Tuesday, November 10, 2020

आज जिल्ह्यात 32 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 10 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 32 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 291 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 *291 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 21, कराड येथील 14, फलटण येथील 10, कोरेगांव येथील 23, वाई येथील 27, खंडाळा येथील 19, रायगांव येथील 37, पानमळेवाडी येथील 24, मायणी येथील 8, दहिवडी येथील 8, म्हसवड येथील 18, पिंपोड येथील 6, तरडगांव येथील 12  व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 64 असे एकूण 291 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*घेतलेले एकूण नमुने -210859*
*एकूण बाधित -48155*  
*घरी सोडण्यात आलेले -43874*  
*मृत्यू -1621* 
*उपचारार्थ रुग्ण-2660* 
00000

जिल्ह्यांतील 177 जण बाधित

सातारा दि.10 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 177 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
      *सातारा तालुक्यातील*  सातारा 6, मंगळवार पेठ 2, शुक्रवार पेठ 5, शाहुपुरी 1, सदरबझार 3, बोरगाव 1, लिंब गोवे 1, खिंडवाडी 2, खोकडवाडी 1, आनंदनगर सोसायटी सातारा 1, धनगरवाडी 1, शिंदेनगर सातारा 1, कोंढवे 1, व्यंकटपुरा पेठ सातारा 1, गणेशनगर 1, बुधवार पेठ सातारा 4, अहमदाबाद 1, शनिवार पेठ सातारा 1,खार्शी 1,   
         *कराड तालुक्यातील* वाकेश्वर रोड 1, विद्यानगर 2, तळबीड 1, वहागाव 1, चचेगाव 1, मलकापूर 3, 
         *पाटण तालुक्यातील* अवर्दे 1, हेळगाव 1, नानेगाव 1, तारळे 3,  
        *फलटण तालुक्यातील* फलटण 2, कांबळेश्वर 1, कोळकी 1, तरडगाव 2,साखरवाडी 2, आसू 1, पवारवाडी 1,  कसबा पेठ 2, हिंगणगाव 2, लक्ष्मीनगर 1, निंबळक 1, 
        *महाबळेश्वर तालुक्यातील*  पाचगणी 3, 
         *खटाव तालुक्यातील* औंध 2, पुसेगाव 5, सिद्धेश्वर कुरोली 2, खातगुण 4, राजापुर 1, निढळ 1, बुध 1, पडळ 1, वडूज 5, येरळवाडी 1,  उंबरडे 9, नाईकाचीवाडी 4, पुसेसावळी 1,
          *माण  तालुक्यातील* म्हसवड 2, राणंद 1, दिवड 1, पुळकोटी 3, झगाजवाडी 1, शिंदी बु 1, गोंदवले खु 1, आंधळी 1, दहिवडी 1, बोराटवाडी 1, बिदाल 12, 
          *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1, बोरगाव 1, रहिमतपूर 3, चिलेवाडी 7, वेळू 1, सुरली 1,दुधी 1, भातमवाडी 1, आर्वी 2,   
*जावली तालुक्यातील* जावली 1, बामणोली 1, मेढा 1, आनेवाडी 1, मालचौंडी 1, कुसुंबी 3, रायगाव 1, कुडाळ 2,
*वाई तालुक्यातील* भुईंज 1, उडतारे 1,  आसले 1, केंजळ 1, 
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 2, लोणंद 1, 
*इतर*2, बादेवाडी 1,  
*बाहेरी जिल्ह्यातील झरे जि. सांगली 1, डांजेघर 1, खानापूर 1
 * 3 बाधितांचा मृत्यु*
  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये म्हसवड ता. माण येथील 60 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉसिपटलमध्ये धोंडेवाडी ता. खटाव येथील 80 वर्षीय पुरुष तसेच उशीरा कळविलेले सातारा येथील 71 वर्षीय महिला  अशा एकूण  3 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
*घेतलेले एकूण नमुने -210859*
*एकूण बाधित -48155*  
*घरी सोडण्यात आलेले -43842*  
*मृत्यू -1621* 
*उपचारार्थ रुग्ण-2692* 
00000

Monday, November 9, 2020

आज जिल्ह्यातील 144 जणांना दिला डिस्चार्ज

*144 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 276 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

सातारा दि. 9 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 144 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 276 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 *276 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 9, कराड येथील 12, फलटण येथील 13, कोरेगांव येथील 32, वाई येथील 24, खंडाळा येथील 29, रायगांव येथील 17, पानमळेवाडी येथील 43, महाबळेश्वर येथील 10, दहिवडी येथील 10, मळमावले येथील 16 म्हसवड येथील 11  व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 50 असे एकूण 276 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*घेतलेले एकूण नमुने -206000*
*एकूण बाधित -47978*  
*घरी सोडण्यात आलेले -43842*  
*मृत्यू -1618* 
*उपचारार्थ रुग्ण-2518* 
00000

Sunday, November 8, 2020

जिल्ह्यात 191 जण बाधित

 सातारा दि.9(जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 191 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 

      *सातारा तालुक्यातील* सातारा 3, सदरबझार 2, शाहुनगर 1, चिमणपुरा पेठ 1, कृष्णानगर 1, लिंबाचीवाडी 1, देगाव 1, गोजेगाव 2, महागाव 1, रोहोट 2, आयटीआय रोड सातारा 4, मंडवे 1, पिंपळवाडी 2, विलासपूर 3, वर्णे 3, सरताले 1,वारणा 1, पिरवाडी 1, मदनपुरवाडी 1, जिहे 1, कोंढवे 1, कर्मवीरनगर सातारा 1, कोडोली 2, 
         *कराड तालुक्यातील* तळबीड 1, वडगाव हवेली 2, ओंढ 1, उंब्रज 1, सैदापूर 1, हनुमंतवाडी 1, घोरगेवाडी 1, 
         *पाटण तालुक्यातील* तारळे 3, निसरे 1, गोरेवाडी 1,  
        *फलटण तालुक्यातील* फलटण 1, हिंगणगाव 10, साखरवाडी 3, कोळकी 2, तिरकवाडी 1, सांगवी 1, विढणी 1, मुळीकवाडी 1, 
        *महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 1, राजपुरी 2, पाचगणी 4, 
         *खटाव तालुक्यातील* साठेवाडी 1, निमसोड 2, पुसेसावळी 2, गोरेगाव 1, खटाव 5, वडूज 8, दरुज 1, वाकेश्वर 3, पुसेगाव 13, सिद्धेश्वर कुरोली 1, अंबवडे 1, 
          *माण  तालुक्यातील* म्हसवड 5, पिंपरी 1,मलवडी 7, पुळकोटी 1, बिदाल 2, टेकेवाडी 1, सोकासन 1, शिंगणापुर 1, खंडेवाडी 1, लोधवडे 5, 
          *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 2,  रहिमतपूर 3, चिमणगाव 2, वाठार स्टेशन 2, अंबवडे बु 2, भक्तमवडी 1, चिलेवाडी 1, बिचुकले 1, वाठार किरोली 4, बोरगाव 3, न्हावी 1, 
*जावली तालुक्यातील*कुडाळ 2, 
*वाई तालुक्यातील* वाई 2, कानुर 1, यशवंतनगर 1, उडतारे 2, 
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 2, विंग 1, शिरवळ 2, खंडाळा 1, 
*इतर* अंबेगड बु 1, गावठाण 1, अर्गळवाडी 4, शिंदे घर 4, 
*बाहेरी जिल्ह्यातील नातेपुते जि. सालापूर 2, 
 *8 बाधितांचा मृत्यु*
  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये विटा ता. खनापुर जि. सांगली येथील 39 वर्षीय पुरुष. जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये नेर ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, पाटण येथील 85 वर्षीय पुरुष. तसेच रात्री उशीरा कळविलेले बोरखळ ता. सातारा येथील 71 वर्षीय पुरुष, कुरोली ता. खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, पाटखळ माथा ता. सातारा येथील 67 वर्षीय पुरुष, विसापूर ता. खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, कळंबे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष  अशा एकूण 8 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
*घेतलेले एकूण नमुने -206000*
*एकूण बाधित -47978*  
*घरी सोडण्यात आलेले -43698*  
*मृत्यू -1618* 
*उपचारार्थ रुग्ण-2662* 
00000

नगरसेवक सौरभ अशोकराव पाटील ; शहराचे उभरते नेतृत्व ; युवकांचे आशास्थान...

कराड
 स्वर्गीय,आदरणीय पी डी पाटील साहेब यांचे नातू, पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील व लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाषकाका पाटील यांचे पुतणे लोकशाही आघाडीचे गटनेते नगरसेवक सौरभ अशोकराव पाटील यांचा वाढदिवस काल रविवार दि 8 रोजी मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. कराड शहराचे उभरते नेतृत्व व युवकांचे आशास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे...त्यांच्याविषयी थोडक्यात...  

नगरसेवक सौरभ पाटील हे त्यांच्या वक्तृत्व व अभ्यासू स्वभावामुळे पहिल्यांदाच निवडून येऊन देखील शहरातील लोकप्रिय नगरसेवक म्हणून  सर्वपरिचित झाले आहेत.वेगवेगळ्या विषयांवर बोलण्याची व विषयाला पारखून त्याचे विश्लेषण करण्याची त्यांची खासियत आहे.कार्यकर्त्यांना बळ देण्याचा त्यांच्या हातखंडा आहे. निष्ठवंत कार्यकर्त्यांची त्यांच्याकडे मोठी फौज आहे. एकूणच शहराला त्यांच्या रूपाने एक परिपक्व व वैचारिक युवा नेतृत्व मिळाले आहे त्यामुळे, ते सर्वांचे आशास्थान आहेत हेही यानिमित्ताने सिद्ध झाले आहे. 
सौरभ पाटील यांचा वाढदिवस काल साजरा झाला. त्यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येकजण त्यांचे अभिनंदन करताना दिसत होता.विशेष म्हणजे त्यांच्या विरोधकांनीदेखील त्यांचे भरभरून स्वागत करत अभिनंदन केलेले काल शहराने पाहिले. सौरभ पाटील यांच्या संस्कारित स्वभावगुणांमुळे त्यांची शहरात सभ्य राजकारणी म्हणून प्रतिमा आहे. शहरात असणाऱ्या अनेक सोशल मीडियावर काल फक्त त्यांचाच वाढदिवस साजरा होत होता हे वैशिठ्य म्हणावे लागेल. 
ते पालिकेत रोज सकाळी नियमितपणे आपल्या दालनात हजर राहून येणाऱ्या प्रत्येकाचे कोणतेही काम असेल तर ते करण्याचा प्रयत्न करत असतात.केवळ आपल्या वार्डातीलच नव्हे,तर संपूर्ण शहरातील कामे करण्यात ते आपला इंटरेस्ट दाखवतात. शहरातील विविध प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ते नेहमीच अग्रेसर दिसतात. त्यांच्यात असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वृत्तीचे सर्वदूर कौतुक होत असते.कोणताही बडेजाव नाही. पुढारपणाचा आव नाही.सर्वसामान्य जनतेबरोबर राहून त्यांच्याशी आपुलकीचे नाते जपत ते आपल्या पहिल्याच राजकीय इनिंग मध्येच प्रत्येकाला "आपला माणूस' वाटणारे नेतृत्व म्हणून शहरातुन आता पुढे येऊ लागले आहेत. 
लॉक डाऊन पिरियड मध्ये त्यांनी अनेक गरजुना कोणताही गाजावाजा न करता भरभरून मदत केली आहे.लाघवी बोलणे,मृदु स्वभाव वैचारिकतेकडे झुकते माप, आणि समोरच्याला माणूस म्हणून समजून घेण्याची वृत्ती यामुळे त्यांच्याकडे एक परिपक्व नेता म्हणून शहरातील युवक मोठ्या आशेने पाहत आहेत. त्याचाच परिपाक म्हणून काल त्यांच्या वाढदिनी त्यांच्या सहकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केलेच...पण विरोधक व  वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनीदेखील त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. ही कौतुकास्पद बाब काल सर्वानाच पहायलाही मिळाली, त्यामुळे खऱ्या अर्थाने  राजकारणापलीकडे जाऊन आपलासा वाटणारा नेता तात्यांच्या रूपाने शहराला मिळाला आहे, शहरातील युवकांचे ते आशास्थान बनले आहेत...
आपुलकीचे नाते जपणाऱ्या तात्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... 

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आ पृथ्वीराजबाबा यांची घेतली सदिच्छा भेट

कराड: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आज सातारा जिल्हा दौऱ्यादरम्यान माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या कराड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांच्या सोबत सातारा लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील व श्याम पांडे उपस्थित होते. 
यावेळी पृथ्वीराज बाबांनी नानाभाऊंचे,  खा श्रीनिवास पाटील व नानाभाऊंचे मित्र श्याम पांडे यांचे स्वागत केले. यावेळी कराड दक्षिण काँग्रेस चे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजित गुजर, माजी शहर अध्यक्ष प्रदीप जाधव, युवानेते इंद्रजित चव्हाण, राहुल चव्हाण उपस्थित होते.

आज जिल्ह्यात 60 जणांना दिला डिस्चार्ज

*60 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 14 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

सातारा दि. 8 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 60 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 14 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 *14 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 9, महाबळेश्वर येथील 2, पिंपोडा येथील 3 असे एकूण 14 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*घेतलेले एकूण नमुने – 205774*
*एकूण बाधित -- 47787*
*घरी सोडण्यात आलेले -43698*
*मृत्यू -- 1610*
*उपचारार्थ रुग्ण -- 2479*