कराड
येथील काही नगरसेविकांच्या पतींच्या पालिकेतील कारभारात होणाऱ्या हस्तक्षेपाच्या कारणावरून काही महिन्यांपूर्वी झालेल्या पालिकेच्या सभेत खडाजंगी पहायला मिळाली होती तरी अद्याप काही जणांचा हस्तक्षेप अजूनही कमी झालेला नाही अशा लोकांच्या आजही तक्रारी येत आहेत एकीकडे राजकीय विरोधकांकडून पालिकेच्या कारभारावर टीका होत असताना आता नगरसेविकांचे पती कारभारात हस्तक्षेप करतात हा मुद्दा ऐरणीवर आला आहे याबाबत दबक्या आवाजात लोक बोलत असताना याला जबाबदार कोण?अशी चर्चा त्यांना बरोबर घेऊन फिरणाऱ्या नेत्यांकडे बोट दाखवणारे करीत आहेत...
नगरसेविकांचे पती पालिकेतील कामात हस्तक्षेप करतात या कारणाने पालिकेची सभा काही महिन्यांपूर्वी चांगलीच गाजली होती त्या सभेत नगरसेविका सौ पल्लवी पवार व नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांच्या पतींच्या कामात ढवळाढवळ करण्याचा मुद्दा पुढे आला होता दरम्यान पालिकेत असणाऱ्या सर्वच नगरसेविकांचे पती उचापती करीत नाहीत हे जरी खरे असले... तरी काहींना रोज पालिकेत हजरी लावल्याशिवाय चैनच पडत नाही... शासनाने पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिले आहे त्यानुसार महिला निवडून येतात त्यात काहीजणी स्वतः यशस्वीपणे कारभार करताना दिसतात तर काही महिलांचे पती निवडणूकीनंतर त्यांच्या जागी स्वतःच कारभार करताना दिसतात...
हे लोक एखाद्या राजकीय पार्टीच्या माध्यमातून राजकारण करताना त्या पार्टीप्रमुखाला भविष्यात अडचणीचे ठरू शकतात... त्यांचा हस्तक्षेप कारभारात वाढतो... तेच स्वतःला निवडून आलेले पुढारी समजतात...आणि पुढे जाऊन घोळ होऊन बसतो...त्यापैकी काही उचापतीच्या हस्तक्षेपामध्ये टेंडर चा स्वार्थ असतो..? तर काहींचा स्वार्थ राजकारणात पदे मिळावीत यासाठी दिसतो... ? पण त्यामुळे कारभारात व्यत्यय येण्याचे प्रकार वारंवार घडतात...पार्टीमधले इतर कार्यकर्ते... सारखे तुम्ही याच लोकांना बरोबर घेऊन का फिरता? असे म्हणत पार्टी नेत्यावर नाराजही होताना बऱ्याचवेळा दिसतात...असे अनेक प्रकार यांतून झालेले यापूर्वी पहायला मिळाले आहेत... यापूर्वी पालिकेच्या सभेमधील याच मुद्यावरून झालेला वाद उचापतीच्या कारभारात ढवळाढवळ करण्यामुळेच झाला हे नाकारता येईल का...? त्या वादावेळी त्यांची बाजू जे-जे राजकारणी लोक घेत होते त्यांनी पालिकेतील कारभारात या उचापतींचा हस्तक्षेप पुन्हा होऊच नये याची खबरदारीदेखील यापुढे घ्यायला हवी...लोकशाहीआघाडी, भाजपा, आणि जनशक्ती यामधून अनेक महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत... त्यांपैकी काही नगरसेविकांचे पती स्वतःच नगरसेवक आहोत असे वावरताना दिसतात...त्यांना लोक "मेहेरबान' म्हणतात...आणि हे त्या हाकेला प्रतिसादही देतात .. लोक मेहेरबान कुणाला म्हणतात...? का म्हणतात...? या शब्दाचा अर्थ व जबाबदारी काय असते...हे शहराचे नेते सुभाषकाका पाटील यांनी सविस्तरपणे काही दिवसांपूर्वी सांगितले आहे...
दरम्यान उचापती म्हणून चर्चेत असणारे पालिकेतील केबिन मध्ये बसून शीपाई किंवा इतर कर्मचाऱ्यांना कामासबंधी ऑर्डर सोडताना दिसतात..वेळ पडली त्यांना वरच्या आवाजात बोलतात... अशी चर्चा असते...हे लोक दिवसभर पालिकेतच असतात... नेत्याच्या खुर्चीला खुर्ची लावून फोनाफोनी करत इतर कामात विनाकारण लक्ष घालतात... आणि...हे सगळं त्यांच्या नेत्यांच्या समोर चालू असते...तरी त्या नेत्यांना हे कसे चालते...हा शहराला पडलेला प्रश्न आहे... यामध्ये काही माजी नगरसेविकांचे पतीदेखील हस्तक्षेपाच्या भानगडी करताना पालिकेत दिसतात अशीही चर्चा असते
दरम्यान,ग्रामपंचायतीत महिला सरपंच असेल आणि त्या महिलेच्या पतीचा हस्तक्षेप झाल्यास कारवाईची तरतूद कायद्यात आहे... पालिका स्तरावर असा कोणताच कायदा अस्तित्वात नसला तरी... या लोकांना बरोबर घेऊन फिरणाऱ्या नेत्यांकडूनच या उचापतींच्या हस्तक्षेपाला आवर घालणे गरजेचे आहे... हे प्रकार आता थांबले पाहिजेत अशी लोकांची भावना आहे
No comments:
Post a Comment