कराड
नामदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने कराड नगरपरिषदेच्या विविध 115 कामांसाठी 11 कोटी 26 लाख इतका निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे त्यापैकी रस्ते विकासकामांचा प्रातिनिधिक शुभारंभ उद्या सोमवार दि 20 रोजी नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती गटनेते सौरभ पाटील यांनी आज दिली
या रस्ते कामांच्या शुभारंभांची सुरुवात सकाळी साडे अकराच्या सुमारास जमदाडे घर ते दिलीप सुर्यवंशी यांचे घरापर्यंत रुक्मिणी गार्डन परिसरातून होईल... त्यानंतर बारा वाजता मुजावर कॉलनी मुख्य रस्ता येथे... तर दुपारी सव्वाबाराला सुमंगल नगर मुख्य रस्ता येथील कामाचा शुभारंभ होईल... साडेबारा वाजता मार्केटयार्ड गेट नं एक चे समोर... तर एक वाजता कोयनेश्वर मंदिर चौक येथे... आणि दीड वाजता पेंढारकर पुतळ्यामागील ग्राऊंड याठिकाणच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होणार आहे... अशी माहिती सौरभ पाटील यांनी दिली आहे
या सर्व ठिकाणच्या होणाऱ्या रस्ते उदघाटनप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गटनेते सौरभ पाटील लोकशाही चे अध्यक्ष जयंत पाटील नगरसेविका सौ पल्लवी पवार यांनी केले आहे
*
No comments:
Post a Comment