Tuesday, December 21, 2021

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांचा वाढदिवस "वाय एस जगन अण्णा फॅन्स क्लब' यांच्या वतीने कराडात केक कापून साजरा...

वेध माझा ऑनलाईन
कराड
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी  यांचा वाढदिवस कराड आणि परीसरातील  "वाय एस जगन अण्णा फॅन्स क्लब' यांच्या वतीने केक कापून नुकताच साजरा करण्यात आला. आंध्रप्रदेश चे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे ते चिरंजीव होत

जगन मोहन त्यांचे वडील राजशेखर रेड्डी यांचे दुर्घटनेने अचानक निधन असो... किंवा त्यांना अधिक संपत्ती बालगळ्याच्या प्रकरणात जेल मध्ये जायला लागलेले प्रकरण असो..ते जगनमोहन यांनी वाय एस आर काँग्रेस राजकीय पार्टी तयार करण्यापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास असो ...त्यांना खूपच अडचणीना सामोरे जावे लागले... मात्र एक दिवस "सफलता' झक मारत त्यांच्या पायाशी लोळण घेत आलीच... 

आंध्रप्रदेश चे आज ते लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत सम्पूर्ण जगभर त्यांचे फॅन्स आहेत त्यांचा वाढदिवस काल कराडातदेखील त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या उत्साहात शाहू चौक येथे साजरा केला...  जगन मोहन रेड्डी यांचा राजकीय प्रवास खूपच खडतर आहे त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी हयात असताना त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला  2004 ला केलेला प्रयत्न यशस्वी झाला नाही त्यानंतर 2009 ला त्यांना राजकारणात सुरुवात करण्यात यश मिळाले मात्र त्याच वेळी त्यांचे वडील हेलिकॉप्टर दुर्घटनेत मरण पावले कालांतराने त्यांनी पुरेसे पाठबळ असताना मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी त्यांनी काँग्रेसकडे विचारणा केली काँग्रेसने ती नाकारली त्यांना घाणेरड्या राजकारणाचे बळी होत जेल मध्येही जावे लागले कालांतराने काँग्रेस मधून बाहेर पडून जगन मोहन यांनी वडिलांच्या नावे वाय एस आर काँग्रेस ची निर्मिती केली त्यांनी काँग्रेस व चंद्राबाबू नायडू या दोघाना एकावेळी फाईट करत 175 पैकी 151 जागा निवडून आणल्या तर 25 पैकी 21 लोकसभा जागा निवडून आणत आपली सिद्धता सिद्ध केली दरम्यानच्या काळात त्यांनी 351 दिवसाची पदयात्रा काढून लोकांमधून आपले नेता म्हणून स्थान अधिक बळकट केले या पदयात्रेत त्यांनी 2 कोटीहून अधिक लोकांशी थेट संपर्क साधला त्यांनी त्यावेळी 3648 किलोमीटर पायी प्रवास केला आज त्याच लोकांनी त्यांना त्यांच्या अवघ्या 47 व्या वर्षी अक्षरशः डोक्यावर घेत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री केले आहे जगभर त्यांच्या कर्तृत्वाचे गुणगान गाणारे चाहते आहेत 

त्यांचा वाढदिवस काल सम्पूर्ण देशभर पार पडला कराडमध्ये ही त्यांच्या नावे फॅन्स क्लब आहे अनेकांचे ते आयडॉल आहेत काल येथील शाहू चौक येथे केक कापून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कराडात भविष्यात या फॅन्स क्लबचे हजारो सदस्य असतील असा विश्वास युवा नेते राहुल खराडे यांनी रेड्डी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोलून दाखवला

यावेळी जगमोहन रेड्डी फॅन्स क्लबचे सदस्य सौ. गीतांजली थोरात, राहुल खराडे ,सचिन पवार (महाराज), समाधान चव्हाण(बापू) , भूषण जगताप (सर), राज ओसवाल, विनोद पवार, आदिल मोमीन, अमित पवार, संजय चेन्ने, रोहित कट्टीम्हणी ,कासिम शेख संदीप साळुंखे ,नितीन पाटील निलेश चौगुले , समीर पटवेकर आदी उपस्थित होते.

आज जिल्ह्यात 12 बाधीत,21 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 12 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
21 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 1 कराड 1 खंडाळा 0 खटाव 1 कोरेगांव 0 माण 1 महाबळेश्वर 0  पाटण 0 फलटण 4 सातारा 2 वाई 0 व इतर 0 आणि नंतरचे वाढीव 2 असे  आज अखेर एकूण 12 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 21 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Monday, December 20, 2021

शिवेंद्रराजेंची उदयनराजे वर टीका ; म्हणाले खासदारांची बुद्धी अफाट,अचाट...त्यांच्या बुद्धीचे पराक्रम बघितलेत...

वेध माझा ऑनलाईन
कराड
सातारा नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा साताऱ्यात भोसले बंधुंमध्ये वाक्-युद्ध रंगताना पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केलेली असताना दुसरीकडे आता शिवेंद्रराजे यांनी देखील उदयनराजे भोसले यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

उदयनराजे भोसले यांनी नुकतीच शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. “त्यांच्या शरीराची वाढ झाली आहे, पण बुद्धीची वाढ झाली नाही”, अशी टीका उदयनराजे भोसलेंनी केल्याचं शिवेंद्रराजे म्हणाले आहेत. या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी आज पत्रकार परिषदमध्ये उदयनराजे भोसले यांची बुद्धी अचाट असल्याचा टोला लगावला आहे.
“ते म्हणाले की माझी वाढ झाली, पण बुद्धीची वाढ झाली नाही. खासदार साहेबांची बुद्धी वाढली असेल. त्यांची अफाट आणि अचाट बुद्धी आहे असं माझं म्हणणं आहे. त्याची तुलना आमच्याशी होऊच शकत नाही. आम्हालाही मान्य आहे की आम्ही लहान बुद्धीचे आहोत. पण यांच्या बुद्धीचे आविष्कार आणि पराक्रम बघितले, तर लोकांमधून निवडून आलेली लोकसभा घालवून हे आपली बुद्धी वापरून राज्यसभेत जाऊन बसले आहेत. म्हणजे जिथे तुम्ही पुढच्या दाराने गेले होते, ते सगळं घालवून मागच्या दाराने तुम्ही खासदार म्हणून बसलात. म्हणजे तुमच्या बुद्धीचा हा कुठला पराक्रम आहे हे तुम्हीच बघा”, असा टोला शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला आहे.
“निवडणुका आल्या की नारळ फोडायचे, मंत्र्यांना निवेदनं द्यायची. ४-५ महिने मी नगरपालिकेत किती कामं करतोय हे दाखवायचं आणि लुटून खायचं हाच प्रकार सातारा विकास आघाडीचा लोकांना दिसलाय. खासदार साहेबांची बुद्धी एवढी मोठी आहे, तर साडेतीन वर्ष अजूनही भुयारी गटार योजना पूर्ण झालेली नाही. त्यांनी त्यांच्या अफाट बुद्धीचा वापर करावा. तीन वर्षांपासून घरकुल योजनेचं अजून कुठेच काही नाही”, अशा खोचक शब्दांत शिवेंद्रराजेंनी उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला.

कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेची संपातून माघार घेतल्याची घोषणा ; परिवहन मंत्री अनिल परब आणि कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेच्या बैठकित झाला निर्णय...

वेध माझा ऑनलाईन
कराड
राज्यात गेल्या 54 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी संपाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. अजय गुजर प्रणित कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेने या संपातून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेची आज बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. 
गेले 54 दिवस एसटी संप सुरु आहे. संपकरी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आहे. आज महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेनं आज परिवहन मंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे  मंत्रालयात चर्चा केली. त्यामुळे आता 22 डिसेंबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं असे आवाहन कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी केलं आहे. मुंबईबाहेरचे कामगार, जे मुंबईत आंदोलनासाठी आले आहेत त्यांना कामावर रुजू होण्यासाठी अतिरिक्त दोन दिवस देण्यात आले आहेत. 

अनिल परब म्हणाले की, "एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या समितीचा निर्णय संपकरी आणि राज्य सरकार या दोन्ही बाजूंना मान्य आहे. तसेच शासकिय कर्मचाऱ्यांमध्ये वेतन मिळण्याबाबतच्या मागणीवरही राज्य सरकार संघटनेशी चर्चा करणार आहे.  ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, ते कर्मचारी जर कामावर पुन्हा रूजू  झाले तर त्यांच्यावरची कारवाई मागे घेतली जाईल. तसेच त्यांच्यावरील फौजदारी गुन्हे ज्यांच्यावर दाखल झाले आहेत त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कारवाई मागे घेण्यात येणार आहे." 
दरम्यान, कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेने संप माघार घेतल्याच्या निर्णयानंतर आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिली आहे. विलिनीकरणाची मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नसल्याचं आंदोलकांनी सांगितलं. त्यामुळे आता एसटी कर्मचारी संपामध्ये फूट पडल्याचं दिसून येत आहे.

...अन्यथा, शेतकरी ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथील समुद्रात जलसमाधी घेतील ; बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा...

वेध माझा ऑनलाईन
कराड
सरकारने शेती पंपाला दिवसा आठ तास मोफत वीजपुरवठा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान, संपूर्ण कर्जमाफी, दुधाची खरेदी किलोमध्ये व लिटरमध्ये केल्यास त्याप्रमाणे पावती व बिल द्यावे आणि राज्यात गुंठेवारी खरेदी-विक्रीला परवानगी या गोष्टींवर सरकारने 23 डिसेंबर पर्यंत निर्णय जाहीर करावा. अन्यथा, शेतकरी ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे समुद्रात जलसमाधी घेतील, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला आहे.

      बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने या मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. यासंदर्भात येथील शासकीय विश्रामगृहात आज सोमवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात आज 544 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 515 रुग्ण झाले कोरोनामुक्त...

वेध माझा ऑनलाईन
कराड
कोरोनाबाधीत रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज   544 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 515  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 98  हजार 015 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे. 
राज्यात  आज ओमायक्रॉनचा एकाही  ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 54 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 31 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

आज जिल्ह्यात 12 बाधीत, 6डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 12 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
6 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 1 कराड 1 खंडाळा 0 खटाव 2 कोरेगांव 1 माण 1 महाबळेश्वर 0  पाटण 0 फलटण 3 सातारा 1 वाई 0 व इतर 1 आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 12 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 6 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.