वेध माझा ऑनलाइन।
कराडच्या राजकीय क्षेत्रात नागरिकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत राहणारे सतीश भोंगाळे यांनी पद नसतानाही जनसेवेची आपली वाटचाल कायम ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांची "आपला माणूस' म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून लोकशाही आघाडीच्या माध्यमातून, विशेषतः मार्केट यार्ड परिसरातील आपल्या प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी भोंगाळे सातत्याने उपलब्ध राहिले आहेत.
परिसरातील नागरी समस्या, छोट्या-मोठ्या विकासकामांचे प्रश्न किंवा एखाद्या नागरिकाची वैयक्तिक अडचण असो, त्यासाठी ते संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असतात.
नगरपालिका राजकारणात सक्रिय असलेल्या अनेक लोकप्रतिनिधींसोबतच नागरिकांच्या प्रश्नांसाठी पद नसतानाही उपलब्ध राहणाऱ्या कार्यकर्त्यांचीही स्वतंत्र ओळख निर्माण होते. सतीश भोंगाळे हे त्याचे उदाहरण ठरत आहेत. नगरसेवक पदावर नसतानाही नागरिक स्वतःहून त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या अडचणी मांडतात, ही त्यांच्या सामाजिक कार्याची पावती मानली जात आहे.
गेल्या नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, निवडणुकीतील पराभवाने भोंगाळे यांच्या सार्वजनिक जीवनातील सक्रियता कमी झालेली नाही. पद गेले, मात्र जनसेवेची भावना कायम राहिली, अशीच त्यांची कार्यपद्धती राहिली आहे.
दरम्यान, सतीश भोंगाळे यांची मित्रपरिवारातही स्वतंत्र ओळख आहे अनेक मित्रांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेम, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम आणि चित्रपटांविषयीची आवड या माध्यमातून या मित्रपरिवाराची वीण अधिक घट्ट झाली आहे.
सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक नातेसंबंध जपत नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून सतीश भोंगाळे यांची आपला माणूस ओळख निर्माण झाली आहे.
निवडणुकीचा निकाल बदलला, पण नागरिकांशी असलेले नाते बदलले नाही, हे त्यांच्या आजवरच्या कार्यातून अधोरेखित होते.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment