वेध माझा ऑनलाईन
कराड
साताऱ्यात पुन्हा एकदा शिवेद्रराजे आणि उदयनराजे आमने-सामने आले आहेत. सातारा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवेंद्रराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी उदयनराजेंवर टीका करताना साताऱ्यात नारळफोड्या गँग फिरत आहे असा टोला लगावला होता. त्यांच्या या टीकेला आता उदयनराजेंनी उत्तर दिलं असून आम्ही चांगली काम करतो, पण तुम्ही तर लोकांची घर फोडता असं म्हटलं आहे. वय वाढल्यामुळे शिवेंद्रराजेंची बुद्धी लहान मुलाच्या बुद्धीपेक्षा कमी झाली आहे असंही यावेळी ते म्हणाले.
“वय वाढल्यामुळे शिवेंद्रराजेंची बुद्धी लहान मुलाच्या बुद्धीपेक्षा कमी झाली आहे, त्यामुळेच त्यांनी आमच्यावर असा आरोप केला. इतक्या वैयक्तिक पातळीवर जाणं मला पटत नाही. पण दिशाहीन झालेले अत्यंत संकुचित वृत्ती असणारे काही लोक असतात. त्यांच्याकडून फार अपेक्षा करणं अन्याय करण्यासारखं आहे. पूर्तता करु शकतील अशा लोकांकडून अपेक्षा करायच्या असतात,” असंही यावेळी ते म्हणाले.
No comments:
Post a Comment