वेध माझा ऑनलाइन।
प्रशांत महासागरात सध्या एकाच वेळी तीन चक्रिवादळे सक्रिय असून त्यांचा कहर सुरू आहे. त्यातच आणखी एक चौथे वादळ तयार होण्याची शक्यता वाढली आहे. यापैकी एका वादळाच्या वाऱ्यांचा वेग तब्बल 241 किलोमीटर प्रतितास इतका नोंदवण्यात आला आहे. या वादळामुळे अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, जवळपास दशकभरानंतर पहिल्यांदाच प्रशांत महासागरात एकाच वेळी तीन वादळे सक्रिय झाली आहेत. त्यामुळे मेक्सिकोपासून अमेरिकेतील कॅलिफोर्नियापर्यंत चिंता वाढली आहे.
यंदा प्रशांत महासागरातील वादळांची सक्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामागे एल निनोची स्थिती हे महत्त्वाचे कारण मानले जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, एल निनोची स्थिती लवकरच विक्रमी पातळीपर्यंत मजबूत होऊ शकते. सध्या सक्रिय असलेल्या तीन वादळांमध्ये चक्रिवादळ लोवेल सर्वात शक्तिशाली आहे. हे सध्या कॅटेगरी -4 चे अत्यंत धोकादायक वादळ आहे. त्याच्या वाऱ्यांचा कमाल वेग सुमारे 241 किलोमीटर प्रतितास नोंदवण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते,लोवेल पुढील काही दिवस मोठ्या चक्रिवादळात परावर्तित होऊ शकते.
No comments:
Post a Comment