कराड
राज्यात शनिवारी 854 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 804 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 96 हजार 733 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71% इतके झाले आहे.
राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज ओमायक्रॉनच्या आठ रुग्णांचीही भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 48 इतकी झाली आहे
दरम्यान...
आज सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत... जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 23 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर
15 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे
No comments:
Post a Comment