कराड
राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. रविवारी राज्यात 902 नव्या कोरोनाबाधित रुग्णाची भर पडली आहे. तर 9 रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. याच कालावधीत राज्यात 767 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी 854 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, यामध्ये आज किंचीत वाढ झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 97 हजार 500 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71% इतके झाले आहे.
No comments:
Post a Comment