वेध माझा ऑनलाइन।
सातारा शहरातील माची पेठ भर दुपारी कॉम्प्रेसरच्या भीषण स्फोटाने हादरली. स्फोटामुळे घरांच्या खिडक्यांचा काचा फुटल्या. तसंच स्फोटाच्या आवाजामुळ परिसरात एकच खळबळ उडली. हा स्फोट नेमका कॉम्प्रेसरचा झाला की वाहनात गॅस भरताना झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
साताऱ्यातील माची पेठे परिसर मंगळवारी दुपारी सर्व्हिसिंग सेंटरमधील कॉम्प्रेसरच्या फोटाने हादरला. या स्फोटात एक जागीच ठार, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे आजुबाजूच्या घरांतील खिडक्यांचा काचा फुटल्या.
सातारा शहरातील माची पेठेत अदालत वाड्याजवळ असलेल्या सर्व्हिसिंग सेंटरमध्ये भरदुपारी भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर आसमंतात पांढऱ्या रंगाचे लोट पसरले. स्फोट एवढा जबरदस्त होता की सर्व्हिसिंग सेंटरच्या बाजूच्या दुकानात बसलेल्या तिघांपैकी मुनीर बागवान हा ३० फूट दूरवर उडाला आणि डांबरी रस्त्यावर पडला. त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. कॉम्प्रेसरचा स्फोट शॉर्टसर्किटने झाला की वाहनात गॅस भरताना झाला, हे स्पष्ट झालेलं नाही.
No comments:
Post a Comment