कराड
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठेपणा आज पुन्हा एकदा पाहण्यास मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा पुण्यात मुक्कामी आहे. पण, ऐनवेळी त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था न झाल्याचं समोर आलं. अजित पवारांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी तातडीने सर्किट हाऊसमधील आपला सूट अमित शहा यांच्यासाठी उपलब्ध करून दिला.
भाजप नेते राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची एकही संधी सोडत नाही. पण, राजकारणात कायम कुणीच कुणाचा शत्रू नसतो हे पुन्हा एकदा अजित पवार यांनी दाखवून दिले.
No comments:
Post a Comment