कराड
दक्षिण आफ्रिकेत प्रथमच सापडलेल्या 'ओमायक्रॉन' या कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट भारतात ही कहर माजवत आहे. काल शुक्रवारी ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या भारतात 100 च्या पुढे गेली आहे. एकाच दिवसात ओमायक्रॉनची 26 प्रकरणे नोंदवण्यात आली ही चिंतेची बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही लोकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
कर्नाटकात पहिल्या प्रकरणाची नोंद झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी, 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमायक्रॉन प्रकरणांची संख्या 111 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात बाधितांची संख्या 40च्या वर आणि दिल्लीत 22 झाली आहे. तेलंगणा आणि केरळमधून प्रत्येकी दोन आणखी रुग्ण आल्याने संक्रमितांची संख्या अनुक्रमे आठ आणि सात झाली आहे.
No comments:
Post a Comment