वेध माझा ऑनलाइन।
विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. अशातच आता राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कारण सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन प्रचंड वातावरण तापलं आहे. कारण ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रोहित पवार, राजेश टोपेंसह अन्य 50 नेत्यांना थेट इशारा दिला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्यातील नेत्यांना थेट इशारा दिला आहे. ज्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांना पोसलं आहे तसेच त्यांच्या आंदोलनाला देखील रसद दिली आणि ओबीसी समाजाचं आरक्षण पळवण्याच्या प्रयत्न केला अशा राज्यातील तब्बल 50 उमेदवारांना पाडण्याची आमची यादी तयार असल्याच रोखठोक मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केल आहे.
राज्यातील ओबीसी समाजाला अजूनही आरक्षणाची गरज आहे. तसेच सामान्य ओबीसीच्या हितासाठी ओबीसी नेत्यांनी देखील समोर यावे. याशिवाय विदर्भ ओबीसी चळवळीत कुठेही मागे पडणार नाही असे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केल आहे.
रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासारखे उमेदवार पाडणार :
आम्ही राज्यातील 50 उमेदवार पडण्याची यादी देखील तयार केली आहे. तसेच राज्यात विधानसभेला 50 उमेदवार निवडून आणण्याची यादी आम्ही लवकरच तयार करु असे हाके म्हणाले आहेत. कारण ओबीसी मतांची भीती कधी वाटणार आहे. विदर्भातील ओबीसी नेतृत्वाला दुय्यम दर्जाची वागणूक सध्या राज्यातून मिळत आहे. तसेच ओबीसींनी यांच्या तुकड्यावर जगू नये . कारण 50 ते 60 टक्के लोकसंख्या असणाऱ्या ओबीसींची भीती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला कधी बसेल? असा सवाल देखील हाकेंनी उपस्थित केला आहे.
यासह आम्ही राज्यातील 50 उमेदवार कोणते पाडायचे हे देखील ठरलं आहे. यामध्ये रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासारखे अजून 50 मोठे उमेदवार आम्ही पाडणार आहोत. ओबीसीची भूमिका घेणारे अनेक तरुण कार्यकर्ते येत्या विधानसभेत दिसणार आहेत. त्यामुळे लक्ष्मण हाके रस्त्यावरची लढाई लढणार आहे असे लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
No comments:
Post a Comment