Thursday, April 1, 2021

मास्क घातला नाही म्हणून कराडात "तोंड' बघून कारवाई सुरू ...

 
कराड
कोरोनाच्या पार्शवभूमीवर शहर व परिसरातील लोकांनी मास्क घातला नसेल तर येथील पालिका प्रशासनाच्या वतीने दंड आकारला जात आहे शहरातील चौका चौकात हा दंड आकारला जात असल्याचे चित्र आहे मात्र, हा दंड तोंड बघून आकारला जातोय म्हणजे बड्या धेंडयांकडे दुर्लक्ष करीत हातावर पोट असणाऱ्यांकडून अक्षरशः रेटारेटी करून 500 रुपये दंड आकारणी चालु आहे आणि विशेष म्हणजे पालिका प्रशासनाची ही वसुली चक्क पोलीसच करताना दिसत आहेत. त्याठिकाणी पालिकेकडून कोणीच हजर नसते असेही दिसून आले आहे. मास्क घालत नाहीत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे,मात्र सर्वांना समान न्याय पद्धतीने ही कारवाई होत नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. शासनाने मास्क वापरा, सोशल डिस्टन्स पाळा, सॅनिटायझर चा वापर करा वारंवार हात स्वच्छ धुवा असे अनेकदा सांगूनही अनेकजण शासनाचे हे नियम  पाळत नसल्याचे निदर्शनास येत आहे या लोकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोना वाढण्याची भीती आहे म्हणून शासनाने आता लोकांनी नियमांचे पालन केले नाही तर दंड आकारणी लावली आहे आणि मास्क नसेल तर दंड करणे हे योग्यच आहे त्याबद्दल कोणाचेच दुमत असण्याचे कारणच नाही..याच पार्शवभूमीवर येथील पालिका प्रशासनाच्या वतीने शहरात दंड वसुली सुरू आहे. मात्र ही दंड वसुली तोंड बघून आणि अक्षरशः रेटारेटी करून सुरू असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
म्हणजेच, एखाद्या महागड्या गाडीतून उतरणाऱ्या व्यक्तीने मास्क न लावता गाडीतून उतरून इकडून तिकडे कामानिमित्त मास्कशिवाय वावर केला तरी त्याकडे दुर्लक्ष केले जातंय... पण , एखाद्या सामान्यांच्या तोंडावर मास्क नसेल तर मात्र त्याला आपला खाक्या दाखवत ही वसुली चालू आहे... हे कितपत योग्य आहे अशी लोकांकडून विचारणा होतेय...तर दुसरीकडे चक्क पालिकेतील काही अधिकारीच मास्कविना सगळीकडे फिरताना दिसत आहेत...पालिकेत व पालिकेबाहेर या अधिकाऱ्यांचा वावर विनामास्कच दिसून येतोय...  इतरांकडून दंड घ्यायचा अधिकार याना आहे तर मग,  मास्क न घालण्याची परवानगीदेखील याना मिळाली आहे का...? यांच्यापैकी कोणाला कोरोना झालाच तर इतर ठिकाणी त्याचा फैलाव होणार नाही का?  मग याना दंड माफ आहे का  ? याचा खुलासाही शहरवासी मागत आहेत... काही अधिकारी मात्र मास्कचा वापर करताना नियमित दिसतात हेही तितकेच खरे आहे.

शहरात कोरोना वाढतोय मात्र त्याकरिता प्रतिबंधक उपाय म्हणून इतर काही बाबी ,नियमितपणाने होणेही तितकेच गरजेचे आहे मात्र त्या बाबी होताना दिसत नाहीत.यापूर्वीचे वादग्रस्त सी ओ यशवंत डांगे यांनी जसे शहरातील बड्या धेंड्याची अतिक्रमणे तशीच ठेवून सामान्यांची काढली... तशीच काहीशी ही दंड वसुली धेंड्याना न्याय वेगळा आणि सामान्यांना वेगळा अशीच चालू असल्याचे दिसतय...विशेष म्हणजे ह्या दंडाच्या पावत्या कोणी पालिका कर्मचारी किंवा अधिकारी यांच्याकडून मिळत नाहीयेत... तर पोलीस हा दंड आपल्या स्टाईलने करताना दिसतायत... खरतर या वसुलीवेळी पालिका कर्मचारी त्याठिकाणी पोलिसांबरोबर हजर असणे गरजेचे आहे मात्र  तसे कोणी दिसत नाही... मुख्याधिकारी डाके याना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले संबंधित अधिकाऱ्याकडून या विषयाची महिती घेतो...म्हणजे डाके यांना याबाबत काही माहिती नाही असेच दिसते...मग, मुख्याधिकार्यांनाच माहीत नसलेल्या या दंड वसुलीचा "उदयोग' किती खरा,.. किती खोटा... हेही आता तपासावे लागणार आहे...

No comments:

Post a Comment