Friday, May 19, 2023

महाविकास आघाडीचा फोर्म्युला 16;16; 16; असा ठरला ? मात्र संजय राऊत वेगळंच बोलतायत!

वेध माझा ऑनलाइन । महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्ष आपापल्या ताकदीची चाचपणी सुरु केली आहे. असे असताना मविआचा लोकसभेसाठी १६-१६-१६ जागा वाटून घेण्याचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर ठाकरे गट शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

बाहेर सुरु असलेली बातमी चुकीची आहे. मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मविआमध्ये सध्या जागा वाटपाची चर्चा प्राथमिक स्तरावर आहे. पवारांच्या घरी जी बैठक झाली ती एकत्र लढविण्याच्या चर्चेसाठी होती. कोणी काही म्हणूदेत आघाडी एकत्रच लढणार आहे.  आमचे १९ खासदार लोकसभेत राहतील, असे राऊत यांनी सांगितले. 
गेल्यावेळी लोकसभेला राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने जरी एक जागा जिंकली असेल तरी ती त्यांच्याकडेच राहिल. यामुळे जिंकल्यानंतर कोण कुठे गेला यावर जागावाटप ठरणार नाही. दादरा नगर हवेलीचा एक खासदार आमचा आहे, महाराष्ट्रात १८ जागा जिंकल्या होत्या. मी एवढेच सांगेन की लोकसभेत आमचे १९ खासदार असतील, असे राऊत म्हणाले. 


No comments:

Post a Comment