Sunday, May 3, 2020

जिल्हाधिकारी साहेब ... कराडकरांच्या "या' प्रश्नाची सोडवणूक करा... नगराध्यक्षा सौ.रोहिणीताई शिंदेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र...

कराड
येथील पालिकेच्या नगराध्यक्षा सौ.रोहिणीताई शिंदे यांनी
नेहमीच जनहिताचा विचार करून शहराचा कारभार करण्यास प्राधान्य दिले आहे. मग त्यासाठी वेळ प्रसंगी त्यांना प्रशासन आणि विरोधक यांच्या टिकेलाही सामोरे जावे लागले आहे,मात्र त्यांनी आपला मुद्दा कधीही राजकीय न करता लोकांचा विचार करून समाजकारणाला महत्व देत त्या मुद्यातून शहराचा विकास साधण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केला आहे.शहरातील जनतेसाठीची तळमळ हेच त्या मागचे कारण आहे. याच तळमळीने त्यांनी सातारा जिल्हाधिकारी यांना कराड शहरवासीयांच्या सध्याच्या लॉक डाऊन काळातील जीवनावश्यक प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून पत्राद्वारे नुकतीच विनंती केली आहे.
सध्या कोरोना व्हायरस च्या प्राधुरभावाने जनता त्रस्त असताना आपल्या जबाबदारीची शहरासाठी काय जाणीव असावी... याच उत्तम उदाहरण म्हणजे कराडच्या नगराध्यक्षा सौ शिंदे याच ठरल्या आहेत. त्यांनी आताच्या काळात लॉक डाऊन सुरू असताना शहरातून पालिकेच्या मोठ्या अग्निशामक गाडीतून औषध फवारणी करून शहर निर्जंतुकीकरण करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. विलीगिकरण कक्षाची निर्मिती करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्नही चर्चेत राहिले. हॅन्ड ग्लोवज मास्क,गॉगल,सॅनिटाइझर या व अशा अनेक सेफ्टी थिंग्स पालिकेतील कर्मचाऱ्यांना मिळाल्या पाहिजेत यासाठी त्यांचा हट्ट होता,त्यामागे कर्मचारी सुरक्षित राहिला पाहिजे हा हेतू होता. संवेदनशीलपणे लोकांचा विचार करून शहराची वाटचाल विकासाकडे नेऊ पाहणाऱ्या कराडच्या नगराध्यक्षानी सध्या शहरातील प्रामुख्याने मध्यम वर्गीयांच्या जाणवणाऱ्या लॉक डाऊन मधल्या समस्या जाणून घेतल्या व त्याचे निराकरण व्हावे यासाठी तातडीने सातारा जिल्हाधिकारी यांना याबाबत पत्रव्यवहार करून त्या लवकरात लवकर सोडवल्या जाव्यात अशी विनंतीही त्यांनी आपल्या पत्रातून केली आहे
मधल्या काही दिवसांपूर्वी दूध, भाजी याबाबतीतील समस्या शहरातून जाणवत होत्या त्याबाबतदेखील  त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रश्नी सोडवणुकीबाबतीत प्रामाणिक प्रयत्न केले होते. आणि आता जनतेच्या आणखी काही मूलभूत गरजाबाबतीतील अडचणी जाणून घेऊन त्यांनी त्याही सोडवण्यात याव्यात यासाठी हा पत्रव्यवहार कला आहे.

या पत्रातून त्यांनी म्हटले आहे...

               प्रति
                  मा. जिल्हाधिकारी सो.
                          सातारा.
              विषय :- कराड शहरातील
                 विविध समस्यांबाबत.
महोदय,
             कराड शहरातील सर्व परिस्थिती बाबत आपणास सर्व माहिती आहेच.तरी सुद्धा काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणून देणे गरजेचे असल्याने   ही पोस्ट करत आहे.
१.२२ मार्च रोजी लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली.व नंतर २ वेळा तो वाढवण्यात आला.याचे पालन कराडकर करत आहेत.मात्र या काळामध्ये नागरिकांची बऱ्याच गोष्टींची अडचण जाणवू लागली आहे.
२. आजचा विचार केला तर नागरिकांच्या घरातील रोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू संपलेल्या असून घरपोच सेवा योजना प्रशासनाने केली आहे ती यशस्वी होईल का हे सांगता येणार नाही.
३. प्रत्येकी ५ स्वयंसेवकांनी प्रत्येक प्रभागात जावून किराणा माल घरपोच करण्याची योजना प्रशासनाने केली आहे. पण जवळ जवळ सर्व दुकानदरांकडून माल शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. तसेच किराणा सामनामध्ये ज्या ८ गोष्टी देण्यात येणार आहेत त्या व्यतिरिक्त लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे काय?
४. यासाठी शासनाने काही विशिष्ट वेळ निश्चित करून २ तास दुकाने उघडण्यासाठी परवानगी द्यावी. या काळामध्ये नागरिकांना किराणा, दूध भाजीपाला, औषधे विकत घेण्याची मुभा द्यावी. या २ व्यतिरिक्त इतर २२ तास कडेकोट लॉक डाऊन चे काटेकोर पालन करणे नागरिकांना बंधनकारक करण्यात यावे.
५. तसेच या काळामध्ये शहरातील सर्व बँकाचे व्यवहार बंद असल्याने नागरिकांना पैश्याची अडचण येत आहे त्यामुळे बँकांचे व्यवहार काही ठराविक वेळेत सुरू राहणे आवश्यक आहे. याचाही विचार व्हावा.
     आपल्या मागे फार मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. परंतु काही अडचणी आपल्या पर्यन्त पोचवल्या नंतर यामधून नक्की मार्ग निघेल याची मला खात्री वाटते म्हणूनच या गोष्टी आपल्या निदर्शनास आणून देत आहे.
                 
                 आपली विश्वासू

              सौ. रोहिणी उमेश शिंदे
                    नगराध्यक्षा
               कराड नगरपरिषद,कराड.

No comments:

Post a Comment