कराड
जगभरात चिंतेचा विषय ठरलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉनव्हेरियंटच्या रुग्णाची संख्या महाराष्ट्रात दररोज वाढत आहे. रविवारी महाराष्ट्रात सहा नव्या ओमायक्रॉनच्या रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनच्या रुग्णाची संख्या 54 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत राज्यात 28 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. तर इतर रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आहेत. आज आढळलेल्या रुग्णापैकी चार रुग्ण मुंबई विमानतळावर घेतलेल्या चाचणीत आढळले आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील रुग्णाचा समावेश आहे. मुंबई आढळलेल्या चारही रुग्णाचे लसीकऱण झालं आहे.
मुंबईत चार रुग्ण -
मुंबईत आज ओमायक्रॉनचे चार नवे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांपैकी दोन जण कर्नाटकचे तर, एक औरंगाबाद आणि दुसरा दमनचा रहिवाशी आहेत. त्यांनी यूके आणि टांझानियातून प्रवास केल्याची पार्श्वभूमी आहे. या चारही रुग्णांमध्ये कोणताही लक्षणं नाहीत. यांच्यावर मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
No comments:
Post a Comment