Monday, December 27, 2021

लहान मुलांचे लसीकरण येत्या 3 जानेवारीपासून सुरू... आजपासून नोंदणीला सुरुवात...

वेध माझा ऑनलाईन
कराड
15 पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे 15ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण येत्या 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मात्र, त्यासाठीची नोंदणी आज 1 जानेवारीपासून करायची संधी मिळणार आहे. पोर्टलवर ही नोंदणी करता येणार आहे खर तर 12 वर्षांच्या पुढील मुलांच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, केंद्र सरकारने तूर्तास 15 वर्षांवरील मुलांचे लसीकरण करायला मान्यता दिली आहे. ओमिक्रॉनच्या विषाणूमुळे जगभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. हे पाहता अमेरिका आणि इंग्लंडसारख्या ठिकाणी मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता भारतही पाऊल टाकताना दिसतो आहे.

अशी करा नोंदणी

आज 1 जानेवारीपासून Cowin पोर्टलवर लहान मुलांची लसीकरण नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ओळखपत्र म्हणून विद्यार्थ्यांचे शाळेतील ओळखपत्र जोडले जाणार आहे. त्यामुळे आपल्या मुलाचे वय पंधरा असेल, तर ओळखपत्र जरूर असू द्या. शाळेतून मिळाले नसेल, अथवा हरवले असेल तर ते पुन्हा एकदा काढा. या नोंदणीनंतर 3 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. तूर्तास भारतातील मुलांना कोव्हॅक्सीन लस देण्यात येणार आहे. दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर ठेवले जाणार आहे.

No comments:

Post a Comment