Saturday, January 1, 2022
भाजपा नेत्या पंकजा मुंढे याना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण...!
वेध माझा ऑनलाईन - भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडेंना यााआधी देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे पंकजा यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंकजा यांना ओमायक्रोची लागण झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. तरीही पंकजा यांची प्रकृती ठीक असून काळजी करण्यासारखं काही नाही, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
साडे दहा हजार एस टी कर्मचाऱ्यांना रुजू करुन घेण्यास नकार...अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ...!
वेध माझा ऑनलाईन - राज्य शासनात विलीनीकरण्याच्या मागणीसाठी दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीची घोषणा केल्यानंतरही एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. अशावेळी साडे दहा हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. याबाबतच्या सुनावण्यांना हजर राहिले नाहीत म्हणून 700 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक एसटी कर्मचारी आगारात जात कामावर रुजू करुन घेण्याची विनंती करत आहेत. मात्र, मध्यवर्ती कार्यालयानं याबाबत सूचना केली नसल्याचं सांगत आगारप्रमुखांनी त्यांना रुजू करुन घेण्यास नकार दिलाय.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेत कामावर रुजू होण्याची विनंती वारंवार करण्यात येत आहे. दुसरीकडे आवाहन करुनही हजारो कर्मचारी संपावर ठाम असल्यानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. महामंडळाच्या शिस्त आवेदन कार्यपद्धतीनुसार निलंबित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरु आहे. तर दोन महिन्यांपासून संप सुरु आहे, राज्य सरकार विलीनीकरणाची मागणी मान्य करत नाही. त्यामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलीय. अशावेळी हे कर्मचारी कामावर रुजू करुन घेण्याची मागणी करत आहेत. मात्र, आता आगारप्रमुखांकडून त्यांना कामावर रुजू करुन घेण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे या एसटी कर्मचाऱ्यांचे परतीचे दोर तुटल्याची चर्चा आता सुरु आहे.
गेल्या २४ तासांत मुंबईत तब्बल ६ हजार ३४७ नव्या रुग्णांची नोंद ; सध्या २२ हजार ३३४ रुग्णांवर उपचार सुरू...
वेध माझा ऑनलाईन
मुंबईत कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चाललं आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत तब्बल ६ हजार ३४७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल हाच आकडा ५६३१ इतका होता. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे मुंबईतील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही आता झपाट्यानं वाढ होत आहे. मुंबईत सध्या २२ हजार ३३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ४५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे निर्बंध आणखी कडक करण्याचा विचार राज्य सरकार आणि महापालिका करत आहे. राज्यात लॉकडाऊनचा विचार सध्या नसला तरी निर्बंध अधिक कडक केले जाऊ शकतात असे स्पष्ट संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. त्यानुसार मुंबईची वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहात येत्या काही दिवसांत निर्बंध आणखी कठोर केले जाण्याची दाट शक्यता आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर ०.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी आता २५१ दिवसांवर आला आहे. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९५ टक्के इतकं आहे. मुंबईत सध्या १० कन्टेनमेंट झोन आहेत. तर १५७ इमारती सील करण्यात आल्या आहेत. मुंबईत गेल्या २४ तासांत ४७ हजाराहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
लॉक डाऊन चा विचार नाही मात्र निर्बंध वाढणार... ना. राजेश टोपे
वेध माझा ऑनलाईन - राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वार काढलं आहे. दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात भीतीचे वातारण आहे. 31 डिसेंबरपासून राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा राज्यात लॉकडाऊन लागणार का? अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टापे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार नसल्याचं सांगितलं. पण कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं. ऑक्सिजनची गरज 700 मेट्रिक टनहून अधिक लागल्यास राज्यात लॉकडाऊन लागेल असे, राजेश टोपे यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
आज जिल्ह्यात 53 बाधीत,15 डिस्चार्ज
सातारा दि (जिमाका)
जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 53 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर
15 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे
तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 2 कराड 6 खंडाळा 5 खटाव 2 कोरेगांव 3 माण 4 महाबळेश्वर 2 पाटण 0 फलटण 7 सातारा 19 वाई 1 व इतर 2 आणि नंतरचे वाढीव 0 असे आज अखेर एकूण 53 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात...
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 15 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी नाइट कर्फ्यूचा उपयोग नाही, त्याला शास्त्रीय आधारही नाही ; जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांचे मत...
वेध माझा ऑनलाईन - गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. यापूर्वीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यातून सावरण्यासाठी नाइट केंद्रातील मोदी सरकारने नाइट कर्फ्यू लावण्याबाबत राज्यांना निर्देश दिले होते. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोना रोखण्यासाठी किंवा कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाइट कर्फ्यूचा उपयोग नसून, त्याला शास्त्रीय आधारही नाही, असे सांगितले आहे.
सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोना नियंत्रणासाठी भारतासारख्या देशाने नेमके काय करावे? याबाबत मोलाचा सल्लाही दिला आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये करोनाला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांविषयी भाष्य केले आहे. यावेळी बोलताना डॉ. स्वामीनाथन यांनी भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशांनी कशा प्रकारच्या उपाययोजना करायला हव्यात, नाईट कर्फ्यू का उपयोगी नाही, याविषयी भूमिका मांडली आहे.
नाइट कर्फ्यू लावण्यामागे कोणताही शास्त्रीय आधार नाही
नाइट कर्फ्यूला कोणताही आधार नाही. कोरोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी विज्ञानावर आधरित, पुराव्यांवर आधारित उपाययोजना आवश्यक आहेत. अशा प्रकारच्या उपाययोजनांची एक यादीच करता येऊ शकेल. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाइट कर्फ्यू लावण्यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही. भारतासारख्या देशांनी या विषाणूला आवर घालण्यासाठी वैज्ञानिक आधारांवर धोरण ठरवायला हवे, असे स्वामीनाथन म्हणाल्या.
नव्यावर्षांच्या पहिल्याच दिवशी सिलिंडरचे दर झाले कमी...
वेध माझा ऑनलाईन - नव्यावर्षांच्या पहिल्याच दिवशी कंपन्यांकडून एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरचे दर कमी करण्याचा निर्णय कंपन्यांकडून घेण्यात आलाय. IOCL नुसार १ जानेवारी २०२२ ला दिल्लीतील कमर्शिअल सिलिंडरची किंमत १०२ रुपयांनी कमी होऊन १९९८.५० रुपये झाली आहे.
३१ डिसेंबर रोजी १९ किलोच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर २१०१ रुपये होते. तर चेन्नईमध्ये या कपातीनंतर १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरचे दर २१३१ रुपये आणि मुंबईत हे दर १९४८.५० रुपये इतके झाले आहेत. नव्या किंमती जारी केल्यानंतर कोलकत्यात १९ किलोच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर २०७६ रुपये झाले आहेत.
घरगुती सिलिंडरच्या किंमती 'जैसे थे'कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर कमी झाले असले तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नाही. दिल्ली आणि मुंबईमध्ये नॉन सब्सिडीच्या १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरचे दर ८९९.५० रुपये आहेत. तर कोलकात्यात याची किंमत ९२६ रुपये, चेन्नईमध्ये ९१५.५० रुपये इतकी आहे.
Subscribe to:
Posts (Atom)