Friday, April 30, 2021

वाशीम जिल्ह्यात पालकमंत्री दाखवा आणि एक रुपया मिळवा ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने "ओपन चॅलेंज'...


वेध माझा ऑनलाइन
कराड
 वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे गृहराज्यमंत्री ना शंभूराज देसाई हे बिनकामाचे पालकमंत्री म्हणून त्याठिकाणी अल्पावधीत चर्चेत आले आहेत. सम्पूर्ण कोविड काळात अकार्यक्षम नेता म्हणून त्यांची वाशीम जिल्ह्याने पारख केली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने वाशीम जिल्ह्यात सध्या बोंब सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पालकमंत्री दाखवा आणि एक रुपया मिळवा असे ओपन चॅलेंज करत तसा मचकूर असणारे पोस्टर्स वाशीम जिल्ह्यात लावण्यात आले आहेत, तर सातारा जिल्ह्यातील त्यांच्या चमकोगिरी करत गल्लीबोळात सायरन वाजवत फिरण्याचीदेखील कराड व परिसरात उलट सुलट चर्चा सुरु आहे.

सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून किंवा अन्य इतर मार्गाने गरज असताना आणि नसतानाही जिल्ह्यांतील सार्वजनिक कामात लक्ष घालणारे नामदार शंभूराज देसाई हे महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर आजतागायत पालकमंत्री म्हणून ते त्याठिकाणी फिरकलेच नाहीत असे तेथील लोक सांगतात. कोरोनाचा सम्पूर्ण राज्यात प्रकोप चालू असताना प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या त्या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्याच्या कारणानें आपली जबाबदारी ओळखून ग्राउंडवर काम करताना दिसत आहेत. आपआपल्या जिल्ह्याच्या मागणीनुसार त्याठिकाणी कोविड सेंटर उभी करत आहेत. जिल्ह्यात लसीकरणाच्या साठ्यासाठी पाठपुरावा करताना दिसत आहेत. इंजेक्शन च्या तुटवडा आपल्या जिल्ह्यात जाणवू नये म्हणून शासनदरबारी लोकांसाठी भांडताना दिसत आहेत. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र वाशीम जिल्ह्यातील ना शंभूराज देसाई यांचे अकार्यक्षमतेचे उदाहरण चर्चेत आहे. 

ना शंभूराज देसाई राज्यातील वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.  26 जानेवारीचा तेथील कार्यक्रम करून त्याठिकाणी ते परत फिरकलेच नाहीत अशा तेथील लोकांच्या तक्रारी आहेत, त्यामुळे कोरोना संकटात तेथील जनता पालकमंत्र्याविना सध्या वाऱ्यावरच आहे.याउलट
सातारा जिल्ह्यात उगीचच सायरन वाजवत गल्ली बोळात फिरून नुसतीच चमकोगिरी करणारे नेते म्हणून त्यांची इथेही ओळख तयार झाली आहे.  सध्या कोविडच्या महामारीत सातारचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील हे अक्षरशः पायाला भिंगरी बांधून जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने यशस्वी काम करत आहेत. त्यांचं काम सक्षमपणे चालू असताना ना देसाई अधूनमधून मी पण जिल्ह्यात काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी  स्टंट करत जिल्ह्याच्या एकूणच कामात लक्ष घालताना दिसत आहेत अशी चर्चा आहे. सातारा जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या किरकोळ कारणावरून वारंवार बैठका घेतानाही ते दिसत आहेत, त्यामुळे अधिकारीवर्ग अक्षरशः त्यांच्या हस्तक्षेपाला वैतागला असल्याचेही समजते. 

ना देसाई हे वाशीमचे पालकमंत्री म्हणून आपली जबाबदारी झटकुन मोकळे झाले आहेत. त्या ठिकाणी वेळोवेळी कोरोनाचा आढावा घेणे, जनतेची विचारपूस करणे, आवश्यकतेनुसार कोविड सेंटर व ऑक्सिजन सेंटरची उभारणी करणे, यासारख्या जबाबदाऱ्या त्यांनी इतर पालकमंत्र्यांप्रमाणे पार पाडणे तेथील जनतेला अपेक्षित होते मात्र, तेथील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे आता ना देसाईंना वाशिममध्ये फिरकू न देण्याचे तेथील लोकांनी ठरवले असल्याचे समजते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पालकमंत्री दाखवा आणि एक रुपया मिळवा असे जाहीरपणे चॅलेंज करण्यात आले आहे. तसा मचकूर असणारे पोस्टर्सही सगळ्या भागात लावले गेले आहेत. या एकूणच प्रकारामुळे नामदार शंभूराज देसाई यांची अकार्यक्षमता चव्हाट्यावर आलेली पहायला मिळत आहे. त्यांनी सातारा जिल्ह्यात सायरन वाजवत गल्लीबोळातून फिरण्यापेक्षा वाशीममध्ये फिरून त्याठिकाणचे पालकमंत्री या नात्याने आपली जबाबदारी पार पाडावी अशी चर्चा राज्यभर सुरू आहे.

2493 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 32 बाधितांचा मृत्यू

 सातारा दि. 30 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2493 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 32 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 128 (4824), कराड 212 (15714), खंडाळा  144 (6315), खटाव 309 (8906), कोरेगांव 251 (8680),माण 185 (6136), महाबळेश्वर 35 (3339), पाटण 124 (4229), फलटण 389 (13059), सातारा 466 (23617), वाई 221 (7889 ) व इतर 29 (573) असे आज अखेर  एकूण   103281  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (103), कराड 4 (432), खंडाळा 0 (82), खटाव 5 (253), कोरेगांव 2 (233), माण 5  (141), महाबळेश्वर 1 (31), पाटण 1 (118), फलटण 3 (184), सातारा 7 (733), वाई 3 (186) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण  2496 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

आरोग्यमंत्री गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का? -भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका

वेध माझा ऑनलाइन
राज्यात अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांना लसीकरण सुरू करता येणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरोग्यमंत्र्यांवर आणि राज्य सरकारवर देखील सडकून टीका केली आहे. “सकाळी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी घोषित केलं की १ तारखेपासून आम्ही १८ ते ४४ वयोगटातल्या लोकांना लसीकरण करणार आहोत. आणि संध्याकाळी ४ वाजता सांगितलं की ते करता येणार नाही. हे इतके गोंधळलेले लोक आहेत. यांना लोकांचं घेणं-देणं नाही. सकाळी तुम्ही घेतलेली पत्रकार परिषद मग गांजा ओढून घेतली होती का? तुम्हाला माहीत नव्हतं का? सकाळी सांगता मोफत लस देणार आहोत आणि ४-५ तासांनी सांगता की आमच्याकडे तेवढ्या लसी उपलब्ध नाहीत”, असं पडळकर म्हणाले आहेत. ते सांगलीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर देखील निशाणा साधला. “हे तिन्ही पक्ष विचारसरणी एक नसताना भाजपाची जिरवण्यासाठी हे पक्ष एकत्र आले आहेत. यांना ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवायचं आहे. केंद्राला बदनाम करायचं आहे. या सरकारने यातून बाहेर येऊन केंद्राकडे बोट न दाखवता कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये यासाठीचं नियोजन करावं इतकीच आमची महाराष्ट्र सरकारकडे विनंती आहे”, असे ते म्हणाले.
रेमडेसिविरच्या काळ्या बाजारावरून पडळकरांनी राज्य सरकारवर टीका केली. “रेमडेसिविरचा काळा बाजार नेमका कोण करतोय? जे इंजेक्शन जिल्ह्यांना दिलेत, त्याची यादी प्रत्येक लोकप्रतिनिधीला दिली पाहिजे. या काळ्या बाजारात हात धुवून घेण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आणि काही अधिकाऱ्यांचा सुरू आहे. जे कुणी यात आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. ही काही लोणी खायची वेळ नाही. पण राज्य सरकारने वसुलीची भूमिका घेतल्यामुळे खालच्या लोकांनाही तीच सवय लागली आहे”, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

Thursday, April 29, 2021

बजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा ; नीरज बजाज नवे अध्यक्ष ; राहुल बजाज यांनी पाच दशकांहून अधिक काळ कंपनीला सेवा दिली आहे...

वेध माझा ऑनलाइन
बजाज ऑटो या कंपनीचे कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष राहुल बजाज यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा कंपनीने आज केली. त्यांच्याजागी आता कंपनीचे कार्यकारी संचालक नीरज बजाज यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ते १ मे पासून आपला पदभार स्वीकारणार आहेत.

राहुल बजाज हे १९७२ सालापासून कंपनीसोबत कार्यरत होते. त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ कंपनीसोबत काम केलं आहे. त्यांच्या वयाचा विचार करता हा राजीनामा स्वीकारल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. ३० एप्रिल हा त्यांचा कामाचा शेवट असेल.

राहुल बजाज यांचं कंपनीच्या यशामध्ये उल्लेखनीय योगदान आहे. त्यांचा पाच दशकांहून अधिक काळचा अनुभव आणि त्यांची कंपनीशी असणारी बांधिलकी यामुळे ते कंपनीशी कायम जोडलेले राहतील. त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा आणि शिकवणुकीचा फायदा यापुढेही कंपनीला होत राहील. ते सल्लागार म्हणून सदैव कंपनीच्या सोबत असतील. त्याचबरोबर १ मेपासून ते कंपनीच्या चेअरमन एमेरिटस या पदावर पुढच्या पाच वर्षांसाठी काम करतील असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

राज्य सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा घेतला निर्णय...

वेध माझा ऑनलाइन
राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात आदेश काढला आहे. या आदेशानुसार सध्या राज्यात लागू असणारे निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यागोदरच लॉकडाउन मध्ये वाढ करण्यात येणार आहे याचे संकेत दिले होते. यानुसार सरकारने स्वतंत्र आदेश काढून राज्यातील लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.

राज्यात १४ एप्रिलपासून सरकारने कोरोनाबाबतचे निर्बंध लागू केले होते. हे निर्बंध १४ एप्रिल ते १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू करण्यात आले होते. त्यात आता वाढ करून ते १५ मे पर्यंत वाढवण्यात आले आहेत. कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता राज्यातील अनेक मंत्र्यांनी राज्य सरकारकडे लॉकडाउन करण्याची मागणी केली होती. राजेश टोपे यांनी देखील यांनी देखील कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता लॉकडाउन मध्ये वाढ करावीच लागेल असे मत मांडले होते. त्यानुसार आज राज्य सरकारने आदेश काढत लॉकडाउन जाहीर केला आहे. या लॉकडाउन दरम्यान १३ एप्रिल आणि २१ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेले निर्बंध लागू असतील, असे राज्य सरकारने जाहीर केले आहे.राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित सर्व सरकारी कार्यालये फक्त १५ टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. कोरोनाशी संबंधित अत्यावश्यक सेवांच्या कार्यालयांना यामधून वगळण्यात आले आहे.
प्रत्यक्ष लोकांपर्यंत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी असणार आहे.लग्नसमारंभ फक्त एकाच हॉलमध्ये २ तासांमध्येच पूर्ण करावे लागतील. यासाठी एकूण २५ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कुटुंबाला ५० हजार रुपये दंड तर हॉलवर कोरोनाची परिस्थिती सामान्य होईपर्यंत बंदी घातली जाणार आहे.बसेस वगळता सर्व खासगी प्रवासी वाहतूक फक्त अत्यावश्यक कारणासाठीच सुरु राहणार आहे. चालक आणि एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना प्रवासाची परवानगी असणार आहे. हे नियम आंतरजिल्हा किंवा जिल्हांतर्गत वाहनांना लागू नसून प्रवासी राहात असलेल्या शहरांनाच लागू असणार आहेत.
आंतरजिल्हा किंवा जिल्हांतर्गत प्रवास अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय कारण किंवा अंत्यविधीसारख्या टाळता न येण्यासारख्या कारणासाठीच करण्यात येणार आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
खासगी बसमध्ये एकूण आसनक्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. बसमध्ये उभ्याने प्रवास करण्यास मनाई असणार आहे. खासगी बसेसला एका शहरात जास्तीत जास्त दोन थांबे घेता येणार आहे. सर्व थांब्यांवर प्रवाशांच्या हातावर १४ दिवसांच्या क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येणार आहे. हा शिक्का बस सेवा पुरवणाऱ्यानेच मारणे बंधनकारक असणार आहे. खासगी बसेसमधून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला दिला गेला आहे. कोणताही खासगी बस सेवा पुरवठादार या नियमांचा भंग करताना सापडला , तर त्याला १० हजारांचा दंड ठोठावण्यात येईल. वारंवार नियमांचा भंग केल्यास त्याचा परवानादेखील रद्द केला जाईल. ठराविक ठिकाणच्या कोरोनाच्या परिस्थितीनुसार तिथून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारावा किंवा नाही, याबाबत स्थानिक आपत्ती निवारण व्यवस्थापन निर्णय घेणार आहे.
राज्य, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनातील कर्मचारी, आरोग्य सेवा पुरवणारे कर्मचारी आणि वैद्यकीय उपचारांची गरज असणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्यासोबत एक अतिरिक्त व्यक्ती यांनाच तिकीट आणि पास दिले जातील. त्यांनाच फक्त लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनो रेलमधून प्रवास करता येणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी हे नियम लागू नसणार आहे. जिल्हांतर्गत किंवा आंतरजिल्हा सेवा देणाऱ्या बस किंवा रेल्वे प्रवासासाठी रेल्वे अधिकारी किंवा एसटी बस अधिकाऱ्यांना स्थानिक प्रशासनाला प्रवाशांच्या स्क्रीनिंगविषयी सर्व माहिती पुरवणे बंधनकारक असणार आहे. तसेच थांब्यावर उतरल्यावर प्रवाशांच्या हातावर १४ दिवस होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येणार आहे. थर्मल स्कॅनरमध्ये जर एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीला कोरोना केंद्र किंवा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासन एका अधिकृत लॅबला प्रवाशांच्या चाचणी करण्याचे काम देऊ शकते. या चाचणीसाठी लागणार खर्च संबंधित प्रवाशाकडूनच घेतला जाणार आहे.

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून स्थानिक विकासनिधी मधून ६ कोटी मंजूर...


कराड
 कराड दक्षिण मतदारसंघातील गावांच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून २५१५ व स्थानिक विकास निधी मधून ६ कोटींचा निधी नुकताच मंजूर झाला आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी २५१५ च्या कामासाठी निधी मंजूर केला आहे. आ. चव्हाण यांनी २५१५ निधीसाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा पाठपुरावा केला होता यानुसार कराड दक्षिण मधील गावांच्यासाठी ३ कोटी इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. तसेच आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकासनिधीमधून ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत असा एकूण ६ कोटी रुपयांचा भरघोस निधी कराड दक्षिणेस मंजूर झाला आहे. 
२५१५ (इतर ग्राम विकास कार्यक्रम) मधून मंजूर निधीतून वनवासमाची येथे अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १० लाख रु., धोंडेवाडी अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ५ लाख रु., पवारवाडी (बामणवाडी) अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., कोळेवाडी येथे अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १० लाख रु., वानरवाडी येथे सामाजिक सभागृहासाठी ७ लाख रु., गोळेश्वर येथील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १० लाख रु., नांदगाव येथील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १५ लाख रु., रेठरे बु. येथील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १५ लाख रु., रेठरे बु. येथे मुस्लिम समाजासाठी कब्रस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओढ्यावर साकव पूल बांधणे यासाठी २५ लाख रु., बोत्रेवाडी (आकाईचीवाडी) येथे अंतर्गत रस्त्यासाठी ७ लाख रु., हवेलवाडी (सवादे) येथे सामाजिक सभागृह बांधणेसाठी १० लाख रु., शेळकेवाडी (येवती) सामाजिक सभागृहासाठी ७ लाख रु., नांदलापूर येथे गोपाळवस्ती अंतर्गत बंदिस्त गटार बांधणीसाठी ५ लाख रु., काले येथे कालेवाडी मालखेड (देसाईवस्ती) रस्त्यासाठी १० लाख रु., कोडोली ते वडगाव ह. रस्ता दुरुस्तीसाठी १४ लाख रु., कोडोली येथे अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., किरपे येथील अंतर्गत रस्त्यासाठी १५ लाख रु., सवादे येथील व्यायामशाळेसाठी १५ लाख रु., धोंडेवाडी येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., कापील येथील अंतर्गत रस्त्यासाठी १५ लाख रु., नारायणवाडी येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., गोटे येथील अंतर्गत रस्त्यासाठी २५ लाख रु., ओंड येथील अंतर्गत रस्ते व गटर साठी १० लाख रु., कार्वे येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., जखीणवाडी येथील येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु. असा २५१५ चा ३ कोटी इतका निधी मंजूर झाला आहे. यासोबतच आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून ३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये शेणोली येथे अंतर्गत गटर बांधणेसाठी ८ लाख रु., गवारकरवाडी (येळगाव) येथील स्मशानभूमीच्या शेडबांधणीसाठी ८ लाख रु., गोवारे येथील अंतर्गत रस्त्यासाठी व गटर साठी १० लाख रु., सैदापूर येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., सवादे येथील स्मशानभूमीच्या शेडमधील काँक्रीटीकरण व संरक्षक भिंतीसाठी १० लाख रु., साळशिरंबे येथे अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., चचेगाव येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., वडगाव ह. येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., घारेवाडी येथील अंतर्गत रस्त्यासाठी ६ लाख रु., जिंती येथील येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., वारुंजी येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., विंग येथील रस्त्यासाठी व गटर साठी १० लाख रु., म्हासोली येथील स्मशानभूमीच्या संरक्षण भूमीसाठी व पेव्हर ब्लॉक साठी १० लाख रु., रेठरे खुर्द येथील रस्त्यासाठी १० लाख रु., गवारकरवाडी (येळगाव) येथील स्मशानभूमीच्या शेडसाठी ८ लाख रु., मालखेड येथील गटर बांधणीसाठी १० लाख रु., शिंगणवाडी येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., टाळगाव येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., कालवडे येथे सामाजिक सभागृह बांधणीसाठी १५ लाख रु., तारूख येथील सभागृह दुरुस्तीसाठी ७ लाख रु., सवादे येथे हायमास्ट दिवे बसविण्यासाठी ३ लाख रु., तुळसन येथे हायमास्ट दिवे बसविण्यासाठी ३ लाख रु., बोत्रेवाडी (आकाईचीवाडी) येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., टाळगाव (शेवाळवाडी) येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., विंग येथील अंतर्गत रस्त्यासाठी ५ लाख रु., कराड येथील उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयाची दुरुस्तीसाठी ६ लाख रु., घोणशी येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., कोळे येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., शेरे येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., नांदलापूर येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., कुसूर येथे अंतर्गत रस्ते व गटर बांधणीसाठी १० लाख रु., मलकापूर नगरपालिकेला रुग्णवाहिकेसाठी १५ लाख रु., व कराड नगरपालिकेला रुग्णवाहिकेसाठी १५ लाख रु., कराड शहर मुस्लिम समाज संचलित कोविड केअर सेंटर साठी ३ लाख रु. असा भरघोस निधी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण या आपल्या मतदारसंघासाठी मंजूर करून आणला आहे. या निधीच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जाणार आहेत.

Wednesday, April 28, 2021

1810 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू

सातारा दि. 28 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1810  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 34 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 77 (4627), कराड 202 (15222), खंडाळा  101 (6036), खटाव 200 (8450), कोरेगांव 139 (8224),माण 90 (5681), महाबळेश्वर 69 (3258), पाटण 73 (3994), फलटण 217 (12351), सातारा 507 (22674), वाई 114 (7499 ) व इतर 21 (516) असे आज अखेर  एकूण   98532  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (96), कराड 4 (423), खंडाळा 0 (81),खटाव 0 (237), कोरेगांव 4 (229), माण 3  (133), महाबळेश्वर 1 (29), पाटण 1(115), फलटण 3 (179), सातारा 12 (720), वाई 6 (180) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण  2422 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

कराड पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी घेतला सत्तेचा गैरफायदा ; भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांवर व त्यांच्या प्रभागावर अन्याय केल्याचा आरोप...


वेध माझा ऑनलाइन
कराड
राजकीय द्वेषातून सत्ताधार्‍यांकडून नगराध्यक्ष व भाजपाचे 4 नगरसेवक यांच्या वार्डातील कामे पूर्णपणे टाळण्यात आली आहेत. राजकीय हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयात हस्तक्षेप करून सत्ताधार्‍यांनी सत्तेचा गैरफायदा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांवर त्यांच्या प्रभागावर अन्याय केला आहे. व सत्तारूढ पक्षांच्या नगरसेवकांची जास्तीजास्त कामे घेतली आहेत. जनशक्ती व लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांच्या वार्डातील चांगले असणारे रस्ते सुद्धा पुन्हा डांबरीकरण करणे,कारपेट करणे अशी कामे परत करण्यात येत असल्याचा आरोप नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व भाजपाच्या नगरसेवकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.  

पत्रकात म्हटले आहे की, सुमारे 3 महिन्यापूर्वी कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी एक आदेश काढून सन 2020 व सन 2021 साठी प्रत्येक नगरसेवकांनी आपापल्या वार्डात प्रत्येकी 30 लक्ष रुपयांची कामे सुचवावीत असे कळवले होते.यासाठी शासनाकडून 7.50 कोटी रुपये नागरोथान मधून व 1.36 कोटी निधी दलितेतर फंडामधून मंजूर झाला होता. यानुसार प्रत्येक नगरसेवकांनी आपआपल्या वार्डातील कामांच्या याद्या तयार करून त्या प्रशासनाकडे सुपूर्द केल्या. या याद्याप्रमाणे प्रत्येक कामाचे एस्टिमेट तयार होऊन त्यास टेक्निकल मंजूरी घेतली आहे व सदर कामाच्या याद्या जिल्हाधिकार्‍यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्या आहेत असे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके व बांधकाम इंजिनियर एन.एस.पवार यांनी सांगितले जिल्हाधिकार्‍यांकडून 7.50 कोटी रुपये नगरोत्थान मधून व 1.36 कोटी दलितेतर फंडातील निधी यामधील कामे मंजूर झाली असून या मंजूर कामांच्या याद्या नगरपरिषदेमध्ये आल्या आहेत. त्या याद्या पहिल्या असता असे दिसून आले की भारतीय जनता पक्षाचे 4 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष यांच्या वार्डातील कामे कामे पूर्णपणे टाळण्यात आली आहेत. कराड शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून सर्व वार्डातील कामे घेणे जरुरीचे होते. तरी सुद्धा राजकीय हेतूने मा.जिल्हाधिकारी सो.यांचे कार्यालयात हस्तक्षेप करून सत्तेचा गैरफायदा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांवर त्यांच्या प्रभागावर अन्याय केला आहे. व सत्तारूढ पक्षांच्या संबधित असलेल्या नगरसेवकांची जास्तीजास्त कामे घेतली आहेत. कराड नगरपरिषदेमधील जनशक्ती व लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांच्या वार्डातील चांगले असणारे रस्ते सुद्धा पुन्हा डांबरीकरण करणे,कारपेट करणे अशी कामे परत करण्यात येत आहेत. पण भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षा,व नगरसेवक यांच्या वार्डातील रस्ते अत्यंत खराब झाले असताना सुद्धा सदर यादीमध्ये घेण्यात आलेले नाहीत. आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक हे कराड शहराचे नागरिक असून त्यांचे प्रभागहि कराड शहरात येत आहेत. त्यामुळे हा आम्हा नगरसेवकांवर,आमच्या प्रभागवार,व येथील नागरीकांच्यावर फार मोठा अन्याय असल्याने या अन्यायाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. प्रसिध्दी पत्रकावर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नगरसेवक विनायक पावसकर, विद्या पावसकर, सुहास जगताप, अंजली कुंभार यांच्या सह्या आहेत.

कराडात सोमवार पेठेतील शाळा क्रमांक 4 मध्ये रक्तदान शिबिरास प्रतिसाद...

कराड
श्रीरामनवमी व श्रीहनुमान जन्मोत्सवा निमीत्त आज बुधवार दिनांक 28  रोजी येथील सोमवार पेठेतील शाळा क्रमांक चार येथे दिपक पाटिल , अजय कुलकर्णी- उंडाळकर , सुनिल  उमराणी , मंदार अष्टेकर, डाॕ.बी.एम.कुलकर्णी , संकेत गोवेकर, प्रविण ( भैय्या ) मोहिते मंदार पाटिल यांनी एकत्रित येऊन घेतलेले रक्तदान शिबीर उत्हासात पार पडले 
शिबीराचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व येथील पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सुनिल उमराणी, भार्गव पाटिल, संकेत धोंगडे, जयवंत कुलकर्णी, अभय कुलकर्णी, प्रशांत मोहिते, हरिष देशपांडे, ओंकार कुलकर्णी , गणेश बापट, पृथ्वीराज लाड, कु. प्रियांका पाटिल, विशाल कुंभार, दिगंबर कुंभार , प्रसाद ( दिनेश ) कुंभार, मदन कुंभार, श्रीजित भस्मे, अर्थव पाटील, अमित घळसासी, धिरज संकपाळ, प्रसाद कुष्टे, अमृत गिजरे (सर ), व सुरज कांबळे  या 22 रक्तदात्यांनी रक्तदान केले.त्यांना याठिकाणी प्रशस्तीपत्र देण्यात आले

याप्रसंगी कराडच्या नगराध्यक्षा सौ रोहिणीताई शिंदे,  सामाजिक कार्यकर्ते जयंतराव बेडेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबर साहेब, वेध माझाचे पत्रकार अजिंक्य गोवेकर आदी मान्यवरांनी याठिकाणी येऊन सदिच्छा भेट दिली व सध्याच्या कोरोना काळात एकूणच केलेल्या कामाबद्दल आयोजकांचे कौतुक केले


राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण-- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा -राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सर्वानुमते निर्णय...


राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले

यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून आपण कोविडची लढाई लढतो आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरु आहे. आजतागायत ४५ च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे.

*लस पुरवठ्याप्रमाणे लसीकरण कार्यक्रम घोषित करणार*

उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळेच १८ ते ४४ च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.

*जास्तीत जास्त लस मिळविण्याचे प्रयत्न*

सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल.

*उत्तम नियोजन करावे*

18 ते 44 वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे

*कोविन एपवर नोंदणी करा*

या वयोगटातील नागरिकांनी  कोविन मोबाईल एपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये
लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील असेही मुख्यमंत्री म्हणतात

Tuesday, April 27, 2021

आणखी काही दिवस लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत सरकारमधील मंत्र्यांनी दिले...


वेध माझा ऑनलाइन
 राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, लगेच लॉकडाऊन उठवला जाणार नसून कोरोनावर पूर्णपणे मात करण्याच्या प्रयत्नात लॉकडाऊन वाढण्याचे संकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले आहेत.

मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ आणि उदय सामंत या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार आता लॉकडाऊन वाढवण्याच्या तयारीत आहे, असे संकेत दिले आहेत. गेल्या 14 एप्रिलला मुख्यमंत्र्यांनी राज्यात कडक निर्बंध लावले होते. पण परिस्थिती जैसै थे होती. त्यानंतर 22 एप्रिलपासून पुढील 15 दिवस लॉकडाऊनला सुरुवात झाली. कोरोनाग्रस्तांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली पण तिसरी लाट येण्याआधी सरकारला राज्यात बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत ज्यामध्ये सर्वात प्रथम लसीकरण, आयसीयू बेड्सची संख्या, जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठ्याचा समावेश आहे. त्यासाठी लॉकडाऊन गरजेचं असल्याचं मत महाविकास आघाडीतले नेते करत आहेत. 
कॅबिनेट बैठकीत लॉकडाऊन वाढवायचा की नाही याची प्राथमिक चर्चा केली जाईल. यामध्ये शहरनिहाय कोरोनाग्रस्तांची आकडेवारी समोर मांडली जाईल, लॅाकडाऊनचा किती परिणाम सध्या होतोय आणि वाढवला तर किती परिणाम होईल यावर सगळं अवलंबून आहे
लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात भार पडतोय. पण रुग्णसंख्या कमी करण्यात मोठी मदत होत आहे. 1 मे पासून लसीकरण सुरु करायचं आहे, राज्यात सध्या 4 हजार लसीकरण केद्र आहेत ते दुप्पटीनं वाढवायचे आहेत, 18 ते 44 पर्यंत साधारणत: साडेपाच कोटींच्या घरात संख्या आहे. लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये यासाठी सरकारला नियोजन करायचे आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवलं तर नक्कीच याचा परिणाम राज्यातली कोरोनाची परिस्थिती सुधारण्यावर होईल असे मंत्री बोलतात.दुसऱ्या लाटेतून जाताना महाराष्ट्राला चांगलेच चटके बसले आहेत. राज्य आतापासूनच तिसऱ्या लाटेची तयारी करतंय, लॉकडाऊन वाढवला तर कोरोनाग्रस्तांची आकडेवारीसह कोरोनासाठी लागणारी साधनसामुग्री वाढवतां येईल. यासाठी हा लॉकडाऊन महत्वाचा मानला जातोय त्यामुळे राज्याचे नेते आता कॅबिनेटमध्ये काय निर्णय घेतायत याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

9 लाख 48 हजार 396 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी -विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती

 वेध माझा ऑनलाइन
 पुणे, दि. 27 :  पुणे विभागातील 9 लाख 48 हजार 396 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 11 लाख 20 हजार 939 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 51 हजार 130 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 21 हजार 413 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.91 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.61 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

*पुणे जिल्हा*
            पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 7 लाख 99 हजार 232 रुग्णांपैकी 6 लाख 88 हजार 158 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 98 हजार 709आहे. कोरोनाबाधित एकूण 12 हजार 365 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.10 टक्के आहे.

*सातारा जिल्हा*
              सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 95 हजार 56 रुग्णांपैकी 73 हजार 690 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 19 हजार 193 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 173 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

*सोलापूर जिल्हा*
              सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 92 हजार 402 रुग्णांपैकी 75 हजार 846 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 935 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 621 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 
 *सांगली जिल्हा*
               सांगली  जिल्ह्यातील  कोरोना बाधीत एकूण 70 हजार 332 रुग्णांपैकी 56 हजार 645 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 544 आहेत.  कोरोनाबाधित एकूण 2 हजार 143 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

*कोल्हापूर जिल्हा*
            कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 63 हजार 917 रुग्णांपैकी 54 हजार 57 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 749 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

*कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ*
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 11 हजार 4 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 6 हजार 46, सातारा जिल्ह्यात 1 हजार 437, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 537, सांगली जिल्ह्यात  1 हजार 141 तर कोल्हापूर जिल्ह्यात 843 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

*कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण*  
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या  11 हजार 834 आहे. पुणे जिल्हयामध्ये 8 हजार 823, सातारा जिल्हयामध्ये 338, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 327, सांगली जिल्हयामध्ये 935 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 411 रुग्णांचा समावेश आहे.
विभागामध्ये लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्हयातील 20 लाख 83 हजार 288, सातारा 5 लाख 57 हजार 935, सोलापूर 3 लाख 8 हजार 890, सांगली 4 लाख 78 हजार 505 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 3 लाख 75 हजार 507 नागरिकांचा समावेश आहे.
*पुणे विभागातील सर्व्हेक्षण*
आजपर्यत विभागामध्ये एकुण 64 लाख 89 हजार 254 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 11 लाख 20 हजार 939 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
 
(टिप :- दि. 26 एप्रिल 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
000000

कराडच्या समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीेर संपन्न ; 54 रक्तदात्यानी केले रक्तदान ; 21 महिलानी नोंदवला सहभाग...


वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्थेच्या वतीने आज भगवान परशुराम जयंतीनिमित्त येथील सोमवार पेठेत रक्तदान शिबीर पार पडले यावेळी 54 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती देण्यात आली त्यामध्ये 21 महिलांनी रक्तदाता म्हणून आपला सहभाग नोंदवला  

संस्थेचे अध्यक्ष जयंत बेडेकर,सचिव ओंकार आपटे,माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर ,प्रबोध पुरोहित,हेमंत बेडेकर,मोहन आरे,संजय घळसासी संदीप शेंडे,पत्रकार सतीश मोरे ,माजी नगरसेविका सौ,ज्योती बेडेकर, सौ विनिता पेंढारकर महालक्ष्मी ब्लड बँकेच्या सौ,वीणा ढापरे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
 
या शिबिरास नगरपालिकेतील लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक मोहसीन आंबेकरी,माजी नगरसेवक बाळासाहेब उमराणी, अजय उंडाळकर यांनी शिबिराला भेट दिली व उपक्रमाचे कौतुक केले

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव सद्यस्थितीला लक्षात घेता प्लाझमादान व रक्तदान ह्या दोन्हीं बाबींची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील जनतेसाठी लस देणे सुरू होणार आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे त्यामुळे लस घेतल्यानंतर किमान 28 दिवस प्लाझ्मा व रक्तदान करता येत नाही असे वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञ सांगतात त्यामुळे ब्राह्मण समाज सामाजिक संस्थेने लस घेण्याअगोदर या शिबिरास भेट देऊन रक्तदान करा असे आवाहन केले होते महिलांसह अनेक रक्तदात्यानी या आवाहनाला प्रतिसाद देत आज रक्तदान केले

दीपक पाटील मित्रपरिवाराच्या वतीने उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन ; मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याबाबत केले आवाहन...


कराड
श्रीरामनवमी व श्रीहनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून उद्या दिनांक 28 रोजी सकाळी 10 वाजता येथील नगरपालिका शाळा नं 4. सोमवार पाण्याच्या टाकी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवा नेते दीपक पाटील मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आली यावेळी इछुक रक्तदात्यांनी रक्तदान करणेसाठी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहनही करण्यात आले आहे. कराड पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डाके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे

 कोरोनाचा प्रादुर्भाव सद्यस्थितीला लक्षात घेता  प्लाझमादान व रक्तदान ह्या दोन्हीं बाबीची अत्यंत गरज निर्माण झाली आहे.तसेच १ मे पासून १८ वर्षांवरील जनतेसाठी लस देणे सुरू होणार आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे त्यामुळे लस घेतल्यानंतर किमान 28 दिवस तरी प्लाझ्मा व रक्तदान करता येत नाही असे वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञ सांगतात त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की, लस घेण्याअगोदर या शिबिरास भेट देऊन रक्तदान करा आणि आपण समाजाचे काही देणं लागतो ह्या भावनेतून आपले कर्तव्य पार पाडा असे आवाहन देखील याठिकाणी करण्यात आले आहे


1666 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 33 बाधितांचा मृत्यू

सातारा दि. 27 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1666  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 33  बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची आजची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 149 (4550), कराड 258 (15020), खंडाळा  74 (5935), खटाव 142 (8250), कोरेगांव 78 (8085),माण 123 (5591), महाबळेश्वर 31 (3189), पाटण 119 (3921), फलटण 151 (12134), सातारा 367 (22167), वाई 147 (7385 ) व इतर 27 (495) असे आज अखेर  एकूण   96722  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (96), कराड 6 (419), खंडाळा 3 (81),खटाव 5 (237), कोरेगांव 1 (225), माण 2  (130), महाबळेश्वर 0 (28), पाटण 14), फलटण 1 (176), सातारा 11 (708), वाई 2 (174) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण  2388 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Monday, April 26, 2021

मोठ्या प्रमाणात रक्तदान करा ; मीही करणार आहे...नगरसेवक सौरभ पाटील यांचे कोरोनाच्या पार्शवभूमीवर युवकांना आवाहन...


वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील शिवराय ट्रेकिंग ग्रुपच्या वतीने.आज दि 27 रोजी (मंगळवारी) कार्वे नाका येथे सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे सध्या कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा जाणवतोय त्या पार्शवभूमीवर घेतलेल्या या रक्तदान शिबिराचे खरोखर कौतुकच आहे युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून या उपक्रमास यशस्वी करावे आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून रक्तदान करा असे आवाहन येथील पालिकेतील लोकशाहीचे गटनेते नगरसेवक सौरभ पाटील यांनी व्हीडिओ च्या माध्यमातून केलं आहे

नगरसेवक सौरभ पाटील हे शहरातील लोकप्रिय नगरसेवक आहेत.त्यांनी कोरोना काळात कोणतीही जाहिरातबाजी न करता काम केलं आहे शहराचे सॅनिटायझिंग,मास्क वाटप,करत त्यांनी  कोरोनाबाबत जन-जागृतीदेखील केली आहे अनेकांना मदतीचा हात देत त्यांनी आपली बांधीलकी जपल्याचेही सर्वांना माहीती आहे. त्यांनी पालिकच्या सहकार्याने काही सुविधांसह सुरू केलेल्या लसीकरण केंद्राद्वारे  शेकडो जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे
 कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा सध्या जाणवतोय याच पार्शवभूमीवर युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी नुकतेच केलं आहे शिवराय ट्रेकिंग ग्रुपने घेतलेल्या आजच्या रक्तदान शिबिरात आपण स्वतः रक्तदान करून आपले कर्तव्य बजावणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे



राज्यात गेल्या सहा दिवसात ४ लाख ४२ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. २६: कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आज ७१ हजार ७३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात गेल्या दोन महिन्यापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. दररोज किमान ६० हजारांच्या आसपास नविन रुग्णांची नोंद होत आहे. आठवडाभरापूर्वी १८ एप्रिलला आतापर्यंतची सर्वाधिक ६८ हजार ६३१ इतके रुग्ण एकाच दिवशी आढळून आले होते. आठवडाभरानंतर मात्र रुग्णसंख्येत जास्तीची वाढ झालेली आढळून आली नाही मात्र दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर आहे. त्याप्रमाणात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, हि दिलासा देणारी बाब ठरली आहे.
आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्स यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी बळ मिळत आहे. दैनंदिन नविन रुग्णांच्या संख्येइतकेच बरे होणाऱ्यांची संख्या असल्याने नागरिकांच्या मनावरील ताण काहीसा कमी होताना दिसून येत आहे. गेल्या सहा दिवसातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या पाहिल्यास त्याची प्रचिती येते, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
 दि. २० एप्रिलला ५४ हजार २२४ रुग्ण घरी सोडण्यात आले. त्यानंतर २१ एप्रिलला ५४ हजार ९८५, २२ एप्रिलला ६२ हजार २९८, २३ एप्रिलला ७४ हजार ४५, २४ एप्रिलला ६३ हजार ८१८, २५ एप्रिलला ६१ हजार ४५० आणि आज २६ एप्रिल रोजी ७१ हजार ७३६ असे एकूण ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

अजय जाधव..२६.४.२०२१

1434 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 26 बाधितांचा मृत्यू

सातारा दि. 26 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1434  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 26  बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची आजची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 77 (4401), कराड 76 (14762), खंडाळा  87 (5861), खटाव 270 (8108), कोरेगांव 118 (8007),माण 145 (5468), महाबळेश्वर 38 (3158), पाटण 32 (3802), फलटण 204 (11983), सातारा 295 (21800), वाई 84 (7238 ) व इतर 11 (468) असे आज अखेर  एकूण   95056  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (95), कराड 5 (413), खंडाळा 0 (78),खटाव 3 (232), कोरेगांव 2 (224), माण 2  (128), महाबळेश्वर 0 (28), पाटण 1 (113), फलटण 7 (175), सातारा 5 (697), वाई 1 (172) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण  2355 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Sunday, April 25, 2021

कोरोना संकटकाळात जनतेला आधार देण्यासाठी नगराध्यक्षा पुन्हा सरसावल्या... त्यांच्या कर्तव्यदक्षतेची याचनिमित्ताने पुन्हा चर्चा सुरू...

वेध माझा ऑनलाइन
कराड
सध्या कोरोनाचे मोठे संकट आपणा सर्वांसमोर उभे ठाकले आहे तरीही घाबरून न जाता व गाफील ही न राहता या संकटाचा आपण मुकाबला करूया नगरपरिषद प्रशासनाची यंत्रणा या संकटाशी सामना करण्यासाठी सज्ज आहे शासनाच्या नियमांचे पालन करा सॅनिटायझर मास्क सोशल डिस्टन्स चा अवलंब करा गाफील राहू नका असे आवाहन कराडच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांनी शहरातील नागरिकांना व्हीडिओ च्या माध्यमातून केल आहे सध्याच्या कोरोना संकट काळात जनतेला आधार देण्यासाठी त्या पुन्हा लोकांसमोर आल्या आहेत 

नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे या शहराने निवडून दिलेल्या नगराध्यक्षा आहेत.त्यांची ही पहिलीच राजकीय इनिंग असली तरी त्या समाजकारणाच्या मैदानात यशस्वी झाल्या आहेत त्यांनी कोरोना संकटात केलेलं काम विसरून चालणार नाही  एका कोरोना मृतदेहावर चक्क अंत्यसंस्कार करून त्यांनी आपल्या कार्याचा वेगळेपणाही दाखवून दिला होता...  एक महिला नगराध्यक्षां कोविड मृतदेहावर अंत्यसंकार करते हे सम्पूर्ण राज्यातील पहिलेच उदाहरण ठरले होते आणि म्हणूनच त्यांचं त्यावेळी राज्यभर कौतुकही झालं होतं...

स्वतः त्या कोरोना पोसिटीव्ह झाल्या होत्या,  त्यावर मात करून काही दिवसातच लोकांसाठी कोरोनाशी लढताना पुन्हा त्या दिसल्या... शहराला सॅनिटायझिंग करणे असो.. रुग्णांना सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करणे असो, किंवा विलीगिकरण कक्षाच्या निर्मितीपासून ते रुग्णाला डिस्चार्ज मिळेपर्यंत त्याच्या कुटुंबियांना धीर देणे असो...अशा सर्वच जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पेलल्याचे शहराने पाहिले ...नेमकं त्याचवेळी त्यांच सम्पूर्ण कुटुंबही कोरोना बाधीत झाल होत...आपल्या कुटुंबाबरोबर शहराचीही काळजी घेताना त्याना त्याहीवेळी सर्वांनीच पाहिलय... 

स्वतःला कर्तव्यात झोकून देत काम करणं म्हणजे नेमकं काय असत...हे त्यांच्या कामाच्या झपाट्यातून वेळोवेळी त्यांनी दाखवून दिलय... कोरोनाचा प्रभाव अधिक वाढला असताना मी मी म्हणणारे त्यावेळी फारसे बाहेर दिसत नव्हते... अशा परिस्थितीत याच "अध्यक्षा' कोरोनाशी लढताना  दिसल्या... संकटकाळात आपले कर्तव्य धाडस आणि निष्ठा याच्या जोरावर जनतेच्या सेवेस वाहून घेऊन कशाप्रकारे काम केल जात... याचे "त्या' उत्तम उदाहरणच ठरल्या... 

आज शहरातील जनतेच्या स्वास्थ्यासाठी त्यांनी पुन्हा आवाहन केले आहे... सध्या कोरोनाची दुसरी लाट असताना लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे...  याच जाणिवेतून त्यानी शहरवासीयांना वरील आवाहन केल आहे... संकटकाळात घरात न बसता लोकांसाठी ग्राउंडवर उतरून काम करण्याच्या त्यांच्या कर्तव्यदक्षतेची याचनिमित्ताने पुन्हा चर्चा सुरू आहे. 

पुढचे चार दिवस महत्त्वाचे, महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता...29 एप्रिलपर्यंत मध्य भारतासह महाराष्ट्रात वादळी वारे तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे

वेध माझा ऑनलाइन
एकीकडे उन्हाच्या झळा वाढत असताना आगामी चार दिवस म्हणजेच 29 एप्रिलपर्यंत मध्य भारतासह महाराष्ट्रात मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यापूर्वी 11 एप्रिल रोजी राज्यात कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, परभणी या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला होता. त्यानंतर आता पुन्हा आगामी 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील चार दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे...
महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यांत पारा चांगलाच तापला आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता आगामी चार दिवस म्हणजेच 29 एप्रिलपर्यंत अचानक हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तविली जातेय. मध्य भारतासह महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतोय. तसे हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे.

कराड शहर जैन समाजातर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


वेध माझा ऑनलाइन
कराड 
भगवान महावीर जयंती निमित्त कराड शहरातील श्री संभवनाथ महाराज ट्रस्ट व श्री संभवजीन  संगीत मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास कराडकर  नागरिकांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात सुमारे २८५  रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचे दर्शन घडवले.

  सध्याच्या कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर  राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांना रक्ताची तातडीची गरज भासू लागली आहे. या जाणिवेतून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, लोकशाही आघाडीचे नेते सौरभ पाटील ,जयंतकाका पाटील ,जयंत बेडेकर, मुकुंद चरेगावकर ,पोपटराव साळुंखे, प्रमोद पाटील, विजयसिंह यादव, राजेंद्र माने ,नंदकुमार बटाणे, अतुल शिंदे ,विजय मुठेकर आदी मान्यवरांनी या शिबिरास भेट देऊन संयोजकांचे कौतुक केले. रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री संभवजीन  संगीत मंडळाचे आदर्श शहा, ऋषभ शहा, संकल्प शहा ,सागर शहा, नितीन शहा, सौरभ शहा आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

मुंबई महापालिकेच्या 12 रुग्णालयांमध्ये 16 ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे नियोजन सुरू... हवेतून ऑक्सिजन बनवणाऱ्या प्लांटमधून दररोज 43 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती करण्यात येणार...


वेध माझा ऑनलाइन
 कोरोना रुग्णालयातील ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता मुंबई महापालिकेच्या 12 रुग्णालयांमध्ये 16 ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे नियोजन सुरू आहे. हवेतून ऑक्सिजन बनवणाऱ्या  प्लांटमधून दररोज 43 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार आहे. या संबंधी निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर महिन्याभरात हा प्लांट सुरू होणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आली. 

अशा प्रकारचे प्लांट मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात आणि जोगेश्वरीच्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात सुरू आहेत. आता एकूण 12 रुग्णालयात 16 नवीन प्लांट सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या 16 प्रकल्पांसाठी जवळपास 90 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. महत्वाचं म्हणजे या प्रकल्पांचे आयुर्मान किमान 15 वर्षे असणार आहे. 
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा पडत असल्याचं दिसून येतंय. मुंबईतही ऑक्सिजनची मागणी ही प्रत्येक रुग्णालयातून दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हवेतून प्राणवायूची निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पाची अत्यंत आवश्यकता आहे. महापालिकेचे हे प्लांट सुरू झाल्यास दररोज 43 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती सुरू होणार आहे. तसेच यामुळे सध्या ऑक्सिजन खरेदीवर जो खर्च होत आहे तो निम्म्यावर येणार आहे. त्यामुळे मुंबईसाठी हा प्रकल्प फायदेशीर आहे. मात्र या प्रकल्पाची अत्यावश्यकता लक्षात घेता वेळ न वाया घालवता निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एका महिन्याभरात हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे लक्ष महापालिकेसमोर आहे. त्यामुळे तातडीने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 
राज्यात कोरोनाचं वाढतं प्रमाण आणि त्यामुळं राज्यभरात होत असलेला ऑक्सिजनचा तुटवडा सध्या चिंतेचा विषय आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून राज्यात ऑक्सिजनची निर्मिती करण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू आहेत.

जमेल त्या मार्गाने ऑक्सिजन राज्यात आणणार, राजेश टोपेंची माहिती


वेध माझा ऑनलाइन
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्दे मांडले. ऑक्सिजन, रेमडेसेवीर, लशी आपल्या न्याय हक्काप्रमाणे मिळावे. रिकामे टँकर एअर फोर्सच्या विमानाने नेले जातील, भरलेले टँकर रेल्वे मार्गाने आणले जातील. आपल्याला दूरच्या राज्यातून ऑक्सिजन मिळतोय पण तो आणलाय उशीर लागतोय. त्यामुळे एअरफोर्सच्या मदतीने त्याची वाहतुक व्हावी अशी मागणी केली ती मान्य झाली. जवळची राज्य असतील तर रस्त्याने येतील. साखर कारखान्यांमध्ये जिथे को जनरेशन आणि इथेनॉल जे प्लॅन्ट आहेत, तिथे ऑक्सिजन प्रकल्प उभे करण्याची विनंती वसंतदादा शुगर इस्टिट्यूटने केली आहे. फूड पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये नायट्रोजनचा वापर केला जातो आणि ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. अशा इंडस्ट्रीमधून ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करतोय. इतर राज्यातून येणार्‍या टँकर अडवू नये अशी सूचना त्यांनी केली आहे.जमेल त्या मार्गाने राज्यात ऑक्सिजन आणणार आहोत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कराड पालिकेचे गटनेते राजेंद्र यादव यांच्या प्रस्तावांना उदयनराजेच्या माध्यमातून मंजुरी...उदयनराजे यांच्या प्रयत्नातून एकूण 20 कोटी मंजूर...


वेध माझा ऑनलाइन
कराड
कराड पाटण तालुक्यातील डिचोली ते शेणोली रेल्वे स्टेशन या राज्य महामार्गाच्या मजबुतीकरण कामा करिता खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड पालिका गटनेते राजेंद्र यादव यांचे समवेत प्रस्ताव दिला होता त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सेंट्रल रोड फडमधून या कामासाठी निधी मंजूर केला आहे

कराड पाटण तालुक्यातील डिचोली नवजा हेलवाक मोरगिरी गारवडे साजूर 
तांबवे विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन या राज्य महामार्गाच्या कामासाठी चार कोटी 91 लाख रुपये असा एकूण 20 कोटींचा निधी खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे 
उदयनराजे नेहमीच जिल्ह्याच्या विकासाकरिता आग्रही असतात पंतप्रधान ग्राम सडक योजना सेंट्रल रोड फंड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून उदयनराजेनी जिल्ह्यातील रस्ते मजबुतीकरण करिता नेहमीच विशेष प्रयत्न केले आहेत

1933 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 39 बाधितांचा मृत्यू

*1933 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 39 बाधितांचा मृत्यू*
 सातारा दि. 25 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1933  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 39  बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 85 (4324), कराड 226 (14686), खंडाळा  145(5774), खटाव 261 (7838), कोरेगांव 148 (7889),माण 176 (5323), महाबळेश्वर 47 (3120), पाटण 81 (3770), फलटण 259(11779), सातारा 346 (21505), वाई 140 (7154 ) व इतर 19 (457) असे आज अखेर  एकूण   93619  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 

  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 3(95), कराड  4 (408),  खंडाळा 1 (78) ,खटाव 6 (229), कोरेगांव 3 (222), माण 2  (126), महाबळेश्वर 0 (28), पाटण 2 (112), फलटण 5 (168), सातारा 6 (692), वाई 7 (171) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण  2329 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Saturday, April 24, 2021

तर जिल्ह्यांतर्गत फिरताच येणार नाही...

 अत्यावश्‍यक कारणासाठी शहर, तसेच जिल्ह्यांतर्गत प्रवास सुलभ होण्यासाठी नागरिकांना ई-पास देण्यासाठी जिल्हा विशेष शाखेमध्ये स्वतंत्र ई-पास कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा पास असल्याशिवाय नागरिकांना आता शहर, तसेच जिल्ह्यांतर्गत फिरता येणार नाही.

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी शासनाने एक मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. या आदेशानुसार नागरिकांना संचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये वैद्यकीय कारण, नातेवाईकाचे अंत्यसंस्कार किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या गंभीर आजारपणाच्या कारणासाठी प्रवास करण्यास सवलत देण्यात आली आहे. लॉकडाउनची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस दल सज्ज झाले आहे. शहर, तसेच जिल्ह्याच्या प्रवेश मार्गावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याठिकाणी नागरिक कशासाठी बाहेर पडलेत याची विचारणा केली जाणार आहे. अशावेळी नागरिकांकडे ठोस कारण सांगता येणे आवश्‍यक असते. या विचारण्यामध्ये वेळ जाऊ नये, तसेच वादावादीचे प्रसंग उद्‌भवू नयेत, यासाठी जिल्हा पोलिसांनी नागरिकांच्या सोयीसाठी ई-पास देण्याची सुविधा सुरू केली आहे.
ई-पास देण्यासाठी जिल्हा विशेष शाखेत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली आहे. नागरिकांनी http://covid19.mhpolice.in या लिंकचा वापर करायचा आहे. त्यामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून आपली व आपल्या सहप्रवाशांची माहिती, प्रवासाचे कारण, प्रवास सुरू करण्याचे ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण याबाबतची माहिती व कागदपत्रांची पूर्तता करून ई-पाससाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. ज्या नागरिकांना इंटरनेट सेवा, तसेच मोबाईलचा वापर करता येत नाही, ई-पास हवा असल्यास त्यांना प्रत्येक पोलिस ठाण्याकडून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात ई-पास मार्गदर्शन पथक निर्माण करण्यात आल्याची माहितीही निरीक्षक कुंभार यांनी दिली आहे. अशा नागरिकांना या पासशिवाय शहर व जिल्ह्यांतर्गत फिरण्यावर दहा हजार रुपये दंड करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आला आहे

चुकीची माहिती पसरवू नका”; अनिल देशमुख प्रकरणावरून संजय राऊत, जयंत पाटलांवर भाजपाचा निशाणा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरासह, कार्यालयांमध्ये झाडाझडती देखील सीबीआयने घेतली आहे. या कारवाईवरून सत्ताधारी पक्षाचे नेते व भाजपा नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सीबीआयकडून करण्यात आलेल्या या कारवाईबाबत शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आदी नेत्यांनी शंका उपस्थित करत, भाजपावर निशाणा साधला आहे. यावर आता भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिले आहे

“उच्च न्यायालयाने सीबीआयला कधीही अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले नाहीत. त्या आरोपांमध्ये काही तथ्य आढळल्यास सीबीआयला कायद्यानुसार पुढे जाण्याचे निर्देश दिलेत. म्हणून चुकीची माहिती पसरवू नका, आम्ही आपल्यासारख्यां प्रतिष्ठित व्यक्तींकडून फेक न्यूज पसरवण्याची अपेक्षा करत नाही.” असं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना नेते संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्देशून म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी न्यायालयच्या आदेशातील मजकूर देखील पाहण्यासाठी जोडला आहे.

CBI च्या छाप्यानंतर अनिल देशमुख यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

 
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि अन्य मालमत्तांवर CBI ने छापे टाकले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. सुमारे दहा तास सीबीआयचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरी झाडाझडती घेतली. यानंतर अनिल देशमुख यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अगदी मोजक्या शब्दांत अनिल देशमुख यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली. 

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह या प्रकरणातील संबंधित इतरांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आहे. तसेच प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने काही ठिकाणी सीबीआयकडून झाडाझडतीही सुरू करण्यात आली आहे. दिवसभर सीबीआयची कारवाई सुरू होती. मात्र, त्यानंतर सायंकाळी अनिल देशमुख यांनी या प्रकरणी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. अनिल देशमुख यांनी एक ट्विट केले आहे. सीबीआयच्या पथकाला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करून मी कोरोनाच्या अनुषंगाने काटोल व नरखेड येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रांची पाहणी करण्यासाठी निघालो आहे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. 

न्यायालयाकडून चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे. उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही असे जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, सीबीआयला उच्च न्यायालयाने काही आदेश दिले आहेत. सीबीआय त्यानुसार काम करत असेल. यात राजकीय सूडबुद्धीचा प्रकार नसावा असं मी मानतो. पण जर तसं काही असेल, तर महाविकास आघाडीचं सरकार म्हणून आम्ही यासंदर्भात भूमिका घेऊ, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

2001 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू

सातारा दि. 24 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2001 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 34  बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

  तालुकानिहाय कोरोना बाधितांची आजची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 76 (4239), कराड 244 (14460), खंडाळा  162 (5629), खटाव 114 (7577), कोरेगांव 117 (7741),माण 177 (5147), महाबळेश्वर 92 (3073), पाटण 110 (3689), फलटण 253 (11520), सातारा 372 (21159), वाई 249 (7014  ) व इतर 439 असे आज अखेर  एकूण   91687  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 

  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (92), कराड  3 (404),  खंडाळा 0 (78) ,खटाव 6 (223), कोरेगांव 3 (219), माण 1 (124), महाबळेश्वर 1 (28), पाटण 1 (110), फलटण 3 (163), सातारा 12 (686) व  वाई 3 (164) असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण  2291 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Friday, April 23, 2021

ऑक्‍सिजनचा टँकर कुणाचा? सातारा आणि कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद.सातारच्या सीमेवर ऑक्सिजन टँकर अडवला...



सातारा : सध्या देशात कोरोना संसर्गाचा विस्फोट झाला असून अनेक राज्यात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. वैद्यकीय उपचारांविना रुग्णांचे जीव जात आहे. राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हा, शहर प्रशासन ऑक्सिजन मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. अशीच एक घटना सातारा जिल्ह्याच्या सीमेवर घडली आहे. जिथं ऑक्सिजनवरुन दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद झालाय.

सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी सीमेवरुन जाणारा ऑक्सिजनचा टँकर अडवला. यावरुन कोल्हापूर आणि सातारा जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे पहायला मिळाला. ऑक्‍सिजनचा टँकर आमचाच असल्याचा दावा कोल्हापूर आणि सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. त्यामुळे सध्या टँकर पोलीस बंदोबस्तात उभा आहे. ही घटना साताऱ्याच्या हद्दीवर घडली असून दोन जिल्हाधिकाऱ्यांची उच्च पातळीवर चर्चा झाली. 

तो टँकर सातारचा
ऑक्सिजन टँकरवरुन वाद झाल्यानंतर फोनाफोनी केल्यानंतर तो टँकर सातारचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच वेळी दोन टँकर निघाले होते. एका टँकरचा संपर्क तुटल्यामुळे ही गफलत झाली असल्याची माहिती मिळाली आहे. तर संबधित टँकरचा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाशी काही संबध नाही. तो टँकर कोल्हापुरातल्या प्रायव्हेट उत्पादकाचा आहे. त्यातील ऑक्सिजन कोल्हापूर जिल्ह्यासाठी नाही. कोल्हापूर जिल्ह्यासाठी TNS या कंपनीकडून स्वतंत्र टँकर येत आहे, अशीही माहिती मिळाली आहे



खा.श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने सातारा ते कागल या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्राच्या सुधारणेसह दुरुस्तीच्या कामासाठी 558 कोटी 24 लाख निधी मंजूर...

कराड
खा.श्रीनिवास पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने सातारा ते कागल या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्राच्या सुधारणेसह दुरुस्तीच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी 558 कोटी 24 लाख एवढा भरघोस निधी मंजूर केला आहे. त्यामुळे उड्डाणपूल उभारणीसह महामार्ग दुरुस्तीच्या कामांमुळे नागरिकांचा महामार्गावरील प्रवास सुरक्षित व सुखकर होणार आहे.

कागल ते शेंद्रे महामार्गाच्‍या पटृयातील पाच धोकादायक ठिकाणांच्‍या (ब्‍लॅक स्‍पॉट) दुरुस्‍ती व सुधारणांसाठी तब्‍बल 646 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामधील पाच पैकी चार ठिकाणे ही सातारा जिल्‍हयातील असून त्‍यामध्‍ये मलकापूर (ता. कराड) येथील नव्‍या उड्डाणपूलासाठी 459  कोटी 52 लाख रुपये, मसूर फाटा येथील अंडर पास पूलासाठी 47 कोटी 18 लाख, इंदोली फाटा अंडर पास पूलासाठी 45 कोटी 35 लाख आणि काशीळ फाटा येथे महामार्गाच्‍या दोन्‍ही बाजूस दीड कि.मी. अंतराच्या सर्व्‍हीस रस्त्यासाठी 6 कोटी 19 लाख  निधीची तरतूद करण्‍यात आलेली आहे. सदर कामांची अंमलबजावणी सातारा-कागल महामार्गाच्‍या सहापदरीकरण कामाबरोबरच करण्‍यात येणार आहे. खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून त्यांनी मागणी केलेल्या सदर कामांसाठी भरघोस निधी मंजूर झाला आहे. 
  सातारा लोकसभेच्या पोटनिवडणूकीत निवडून आल्यानंतर खा.श्रीनिवास पाटील यांनी कामाचा धडाका लावला आहे. निवडणूक निकालानंतर त्यांनी लगेचच नोव्‍हेंबर 2019 मध्ये केंद्रीय रस्‍ते वहातूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याशी  पत्रव्‍यवहार करुन तर अनेकदा त्यांना प्रत्‍यक्ष भेटून सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा संदर्भातील विविध मागण्या केल्या होत्या. सातारा ते कागल अशा 132 कि.मी. अंतरामध्‍ये मार्गाची झालेली दुर्दशा, त्यामुळे वहातूकीसाठी निर्माण होत असलेली  धोकादायक परिस्थिती तसेच  या पटृयात होणारे अपघातांचे प्रमाण आणि त्यामध्ये नागरिकांचे जाणारे नाहक बळी याबाबत त्यांनी ना.गडकरी यांचे लक्ष वेधले होते.  खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन ना.गडकरी यांनी दि. 22  सप्‍टेंबर 2020 रोजी पत्र लिहून त्यांना आपल्‍या मागणीप्रमाणे सातारा-कागल महामार्गावरील प्रमुख पाच धोकादायक व अपघात प्रवण ठिकाणे निश्चित करुन त्‍याची दुरुस्‍ती व सुधारणा करण्‍याचे काम हाती घेतले असल्याचे कळविले होते. त्यानंतरही  नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या  बजेट अधिवेशनातील  प्रश्‍नोत्‍तराच्‍या काळात  खा.श्रीनिवास पाटील यांनी हे मुद्दे लावून धरत महामार्ग संदर्भातील आपल्या मागण्या केल्या होत्या. खा.पाटील यांनी केलेल्या मागण्या व सूचनांना ना.नितीन गडकरी यांनी सकारात्‍मक प्रतिसाद दर्शवून या मागण्यांची सोडवणूक त्वरित केली जाईल असे त्यावेळी आश्वासित केले होते.
    सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गा संदर्भात केलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष्य देवून मोठा निधी उपल्ब्ध करून दिल्याबद्दल ना. गडकरी यांचे खा.पाटील यांनी आभार मानले आहेत. दरम्यान जिल्‍हयातील राष्‍ट्रीय व राज्‍य महामार्गावरील इतर अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करुन त्‍याबाबत केंद्रीय रस्‍ते वहातूक मंत्रालयाला कळवण्यात यावेत. त्‍याबाबतही तातडीने निर्णय घेण्यात येथील असे ठोस आश्‍वासन ना.गडकरी यांनी खा.श्रीनिवास पाटील यांना लोकसभेत केलेल्या प्रश्‍नांना उत्‍तर देताना दिले होते. त्यासाठी लवकरच ‍जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व आर.टी.ओ. अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेऊन जिल्‍हयातील सर्व अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करण्‍याचे काम हाती घेणार असल्‍याचे खा.श्रीनिवास पाटील यांनी सांगितले आहे.

आज 1742 जण बाधित ; 34 जणांचा मृत्यू


 सातारा दि. 23 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1742  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 34 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

  कोरोना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील* सातारा 112, रविवार पेठ 4, शुक्रवार पेठ 3, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 11, सदरबझार 8, माची पेठ 1, केसरकर पेठ 2,रामचा गोट 6, यादोगोपाळ पेठ 3, गोडोली 7, कोडोली 21, करंजे 8, कृष्णानगर 4, संगमनगर 3, संभाजीनगर 1, तामाजाईनगर 5, सैदापूर 4,  शाहुनगर 5, शाहुपुरी 5,  अपशिंगे 1,  शिवथर 2, क्षेत्र माहुली 2, वाढे 2, लिंब 2,  वनवासवाडी 2, सांगवी 1,अंबेदरे 1, कारंडवाडी 2, चिंचणेर 1, खेड 1, सोनगाव 4, उंब्रज 1, गडकर आळी 1, म्हसवे 2, यतेश्वर 1, कासवडे 2, बोरेगाव 1, तासगाव 1, भरतगाववाडी 1, खावली 1, जकातवाडी 1, अंगापूर 1,धनवडेवाडी 2, बोंडारवाडी 1, शेरेवाडी 1,कुसवडे 2, शेंद्रे 1,जळकेवाडी 7,   निनाम 1, खांबवडे 1, दरे तर्फ 1,  मल्हार पेठ 1, कुशी 1, तारगाव 2,भरतगाव 1, फत्यापूर 3, वर्णे 2, रामनगर 5, निगडी 1, जांबळेवाडी 1, सांगवी 4, सारोळा 1, किडगाव 1, पिंपळवाडी 1,देगाव 1, नांदगाव 1, हमदाबाद 1, अंबेवाडी 1, पाडळी 1, नागठाणे 2, अतित 2, गजवडी 2, मोळाचा ओढा 2, गडकर आळी 2, दरे खु 1, कारंडी 1,  दौलतनगर 2, किडगाव 1, कुमठे 1, आष्टे 1,  निनाम 1,  पानमळेवाडी 1, खडकी 1, कारंडी 1, दरे खु 1, भोरगाव 1, खिंडवाडी 2, प्रतापसिंहनगर 2,      

*कराड तालुक्यातील* कराड 27, शनिवार पेठ 11, गुरुवार पेठ 5, मंगळवार पेठ 3, बुधवार पेठ आगाशिवनगर 7,   विद्यानगर 1, बेलवडे हवेली 1, उंडाळे 7, बनवडी 9, चोरे 2, कोपर्डे हवेली 2, चारेगाव 1, कार्वे 3,  तांबवे 2,भारवाडी 1, उंब्रज 4, येवती 1,रेठरे बु 2, कोयना वसाहत 2, मसूर 3, धोंडेवाडी 3,हजारमाची 4, शेनोली स्टेशन 1, मुंडे 2, येरवळे 1,  कार्वे नाका 1, वाडोली निलेश्वर 1, मलकापूर 17, पार्ले 1, तळबीड 5,  मद्रुळ हवेली 1, सुपने 3, तळीये 1, वनवासमाची 1, गलमेवाडी 1, मनव 1,  हेलगाव 1, गोंडी 1, कोळेवाडी 1, शेरे 1, वहागाव 1,  पाली 1,  गोगाव 1, वाघेरी 2, कोरेगाव 2, विंग 2, धोंडेवाडी 3, काले 2,  वडगाव 1, मार्ली 1, गोवारे 1, कोळे 3,कपील 2, कोनेगाव 1, बाबरमाची 1, शेरे 1,         
*पाटण तालुक्यातील* पाटण 8, खोंजवडे 2, जानुगडेवाडी 1, तारळे 29, कळंबे 2, कडवे 1, पांधारवाडी 2, मालदन 1, राजवाडा 1,ठोमसे 5, मराठवाडी 1, नाडोळी 2, बनपुरी 7, मल्हार पेठ 3, उरुल 1, कटकेवाडी 1,  अवसर्डे 1, दुलसे वजरोशी 1, कोंढवे 1, नावडी 1, ढेबेवाडी 1, गावडेवाडी 1, खिवशी 5, भुईलवाडी 1, आसवलेवाडी 4, मार्ली 1, नवा रस्ता 1, गव्हाणवाडी 1, मारुल 1, कोयना नगर 3,  पापर्डे बु 1, चोबदारवाडी 1, मारुल हवेली 2, चाफळ 2, जाधववाडी 1, खोचरेवाडी 1, बहुले 1,  काळगाव 1, मोरगिरी 1,       

*फलटण तालुक्यातील* फलटण 20,  रविवार पेठ 2, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, कोळकी 4, मलटण 6, वडजल 1, सस्तेवाडी 3, सोनवडी 1, आसु 6, सोमनथळी 4, मिर्ढे 3, तिरकवाडी 1, जाधववाडी 7, तांबवे 8,  विढणी 14, चौधरवाडी 3, काळज 3, वाठार निंबाळकर 2,शिंदेवाडी 1, राजाळे 1, धुळदेव 10, कांबळेश्वर 2, अलगुडेवाडी 4, सोनगाव 1, जिंती 1, साखरवाडी 2, सुरवडी 1, निंबळक 4,खुंटे 1, तावडी 1, मिरेवाडी 1, पिप्रद 1, वाठार 1, कापशी 1, तरडगाव 1, चव्हाणवाडी 2, विठ्ठलवाडी 1, तडवळे 1, तरडगाव 2,कापडगाव 2, डोंबाळवाडी 1, घाडगेवाडी 1, मुंजवडी 1, मुळीकवाडी 1, ढवळ 2, आळापुर 1, जावली 1, राजाळे 1, फडतरवाडी 1,      

*खटाव तालुक्यातील* खटाव 27, वडूज 5, विसापूर 3, वेटणे 13, खादगुण 1, निढळ 4, वर्धनगड 1, मायणी 2, पुसेगाव 1, अंबवडे 1, सिद्धेश्वर कुरोली 1, कातरखटाव 9, औंध 5, खबालवाडी 1, पडळ 1, बुध 2, डिस्कळ 1, दारुज 4, भुरकवाडी 2, जांभ 2, सिद्धेश्वर कुरोली 1, पाडेगाव 1, विसापूर 2, कोळेवाडी 1, विठापूर 1, वारुड 2, नागाचे कुमठे 7, लोणी 2, खरशिंगे 3,निमसोड 1,  
*माण तालुक्यातील* मार्डी 4, म्हसवड 66, माण 1, नरवणे 22, शिरवली 1, वारुगड 1, कुळकाई 1, मोही 9, ढाकणी 5, ताडळे 6, इंजबाव 1, भाळवडी 1, पळशी 7,  गोंदवले 5,  किरकसाल 3,बिदाल 6, शिरवली 1, कासारवाडी 1, शेनवडी 2, पर्यंती 2, दहिवडी 33,       पिंपरी 1, कुक्कुडवाड 1, विरकरवाडी 1, लोधवडे 2, देवपूर 3, पुलकोटी 1, पंधारवाडी 4, माहिमगड 1, पांघारी 1,उकीर्डे 1, गोंदवले खु 5, किरकसाल 1, पिंगळी बु 1, वावरहिरे 2, पिंगळी खु 1, 

*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 12, रहिमतपूर 2, सातारा रोड 7, अनपटवाडी 1, निगडी 2, एकंबे 3, जांभ 2, भिवडी 2, बिचुकले 8, गोलेवाडी 1, देवूर 1, कुमठे 2, अनपटवाडी 4, रणदुल्लाबाद 3, पिंपोडे बु 2, धामणसे 1, वाघोली 1, चिंमणगाव 1, किन्हई 1, तळीये 3, वाठार स्टेशन 2, अपशिंगे 1, वेळंग 1,    
*खंडाळा तालुक्यातील*  लोणंद 19, पाडेगाव 3, शिरवळ 39, अंधोरी 12, पळशी 1, अतित 3, नायगाव 1, केसुर्डी 1,मिसाळवाडी 1, विंग 2, खराडवाडी 1, तोंडळ 1,  खेड 1, देवघर 1, पळशी 2, मोरवे 3, निंबोडी 1, कराडवाडी 2, भादे 1, खेड बु 1, खराडवाडी 1,       

*वाई तालुक्यातील* वाई 27, फुलेनगर 2,   बावधन 19, भुईंज 3, चिंदवली 1, मयुरेश्वर 1,कवठे 6,  चांदक 1, मोहडेकरवाडी 2, काचलेवाडी 1, केंजळ 1, पाचवड 1, म्हातेकरवाडी 8, दरेवाडी 1, पसरणी ,कुसगाव 1, बोरगाव 12, कानुर 1,चिखली 1, लोहारे 1,   सातलेवाडी 1, वाघजाईवाडी  2, रामढोह आळी 5,  सिद्धनाथवाडी 3,गणपती आळी 4, यशवंतनगर 1, गुळुंब 2, धोम कॉलनी 1, धर्मपुरी 3, दत्तनगर 3, भोगाव 4, गंगापुरी 3, सोनगिरवाडी 1, कुडाळ 1, किकली 1, एसर 1, अभेपुरी 1, मालतापूर 1, आसरे 2, शिरगाव 1,  
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 16, पाचगणी 15, उतेकर अनवली 5, तापोळा 7, मांघर 1, तळदेव 2, गोडोवली 1, खिंगर 1, सोळशी 5,  

*जावली  तालुक्यातील* जावली 1, प्रभुवाडी 1, सोनगाव 1, मोहाट 1, मेढा 8, चिकनवाडी 1, धुंद 1, खर्शी कुडाळ 12, ओझरे 1, कुडाळ 10,  सांगवी कुडाळ 1, म्हाते बु 5, मोरावळे 2, बामणोली 3, तेटली 3, पानस 1, बिभवी 7, सर्जापुर 5, दरे बु 3, करंदोशी 1, शेटे 3, राजापुरेवाडी 1, खर्शी 9, महु 3, भोगोवली 1, अंबेघर 1,  सायागव 1, 

*इतर* 12, नांदगाव 1,   पांघारी 1, कारखेल 1, बावकलवाडी 1, बनगरवाडी 1, पावशेवाडी 11,   रांजणी 1, अलेवाडी 9, भक्तवडी 2, लोणार खडकी 7, आंबेगाव 1, नांदगिरी 1, भिमनगर 1, ध्याती 1, तांबवे 1, घोंशी 1, चौपदारवाडी 1,परखंदी 1, वाघजाईवाडी 1,  दुरुस्करवाडी 1, सायगाव 2,कोळेवाडी 1, खडकी 2, सावरी 1, पुळकोटी 1, चिखली 1, भक्ती 5, खोजेवाडी 3, पांडेवाडी 1, शिरगाव 1,विरळी 1, जायगाव 1,  अंबेरी 1, खारकरवाडी 1, बहुले 24, येराडळ 1, गोसावीचीवाडी 1, करंडोशी 1, वनवासमाची 1, एकीव 1, कळंबी 1, कारवडी 1, बोंबाळे 5, विवर 1,   वरुड 2, भोर 1, येलमारवाडी 2, गावडेवाडी 1, रांगेघर 1,    मानेवाडी 1, महु 1, सोमर्डी 5, पाटोळे खडकी 2, ताडळे 2, येराळवाडी 2, वाघेरी 1, डांबेवाडी 2, गोवारे 1, घोटेघर 1, लटकेवाडी 2, गणेशवस्ती 1,    बांबळे 1, बोपर्डी 1, सायगाव 2, गुजरवाडी 1, खातवळ 2, हवालदारवाडी 3, हिंगणी 1, वाकी वरकुटे 1, म्हासोली 1,  दिवड 5, जांभुळणी   लाडेगाव 1, म्हसाळवाडी 5, अंबेघर 1, वडगाव हवेली 1, वाघोली 3, किकसाळी 1,   खडकी 2, जखीनवाडी 2, बांगरवाडी 1, कोळे 1, बोंडरवाडी 1, रुईघर 1,दापवाडी 1, परखंदी 1, वडगाव 1, खरातवाडी 1,  वसंतगड 1, शिरवडे 2, मोरगिरी 3,  

*बाहेरील जिल्ह्यातील* पुणे 3,  मुंबई 3, निपाणी 15, अंबरनाथ 1,विजापूर 1, कोल्हापूर 1, सांगली 2, रत्नागिरी 1, वाळवा 1, केडगाव 3,  
*34 बाधितांचा मृत्यु*
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील रहिमतपूर ता.कोरेगाव येथील 60 वर्षीय महिला, अतित ता. सातारा येथील 72 वर्षीय महिला, पिंपोडे ता. सातारा येथील 50 वर्षीय महिला, विविध खासगी हॉस्पीटलमध्ये सातारा येथील 55 वर्षीय महिला, महागाव ता. सातारा येथील 81 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर येथील 85 वर्षीय महिला, केसरकर पेठ, सातारा येथील 63 वर्षीय पुरुष, तडवळे ता. कोरेगाव येथील 76 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, सातारा येथील 73 वर्षीय महिला, गजवडी ता. सातारा येथील 50 वर्षीय महिला, मुंबई येथील 58 वर्षीय महिला, सोळशी ता. कोरेगाव येथील 31 वर्षीय पुरुष, कात्रज, पुणे येथील 40 वर्षीय महिला, सायगाव ता.जावली येथील 79 वर्षीय पुरुष, फलटण येथील 38 वर्षीय पुरुष, खबालवाडी ता. खटाव येथील 47 वर्षीय पुरुष, कर्मवीरनगर ता. सातारा येथील 55 वर्षीय पुरुष, बोपेगाव ता. वाई येथील 65 वर्षीय पुरुष, तोंडोली ता.कडेगाव जि. सांगली येथील 60 वर्षीय महिला, कराड येथील 52 वर्षीय महिला, पोतेकरवाडी ता. पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, काळे ता. कराड येथील 72 वर्षीय महिला, कर्वे नाका, कराड येथील 47 वर्षीय पुरुष, केसकर पेठ, सातारा येथील 67 वर्षीय पुरुष, वरुड ता. खटाव येथील 76 वर्षीय पुरुष, वडी ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, बरड ता. फलटण येथील 53 वर्षीय महिला, तांबवे लोणंद ता. खंडाळा येथील 27 वर्षीय पुरुष, बिदाल. ता माण येथील 70 वर्षीय महिला, काण्हरवाडी ता. खटाव येथील 49 वर्षीय पुरुष, येराळवाडी ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला, मायणी ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष, बावधन ता. वाई येथील 60 वर्षीय महिला, वाई येथील 11 वर्षीय युवक अशा एकूण 34  कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

*एकूण नमुने -501033*
*एकूण बाधित -89654*  
*घरी सोडण्यात आलेले -70600*  
*मृत्यू -2290* 
*उपचारार्थ रुग्ण-16764* 
0000

कोरोना विरोधात भाजपाची टास्क फोर्स राहणार उभी ; विक्रम पावसकर पुन्हा कोरोनाशी लढण्यासाठी सरसावले...

कराड
सर्वसामान्यांच्या हितासाठी नेहमीच झटत असलेल्या भाजपातर्फे कोरोना विरोधातील लढाईसाठी साहाय्यक समिती गठीत करण्यात आली आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी भाजपाची टास्क फोर्स ठामपणे उभी असून नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केले आहे.

याबाबत देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी झटत आहे. त्यांच्या अडचणीच्या काळात बरोबरीने उभी आहे, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी नेते हे तन-मन-धन अर्पण करून लोकांची सेवा करत असतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही सेवा ही संघटन या पक्षाच्या कार्यपद्धती प्रमाणे सर्वजण लोकांना मदत करत होते. त्यावेळी धान्य वाटप, अन्न पोहोच करणे, रुग्णांना औषधे पोहोच करणे, रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी मदत करणे, दुसर्‍या जिल्ह्यात जाण्या-येण्यासाठी पास काढण्यासाठी मदत करणे, परप्रांतीयांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करणे आणि सर्वात महत्वाचे समुपदेशन करणे यांसारख्या अनेक कामात कार्यकर्ते सहभागी होते.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लोकांच्या सेवेसाठी अविरत झटत आहेत. कोरोनाग्रस्तांना कशाप्रकारे मदत करता येईल, हे ठरवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, भाजप उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, सातारा जिल्हा प्रभारी सदाशिवभाऊ खाडे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीमध्ये भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केलेल्या आवाहनानुसार ‘माझा बूथ कोरोना मुक्त बूथ, माझा बूथ लसीकरण युक्त बूथ’ या तत्वानुसार सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी काम करावे असे ठरले. 
या बैठकीला प्रदेश कार्यकारिणी सदस्य मदनदादा भोसले, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, सरचिटणीस आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोनाग्रस्तांना ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड किंवा हॉस्पिटलची माहिती वेळेवर मिळावी. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावे आणि लोकांचे प्राण वाचावेत यासाठी भारतीय जनता पार्टीने जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यासाठी 15 कार्यकर्त्यांची टीम तयार केली आहे. तसेच प्रत्येक शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी प्रत्येकी 10 असे एकूण 175 जणांची टीम तयार केली आहे. या टीमकडे बेड उपलब्धता आणि हॉस्पिटल माहिती, इंजेक्शन बाबत माहिती, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना माहिती, रुग्णालयाकडून ज्यादा बिल आकारणी बाबतचे तक्रार निवारण, लसीकरणाबाबत माहिती आणि कोरोना कोविड सेंटर बाबत माहिती हे विभाग वाटून दिले आहेत. त्यांचे काम चालू झाले आहे. 
जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केलेल्या सुचनेनुसार सातारा जिल्हा संघटन सरचिटणीस चंद्रशेखर वढणे यांनी प्रमुख पदाधिकार्‍यांचे फोन नंबर आणि नावे हेल्पलाइन म्हणून दिले आहेत. त्यानुसार सातारा-जावळी : विठ्ठल प्रल्हाद बलशेटवार 9822215269, विकास विजय गोसावी 9011031794, डॉ.उत्कर्ष सखाराम रेपाळ 8421791983, डॉ.वीरेंद्र घड्याळे 9422400024. कोरेगाव: राजेंद्र दगडू इंगळे 9822599139, गणेश पालखे 9822425782, अप्पा कदम 9172500555, वाई. महाबळेश्वर, खंडाळा : सचिन घाटगे 9822241548, अलंकार सुतार 8805775164. माणं, खटाव, फलटण : सुहास मुळे 8275060182, जयकुमार शिंदे 9595365551, कराड-पाटण: महेंद्र डुबल 855199153, अजय पावसकर- 8275387994 व औषधांसाठी शैलेंद्र कांबळे 839010112 यांना संपर्क करून आपल्या अडचणी सांगाव्यात, त्याचे निराकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल, असे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सांगितले.

Thursday, April 22, 2021

वसई विरार येथील कोविड हाॅस्पिटलला अचानक लागली आग ; 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू

वसई विरार येथील कोविड हाॅस्पिटलला अचानक आग लागली. या आगित 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इतर रुग्णांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षा विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती. यामध्ये १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी अतिदक्षा विभागात १७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे.
दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. ही आग नक्की कशी लागली हे अद्याप कळू शकलेले नाही. इतर रुग्णांची सुटका करण्यात आली.

सध्याच्या ऑक्सिजन च्या तुटवड्याबाबत उपाय म्हणून ऑक्सिजन फिलिंग स्टेशन उभे करण्याबाबत अहवाल देण्याच्या आ. चव्हाण यांनी प्रशासनाला दिल्या सूचना

कराड
 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. याअनुषंगाने प्रशासनाकडून कोणत्या प्रकारची तयारी करण्यात आली आहे तसेच काय अपेक्षित आहे यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला. या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य तथा रयत सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, पै. नानासो पाटील, नरेंद्र पाटील, नितीन थोरात, उदय पाटील आदी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी आढावा बैठकीत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोनाच्या सद्य परिस्थितीतील बेडची उपलब्धता, रेमडीसीव्हर इंजेक्शन चा पुरवठा, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला एक रुग्णवाहिका तसेच लसीकरण मोहीम कश्या प्रकारे राबविली जात आहे या विषयांवर आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कराड तालुक्यात १२ हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. यामध्ये सह्याद्री हॉस्पिटल, शारदा क्लिनिक एरम हॉस्पिटल, स्व.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड हॉस्पिटल, राजश्री हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल, क्रांती सर्जिकल, कोयना हॉस्पिटल, सह्याद्री ऍग्री इंजिनिरिंग, देसाई हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल आदी हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. *या सर्व हॉस्पिटल मध्ये आजच्या तारखेला ८६६ इतक्या बेडची तयारी केली गेली असून यामधील सद्या १८३ बेड उपलब्ध आहेत. बेडच्या संख्येबाबत रोजची माहिती उपलब्ध करण्याबाबत सूचना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या. 
याचसोबत कराड तालुक्यातील तथा जिल्ह्यातील हॉस्पिटलना ऑक्सिजन चा तुटवडा भेडसावत आहे. यासाठी आ. चव्हाण यांनी प्रशासनाकडून माहिती घेतली तसेच कराड मधील काही हॉस्पिटल ना सुद्धा संपर्क साधून त्यांच्याकडे किती प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे याची माहिती घेतली. या माहितीमध्ये एकंदरीतच ऑक्सिजनचा साठा कमी आहे असे दिसल्यावर आ. चव्हाण यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी तसेच अन्न व औषध विभागाच्या सचिवांशी संपर्क साधून जिल्ह्यातील ऑक्सिजन च्या पुरवठ्याबाबत माहिती घेतली यानुसार जिल्ह्यासाठी ७ टँकर पाठविले जात आहेत अशी माहिती देण्यात आली. ऑक्सिजन च्या तुटवड्याबाबत यावर उपाय म्हणून सरकारी जागांमध्ये ऑक्सिजन फिलिंग स्टेशन उभा करण्याबाबत चर्चा झाली व तसा अहवाल दयावा अश्या सूचना आ. चव्हाण यांनी दिल्या. 

यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, प्रशासनासोबत घेतलेल्या आढावा बैठकीत बेडच्या उपलब्धतेबाबत, ऑक्सिजन च्या पुरवठ्याबाबत, रेमडेसीव्हर इंजेक्शन पुरवठा यासह लसीकरण मोहीम कश्या प्रकारे चालू आहे याची माहिती घेतली. सद्या बेडची उपलब्धता जरी असली तरी आणखी कोविड सेंटर उभारण्याची गरज आहे व त्यानुसार येत्या आठवड्यात यशवंतराव चव्हाण बहुऊद्देशीय हॉल, वडगाव हवेली ग्रामीण रुग्णालय, उंडाळे ग्रामीण रुग्णालय या ३ ठिकाणी ११० बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे व येथेच कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. यापुढेही जशी गरज पडेल तशी बेड संख्या वाढविले जातील. तसेच तालुक्यात लसीकरण सगळीकडे व्यवस्थित होत आहे. पण लसींचा पुरवठा मर्यादित असल्याने अडचण भासत आहे परंतु प्रशासनाने दिवसाला १५००० जणांना लस देऊ शकतो अशी यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे पुरेशी लस ज्या ज्या वेळी उपलब्ध होईल त्यावेळी लसीकरण मोहीम चांगल्या प्रकारे राबविता येईल. सद्य कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे आपण लॉकडाऊन चा पर्याय घेत आहोत हे टाळण्यासाठी सर्वांनी मास्क चा वापर करावा, कायम हात साबणाने धुवावेत तसेच किमान अंतर राखले पाहिजे असे आवाहन सुद्धा यावेळी आ. चव्हाण यांनी केले.

RBI आणखी एका बँकेचा परवाना रद्द करण्याच्या तयारीत, ग्राहकांचं काय होणार? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँकेला परवाना रद्द करण्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

आर्थिक अडचणीत अडकलेली आणि घोटाळ्याच्या आरोपाने घेरलेली Sambandh Finserve Pvt Ltd या मायक्रो फायनान्स कंपनीचा परवाना लवकरच रद्द होण्याची शक्यता आहे. नुकतंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँकेला परवाना रद्द करण्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मनी कंट्रोल या वेबसाईट दोन सूत्रांच्या माहितीने हे वृत्त दिले आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बँकेची निव्वळ मालमत्ता ही कमीत कमी मर्यादेपेक्षा कमी आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यात या बँकेची आर्थिक स्थिती आणखी वाईट झाली आहे. बँकेतील आर्थिक स्थिती बिघडल्यानंतर आरबीआयने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच बँकेच्या Net worth मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर कंपनीचा परवाना का रद्द केला जाऊ नये? असा प्रश्नही आरबीआयने यात केला आहे.
तसेच दुसरीकडे आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र आरबीआयकडून याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच Sambandh Finserve या कंपनीकडूनही याबाबतचे कोणतेही विधान जारी करण्यात आलेले नाही.

1815 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित ; 28 बाधितांचा मृत्यू

 सातारा दि. 22 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1815 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 28 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
  
कोरोना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील* सातारा 94,  मंगळवार पेठ 8, शनिवार पेठ 3, गुरुवार पेठ 4, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 1, सदाशिवपेठ 1,  चिमणपुरा पेठ 2, बसप्पापेठ 1,  सदरबझार 7, करंजे 3, शाहुपुरी 5, शाहुनगर 7, गोडोली 11, देगाव फाटा 1, कोडोली 6,  खुशी 17, संगम माहुली 1, क्षेत्र माहुली 1, कळंबे 2, जकातवाडी 2, कारंडवाडी 1, कळसंबे 1, निगडी 1,क्षेत्र माहुली 2, उपळे 1, डबेवाडी 1, लिंब 1, नागठाणे 2, रायगाव 1, सोनवडी 1, आरे 1, सैदापूर 1, तासगाव 3, मार्डी 1, अंबेदरे 1, चिंचणेर वंदन 1, कारी 2, संभाजीनगर 1, रामाचा गोट 2, कोंढवे 1, खेड 1, दहिवड 1, वेचले 1, तामाजाईनगर 2,  तुकाईवाडी 2,  खेड 1, नागडे 1,  सोनगांव 1, संगमनगर 1, जवळवाडी 1, मिरेवाडी 1, जकातवाडी 1, समर्थगांव 2, काशिळ 1, सासपडे 1, महागाव 1, निगडी 1, त्रिपुटी 1, आसनगाव त 1, पांढरवाडी 5 चिंचणेर लिंब 1, जैतापूर 1, मिर्ढे 1, पाडेगाव 1, रोहट 1, सोनवडी 1, अंगापूर 1, सातेवाडी 1, जकातवाडी 1, भारमार्ली 1,  अंबवडे 1,  

*कराड तालुक्यातील* कराड 29, सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 3,  शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 6, बनवडी कॉलनी 1, कोळे 2, काले 2, हजारमाची 3, कार्वे 3, शिरगाव 1, कासार शिरंबे 8, कपील 2, वारुंजी 2, मलकापूर 17, सैदापूर 4, बनवडी 1, हेळगाव 1, शहापुर 2, कोयना वसाहत 2, शेनवडी 1, तळीये 2, आगाशिवनगर 7, चरेगाव 1, साजुर 1, सुपने 3, रिसवड 1, घोगाव 1, ओंड 1, उंब्रज 1, कचरेवाडी 1, खराडे 1, नारायणवाडी 3, मुंडे 2,  केसे 1, रेठरे बु 3, रेठरे खु. 1, तासवडे 1, कोळे 1, कोळेवाडी  3,  काले 3, घारेवाडी 1, ओगलेवाडी 3, वाडोळी 1, पार्ले 1, तळबीड 1, येलगांव 1, नांदलापुर 3, नांदगांव 7, चोरे 1, पाडळी 1, कोनेगांव 1,  जखीणवाडी 1, वाठार 1, कांबीरवाडी 4, तारुख 3, बामणवाडी 2, सिंहगडवाडी 2, येणके 3, पाल 1,  गोरजवाडी 1, पार्ले 1, 

*पाटण तालुक्यातील* पाटण 8, काटेवाडी 2, तारळे 5, कळंबे 1, कालगाव 2, मोरेवाडी 1, येरड 3, रिसवड 1, चाफळ 2, मुलगाव 1, आवर्डे 1, गव्हाण 1,  ढेबेवाडी 2, गलमेवाडी 1, ढाकेवाडी 2, हेलगाव 1, खोंजवडे 1, मानेगाव 1,कामरगांव 1, रामल्ला 2, अरबवाडी 1,  कोयनानगर 1,  रुवळे 1, कुसवडे 1, केलोळी 1, 
*फलटण तालुक्यातील* फलटण 46, लक्ष्मीनगर 11, मंगळवार पेठ 3, बुधवार पेठ 3, शुक्रवार पेठ 2,  रविवार पेठ 4, मलटण 13, कोळकी 7, गणेशनगर 1, चव्हाणवाडी 2, तरडगाव 11, घाडगेवाडी 2, पाडेगाव 14, काळज 2, फरांदवाडी 14,चौधरवाडी 2, राजाळे 3, खुंटे 34 शिंदेवाडी 1, तांबवे 14, आसवली 3, शेनवडी 1, बिबी 2,जिंती 1,  खामगाव 1, निंबळक 7,  वाठार निंबाळकर 5, सोमनथळी 3, सालपे 1, हिंगणगाव 8, साखरवाडी 5, जाधववाडी 6, मिर्ढे 1, वंनदेव शेरी 1, नेवसे वस्ती 1, अलगुडेवाडी 1, विढणी 7, वाढळे 5, मुरुम 1, कापशी 3,  अरडगांव 1, गिरवी 4, गुणवरे 1, निंभोरे 2, जावली 1, मुळीकवाडी 1, दुधेबावी 1, शिंदेवाडी 1,राजुरी 1,  बिजवडी 1, ठाकुर्की 1, पिंपरद 1, सांगवी 1, सुरवडी 1, कांबळेश्वर 2, धुळदेव 2,मुजवडी 1, आदर्की 1, विचुर्णी 1, सांगवी 1, बरड 3, आंदरुड 3, गुणवरे 2, वाजेगाव  3, राजुरी 2, गिरवी 2,   

*खटाव तालुक्यातील* वडूज 11, खटाव 5, विसापूर 4, निढळ 11, काटेवाडी 1, रणशिंगवाडी 2, पुसेगाव 4, वेटने 1,खादगुण 1, भांडेवाडी 1, कलेढोण 2, पांगर खेल 1, वेटने 3, बुध 6, राजापुर 9, खबालवाडी 18, राजापुरी 3, लिमसोड 1, औंध 6, कातरखटाव 4, मोराळे 3, वाडी 1,  पाडेगांव 1, पारगांव 1, निमसोड 19, अंबवडे 1, मायणी 19,  चितळी 2, धोंडेवाडी 2, डांबेवाडी 1, तडवळे 1,  काटेवाडी 2, म्हासुर्णे 1, शेळकेवाडी 1, कदमवाडी 2, वडगाव 1, राहटणी 1, भुरकवाडी 7, वरुड 3, दारुज 1, जाखनगाव 2, लोणी 1, सातेवाडी 1, कुरोली 1, जायगाव 1, वाकळवाडी 1,  पुसेसावळी 2, भोसरे 3,कळंबी 1, येळीव 1, डिस्कळ 1,     

*माण तालुक्यातील* पानवन 2, कालवडे 2, बोडके 1, बिदाल 8, वडगाव 2, राणंद 5, शिरपालवन 1, परखंदी 1, ढाकणी 1, राणंद 5, नवलेवाडी 1, उकिर्डे 2, म्हसवड 25, पर्यंती 3, शिरवली 1, मोराळे 1, मार्डी 1,पळसवडे 1,  दहिवडी 15, मोही 2, पिंगळी 3,  नरवणे 7, पांगरी 1,हिंगणी 1, गोंदवले 1, राजवडी 1,  कुक्कुडवाड 2, पळकोटी 1, वेळाई 1, तादळे 1, झाशी 2, सोकासन 1, मार्डी 1,   गोंदवले खु 1, पळशी 1, 

*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 30, रणदुल्लाबाद 4, रहिमतपूर 34, सांगवी 1, कण्हेर खेड 1, सातारा रोड 4, नांदगिरी 1,साप 3, कण्हेरखेड 6, पिंपरी 3, नहरवाडी 4, शेंदुरजणे 9, धामणेर 4, नागझरी 1, नाईकाचीवाडी 1, एकंबे 5, एकसळ 1, बोरजाईवाडी 1, सासुर्वे 2, निगडी 1,  बिचुकले 9, अंबवडे 3, वाठार 15, वेळंग 4, अपशिंगे 4,   बोरगाव 1, सोनके 1, भोसे 1, दुधी 1, सुलतानवाडी 1, कटापुर 1, पळशी 2, दुधानवाडी 1, पोपांडे खुर्द 1, गुजरवाडी 4, देवून 7, एकसळ 2, शिरढोण 1, निमसोड 2, मार्ढे 1,  भक्तवडी 1, नागझरी 1, पुसेसावळी 1, आर्वी 3,  गोरेगाव 1,   कुमठे 1, आसरे 1, आसगाव 1, बुध 1, किन्हई त 1, पिंपोडे बु 3, पंदारवाडी 1, नांदवळ 2, तडवळे 1, नायगाव 1, आसनगाव 1, सायगाव 2,      

खंडाळा तालुक्यातील* लोणंद 20, अंधोरी 3, पाडेगाव 3, बोरी 10, शिरवळ 32, वाघोशी 2, खंडाळ 4, शिंदेवाडी 1, बाळुपाटलाचीवाडी 6, सुखेड 1, खेड 1, केसुर्डी 7, नायगाव1, पळशी 7, भोळी 1, पांडे 5, वडगांव 2, गुठळे 1, सांगवी 1, केसुरडी 2, वाघोशी 3, 

वाई तालुक्यातील* वाई 30, रविवार पेठ 3, गणपती आळी 1, धर्मपुरी 1, मुंगसेवाडी 1, बावधन 7, भुईंज 7, वेळे 5, धोम कॉलनी 2, बोपेगाव 9, वाशिवली 1, सह्याद्रीनगर 3, गंगापुरी 4, कळंबे सर्जापुर 2,  मेणवली 2, पसरणी 7, केंजळ 1, बोरगाव 2, सोनगिरवाडी 3, यशवंतनगर 4, सिद्धनाथवाडी 5, कवठे 5, मांढरदेव 1, धावडी 1, अनपटवाडी 1,  कानुर 1, अभेपुरी 1, सुलतानपुर 1, शेलारवाडी 1, बावधन 2, व्याजवाडी 2, अलेवाडी 2, केंजळ 2, शेंदुर्जणे 2, उडतरे 1, पाचवड 2, कुडाळ 1, चांदक 1, सुरुर 1, चिंदवली 2, माळदेववाडी 2, जांभ 1, केडगाव 1, विरमाडे 1, कुंभारवाडी 1, म्हातेकरवाडी 1, 

महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 18, सोळशी 15, गुरेघर 2,  पाचगणी 12,माचुतर 3,भिलार 3, गोडोवली 6 टेकवली 9, मेटगुटाड 3, पार 1 , खिंगर 2, कासवंड 1, 
*जावली तालुक्यातील* जावली 2, खर्शी कुडाळ 2, कुडाळ 4,सांगवी 4, पिंपरी 5, एकीव 1, बामणोली 1, मोरघर 1, केळघर 7, मेढा 1,  निपाणी 2,  

इतर* 7, शेरनवडी 2, पळसावडे 1, जांभ 1, विरमाडे 1,  कालंगवाडी 1, दुदरस्करवाडी 1, कुंभारवाडी 2, गुजरवाडी 2, धोंडेवाडी 2, शिंगगाव 1, करंडोशी 2, मारुल 1, पिंपळवाडी 3, पंधारवाडी 1, गोंडी 1, ध्याती 5, खिंनघर 2, कामेरी 1, ,   नानेगाव 1, म्हसवे 2, विवर 1, आखडे 3, भिवडी 1, अढळ 1, येळीव 2, खुटबाव 1, वरुड 4, निमसोड 1, पवारवाडी 1, राहटणी 3, कावडे 1, बदालापूर 1,खराडवाडी 1,भक्ती 3, ऐनकुळ 8, पांगर 1, खडकी 4, तडवळे 5, बनगरवाडी 5, बनपुरी 4, बांगरवाडी 3, बिबवी 2, बोंडरवाडी 2, डांबेवाडी 2, मामुर्डी 3,  खातवळ 1, खोजवाडी 1, कालगाव 1, ढवळी 1,  कारखेळ 1,  सोमर्डी 2, कारंडी 1, शंभुखेड 2, डांगरेघर 1, धिवड 3, इंजबाव 2, मसाळवाडी 3, पाटोळेखडकी 1, काळचौंडी 1, धावडी 1, कुसगांव 1, पुलकोटी 3, केडांबे 3,  अमृतवाडी 1, गोव्हडीगर 1, किडगांव 3, भक्तवडी 1, भादे 1, धावशी 2, कराडवाडी 1, बेलमाची 1, जांब 1,  नांदगांव 3, भोगांव 1, तुळसण 1, वरकुटे म्हसवड 1, बेलवडे बु. 2, मुंडेवाडी 40, कापडगाव 6, नांदल 7, सोनवडी खुर्द 3, सोनवडी बु 1, निंबोडी 1, लोणार खडकी 1, अहिरे 1, 
   
*बाहेरील जिल्ह्यातील* मुंबई 4, बीड 1, सांगली 2, बारामती 2, पुणे 1, वेस्ट बंगाल 1, येडेमच्छीं द्र 1, रेठरे 3 (वाळवा), कुंडल (पलुस) 4, तोंडोली (केडगांव) 1,  जाधववाडी (खानापुर) 1,  वीये (रायबाग)1, 

*28बाधितांचा मृत्यु*
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे धनगरवाडी निगडी ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, किन्हई ता. कोरेगाव येथील 48 वर्षीय महिला, तुपेगाव येटगाव ता. कडेगाव जि. सांगली येथील 65 वर्षीय महिला, कोळकी ता. फलटण येथील 84 वर्षीय पुरुष, सावली गावडी ता. जावली येथील 80 वर्षीय महिला, विविध खासगी हॉस्पीटलमध्ये देगाव ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, पुणे येथील 75 वर्षीय महिला, बावधन ता. वाई येथील 41 वर्षीय महिला, अंधोरी ता. खंडाळा येथील 52 वर्षीय महिला, चोरांबे मामुर्डी ता. जावली येथील 75 वर्षीय महिला, गंगापुरी ता. वाई येथील 76 वर्षीय पुरुष, वडवली ता. वाई येथील 46 वर्षीय पुरुष, वर्णे ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, भक्तवडी ता. कोरेगाव येथील 59 वर्षीय महिला, चोरे ता. कराड येथील 87 वर्षीय पुरुष, सालवा ता. खंडाळा येथील 38 व 35 वर्षीय महिला, चिमणपुरा पेठ ता. कराड येथील 71 वर्षीय पुरुष, कोळे ता. कराड येथील 52 वर्षीय पुरुष, तारळे ता. पाटण येथील 46 वर्षीय महिला, मरळी ता. जावली येथील 89 वर्षीय पुरुष, कराड येथील 53 वर्षीय महिला, नरवणे ता. सातारा येथील 35 वर्षीय पुरुष, गारुडी ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, फलटण येथील 70 वर्षीय महिला, खबालवाडी ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले जिल्हा रुग्णालय, सातारा येथे पाचगणी ता. महाबळेश्वर येथील 85 वर्षीय पुरुष, पडळ ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष  अशा एकूण 28 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

*एकूण नमुने -496111*
*एकूण बाधित -87958*  
*घरी सोडण्यात आलेले -68926*  
*मृत्यू -2256* 
*उपचारार्थ रुग्ण-16776* 
0000