Saturday, December 18, 2021

रोटरी क्लब ऑफ कराडच्या वतीने राजाभाऊ कोटणीस जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन; नामदार बाळासाहेब पाटील,श्री छ शिवाजीराजे भोसलेंची प्रमुख उपस्थिती...

वेध माझा ऑनलाईन
कराड
 रोटरी क्लब ऑफ कराड ,रोटरी क्लब कराड चारीटेबल ट्रस्ट आणि कराड बॅडमिंटन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने राजाभाऊ कोटणीस जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धांचे येथे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नामदार बाळासाहेब पाटील व अध्यक्ष म्हणून श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची उपस्थिती होती यावेळी या दोघां मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण पूरक पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले

 याप्रसंगी नामदार पाटील यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या तर श्री  छ शिवाजीराजे भोसले यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रकुमार डांगे यांनी मान्यवरांचे स्वागत करत कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून 293 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला

रोटरी क्लब कराडचे रणजीत शेवाळे ,डॉ राहूल फासे, संदीप कोटणीस कराड बॅडमिंटन क्लबचे अध्यक्ष किशोर कुलकर्णी ,सचिव निलेश फणसळकर , प्रकाश गद्रे, ओमकार पालकर ,अतुल पाटील ,चीप रेफरी- तेजस उंडे, मॅच कंट्रोलर- राज जाधव , मनोज कान्हारे -उपाध्यक्ष सातारा बॅडमिंटन असोसिएशन. रोटरी क्लब कराडचे  स्पोर्ट्स डायरेक्ट अजय भट्टड,काँपस् चेअरमन  शशांक पालकर ,राहुल कुलकर्णी, तुषार गद्रे ,राजेंद्र कुंडले ,गजानन माने आदी मान्यवर पदाधिकारी।यावेळी उपस्थित होते 
सूत्रसंचालन  प्रबोध पुरोहित यांनी केले आभार   अभय पवार यांनी मानले.

No comments:

Post a Comment