Tuesday, May 4, 2021

जावळी तालुक्यात निर्बंध तोडणाऱ्या लग्न समारंभावर कारवाई ; ठोठावला 50 हजाराचा दंड...

वेध माझा ऑनलाइन
सातारा दि.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गर्दीचे कार्यक्रम, लग्न समारंभाच्या संख्येवर जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून निर्बंध घातले असताना जावळी तालुक्यातील कुसुम्बी या गावात लग्नाला मर्यादेपेक्षा जास्त लोक असल्यामुळे आज त्यांच्यावर 50 हजाराची थंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात आली.

 कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी , कुसुम्बी ता.जावळी येथे एका विवाहाप्रसंगी 100 पेक्षा जास्त व्यक्ती लग्नाला असल्या कारणाने ग्रामपंचायतीकडून  50 हजार रुपयांचा दंड  करण्यात आला आहें. यापुढेही निर्बंध तोडणाऱ्यावर अशीच कारवाई होईल असे प्रशासनाने सांगितले आहें.
0000

2059 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 32 बाधितांचा मृत्यू

 सातारा दि. 4 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2059 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 32 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 74 (5314), कराड 316 (16694), खंडाळा  110 (6875), खटाव 188 (9538), कोरेगांव 171 (9423),माण 157 (7137), महाबळेश्वर 26 (3405), पाटण 67 (4530), फलटण 395 (14372), सातारा 414 (25581), वाई 120 (8409 ) व इतर 21 (585) असे आज अखेर  एकूण   111863  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (106), कराड 6 (455), खंडाळा 0 (85), खटाव 5 (273), कोरेगांव 5 (244), माण 0 (147), महाबळेश्वर 2 (34), पाटण 0 (120), फलटण 0 (194), सातारा 11 (781), वाई 2 (203) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2642 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Monday, May 3, 2021

ब्रेक द चेन" अंतर्गत उद्यापासून 10 मे पर्यंत जिल्हादंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी - किराणा, फळे, भाजीपाला, बेकरी, डेअरी,मिठाई, खाद्य पदार्थ दुकानें बंद राहतील

सातारा दि. 3 (जिमाका) : सातारा जिल्हयात कोरोना ‍विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्हयातील सध्य स्थितीत लागू असलेले निर्बंध कडक करणे आवश्यक असल्याने   प्र. जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये, दि. 04 मे 2021 रोजीचे 07.00 वाजलेपासून ते दि. 10/05/2021 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत खालील प्रमाणे आदेश जारी केले आहेत.  
  सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह), पाळीव प्राण्यांच्या खाद्य पदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पुर्णपणे बंद राहतील. तथापि, या दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील. 
  कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीतच चालू राहतील.  तथापि, सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील. 
  हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खादय पदार्थ विक्री दुकाने यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी 12.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यतच सुरू राहतील. तसेच त्यासंबंधित इतर बाबींना  दि. 14 एप्रिल 21 रोजीचे आदेश लागू राहतील. 
  घरपोच मद्य विक्री बाबत दि. 20/04/2021 रोजीच्या आदेशामध्ये नमूद कालावधीमध्ये दुपारी 12.00 ते सायंकाळी 05.00 असा बदल करणेत येत असून या आदेशातील इतर सर्व बाबी कायम राहतील. 
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही, आदेशात नमूद करण्यात आले आहे.

00000

क्षेत्र माहुली व वडूथ येथील कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन-वाढती कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन

वेध माझा ऑनलाइन
सातारा दि.3 (जिमाका): लॉकडाऊन लावूनही जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी वाढत  आहे. ही वाढती साखळी तोडण्यासाठी आणि रुग्ण संख्या कमी करण्यासाठी उद्या 4 मे पासून सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.


क्षेत्र माहुली व वडूथ येथील कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटनप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
राज्यात लॉकडाऊन असूनही राज्यासह जिल्ह्यात कांही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. आज लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाशी चर्चा करुन उद्या म्हणजेच 4 मे पासून सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या कडक लॉकडाऊनची गाईडलाईन जाहीर करण्यात येणार असून जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
क्षेत्र माहुली व वडूथ येथील कोविड केअर सेंटरमध्ये  प्रत्येकी 20 ऑक्सिजन व 10 जनरल बेड असे एकूण 30 बेड असणार आहेत.
0000

खाजगी हॉस्पिटलना कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्यास सद्यस्थितीत मंजूरी नाही ; ऑक्सिजनच्या उपलब्धतेनंतर देणार परवानगी प्र. जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे

सातारा दि. 3 (जिमाका) : सातारा जिल्ह्यात सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालये (DCHC, DCH  व  CCC) मिळून एकूण 82 हॉस्पिटलमध्ये आज रोजी 16 हजार 626 इतके कोरोन संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 12 हजार 447 रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. एकूण 82 हॉस्पिटल पैकी 58 खाजगी हॉस्पिटल यांना कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. 
सद्य:स्थितीत सातारा जिल्ह्यात एकूण 20 खाजगी हॉस्पिटल  प्रशासनाने त्यांच्याकडील सुरु असलेले हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजूरीसाठी सादर केलेले आहेत. तथापि, ऑक्सिजन आणि रेमडिसीवर इंजेक्शनच्या कमतरतेमुळे या खाजगी हॉस्पिटल्सना कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करुन मंजूरी देणे उचित ठरणार नाही. परंतू, भाविष्यात ऑक्सिजन आणि रेमडिसीवर इंजेक्शनची आवश्यकतेनुसार उपलब्धता झाल्यास या सर्व 20 खाजगी हॉस्पिटल्सना कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्याबाबत तात्काळी मंजूरी देण्यात येईल असे, प्र. जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी कळविले आहे. 
सद्य:स्थितीत सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात दैनंदिन लागणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा कमी ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. तसेच अत्यावश्यक रुग्णांना उपचाराकरीता आवश्यक असणारे रेमडिसीवर इंजेक्शनसुध्दा  कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत वरिष्ठ कार्यालय आणि शासनस्तरावर ऑक्सिजन आणि रेमडिसीवर इंजेक्शन उपलब्ध होण्याकरीता युध्द पातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे. लवकच सातारा जिल्ह्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन आणि रेमडिसीवर इंजेक्शन्स उपलब्ध होतील असेही, प्र. जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितले आहे. 
00000

महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स च्या तीन सदस्यांना कोरोनाची लागण...

वेध माझा ऑनलाइन
आयपीएल वर कोरोनाचे संकट आले आहे. कोलकाता नाईट रायडर्स चे 3 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडले असताना आता महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स च्या तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. यापैकी एकही खेळाडू नाही.

ईएसपीएन क्रिकइन्फोनं’ दिलेल्या वृत्तानुसार चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन बॉलिंग कोच आणि टीमच्या बसमधील एक कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. चेन्नईची टीम सध्या दिल्लीमध्ये आहे. या टीममधील सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी रविवारी झालेल्या टेस्टमध्ये निगेटीव्ह आढळली आहे.
दरम्यान यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर  या दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे  कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सोमवारी होणारी मॅच अखेर स्थगित करण्यात आली आहे.

2502 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू

सातारा दि. 3 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2502 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 36 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 126 (5240), कराड 233 (16378), खंडाळा  157 (6765), खटाव 173 (9350), कोरेगांव 192 (9252),माण 337 (6980), महाबळेश्वर 9 (3379), पाटण 136 (4463), फलटण 388 (13977), सातारा 585 (25211), वाई 151 (8289 ) व इतर 15 (594) असे आज अखेर  एकूण   109878  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (105), कराड 0 (449), खंडाळा 0 (85), खटाव 6 (268), कोरेगांव 5 (239), माण 4 (147), महाबळेश्वर 0 (32), पाटण 1 (120), फलटण 1 (194), सातारा 15 (770), वाई 3 (201) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2610 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000