आज सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा पार पडली त्यामध्ये सत्ताधारी व विरोधी गटात राडा झाला यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
दरम्यान या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भाजप आमदार मनोज घोरपडे, विधान परिषद आमदार धैर्यशील कदम सभेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत उपस्थित झाले. यावेळी कार्यकर्त्यांची सभास्थळी हामरीतुमरी झाल्याचे पहायला मिळाले.
सभेठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सभा ठिकाणी राडा झाला त्यानंतर पोलिसांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांततेच आवाहन करण्यात आले. मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते
यानंतर भाजप चे आमदार मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांनी त्याच ठिकाणी दुसरी प्रतिसभा घेत बाळासाहेब पाटील यांनी सभा का गुंडाळली?650 कोटींच कर्ज कशासाठी घेतलं?त्याची परतफेड कशी करणार याबाबत प्रश्न विचारून आम्ही या कारखान्याची सरकार दरबारी चौकशी लावणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले
साखर कारखाना हा शेतकरी सभासदांसाठी महत्वाचा आहे शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे त्यांना प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत मात्र सभा केवळ 15 मिनिटात गुंडालायच कारण काय?असा सवालही या प्रतिसभेत दोन्ही आमदारांकडून विचारण्यात आला
सह्याद्री कारखाना शेतकरी सभासदांसाठी टिकला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे असेही हे दोन्ही आमदार म्हणाले
No comments:
Post a Comment