Wednesday, October 2, 2024

देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर गेले, राऊत अन् नड्डांची झाली भेट, राज्याच्या राजकारणात या गौप्यस्फोटाने खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. महायुती अन् महाविकास आघाडीत जागा वाटपांवर चर्चा होत आहे. यावेळी राज्यातील राजकारणाची दिशा बदलणारी बातमी आली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट झाली आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत भेटले असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी एक्सवर व्हिडिओ ट्विट करत केला आहे. अद्याप या दाव्यावर ठाकरे गट किंवा भाजपकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही.


 सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे की, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत २५ जुलै रोजी नवी दिल्लीत जे.पी.नड्डा यांना भेटले. २५ जुलै रोजी रात्री दोन वाजता ७ डी मोतीलाल मार्गावर ही भेट झाली. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटेच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर पोहचले. रात्री १२ वाजता मातोश्रीवर गेल्यावर त्या दोन्ही नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाली. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे दिल्ली जाऊन पोहचले. दिल्लीला जाताना त्यांच्या सोबत कोण कोण होते, दिल्लीत त्यांनी कोणाकोणाच्या भेटी घेतल्या? त्या भेटीत काय काय ठरले, हे जनतेला सांगावे, असे सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment