शहरातील शाहू चौक ते जुना कोयना पूल रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे व दुरुस्तीचे काम मंगळवारी सुरू करण्यात आले. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सूचना दिल्यानंतर सदर रस्त्याचे काम मिळालेल्या ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती सुरू केली आहे.
शाहू चौक ते जुना कोयना पूल हा शहरातील वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावर शासकीय विश्रामगृह आहे. त्यामुळे अनेक महनीय व्यक्तींची ये जा या रस्त्यावरून होत असते. शिवाय जुन्या कोयना पुलापासून शहरात येण्याचा प्रमुख मार्ग असल्याने वाहनांची वर्दळ जास्त असते. पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना होत होता. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत होती.
या रस्ता नव्याने कारपेट करण्यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सुमारे 70 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र पावसाळ्यामुळे हे काम अद्याप सुरू झालेले नाही. दरम्यान शहरात बीपीसीएल कंपनीची गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होणार असल्याने शहरातील रस्त्यांची कामे नगरपालिकेने थांबवली आहेत. मात्र या रस्त्यावर गॅस पाईपलाईन टाकणार नसल्याने पावसाळा थांबल्यानंतर तातडीने रस्ता कारपेट करण्याचे काम सुरू आहे होणार आहे. तुर्तास वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आमदार डॉ. अतुलबाबांनी ठेकेदारास या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक काम सुरू झाले होते. मात्र पाऊस आल्याने हे काम थांबवण्यात आले होते. मंगळवारी पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने हे काम सुरू करण्यात आले.
नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते विजय वाटेगावकर , नगरसेवक शिवाजी पवार नगरसेवक आशुतोष डुबल यांनी कामाची पाहणी केली.
No comments:
Post a Comment