वेध माझा ऑनलाइन - नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी “छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्याचे पडसाद आज साताऱ्यात उमटले. सातारा भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज राजधानी सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावरून अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करत आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या वक्त्याचा निषेध नोंदवण्यात आला.सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर आज सकाळी भाजप युवा मोर्च्याचे कार्यकर्ते व जिल्हाध्यक्ष निलेश नलवडे दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा सोबत आणला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी एकत्रित येत किल्ल्यावर अजित पवार यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
यावेळी अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जे विधान केले आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागावी.नाहीतर सातारा येथे आम्ही त्यांना फिरू देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला
No comments:
Post a Comment