Monday, January 2, 2023

अजिंक्यतारा किल्ल्यावरून अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट ; सातारा भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन ;

वेध माझा ऑनलाइन - नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी “छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्याचे पडसाद आज साताऱ्यात उमटले. सातारा भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज राजधानी सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावरून अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करत आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या वक्त्याचा निषेध नोंदवण्यात आला.सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर आज सकाळी भाजप युवा मोर्च्याचे कार्यकर्ते व जिल्हाध्यक्ष निलेश नलवडे दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा सोबत आणला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी एकत्रित येत किल्ल्यावर अजित पवार यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
यावेळी अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जे विधान केले आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागावी.नाहीतर सातारा येथे आम्ही त्यांना फिरू देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला 



भाजपच्या कार्यक्रम पत्रिकेत पंकजा मुंढे यांचे नावच नाही ; त्यांना डावलण्यात आल्याची चर्चा ;

वेध माझा ऑनलाइन - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहे. पण, या दौऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांचं कार्यक्रम पत्रिकेवरच नावच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना डावलण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा औरंगाबाद दौरा आहे. ते औरंगाबाद लोकसभा आढावा बैठकही घेणार आहेत. जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. जाहीर सभेच्या निमंत्रण पत्रिकेवर पंकजा मुंडे यांचे नाव नसल्याने पुन्हा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. पंकजा मुंढे या राष्ट्रीय सचिव पदावर आहेत. मात्र त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर छापले नाही.औरंगाबाद लोकसभेच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे प्रत्येक वेळी सभा घेतात. आता त्यांचे नाव पत्रिकेवर नसल्याने त्या सभेला उपस्थित राहणार की नाही हा सस्पेन्स निर्माण झाला आहे विशेष म्हणजे, रविवारीच बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे आले होते. यावेळी जाहीर कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे गैरहजर होत्या.



दीड महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणावर धाडी टाकून तब्बल 12 रिव्हॉल्व्हर जप्त ; सातारा पोलिसांची कारवाई ;

वेध माझा ऑनलाइन - सातारा पोलिसांनी अवघ्या दीड महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणावर धाडी टाकून तब्बल 12 रिव्हॉल्व्हर जप्त केल्या आहेत. याविषयो माहिती देताना सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गेल्या 1 ते 2 महिन्यापासून पोलिसांनी रिव्हॉल्व्हर शोध मोहिम सुरु केली असून या काळात 12 रिव्हॉल्व्हर जप्त केल्या आहेत. यामध्ये पोलीस खात्यातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काही लोकांकडून बेकायदेशीर शस्त्रांचा वापर केला जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी एकत्रित यावर चर्चा केली. तसेच वेगळी पथके तयार केली. आणि त्यांना त्याप्रमाणे योग्य त्या सूचना दिल्या. त्यानुसार रिव्हॉल्व्हर जप्त करण्याच्या कारवाया सुरु करण्यात आल्या आहेत.
आम्हाला रविवारी एका घटनेत चार रिव्हॉल्व्हर सापडल्या. आम्ही हि कारवाई सुमोटो पद्धतीने करत आहोत. कोणतीही घटना होण्यापूर्वी आम्ही बेकायदेशीरपणे रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या लोकांवर कारवाई करत त्याच्याकडून ती जप्त करत आहोत. आणि संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करीन सातारा शहरात शँत्तामय वातावरण राहावे म्हणून प्रयत्न करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.

भारतीय जनता पार्टीच्यावतीने ढेबेवाडी फाटा व दत्त चौक येथे अजित पवारांचा निषेध ; अजित पवार मुर्दाबाद च्या दिल्या घोषणा ;

वेध माझा ऑनलाईन - विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अजित पवार यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीने ढेबेवाडी फाटा व दत्त चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांनी ‘अजित पवार मुर्दाबाद', 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय' अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले म्हणाले, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे हे अख्ख्या देशाचे आराध्य दैवत आहेत. धर्मवीर संभाजीराजेंनी देश व धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या अतुल्य कार्यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळते. अशावेळी विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही भाजपाच्यावतीने तीव्र शब्दांत निषेध करत आहोत. 
दत्त चौक येथे निषेध नोंदवताना भाजप शहर अध्यक्ष एकनाथ बागडी म्हणाले अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल जे वक्तव्य केले आहे त्याचा आम्ही निषेध करतो पुन्हा अस वक्तव्य केल्यास आणखी तीव्र आंदोलन करणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला मलकापूर तसेच कराडमध्ये झालेल्या या दोन्ही निषेध मोर्चाना विविध पदाधिकारी महिला तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Sunday, January 1, 2023

राष्ट्रीय काँग्रेसच्या कराड शहर अध्यक्षपदी ऋतुराज बापूसाहेब मोरे यांची निवड ; तालुकाध्यक्षपदी निवास थोरात...

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रीय काँग्रेसच्या सातारा जिल्ह्याच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत  कराड उत्तरच्या अध्यक्षपदी निवास आत्माराम थोरात तर कराड शहर अध्यक्षपदी ऋतुराज बापूसाहेब मोरे यांची निवड करण्यात आली आहे ऋतुराज मोरे यांनी संघटनात्मक पातळीवर केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची निवड झाली आहे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांनी कराड उत्तरमध्ये काॅंग्रेस पक्षाचे मोठे संघटन केले आहे.कराड उत्तरमध्ये त्यांचा मोठा संपर्क आहे त्यांच्याही कार्याची दखल घेतली गेली आहे

दरम्यान, यापूर्वीचे शहराध्यक्ष व नगरसवेक अप्पा माने यांचा कार्यकाळ संपल्याने मोरे यांची निवड झाली आहे नगरसेवक अप्पा माने यांनीही शहराध्यक्षपदी तसेच पालिकेतही उत्तम काम केले आहे. त्यांचा शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी ऋतुराज मोरे यांचे नाव जाहीर करण्यात आले. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांचे ते लहान बंधू आहेत



प्रेमासाठी कायपण ! थेट बापाचाच मर्डर ; पंढरपूर येथील घटनेने खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन - राज्यात दिवसेंदिवस प्रेमप्रकरणातून गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमासाठी मुलाने आपल्या बापालाच संपवले आहे. या घटनेनंतर पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे चक्क मुलाने आपल्या जन्मदात्या पिताला पेटवून मारून टाकले असल्याची घटना घडली आहे. हे हत्या प्रकरण एका प्रेम प्रकरणातून घडले. यामध्ये मृत अफजल बागवान यांचा मुलगा सोहेल यासह तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तीन अल्पवयीन मुलांच्या आईचे अफजल बागवान यांच्याशी प्रेम संबंध होते. तर तीन अल्पवयीन मधील एका मुलीचे अफजल बागवान यांचा मुलगा सोहेल याच्याशी प्रेम संबंध होते. मात्र, अफजलला सोहेलचे आणि संबंधित अल्पवयीन मुलीचे प्रेम संबंध अमान्य होते. यातूनच प्रेयसीने आपला प्रियकर असणाऱ्या सोहेलच्या मदतीने त्याच्याच पित्याचा अर्थात अफजलचा काटा काढण्याचे ठरवले.
त्यांनी आखलेल्या कटानुसार, पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे अफजल बागवान यास घेऊन जात आधी त्याच्या डोळ्यात लाल तिखट टाकण्यात आले. यानंतर डोक्यावर दगड घालून पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्यात आले. यामध्ये अफजल बागवान याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पंढरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली. प्रेमासाठी चक्क मुलाने आपल्या बापानेच संपवले आहे. याबाबत पंढरपूर तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पत्रकारांपासून सावध रहा ; शरद पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला ;

वेध माझा ऑनलाइन - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शरद पवार यांनी द्राक्ष बागयदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची त्यांच्या शेतात जाऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी माझ्यासमोर बसलेले पत्रकार आहेत. त्याच्यापासून सावध रहा तुमचं उत्पन्न सार्वजनिकरित्या सांगू नका, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला. 

इंदापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याला शरद पवार यांनी भेट दिली.या शेतकऱ्याने एका एकरात शंभर टनाहून अधिक उप्तन्न घेतले आहे. मागील एनेक वर्षापासून हा शेतकरी शंभर टनाहून अधिक उत्पन्न घेत आहे. ऊसाच्या शेताला भेट दिल्यानंतर शरद पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शरद पवार म्हणाले, साखर उत्पादनात भारत एक नंबरचा देश आहे. ब्राझीलमधील लहान शेतकरी 50 हजार टन ऊसाचे उत्पादन घेतो. तेथील 6-7 शेतकरी कारखाना चालवतात. आपल्याकडे काही हजारात सभासद असतात. यापूर्वी एकरी 100 टन पेक्षा जास्त ऊस आणि 50 कांडी ऊस मी बघितला आहे. हे करण्याचा उद्योग या शेतकऱ्यांनी केला आहे. शरद पवार पुढे म्हणाले, माझ्यासमोर बसलेले पत्रकार आहेत. त्याच्यापासून सावध रहा. किती उत्पन्न मिळालं हे सार्वजनिकरित्या सांगू नका.नाहीतर हे लोक दाखवतील शेतकऱ्यांना ऐवढे पैसे मिळतात,मग दिल्लीतले लोक शेतकऱ्यांवर कर लावतील, असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना सावध केल.तसेच केंद्र सरकारवर निशाणा साधला.