कराड, ता. ३ : कृष्णा कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी गेली पाच वर्षे कारखान्याचा कारभार अतिशय पारदर्शीपणे करत, कारखान्याला ऊर्जितावस्था मिळवून दिली. त्यामुळे विरोधकांना बोलायलासुद्धा मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे आता विरोधक बिनबुडाचे आरोप करीत सुटले आहेत, असे प्रतिपादन कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी केले. रेठरे खुर्द (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना सभासद संपर्क भेटीप्रसंगी नुकतेच ते बोलत होते.
यावेळी बोलताना श्री. भोसले पुढे म्हणाले, की गेल्या ५ वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही कारखान्याची सत्ता स्वीकारली तेव्हा कारखान्याची अवस्था खूपच बिकट होती. पण चेअरमन डॉ. सुरेशबाबांनी योग्य नियोजनाने आणि कारखान्याला आर्थिक शिस्त लावत डबघाईला गेलेल्या कृष्णा कारखान्याला उर्जितावस्था आणली. गेल्या ५ वर्षांत उच्चांकी दर, उच्चांकी साखर उतारा असे विक्रम करत कारखान्याने नेहमीच सभासदांचे हित जपण्याची भूमिका घेतली आहे. येथून पुढच्या काळातही कारखान्याला मोठ्या उंचीवर नेण्यासाठी सभासदांनी सहकार पॅनेलला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी राहुल पाटील, धनाजी जाधव, वसंत मोरे, उपसरपंच चंद्रकांत पाटील, मराठा सेवा सोसायटीचे अध्यक्ष जयवंत नलवडे, सोसायटीचे अध्यक्ष सागर साळुंखे, प्रकाश पाटील, बी. एल. मोहिते, बजरंग कळसे, गणेश पाटील, धोंडीराम तांदळे, अशोक गावडे, सुभाष मोहिते, सर्जेराव पाटील, आनंदा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment