Thursday, June 4, 2020

महिला पोलीस अधिकाऱ्यांसह 5 जण झाले कोरोनामुक्त ; आज दिला डिस्चार्ज

कराड, ता. 4
कराड तालुक्यातील उंब्रज येथील रहिवासी असणाऱ्या 29 वर्षीय महिला पोलिस अधिकाऱ्याने कोरानावर यशस्वी मात केली. त्यांच्यासह कोरोनावर मात करणाऱ्या 5 जणांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

उंब्रज येथील 29 वर्षीय महिला मुंबई येथे पोलिस दलात अधिकारी म्हणून कार्यरत आहे. सेवेत असतानच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यावेळी त्यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यशस्वी उपचाराने त्यांनी कोरोनावर मात केली असून, त्या आता कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांच्यासह वानरवाडी येथील 25 वर्षीय युवक, 25 वर्षीय महिला, सदुर्पेवाडी-सळवे-पाटण येथील 30 वर्षीय महिला आणि नवारस्ता - पाटण येथील 12 वर्षीय मुलगी अशा एकूण 5 जणांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक दीपज्योती पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी जमदाडे, कृष्णा अभिमत विद्यापीठातील भक्ती जोशी, मेघा पाटील, गोपालकृष्ण जोशी, वरद जंबगी यांच्या हस्ते या कोरोनामुक्त रूग्णांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कृष्णा विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.

*चौकट*

*‘कृष्णा’च्या नैतिक आधारामुळे मिळाले कोरोनाशी लढण्याचे बळ*

कोरोनाची बाधा झाल्यावर सर्वांनाच खूप मोठा मानसिक धक्का बसतो. मलाही जेव्हा कोरोनाची बाधा झाली तेव्हा अशाच मानसिक अवस्थेतून जावे लागले. पण कृष्णा हॉस्पिटलमधील सर्वच डॉक्टर्स व अन्य स्टाफने दिलेल्या नैतिक आधारामुळे, तसेच घेतलेल्या विशेष काळजीमुळे माझ्यासह अनेकजण कोरोनावर मात करून बरे होऊ शकले आहेत. त्याबद्दल मी कृष्णा हॉस्पिटलचे आभार मानते.
- कोरोनामुक्त महिला पोलिस अधिकारी

*सोबत : फोटो व व्हिडिओ*

Wednesday, June 3, 2020

आणखी 7 जण सापडले पॉझिटिव्ह ; जिल्ह्यातील रुग्णसंख्येत वाढ होतेच आहे

सातारा दि. 4 (जिमाका)
 रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार सातारा जिल्हयातील 7 जणांचे रिपोर्ट कोरोना  (कोविड 19 ) बाधित आल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
      यामध्ये कराड तालुक्यातील खराडे 15 वर्षीय युवक व शिंदेवाडी विंग येथील 15 वर्षीय युवक, शेणोली स्टेशन येथील 14 वर्षीय युवती, वाई तालुक्यातील डुईचीवाडी येथील 15 वर्षीय युवती, सातारा तालुक्यातील कुसबुद्रुक येथील 16 वर्षीय युवक, खटाव तालुक्यातील निढळ येथील 26 वर्षीय् महिला तसेच कारंडवाडी ( देगाव रोड )ता.सातारा  येथील 65 वर्षीय महिला.

Tuesday, June 2, 2020

पुन्हा 15 जण पॉझिटिव्ह सापडले

सातारा दि. 3 (जिमाका)
 रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार कोरेगाव तालुक्यातील कटापूर येथील 62 वर्षीय पुरुष, 24 व 55 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील वाहगाव येथील 34 वर्षीय पुरुष, काटवली येथील 29 वर्षीय पुरुष व 56 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील वावदरे येथील 45 वर्षीय महिला, माणगाव-अतित येथील 35 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील जांभेकरवाडी येथील 2 वर्षीय बालक, दिवशी मारुली येथील 29 वर्षीय पुरुष, नवसारी येथील 55 वर्षीय सारी आजाराचा पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 55 वर्षीय महिला, माण तालुक्यातील दहिवडी येथील 19 वर्षीय युवक, कराड तालुक्यातील तुळसण येथील 62 वर्षीय सारी आजाराचा पुरुष, फलटण तालुक्यातील कोळकी येथील 54 वर्षीय सारी आजाराचा पुरुष, असे एकूण 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
*3 जणांचा मृत्यु पश्चात अहवाल निगेटिव्ह*
बोपेगाव ता. वाई येथील 85 वर्षीय महिला, गिरवी ता. फलटण येथील 65 वर्षीय महिलेचा व वेळेकामती ता. सातारा येथील 59 वर्षीय पुरुषाचा मृत्यु पश्चात घेण्यात आलेला नमुना निगेटिव्ह आला आहे.
*कोळकी येथील एका कोरोना बाधिताचा मृत्यु*
फलटण तालुक्यातील कोळकी येथे मुंबईवरुन प्रवास करुन आलेला 54 वर्षीय कोरोना बाधितचा मृत्यु झाला आहे.
*208 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह*
काल रात्री   प्राप्त झालेल्या अहवालानुसार 208 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
मुंबई येथे खासगी प्रयोगशाळेत तपासणी करुन आलेल्या दिवड ता. माण येथील 29 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांना क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय,सातारा येथे दाखल करुन उपचार सुरु आहेत.
0000

एका बाधिताचा मृत्यू ; एक जण सापडला मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह

सातारा दि. 2 ( जि. मा. का )
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा  येथे दि. 22 मे रोजी दाखल असलेला अंधोरी ता. खंडाळा येथील 43 वर्षीय (सारीचा रुग्ण)  कोविड बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच रांजणी ता.जावळी  येथील मुंबई वरुन प्रवास करुन आलेल्या  85 वर्षीय महिलेचा मृत्यू पश्चात अहवाल  पॉझिटिाव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण दोन कोरोना बाधित  रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
तसेच हडपसर पुणे येथून प्रवास करुन आलेला 27 वर्षीय पुरुष  व मुंबई येथून प्रवास करुन आलेला वेळेकामथी  ता. सातारा येथील 59 वर्षीय पुरुष यांचा मृत्यू प्रश्चात नमुना तपासणी करीता पुणे येथे पाठविण्यात आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात 556 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 223 रुग्ण बरे झाले आहेत.तर 310 रुग्णांवर उपचार सुरु असून 23  जणांचा मृत्यु झालेला आहे.

00000

Monday, June 1, 2020

नवे 18 बाधीत सापडले ; जिल्ह्याला कोरोनाचा विळखा घट्ट ; प्रशासनापुढे पेच कायम

 कराड
आताच हाती आलेल्या रिपोर्टनुसार 18 नवे बाधित सापडले आहेत म्हणजेच आज दिवसभरात एकूण सगळे मिळून 40 रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याची नोंद झाली . जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने लोक भयभीत झाल्याचे चित्र आहे. प्रशासनाच तारांबळ उडालीआहे.कोरोना दिवसेंदिवस कमी होण्याचे नावच घेत नसल्याने रुग्णसंख्या आटोक्यात कशी येणार याच प्रश्नाने प्रशासनाची झोप आता उडाली असल्याचे दिसते आहे. आज रात्री उशिरा 18 जण नवे पॉझिटिव्ह झाल्याची बातमी आल्यावर प्रशासनाची पुन्हा पळापळ झाली. दररोज रुग्ण संख्या वाढत असल्याने लोक भयभीत झाले आहेत.रुग्ण संख्या आता कोणत्याही परिस्थितीत आटोक्यात येणे महत्वाचे आहे

18 बाधित तालुकानिहाय आकडेवारी

▪️कराड - वानरवाडी 4

▪️पाटण - जांभेकरवाडी 1
▪️वाई - दह्याट 1
▪️महाबळेश्वर - हरचंदी 1, कासवंड - 3
▪️सातारा - कुस ( बु.) -2
▪️जावळी - रांजणी1,आंबेघर 1
▪️खंडाळा - शिरवळ - 1
▪️माण - पिंपरी - 3

आज जिल्ह्यात पुन्हा रुग्ण वाढले ; 17 पॉझिटिव्ह सापडले ; प्रशासन पुन्हा हडबडले ; दिवसभरात झाले 22 रुग्ण

सातारा दि. 1  (जिमाका)
 सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 17 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले  आहेत. तसेच  मुंबईवरुन आलेल्या व घरीच क्वॉरंटाईन असेलल्या बोपेगांव ता.  वाई येथील रक्त दाबाचा त्रास असलेल्या  85 वर्षीय महिला. सारीचा आजार असलेली गिरवी ता. फलटण येथील 65 वर्षीय महिला तर 15 वर्षापूर्वी कॅन्सरने आजारी असलेला 29 मे रोजी  मुंबई येथून आलेला 52 वर्षीय पुरुष अशा 3 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यू पश्चात त्यांच्या घाशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याची  माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
बाधित रुग्णांमध्ये   *फलटण* तालुक्यातील बरड येथील 55 वर्षीय महिला, वडाळे येथील 35 वर्षीय पुरुष.
*जावळी* तालुकयातील गवडी येथील 52 वर्षीय महिला, काळोशी येथील 41 वर्षीय पुरुष, केळघर (सोळशी) येथील 39 वर्षीय महिला.
*कराड* तालुक्यातील  विंग येथील  43 वर्षीय महिला,  19 वर्षीय तरुण.
*पाटण* तालुक्यातील काळेवाडी येथील 21 वर्षीय  महिला, नवसरेवाडी  येथील 25 व 22 वर्षीय पुरुष.
*खंडाळा* तालुक्यातील शिरवळ येथील 72 वर्षीय महिला.
*खटाव* तालुक्यातील  अंभेरी येथील 3 व 6 वर्षीय बालीका, 29 वर्षीय पुरुष.
*महाबळेश्वर* तालुक्यातील हरचंदी येथील 53 वर्षीय महिला, गोरोशी येथील 72 वर्षीय महिला.
*वाई* ग्रामीण रुग्णालयातील 24 वर्षीय महिला आरोग्य सेवक.
000000

कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीची शंभरी ; जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली शाबासकी

कराड, ता. 1 : सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून आज कोरोनामुक्त झालेल्या 19 रूग्णांना टाळ्यांच्या गजरात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलने योग्य उपचाराने तब्बल 100 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश प्राप्त केले असून, कोरोनामुक्तीच्या लढाईत कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या योगदानाचे विशेष कौतुक जिल्हाधिकारी शेखर सेह यांनी केले आहे.

दक्षिण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोरोनाने मोठा हाहाकार निर्माण केला. अगदी पहिल्या टप्प्यातच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा तुलनेने सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. त्यातही कराडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदविस वाढू लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात भितीचे वातावरण पसरले. दरम्यान, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचारास प्रारंभ झाला आणि 18 एप्रिल रोजी कराड तालुक्यातील पहिल्या असणाऱ्या तांबवे येथील कोरोनामुक्त रूग्णाला टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कृष्णा हॉस्टिलटने यशस्वी उपचाराने कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना, सन्मानपूर्वक डिस्चार्ज देण्याची मालिकाच सुरू केल्याने लोकांमधील कोरोनाबद्दलची भिती कमी होण्यास मदत झाली. आज जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 100 व्या कोरोनामुक्त रूग्णाला कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये गावडेवाडी येथील 20 वर्षीय युवक, उंब्रज येथील 40 वर्षीय पुरूष, म्हासोली येथील 37 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगी, शिराळ-पाटण येथील 26 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, भरेवाडी-पाटण येथील 36 वर्षीय पुरूष, बनपुरी-पाटण येथील 31 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरूष, 19 वर्षीय युवक, 48 वर्षीय पुरूष, 10 वर्षीय मुलगा, 8 वर्षीय मुलगा, शितपवाडी-पाटण येथील 40 वर्षीय पुरूष, 14 वर्षीय मुलगा, 19 वर्षीय युवक, ढेबेवाडी फाटा येथील 23 वर्षीय पुरूष, 44 वर्षीय महिला, 18 वर्षीय मुलगी अशा एकूण 19 जणांचा समावेश आहे.

यावेळी कोरोनाची लढाई यशस्वीपणे जिंकलेल्या या कोरोनामुक्त रूग्णांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना श्री. सिंह म्हणाले, कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत 100 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, ही आपल्या जिल्ह्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कोरोनामुक्तीच्या या लढाईत डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स व अन्य स्टाफने अमूल्य योगदान दिले आहे. सातारा जिल्ह्यात अद्ययावत व अत्याधुनिक आरोग्यविषयक सोयीसुविधा असणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलमुळे आज याठिकाणी 100 रूग्ण कोरोनामुक्त होण्यात यश प्राप्त झाले असून, मी डॉ. सुरेश भोसले आणि कृष्णा हॉस्पिटलच्या सर्व टीमचे सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने विशेष अभिनंदन करतो.

दरम्यान, कृष्णा हॉस्पिटलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोरोना विशेष वॉर्डकडे जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तसेच अन्य रूग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत कमी कालावधीत कृष्णा हॉस्पिटल व्यवस्थापनाने तयार करण्यात आलेल्या या विशेष मार्गाचे कौतुक केले.

याप्रसंगी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. एस. टी. मोहिते, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर, राजेंद्र संदे, कॉन्ट्रॅक्टर दिपक रैनाक यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.