Saturday, April 3, 2021

पुण्यात मिनी लॉकडाउन’च्या पहिल्याच दिवशी भाजपाचं आंदोलन... गिरीश बापट पोलिसांच्या ताब्यात...


वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काल(दि.३) पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक निर्बंध लागू करण्यात आले. पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदीची घोषणा करण्यात आली. यावेळी पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार असल्याचीही घोषणा झाली. तसेच, पुणे पीएमपीएमएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहणार असल्याचंही जाहीर केलं. मात्र, भाजपाने पीएमपीएमएल बससेवा बंद करण्यास विरोध केला आहे. पीएमपीएमएल बससेवा पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी भाजपाचे खासदार गिरीश बापट आणि माजी आमदार शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले. यावेळी गिरीश बापट आणि जगदीश मुळीक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

No comments:

Post a Comment