Saturday, December 25, 2021

विधानसभा अध्यक्षपदी नितीन राऊतांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता...आज काँग्रेसकडून करण्यात आले मोठे बदल...

वेध माझा ऑनलाईन
कराड
विधानसभेचा आखाडा आरोप प्रत्यारोपांनी गाजत असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांना वेध लागलेत ते विधानसभा अध्यक्षपदाचे. सोमवारी त्याची निवडणूक आहे. पण अजूनही सत्ताधाऱ्यांनी स्वत:चा उमेदवार दिलेला नाही. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे आहे आणि त्यामुळे ते कुणाला संधी देणार याबाबत उत्सुकता आहे. तीन एक नेत्यांची नावं चर्चेत आहेत पण शेवटी कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून चार नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यात भोरचे आमदार संग्राम थोपटे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. आज काँग्रेसकडून करण्यात आलेल्या मोठ्या बदलानंतर आता नितीन राऊतांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

नितीन राऊत होणार अध्यक्ष ? 
नितीन राऊत यांना काँग्रेससं एससी सेलमधूल हटवलं आहे. एक पत्रक जारी करत त्यांना काँग्रेस एससी विभागाच्या अध्यक्षपदावरुन मुक्त करण्यात आलं असून त्यांच्या जागी राजेश लिलोठिया यांना अध्यक्ष करण्यात आलं आहे. या बदलामुळे नितीन राऊत यांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसडे देण्यात आले आहे. काँग्रेसकडून आधी नाना पटोलेंना अध्यक्ष करण्यात आले होते, मात्र नाना पटोले यांचे नाव काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी ठरल्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडले होते. त्यानंतर अध्यक्ष कोण होणार? हे ठरत नसल्याने बराच काळ हे पद रिक्त होतं. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

No comments:

Post a Comment