Friday, May 19, 2023

यंदाचा वर्षापासून राज्यातील सर्व सरकारी शाळांसाठी एक रंग एक गणवेश धोरण आखण्याचा शासनाचा विचार ; मात्र अद्यापही निर्णय नाही ; जून महिन्यात होणार शाळा सुरू ; शाळा व्यवस्थापन संभ्रमात ;

वेध माझा ऑनलाइन ।  नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होत आहे. यंदा शासनाकडून राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये शाळांसाठी एक रंग एक गणवेश  धोरण आखण्याचा विचार सुरू आहे. शाळा सुरू होण्यास एक महिना शिल्लक असताना शासनाकडून गणवेशाचा रंग कोणता असेल? याबद्दल निर्णय झालेला नाही. कोणत्या रंगाच्या गणवेशाची ऑर्डर द्यायची असा प्रश्न शाळांना पडला आहे.

राज्यात 'एक रंग एक गणवेश' धोरण यावर्षी राबवले जाणार की पुढल्या वर्षी ? यासंदर्भात शिक्षण विभागाने स्पष्टता आणावी अशी मागणी शाळा व्यवस्थापनाने केली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होत आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यास अवघा एक महिना बाकी असताना अद्याप शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व सरकारी शाळांबाबत 'एक रंग एक गणवेश' धोरणाबाबत अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळा व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांसोबत 11 मे रोजी बैठक घेतल्यानंतर सुद्धा हे धोरण नेमकं कधी राबवले जाणार? याबाबत स्पष्टता दिलेली नाही. 

 गणवेशाचा रंगच माहित नसल्याने कोणत्या गणवेशाची ऑर्डर द्यायची? असा प्रश्न शाळा प्रशासनाला पडला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात जिल्हास्तरावर गणवेशासाठी निधी मिळतो आणि विद्यार्थी संख्येनुसार तो शाळांना दिला जातो.  त्यानंतर शाळा व्यवस्थापन कापड खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कपड्यांचे माप घेऊन गणवेश शिवून घेण्याची ऑर्डर देते. मात्र नव्या शैक्षणिक वर्षात सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये एकच गणवेश करण्याचा विचार शिक्षण विभागाचा आहे. अद्याप अधिकृत निर्णय न झाल्याने शाळा व्यवस्थापन समोर गणवेश कापड खरेदीची ऑर्डर कधी द्यायची? गणवेश कधी शिवून घ्यायचे ? असा प्रश्न उभा राहिला आहे 
 गणवेश बदल करायचा असल्यास आणि सर्व राज्यातील सरकारी शाळांमध्ये एकच गणवेश करायचा असल्यास त्या संदर्भात अधिकृत निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी शाळा व्यवस्थापनांकडून केली जात आहे. जर यावर्षी हा निर्णय लागू होणार नसेल त्या प्रकारे अधिकृतरित्या परिपत्रकानुसार माहिती द्यावी जेणेकरून शाळांमध्ये गणवेशासंदर्भात संभ्रम राहणार नाही असं शाळा व्यवस्थापनाचे म्हणणं आहे.

महाविकास आघाडीचा फोर्म्युला 16;16; 16; असा ठरला ? मात्र संजय राऊत वेगळंच बोलतायत!

वेध माझा ऑनलाइन । महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्ष आपापल्या ताकदीची चाचपणी सुरु केली आहे. असे असताना मविआचा लोकसभेसाठी १६-१६-१६ जागा वाटून घेण्याचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर ठाकरे गट शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

बाहेर सुरु असलेली बातमी चुकीची आहे. मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मविआमध्ये सध्या जागा वाटपाची चर्चा प्राथमिक स्तरावर आहे. पवारांच्या घरी जी बैठक झाली ती एकत्र लढविण्याच्या चर्चेसाठी होती. कोणी काही म्हणूदेत आघाडी एकत्रच लढणार आहे.  आमचे १९ खासदार लोकसभेत राहतील, असे राऊत यांनी सांगितले. 
गेल्यावेळी लोकसभेला राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने जरी एक जागा जिंकली असेल तरी ती त्यांच्याकडेच राहिल. यामुळे जिंकल्यानंतर कोण कुठे गेला यावर जागावाटप ठरणार नाही. दादरा नगर हवेलीचा एक खासदार आमचा आहे, महाराष्ट्रात १८ जागा जिंकल्या होत्या. मी एवढेच सांगेन की लोकसभेत आमचे १९ खासदार असतील, असे राऊत म्हणाले. 


Thursday, May 18, 2023

आर्यन खानसाठी २७ लाखांची फुकट तिकिटं, रेव्ह पार्टीचं प्रमोशन…आणखी बरच काही...!समीर वानखेडेंच्या व्हाट्स अप चॅटमधून धक्कादायक खुलासे!


वेध माझा ऑनलाइन  । गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने चर्चेत असणारं आर्यन खान प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. मुंबई क्रूज प्रकरणाची चौकशी करणारे तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत. समीर नावखेडे यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याल आला आहे. आता समीर वानखेडेंनी या प्रकरणासंदर्भात तेव्हा त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्याची केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. ‘फ्री प्रेस जर्नल’नं यासंदर्भातलं वृत्त दिलं असून या चॅटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत.

या वृत्तामध्ये देण्यात आलेले व्हॉट्सअॅप चॅट्स हे समीर वानखेडे आणि तत्कालीन एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्याबरोबर झाल्याचं दिसत आहे. यामध्ये कॉर्डेलिया क्रूजवर समीर वानखेडेंच्या टीमनं छापा टाकल्यानंतरच्या घडामोडींदरम्यानचं या दोघांमधलं संभाषण दिसत आहे. यानुसार, आर्यन खानला या क्रूज पार्टीसाठी तब्बल २७ लाखांची व्हीव्हीआयपी तिकीटं देण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. या क्रूज पार्टीचं प्रमोशन करण्यासाठी आर्यन खान आणि त्याच्या आठ मित्रांसाठी ही तिकिटं देण्यात आल्याचा दावा या चॅटच्या हवाल्याने वृत्तात करण्यात आला आहे.

वानखेडेने केलेले चाट.....
“या सगळ्यामध्ये बॉलिवूड महत्त्वाची भूमिका बजावतं. कारण ड्रग्जचं व्यसन पसरवण्यासाठी आणि अधिकाधिक ग्राहक जमवण्यासाठी, ड्रग्जची विक्री करण्यासाठी बॉलिवूडमधील लोकांचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून किंवा मध्यस्थ म्हणून वापर केला जातो. त्यामुळेच आर्यन खानला मोफत तिकिटं, मुली आणि ड्रग्ज मिळालं. कुणीही तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या नावाचा रेव्ह पार्टीची तिकिटं विकण्यासाठी वापर करू शकत नाही”, असं या चॅटमध्ये समीर वानखेडे ज्ञानेश्वर सिंह यांना सांगत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, बॉलिवुडमधील सेलिब्रिटी मंडळींचा कशा प्रकारे वापर केला जातो, यासंदर्भात या चॅटमध्ये दावे करण्यात आले आहेत. “अनेक बॉलिवुड स्टार्स या व्यवहाराचा हिस्सा आहेत. ते शहराच्या बाहेर किंवा रिसॉर्ट्समध्ये रेव्ह पार्टीचं आयोजन करतात. तिथे फुकट ड्रग्ज पुरवतात. त्यात बॉलिवुड स्टार्सला आमंत्रित करतात. म्हणजे या पार्टीचं आणखीन प्रमोशन होतं. त्यानंतर एकदा का ड्रग्जचं व्यसन लागलं, की यांचे ग्राहक उत्तरोत्तर वाढतच जातात. सेक्स हा घटक असं व्यसन लावण्यात महत्त्वाचा ठरतो. त्याामुळे ते या पार्ट्यांमध्ये एमडीएमए आणि काही मुलींनाही बोलवतात”, असंही या चॅटमधून समोर आल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.



बीडमध्ये ठाकरे गटामधील सुषमा अंधारे व जिल्हाप्रमुख यांच्यात वाद ; जिल्हाप्रमुखांचे अंधारेवर गंभिर आरोप ...वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन । शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेमध्ये खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची जाहीर सभा बीडमध्ये होणार आहे. या सभेआधीच ठाकरे गटातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. गुरुवारी  शहरातील महाप्रबोधन सभेच्या स्थळाची पाहणी करण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे बीडमध्ये आल्या होत्या. यावेळी सुषमा अंधारे आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यामध्ये वाद झाला. आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले, आप्पासाहेब जाधव यांनी केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
सुषमा अंधारे या पैसे घेऊन पद विकत असल्याचा गंभीर आरोप अप्पासाहेब जाधव यांनी केला होता. तसेच सुषमा अंधारे यांना दोन चापटा लगावल्याचा दावाही जाधव यांनी केला होता. मात्र दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मारहाणीच्या बातमीत तथ्य नसल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे. तसेच जाधव हे शिंदे गटाला जावून मिळाले असून, ते शिंदे गटाच्या स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला होता.
दरम्यान आता या वादाची गंभीर दखल ठाकरे गटाकडून घेण्यात आली आहे. महाप्रबोधन यात्रेच्या पूर्वसंध्येलाच शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुख या दोघांची हाकालपट्टी करण्यात आली आहे. तशी घोषणा 'सामना'मधून करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासोबत बीड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं सामनामध्ये म्हटलं आहे. दरम्यान या वादामुळे आता ठाकरे गटाची महाप्रबोधन सभा चांगलीच चर्चेत आली आहे.
 

उन्हाचा तडाखा वाढला ; आणखी वाढण्याचा हवामान खात्याचा इशारा ; तापमान गेले 45 अंशावर ; अनेक ठिकाणी आणखी वाढणार ; काळजी घ्या...बातमी;

वेध माझा ऑनलाइन । राज्यासह देशामध्ये वाढत असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच पुढील दोन दिवस  तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  देशातील अनेक राज्यात तापमान 45 अंशावर गेले  आहे. आज देशातील अनेक राज्यात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.  

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिल्लीत कमाल तापमान 42 अंश सेल्सिअल आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअर राहण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये देखील तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. तसेच जोधपूर, बिकानेरमध्ये तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा, पंजाब, छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये तापमान 42 अंशापार जाण्याची शक्यता आहे. तसेच  अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आण त्रिपुरामधील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अंदमान आणि निकोबार, पश्चिम बंगाल, केरळमध्ये हलका पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मिर आणि लडाखमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तराखंडच्या उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमेली, बागशेर आणि पिठोरगडसारख्या डोंगराळ भागात पावसचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान 40 अंश सेल्सियसपेक्षा जास्त
विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान 40 अंश सेल्सियसपेक्षा जास्त आहे. मराठवाडा, विदर्भाच्या तुलनेत कमाल तापमान कमी असले तरी आर्द्रतेमुळे कोकण किनारपट्टीवर अधिक उकाडा जाणवतोय. राज्यातील  अनेक जिल्ह्यांमध्ये गुरूवारी 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले. अकोल्यात 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.


खिशातच मोबाईलचा झाला ब्लास्ट ,अन घडलं भयानक... ; कुठे घडली घटना?

वेध माझा ऑनलाइन । आजकाल मोबाईल ही जणू प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अनिवार्य गोष्ट बनून गेली आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईल वापरताना अगदी दंग होऊन गेल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. खरं तर या फोनने माणसाची अनेक कामं सोपी आणि सोयीस्कर केली. मात्र, फायद्यासोबतच याचे काही तोटेही आहेत, हे नक्की. याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे.

ही घटना नुकतीच घडली आहे त्यामुळे तुम्हीही खिशात मोबाईल ठेवण्याआधी दहावेळा विचार कराल या घटनेचा व्हिडीओ देखील व्हयरल झाला आहे त्यामध्ये एक व्यक्ती चहाच्या दुकानात बसलेला आहे. तो अगदी निवांत बसलेला असतानाच अचानक त्याच्या खिशात असलेल्या मोबाईलचा ब्लास्ट होतो. यानंतर मोबाईल आग पकडतो आणि या व्यक्तीच्या कपड्यांनाही आग लागते.
सुदैवाने हा व्यक्ती अजिबातही वेळ न घालवता लगेचच उठतो आणि आपल्या खिशातील मोबाईल काढू लागतो. मात्र आग लगेचच पसरल्याने त्याला हे शक्य होत नाही. इतक्यात तिथे उपस्थित असलेला दुसरा व्यक्ती लगेचच धावत मदतीसाठी येतो. शेवटी आग लागलेला हा फोन खिशातून बाहेर काढण्यात यश येतं. सुदैवाने या भयानक घटनेत वृद्धाला गंभीर दुखापत झालेली दिसत नाही. मात्र ही घटना अतिशय भयानक होती.ही घटना केरळच्या त्रिसूर जिल्ह्यातील मारोट्टीचलमध्ये घडली.मात्र, सुदैवाने आग तातडीने आटोक्यात आणण्यात यश आले.  


दंगल घडवणारा हिंदू असो वा मुस्लीम त्यांचे हात छाटले पाहिजेत ; राज्यातील वाढत्या दंगलीवरुन आमदार बच्चू कडू यांचे विधान ;

वेध माझा ऑनलाइन ।  गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात दंगली घडल्या आहेत. औरंगाबाद, अकोला, बुलढाणा, नगर या ठिकाणी दंगील घडल्या आहेत. दोन गटात झालेल्या दंगलीमध्ये काही जणांचा जीव गेला आहे तर काहीं जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच नागरिकांच्या मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अलीकडेच अकोला येथे झालेल्या दंगलीत एका युवकाचा मृत्यू झाला तर दोन पोलिसांसह आठजण जखमी झाले. राज्यातील वाढत्या दंगलीवरुन आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. दंगल घडवणारा हिंदू असो वा मुस्लीम त्यांचे हात छाटले पाहिजेत असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

अकोला येथे झालेल्या दंगलीवरुन राज्यातील राजकीय वातावरण  चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी हे विधान केले आहे.ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.महाराष्ट्रात घडत असलेल्या दंगलीबाबत बच्चू कडू यांना विचारले असता ते म्हणाले, दंगल करणारा कुणीही असो…मग तो हिंदू असो वा मुस्लिम असो किंवा इतर कुठल्याही जातीचा असो… जे-जे दंगल पेटवण्यासाठी पुढे आले असतील, त्यांचे हात छाटले पाहिजेत. दंगलीच्या माध्यमातून शहरात अशांतता निर्माण करुन विकासात बाधा आणण्याचे काम करण्यात येत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

बच्चू कडू पुढे म्हणाले, महाराष्ट्रात बेरोजगारी प्रचंड आहे. दररोज कुणी ना कुणी आत्महत्या  करत आहे.औषधं मिळत नाहीत, म्हणून लोक मरत आहेत. असं असताना एकमेकांच्या विरोधात कुणी तलवारी काढत असेल आणि शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात असले तर हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे.त्यांच्याविरोधात कारवाई होणं फार महत्त्वाचं आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असला तरी कारवाई झालीच पाहिजे,
अशी मागणी बच्चू कडू यांनी यावेळी केली