिगेटिंग सुरू असताना अचानकपणे जनरेटरचा भडका ; जनरेटर जळून खाक ;

वेध माझा ऑनलाईन - कराड येथे उड्डाणपूल पाडण्यासाठी बॅरिगेटिंगचे काम सुरू असताना अचानक कंत्राटदाराचा जनरेटर पेटला. यामुळे वाहतूक कोंडी झाली होती सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत जनरेटर पूर्ण जळून खाक झाला.

 याबाबत मिळालेली माहिती अशी, कराड येथे महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. जुना उड्डाणपूल पाडण्यासाठी दुतर्फा बॅरिगेटिंगचे करण्याचे काम सुरू आहे. मलकापूर फाट्याजवळ हे काम सुरू होते. त्यावेळी एका डंपरमधून जनरेटर घेऊन जात असताना अचानक जनरेटरने पेट घेतला. थोड्याच वेळात आग वाढल्याचे निदर्शनास येताच उपमार्गावरील वाहतुक थांबवून पेटता जनरेटर डंपरमधून खाली रस्त्यावर फेकन्यात आला. या वेळी जनरेटरचा भडका उडाला.यावेळी मनसे तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण यांच्यासह परिसरातील नागरिकांनी व वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक सरोजनी पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व तेथिल नागरिकांसह वाहने बाजूला करून परिसर मोकळा करण्यात आला. 

छगन भुजबळांचा महत्वपूर्ण सवाल ; म्हणाले ...संसदीय सदस्य संख्येवर शिवसेनेचा निर्णय घ्यायचा होता तर प्रतिज्ञापत्र कशासाठी मागवली?

वेध माझा ऑनलाईन - संसदीय सदस्य संख्येवर निर्णय घ्यायचा होता तर प्रतिज्ञापत्र कशासाठी मागवली? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. आता खरा निर्णय जनतेच्या कोर्टात असून सहानुभूती ही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे असं मत छगन भुजबळ यांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा पक्ष बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला शिवसेना हे नाव व पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले आहे. या निकाला नंतर नाशिक येथे छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

यावेळी ते म्हणाले की, सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. त्यात वेगवेगळे कंगोरे आहे. यात सखोल विचार करण्याचे काम सुप्रीम कोर्ट करत आहे. त्याच्यात निवडणूक आयोग यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. त्यासाठी प्रतिज्ञापत्र ठाकरे गटाने सादर केली. आता त्यांनी निर्णय दिला की, संसदीय पक्षात जास्तीत जास्त खासदार आणि आमदार शिंदे गटाकडे आहे. जर याच्यावर निर्णय द्यायचा होता तर पदाधिकारी यांचे प्रतिज्ञापत्र का मागवले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, असा निर्णय येईल असा संशय उद्धव ठाकरे यांना होता. यामुळे त्यांनी सांगितलं होतं की, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. मात्र निवडणूक आयोगाकडून निर्णय घोषित करण्यात आला. खरतर त्यांनी दोन चार दिवस थांबायला काय हरकत होती? असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, देशात असे जर निर्णय लागत असतील तर पुढे अनेक प्रश्न निर्माण होतील. ही मोठी विचित्र परिस्थिती लोकशाहीत निर्माण होऊ शकते. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी  ही शिवसेनेची चळवळ सुरू केली. त्यांनी पक्ष स्थापन केला. स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पुढे नेली. त्यानंतर पुढचे पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरे असतील, असा निर्णय झाला. आता अचानक असे निर्णय आले. याला सुद्धा उद्घव ठाकरे सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ शकतील असे त्यांनी सांगितले.

खरा निर्णय जनतेच्या कोर्टात...
निवडणूक आयोग हे निष्पक्षपणे निर्णय घेतात. देशातील केंद्रीय संस्था यांच्याबाबत नक्की काय आहे, हे जनतेला माहित आहे. त्यामुळे असं होणार, हे लोकांना माहित होतं. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या गटाला एक जोड शब्द देऊन ते शिवसेना म्हणून राहतील. राहिला प्रश्न तो निशाणीचा तर आता समाज माध्यमांवर एक मिनिटांत निशाणी आणि नाव ताबोडतोब जाईल. यात फार काही गोंधळ उडणार नाही. फक्त उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायचं की एकनाथ शिंदे यांच्यासोबत जायचं, हे मतदारांना ठरवायचं आहे. पण खरा निर्णय जनतेच्या कोर्टात आहे. याची सहानुभूती ही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे, असं माझं मत आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कराडात शिंदे गटाकडून भगव्या गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा ; फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून देखील केला आनंद व्यक्त ;


वेध माझा ऑनलाईन - शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाने संपुर्ण राज्यभर या निर्णयाचे स्वागत करत मोठा जल्लोष साजरा केला आहे कराडात देखील शिंदे गटाने भगव्या गुलालाची उधळण करत तसेच फटाके फोडुन व पेढे वाटून मोठा जल्लोष केला आहे
यावेळी शिंदे गटाच्या कराडच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय म्हणजे सत्याचा विजय झाला आहे अशा भावना व्यक्त केल्या 
याप्रसंगी  शिंदे गटाचे शहर व तालुक्यातील अनेक पदाधिकारी  महिला तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

पक्षचिन्ह आणि नाव गेल्यानंतर शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला ; वाचा बातमी

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे, तसंच याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या निकालावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
'हा निवडणूक आयोगाचा निकाल आहे, एकदा निकाल लागल्यावर त्यावर चर्चा करता येत नाही. तो स्वीकारायचा आणि नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा काही फार परिणाम होत नसतो. काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी असताना हा वाद झाला. काँग्रेसचं गाय-वासरू चिन्ह होतं, पण त्यांनी पंजा घेतला, पण त्यामुळे काही फरक पडला नाही. लोकांनी ते स्वीकारलं. आताही फरक पडणार नाही, कारी दिवस चर्चा होत राहील, नंतर लोक विसरून जातील,' असं म्हणत शरद पवार यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय स्वीकारण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

शंभूराज देसाई म्हणाले ...हा तर सत्याचा विजय...


वेध माझा ऑनलाईन - केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालामुळे शिंदे गट शिवसेनेसाठी आजचा हा आनंदाचा दिवस आहे. या निकालाच्या रुपाने आम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मिळाला आहे. यापुढे आम्ही शिवसेनेचे ज्वलंत हिंदूत्वाचे काम अधिक जोमाने देशभर करणार आहोत. अखेर सत्याचा व न्यायाचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाईयांनी दिली.

उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेली असून आता धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचे नाव ही एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने आज मोठा निर्णय देत धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव शिंदे गट शिवसेनेला दिले. अनेक दिवसांपासून आयोगाकडून हा निर्णय प्रलंबित होता. आज निवडणूक आयोगाने ७८ पानांची निकालपत्र दिले आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, आजचा आनंदाचा दिवस आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह आम्हाला दिले आहे. या निकालाच्या निमित्ताने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे आमच्या घरातील बाळासाहेबांच्या प्रतिमेस आम्ही पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यापुढे शिवसेनेचे ज्वलंत हिंदूत्वाचे काम आम्ही अधिक जोमाने राज्यात व संपूर्ण देशात करु. नव्या ताकतीने व जोमाने काम करु. अखेर सत्याचा व न्यायाचा विजय झाला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बहुमत असून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे बहुमत असल्यामुळे आम्हाला न्याय मिळाला आहे. आता या क्षणापासून आम्ही सर्वजण नव्या जोमाने कामाला लागणार आहोत.

पंतप्रधान मोदींनी देशात लोकशाही संपवून बेबंदशाही सुरू करावी ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल ;

वेध माझा ऑनलाईन - निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे राहणार असल्याचा निर्णय दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपसह विरोधकांवर हल्लाबोल केला. तसंच पंतप्रधान मोदी यांचे नाव घेत थेट आव्हानही दिलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु असताना पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून घोषणा करावी की ७५ वर्षांचं स्वातंत्र्य संपलंय आणि देशातली लोकशाही संपवून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केली आहे.

आजपर्यंत आपण अनेक उदाहरणे पाहिली आहेत जिथे सरकारची दादागिरी चालली आहे. अगदी न्याययंत्रणासुद्धा आपल्या दबावाखाली कशी येईल याच्याबद्दल केंद्रीय कायदा मंत्री आणि त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचेही अधिकार हवे आहेत. असंच सुरू राहिलं तर लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली वाहून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात करत आहोत असं बोलण्याचं धाडस पंतप्रधानांनी दाखवायला हवं असं उद्धव ठाकरे म्हणाले.आजचा निर्णय हा अनपेक्षित आहे. जवळपास सहा महिने ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोवर निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये असं आम्ही म्हणत होतो. पक्ष कुणाचा हे केवळ आणि केवळ निवडून आलेल्या आमदार, खासदारांच्या जोरावर ठरवलं तर कुणीही धनाढ्य माणूस या आमदार, खासदारांना विकत घेऊन पक्षाचा सर्वेसर्वा , मुख्यमंत्री, पंतप्रधान होऊ शकतो अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.निवडणूक आयोगाबद्दल इतकंच बोलेन की प्रशांत भूषण यांनी निवडणूक आयोगावरच शंका व्यक्त केलीय. जसं न्यायाधीश नेमण्याची प्रक्रिया आहे तशीच निवडणूक आयुक्त नेमायला हवेत. आज जी दयनीय अवस्था गद्दारांची झाली आहे त्यांना स्वत: लढण्याची हिंमत नाही. मला शक्यता वाटते की ज्या पद्धतीने धनुष्यबाण आणि शिवसेना शिंदे गटाला दिले याचाच अर्थ महिन्या दोन महिन्यात महापालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या जातील. त्यांना कोणत्याही परिस्थिती मुंबई महापालिका जिंकायची आहे. मुंबईच्या हातात भिकेचा कटोरा देऊन दिल्लीश्वरांच्या दारात उभी करायची आहे असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.

राज ठाकरेंची ट्विटर वरून उद्धव ठाकरेंना चपराक ; बाळासाहेबांचा फोटो असलेला व्हीडिओ केला शेअर ;

वेध माझा ऑनलाईन - शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे, ज्याचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. तर या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचा फोटो असलेला एक व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे. 

'बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं....', असं कॅप्शन राज ठाकरे यांनी या ट्वीटला दिलं आहे. 'नाव आणि पैसा. पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो... पण एकदा नाव गेलं की परत येत नाही. ते येऊ शकत नाही, काळ्या बाजारात सुद्धा मिळायचं नाही. म्हणून नावाला जपा, नाव मोठं करा.' असा बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातला व्हिडिओ राज ठाकरेंनी शेअर केला आहे.

धनुष्यबाण ही निशाणी मिळाली एकनाथ शिंदे गटाला ; उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का

वेध माझा ऑनलाईन - निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांचा विजय झाला आहे. धनुष्यबाण ही निशाणी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाला मिळाली आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का मानला जात आहे. धनुष्यबाणासह शिवसेना हे नावही एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर काय परिणाम होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सुप्रीम कोर्टामध्ये मागचे तीन दिवस आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून सुनावणी झाली. या सुनावणीवेळी शिंदेंकडून महेश जेठमलानी आणि हरीश साळवे यांनी आम्ही पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन केलं नाही, तर ही पक्षांतर्गत लोकशाही आहे. आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे आहे, असा दावा केला. आता निवडणूक आयोगानेच शिवसेना हा पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवेळीही एकनाथ शिंदेंकडून हा दाखला दिला जाऊ शकतो. निवडणूक आयोगाने आम्हाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं आहे, त्यामुळे पक्षांतरबंदी कायदा कसा लागू होऊ शकतो, असा दावा शिंदेंच्या वकिलांकडून सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवेळी केला जाईल अशी आता यानिमित्ताने शक्यता निर्माण झाली आहे

Wednesday, February 15, 2023

किरीट सोमय्या यांनी केलं नवं ट्विट ; म्हणाले ...आता पुढचा नंबर कुणाचा? हे मी सांगू शकत नाही...

 वेध माझा ऑनलाईन - भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नुकतचं एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी एक सूचक विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अनिल परब आणि राष्ट्रवादि काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या नंतर आता पुढचा नंबर कुणाचा? हे मी सांगू शकत नाही. अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

किरीट सोमय्या यांच्याकडून अब नंबर किस का? असे लिहिण्यात आल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. तर पुढचा नंबर कोणाचा असणार? अशी देखील चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, ‘आता नंबर कुणाचा? एकीकडे हसन मुश्रीफ यांनी १५६ कोटी रूपये कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून मागील तारखांमध्ये नोंदी केल्या. स्वतःच्याच कंपनीचे कर्ज बुडीत खात्यात जमा केले. मुश्रीफ यांची तीन्ही मुले याप्रकरणात जामिनासाठी धावत आहेत.
तर, सुजित पाटकर यांच्या कंपनीच्या खात्यात मुंबई महापालिका आयुक्तांच्या परवानगीने सव्वा बत्तीस कोटी रूपये येतात. त्यातून २० कोटी रूपये गायब होतात. आणि ज्यांच्या खात्यात ते जातात ते उद्धव ठाकरे यांचा उजवा हात. असं देखील यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले.
तर, अनिल परब यांच्या विरोधात प्राप्तिकर खात्याने कारवाई करत त्यांचा साई रिसॉर्ट जप्त केला आहे. जमिन प्राप्तिकर विभागाकडून बेनामी मालमत्ता म्हणून या रिसॉर्टवर कारवाई करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाकडून हा आदेश महाराष्ट्र शासनाला देखील कळविण्यात आला आहे. अनिल परब यांच्याकडून अगोदर चार जामिन घेण्यात आले आहेत. परब यांच्या विरोधात रत्नागिरी पोलिसांकडून तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तर एक तक्रार भारत सरकारकडून करण्यात आली आहे. म्हणजेच, अनिल परब हे चार प्रकरणात जामीनावर बाहेर आहेत. आणि त्यांच्याविरोधात चार गुन्हे आणखी दाखल झाले आहेत. असे देखील यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले. दरम्यान, त्यांनी केलेल्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाली आहे.

यंदाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अभिनेते मकरंद अनासपुरे यांना जाहीर ; अ‍ॅड.उदयसिंह पाटील व प्रा.गणपतराव कणसे यांची पत्रकार परिषदेत माहिती

वेध माझा ऑनलाईन - उंडाळे ता. कराड येथील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 49 व्या स्मृतीदिनानिमित्त 40 वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळावा शनिवार दि. 18 फेब्रुवारी रोजी होत आहे. अधिवेशनात यावर्षीचा मानाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार नाम फाउंडेशन च्या माध्यमातून सुरू असलेले कार्य व प्रबोधनातील क्षेत्राबद्दल प्रतिभावंत अभिनेते मकरंद अनासपुरे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे 51 हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाळ, श्रीफळ असे पुरस्कारचे स्वरूप आहे. दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त व  रयत साखर कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड.उदयसिंह पाटील व व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा.गणपतराव कणसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.यावेळी प्रा.धनाजीराव काटकर, यांची उपस्थिती होती. शनिवार दि. 18 रोजी दुपारी दोन वाजता स्वा. दादा उंडाळकर स्मारक मंदीर उंडाळे येथे अधिवेशनात पुरस्काराचे वितरण होणार आहे.

मकरंद अनासपुरे हे प्रतिभावंत कलाकार असून कला प्रबोधन क्षेत्रात त्यांचे गेले पंचवीस वर्षे योगदान आहे याबरोबर प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्याबरोबर नाम फाउंडेशन च्या माध्यमातून महाराष्ट्रभर फार मोठे समाजकार्य सुरू असून या एकंदरीत योगदानाबद्दल मकरंद अनासपुरे यांचा दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
माजी मंत्री स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांनी वडील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्य स्तरीय स्वातंत्र सैनिकांचे अधिवेशन व समाजप्रबोधन कार्यक्रम सुरू केले होते. 1973 पासून ही परंपरा अखंड सुरू आहे. उंडाळकर यांच्या पश्चात स्मारक समितीने अ‍ॅड. उदयसिंह पाटील याच्या नेतृत्वाखाली ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. स्व. विलासराव उंडाळकर यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता.स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्काराने आत्तापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये स्वातंत्र सेनानी माजी राजदूत एन.जी.गोरे, सुप्रसिध्द कवी ना.धो. महानोर, स्वातंत्र्य सेनानी श्रीमती उषा मेहता, स्वा.से. गोविंदभाई श्रॉफ, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती निलमताई देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते मोहन धारीया, स्वा.से. व साहित्यिक जी.पी. प्रधान, प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, सामाजिक कार्यकर्ते शांताराम गरूड, शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य पी.बी.पाटील, स्वा.सै. प्रभाकररावजी कुंटे, न्यायमूर्ती पी.बी. सावंत, कृषीतज्ज्ञ डॉ. जयंत पाटील, पत्रकार पी. साईनाथ, प्रसिध्द वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम, डॉ. अभय बंग, जे.जे. रूग्णालयाचे नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, अर्थशास्त्रज्ञ निळकंठ रथ, लेखक व विचारवंत डॉ. सदानंद मोरे, डॉ. प्रकाश आमटे, स्वातंत्र्य सेनानी भाई वैद्य, लेखक सुरेश व्दादशीवार, डॉ. विवेक  सावंत, पद्मश्री डॉ.गणेश देवी, पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांचा समावेश आहे.सदर राष्ट्रीय कार्यक्रमास महाराष्ट्र सैनिक स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार, माजी सैनिक उपस्थित राहणार असून तालुक्यातील शेतकरी, माजी सैनिक, युवक, महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वा दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने शेवटी ऍड उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी केले.


पृथ्वीराज चव्हाण म्हणाले ...बीबीसी कार्यालयावरील कारवाई दुर्दैवी ; मिडियावर दडपण आणण्याचे मोदींचे प्रयत्न ; चीनने भारताचा प्रदेश बळकावला आहे ; राज्यातून उदयोग बाहेर चाललेत तरी भाजप गप्पच आहे ;भाजपला लोकशाही नको आहे ;

वेध माझा ऑनलाईन - बीबीसी कार्यालयावरील कारवाई अत्यंत दुर्दैवी अशी आहे. स्वतंत्र मिडियावर दडपण आणण्याचे चालले आहे. ब्रिटीश सरकारची ही कंपनी आहे. छापा टाकून काही सापडणार नाही, केवळ दहशत निर्माण करायची. मोदींच्या विरोधात जी डाॅक्युमेंट्री केली, त्यामुळे मोदींचा संताप झाला आहे. अनेक वृत्तवाहिन्या त्यांनी विकत घेतल्या आहेत. स्वतंत्र मिडिया मोदींना सहन होत नाही. याचे हे उदाहरण असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.

कराड (ता. कराड) येथे काॅंग्रेसच्या हाथ से हाथ जोडो अभियानाच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रयत कारखान्याचे संचालक अॅड. उदयसिंह पाटील, कराड उत्तरचे अध्यक्ष निवास थोरात, सरपंच मृणालिनी मोहिते, शिवराज मोरे, ऋतुराज मोरे, भानुदास माळी, इंद्रजित चव्हाण, अजित पाटील (चिखलीकर), अमित जाधव, उमेश मोहिते, सरपंच संग्राम पवार आदी उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजपा अन् मोदींना लोकशाहीची नको आहे. त्यामुळे चाैथा स्तंभ अन् पाचवा स्तंभ कुठे राहिला. लोकशाहीची मोडून टाकायची आहे. डाक्युमेंट्रीला उत्तर देण्याऐवजी त्या कंपनीवर छापे टाकणे अत्यंत निंदनीय असल्याचे म्हटले.

घमेंडीमध्ये असे बरेच लोक असतात. त्याच काय झालं ते जगाने पाहिले आहे. त्यांना वल्गना करायच्या तेवढ्या करू द्या, आमची 2024 ची तयारी सुरू असल्याचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित शहा यांच्यावर टीका करताना सांगितले.

मोदी सरकारच्या काळात चीनने आक्रमण करून भारताचा प्रदेश बळकावला आहे. गलवान, तवान, अरूणाचल, लडाखमध्ये प्रदेश बळाकावलेला असताना मोदी बोलायला तयार नाहीत. महाराष्ट्रात एकही उद्योग येत नाही, अन् देवेंद्र फडणवीस मूग गिळून गप्प असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

Tuesday, February 14, 2023

कराडच्या मारुतीबुवा मठाच्या विश्वस्तांच्या डोक्यात वीणा घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बाजीरावमामा कराडकर याना सात वर्ष सक्तमजुरी ;

वेध माझा ऑनलाईन - कराड येथील मारुतीबुवा कराडकर मठाच्या विश्वस्तांच्या डोक्यात वीणा घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मठाचे तत्कालीन मठाधिपती बाजीरावमामा कराडकर याला न्यायालयाने दोषी धरुन सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. रविकांत तु. साखरे यांनी मंगळवारी ही शिक्षा ठोठावली. बाजीराव भागवत जगताप (वय- 37, रा. कोडोली, ता. कराड) असे बाजीरावमामचे मुळ नाव आहे.

सरकार पक्षाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरातील मारुतीबुवा मठाचे विश्वस्त व अध्यक्ष यशवंत दाजी माने हे 23 एप्रिल 2019 रोजी मठामध्ये असताना. बाजीरावमामा कराडकर हा आरडाओरडा करीत त्याठिकाणी आला. त्याने तेथे असलेल्या लाकडी विना उचलून घेतला. तसेच दिंडी कशी काढता ते बघतो, असे म्हणत तेथील लोकांशी वाद घातला. त्यावेळी मठाचे अध्यक्ष यशवंत माने यांच्याकडे पाहून तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणत त्याने विना त्यांच्या डोक्यात घातला. त्यामध्ये यशवंत माने हे गंभीर जखमी झाले. मठात असलेल्या मोहन चव्हाण व अशोक शिंगण यांनी त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात बाजीरावमामा कराडकर याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. पी. किर्दत व उपनिरीक्षक भरत चंदनशिवे यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षाच्यावतीने या खटल्यात अ‍ॅड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. त्यांनी 11 साक्षिदार तपासले. त्यापैकी दोन साक्षिदार प्रत्यक्षदर्शी साक्षिदार होते. तसेच डॉक्टरांची साक्षही महत्वपुर्ण ठरली. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानुन न्यायालयाने आरोपी बाजीरावमामा कºहाडकर याला या गुन्ह्यात दोषी धरुन सात वर्ष सक्तमजुरी व सात हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला अ‍ॅड. ऐश्वर्या यादव, अ‍ॅड. संध्या चव्हाण व अ‍ॅड. कोमल लाड यांनी सहकार्य केले.

व्हॅलेन्टाईन डे दिवशी पुन्हा एका श्रद्धाची हत्या ; फ्रीजमध्ये आढळून आला मृतदेह ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन - व्हॅलनटाईन डेच्या दिवशीच दिल्लीमध्ये आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. देशाच्या राजधानीमध्ये पुन्हा एकदा श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. दिल्ली पोलिसांना ढाब्यावर एका तरुणीचा मृतदेह मिळाला आहे. या तरुणीचा मृतदेह एका फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. हा प्रकार दिल्लीच्या बाबा हरिदास नगर भागात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी साहिल नावाच्या आरोपीला अटक केली आहे.

दिल्लीच्या द्वारकाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त विक्रम सिंग यांनी माध्यमाना दिलेल्या माहितीनुसार त्यांना मंगळवारी सकाळी एका महिलेची हत्या झाल्याचं आणि तिचा मृतदेह ढाब्यामध्ये लपवल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपी साहिल गहलोतला पकडलं. साहिल गहलोत मित्रांव गावाचा रहिवासी असून पोलिसांनी पुढची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. साहिलने 10 फेब्रुवारीला लग्न केलं होतं यावर महिलेने आक्षेप घेतला होता. हे दोघं बराच काळ रिलेशनशीपमध्ये होते, असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला हरियाणाच्या झज्जर भागातली आहे. दुसऱ्या महिलेशी लग्न केल्यामुळे आरोपी असलेल्या साहिलला ही महिला कायदाच्या कचाट्यात अडकवण्याची धमकी देत होती, असं सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना कराड शहरच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन ; शिबिरास मोठा प्रतिसाद ; शहर अध्यक्ष राजेंद्र माने यांची माहिती ;

वेध माझा ऑनलाईन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना कराड शहरच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शहर अध्यक्ष राजेंद्र माने यांनी दिली आहे या शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला आहे

यावेळी राजेंद्र माने म्हणाले हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण आणि केवळ 20 टक्के राजकारण करण्याचे संस्कार केले आहेत त्यामुळे आम्ही समाजासाठी असे अनेक उपक्रम राबवत आहोत यापुढेही राबवणार आहोत

यावेळी जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव,उपजिल्हाप्रमुख अक्षय मोहोते,महिला उपजिल्हाप्रमुख सुलोचना ताई पवार, उपशहर प्रमुख संदीप थोरवडे राजीव खराडे गणेश भोसले अशोक शिंदे शंकरराव  वीर अजय देसाई गुलाबराव पाटील प्रमोद वेरणेकर बाबासाहेब बनसोडे  पवन निकम विक्रांत पालकर अजिंक्य माने अदित्य इनामदार आदीची उपस्थिती होती

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा जिल्ह्यात गाेवा बनावटीच्या दारूची वाहतूक पकडली ; कराड हद्दीत झाली कारवाई

वेध माझा ऑनलाईन - राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नूडल्सच्या नावाखाली गाेवा बनावटीच्या दारूची वाहतूक करताना पडकण्यात आली आहे. कराड हद्दीत कुडाळ येथील पथकाने ही कारवाई केली असून 1 कोटी 87 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी, एका नूडल्सच्या कंपनीचा माल म्हणून गोव्यातून आणलेली ट्रकभरुन दारू उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी कराड तालुक्यातील मालखेड येथे पकडली. या ट्रकमध्ये अंदाजे सुमारे साठ लाखांच्या विदेशी मद्यासह पाेलिसांनी वाहन जप्त करुन एकास ताब्यात घेतले आहे.
ट्रक चालकाने नूडल्सची वाहतूक करत असल्याची पावती दाखवून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करीत असल्याचे पथकाच्या तपासणीत निदर्शनास आले. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता त्यात दारुचे बाॅक्स आढळले. सदरचा ट्रक गोव्याहून नाशिकला दारू घेवून निघाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक केली आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या ; आत्महत्येचे कारण काय?

वेध माझा ऑनलाईन - वैभववाडी शहरात भाड्याने राहात असलेल्या खोलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. महेश अनिल गाडवे (मूळ रा. फलटण, जि. सातारा) असे या मयत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

मयत महेश गाडवे हा वैभववाडीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. वैभववाडी शहरात मित्रांसमवेत तो भाड्याच्या खोलीत राहात होता. दोन दिवसांपूर्वी त्याचे मित्र गावी गेल्यामुळे तो खोलीत एकटाच होता. त्याच्या बाजूच्या खोलीत याच महाविद्यालयातील विद्यार्थी राहातात. सोमवारी त्यांना महेश याच्या खोलीचा दरवाजा बंद दिसला. हाक मारुनही प्रतिसाद न मिळालेले त्यांनी जोरदार धक्का मारून दरवाजा उघडला दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, सूरज पाटील, पो.ना. मारुती साखरे, अभिजीत मोर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मयताच्या शर्टच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्या चिठ्ठीत मी घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्यामुळे स्वखुशीने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. महाविद्यालयीन युवकाच्या आत्महत्येने वैभववाडीत खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाड्या शर्यती उत्साहात सम्पन्न ; रेठरे बुद्रुकच्या सदाभाऊ मास्तरांच्या बैलगाडीचा आला प्रथम क्रमांक ...

वेध माझा ऑनलाईन - राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्वे,ता.कराड येथे आयोजित केलेल्या भव्य बैलगाड्या शर्यतीत रेठरे बुद्रुक येथील सदाभाऊ कदम मास्तर यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवत अबालवृध्दांची वाहवा मिळवली.

मोठ्या संख्येने बैलगाड्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक विंग येथील महंमद मुजावर यांच्या बैलगाडीने मिळवला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक खशाबा दाजी शिंदे रेठरे सैदापूर,चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक धानाई बिरोबा प्रसन्न कार्वे तर पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक सदाशिव कदम मास्तर रेटरे बुद्रुक यांच्या बैलगाडीने मिळवला.
बैलगाड्या शर्यती ही ग्रामीण जीवनाची उत्कृष्ठ परंपरा असुन ही परंपरा हौशी शेतकरी निष्ठेने संभाळत असल्याचे नमुद करुन
या बैलगाड्या शर्यतीत पश्चिम महाराष्ट्रातील असंख्य बैलगाड्या शौकिनांनी सहभाग घेतल्याबद्दल शिंदे गटाचे कराडचे नेते व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह  यादव यांनी सर्व सहभागींचे मन:पुर्वक आभार मानुन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमुल्य सहकार्य करणार्‍या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.पारितोषिक वितरण समारंभ सातारा जिल्हा बाळासाहेबांची शिवसेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार कराड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, नगरसेवक हणमंतराव पवार सौ.स्मिता हुलवान,शहर अध्यक्ष राजेंद्र माने,महीला आघाडी उपाध्यक्ष सुलोचना पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी रणजित (नाना) पाटील किरण पाटील, बाळासाहेब यादव, निशांत ढेकळे, ओमकार मुळे, विनोद भोसले, राहुल खराडे, गुलाबराव पाटील, बाळासाहेब बनसोडे, मिलिंद माने, गणेश भोसले, राजेश खराडे, संतोष जाधव संदीप थोरवडे, संकल्प मुळे, शंकर वीर,विद्या शिंदे,विमल सुपनेकर,पवन निकम,सागर बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

बैलगाडी शर्यतीचे उत्कृष्ट नियोजन पावर ग्रुपचे विनोद पवार, प्रकाश पवार, तानाजी देशमुख, विनायक बाबर, संतोष खराडे,सचिन गायकवाड, सुरेश शिंगण, पप्पू शिंगण,दादा भोसले, आबा शिंगण, अरुण शिंगण, संतोष शिंगण,हार्दिक पवार, सचिन पवार, सुनील काशीद, सुदाम सिंगण, अनिल जाधव, विठ्ठल पवार यांनी केले होते.

Monday, February 13, 2023

आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी, शिंदेंसह 'या' आमदाराचा आज होणार फैसला?

वेध माझा ऑनलाईन - राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे. आजपासून कोर्टात नियमित सुनावणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे काय कोर्ट काय निर्णय देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलनटाईन डेच्या दिवशी ठाकरे-शिंदे यांच्या ब्रेकअपचा निर्णय होणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेना आणि शिंदे गट वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणीसाठी सोपवायचं की नाही, यासंदर्भात यावेळी निर्णय होण्याची शक्यता आहे. या याचिकांवर नियमित सुनावणीची तारीख निश्चित झाल्यास सरकारची वैधता आणि आमदारांच्या अपात्रतेबाबत दोन-तीन महिन्यात निर्णय होऊ शकतो. शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेला सहा महिन्यांचा कालावधी झाला असून पाच सदस्यीय पीठाने या याचिकांवर सुनावणी घेतली, तरच लवकर निर्णयाची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रामध्ये जून महिन्यात सत्तानाट्य सुरू असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी गुवाहाटीला गेलेल्या 16 आमदारांना तुमच्यावर कारवाई का करू नये? याबाबत 48 तासात उत्तर द्यायची नोटीस पाठवली होती. या 16 आमदारांमध्ये एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, भरत गोगावले. संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोराने आणि चिमणराव पाटील या 16 आमदारांना ही नोटीस पाठवण्यात आली होती.
आमदारांना नोटीस पाठवण्यात आल्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. विधानसभा उपाध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव आला असल्यामुळे ते आम्हाला अशी नोटीस पाठवू शकत नाहीत, असा दावा शिंदे गटातल्या आमदारांनी केला, यानंतर सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या निलंबनाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश दिले होते. या प्रकरणी आता मंगळवारी सुनावणी होणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट...म्हणाले...अजित पवारांसोबत झालेला शपथविधी शरद पवारांशी चर्चा करूनच झाला होता,

वेध माझा ऑनलाईन - अजित पवारांसोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांसोबत झालेला शपथविधी शरद पवारांशी चर्चा करूनच झाला होता, असा खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारची स्टेटमेंट्स करतील, असं मला कधी वाटलं नाही', असं म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचा दावा फेटाळून लावला आहे.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
'आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली, की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट हवंय, म्हणून आपण सरकार तयार करूया. राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो, तेव्हा चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय केला. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. जी चर्चा झाली होती ती शरद पवार साहेबांशीच झाली होती. ती काही खाली झालेली चर्चा नाही. शरद पवारांशी चर्चा झाली त्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे, त्यामुळे त्याठिकाणीही आमच्यासोबत विश्वासघातच झाला. पहिला विश्वासघात हा मी जास्त मोठा मानतो, कारण तो आपल्यासोबतच्या व्यक्तीने केला होता. हा छोटा होता,' असं फडणवीस म्हणाले.
'अजितदादांनी आमच्यासोबत घेतलेली शपथ फसवणुकीच्या नाही तर प्रामाणिक भावनेतून घेतली होती. पण नंतर ते कसे तोंडघाशी पडले हे अजितदादा सांगतील, त्यांनी नाही सांगितलं तर मी सांगीन,' असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.