कराड
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये सांबराची शिकार केल्याप्रकरणी नाव गावचे रहिवासी असलेल्या ५ जणांना हेळवाक वन्यजीव विभागाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले
याबाबत वन्यजीव विभागाने दिलेली माहिती अशी, नाव गावातील काही ग्रामस्थांनी सांबर या प्राण्यांची शिकार करून त्याचे मांस एका घरात शिजवत असल्याची गुप्त माहिती हेळवाकच्या वन्यजीव विभागास समजली तातडीने वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी छापा टाकून ५ संशयितांना ताब्यात घेतले
या प्रकरणी सीताराम शेंडे, विशाल पवार, अशोक विचारे, महेंद्र जगताप, आनंद विचारे (सर्व रानाव, ता. पाटण) यांना अटक करून पाटण न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे यांनी दिली
No comments:
Post a Comment