कराड, ता. ८ : जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी कृष्णा विश्व विद्यापीठ ते दत्त चौक कराड या मार्गावर भव्य रॅली काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत, फिजिओथेरपी उपचारांबाबत जनजागृती केली.
जगभरात ८ सप्टेंबर हा दिवस फिजिओथेरपी दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा ‘हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार आणि स्ट्रोक उपचारात फिजीओथेरपीचे महत्व’ या मध्यवर्ती संकल्पनेवर जगभर प्रबोधन केले जाणार आहे. या दिवसाचे औचित्य साधून कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्यावतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. ए. माशाळकर यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची ही रॅली कृष्णा हॉस्पिटल, कोल्हापूर नाका मार्गे दत्त चौकात पोहचली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत, फिजिओथेरपी उपचारांबाबत जनजागृती केली.
यावेळी बोलताना कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदाराजुलू म्हणाले, कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता आणि हृदयरोग यांसारख्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे नियमित व्यायाम, योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली यांना विशेष महत्त्व आहे. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेऊन योग्य व्यायामाचे नियोजन करावे.
यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ. एस. आनंद, डॉ. टी. पूविष्णूदेवी, डॉ. सुरज कणसे, डॉ. संदीप शिंदे, डॉ. मंदार माळवदे, डॉ. स्मिता पाटील, डॉ. तृप्ती यादव, डॉ. वैशाली जगताप, डॉ. पूनम पाटील, डॉ. नम्रता कदम, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. सत्यम भोदाजी, डॉ. प्रगती पाटील, डॉ. श्रद्धा मोहिते, डॉ. मयुरी शहा, डॉ. अंकिता दुर्गावळे, डॉ. ओंकार सोमदे, डॉ. तेजश्री कुंभार, डॉ. धैर्यशील पाटील यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी :
कराड : कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्यावतीने काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी-विद्यार्थींनी.
No comments:
Post a Comment