Monday, December 20, 2021

नामदार बाळासाहेब पाटील यांनी केली कराडातील रस्त्यांची उदघाटने...मात्र, लक्षवेधी ठरले नगरसेवक इंद्रजित गुजर...नगराध्यक्षा ,उपनगराध्यक्ष यांच्या अनुपस्थितीची देखील शहरात चर्चा...

वेध माझा ऑनलाईन
कराड
 नामदार बाळासाहेब पाटील यांनी आज शहरातील विविध रस्त्यांच्या कामाचे औपचारिक उदघाटन केले जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यांनी या कामाकरिता 11 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला आहे त्याच रस्त्यांची आज नामदार पाटील यांनी उदघाटने केली यावेळी लोकशाही आघाडीसह जनशक्तीच्या यादव गटाचे सर्व नगरसेवक हजर होते विशेष म्हणजे आ पृथ्वीराज चव्हाण गटाचे नगरसेवक इंद्रजित गुजर यांचीही यावेळी उपस्थिती होती त्यांची उपस्थिती यावेळी लक्षवेधी ठरली तर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची अनुपस्थिती यावेळी चर्चेत राहिली

नामदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने कराड नगरपरिषदेच्या विविध 115 कामांसाठी 11 कोटी 26 लाख इतका निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे त्यापैकी रस्ते विकासकामांचा प्रातिनिधिक शुभारंभ आज सोमवार दि 20 रोजी नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडला... या रस्ते कामांच्या शुभारंभांची सुरुवात सकाळी साडे अकराच्या सुमारास जमदाडे घर ते दिलीप सुर्यवंशी यांचे घरापर्यंत रुक्मिणी गार्डन परिसरातून झाली... त्यानंतर मुजावर कॉलनी मुख्य रस्ता येथे... तर नंतर सुमंगलनगर मुख्य रस्ता येथील कामाचा शुभारंभ झाला... नंतर मार्केटयार्ड गेट नं एक चे समोर... आणि त्यानंतर कोयनेश्वर मंदिर चौक येथे रस्त्याचे उदघाटन पार पडले आणि दीड वाजता पेंढारकर पुतळ्यामागील ग्राऊंड याठिकाणच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला... आणि आजच्या रस्ते उदघाटन कार्यक्रमाची यावेळी सांगता करण्यात आली... या कार्यक्रमप्रसंगी जनशक्तीच्या यादव गटाचे सर्व नगरसेवक हजर होते तर दुसरीकडे नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे व उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांची उपस्थिती  दिसली नाही याबाबत चर्चा व आश्चर्य लोकांनी व्यक्त केले आ पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक व नगरसेवक इंद्रजित गुजर हे देखील या रस्त्याच्या उदघाटन प्रसंगी हजर होते लोकशाहीचे समर्थक त्यांना फोटोसाठी... पुढे या... म्हणत होते... याचीही चर्चा लगेचच कार्यक्रमस्थळी सुरू झाली... 


शहरात होणाऱ्या पालिका निवडणुकीत यादव गटाची लोकशाही गटाबरोबरची जवळीक सगळीकडे चर्चेत असताना आ पृथ्वीराज चव्हाण समर्थक इंद्रजित गुजर यांचीही नामदार पाटील यांची जवळीक आज शहराला दिसली... त्यामुळे पुन्हा राजकीय तर्क वितर्क शहरात सुरू झाले आणि उलटसुलट चर्चाना उधाण आल्याचे दिसले...या कार्यक्रमावेळचे  रंगलेले एकूणच राजकीय चित्र पाहून होणाऱ्या निवडणुकीत नेमकं काय गणित मांडले जाणार... कोणता गट कोणात्या गटाबरोबर जाणार.. याच्याही चर्चा पुन्हा सुरू झाल्या...आ पृथ्वीराज बाबा व नामदार पाटील येथील पालिका निवडणुकीत एकत्र येणार या चर्चा एकीकडे शहरात असताना जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर अतुलबाबा व बाळासाहेब पाटील एकत्र येण्याबाबत शहरात चर्चा सुरू झाल्या दरम्यान पालिकेतील यादव गट व लोकशाही गटाच्या जवळीकीची चर्चा देखील शहरात असताना आजच्या रस्ते उदघाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरसेवक इंद्रजित गुजर यांची अचानक कार्यक्रम स्थळी झालेली एन्ट्री लक्षवेधी ठरली... आणि नेमकं कोण कोणाबरोबर आहे ?...या चर्चेला तोंड फुटले...त्यात लोकशाहीचे समर्थक गुजर याना फोटोसाठी पुढे या.... म्हणत होते त्यामुळे उपस्थितांमध्ये वेगळाच संदेश गेला अशीही... चर्चा सुरू झाली... नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष उपस्थित नव्हते याचीही चर्चा कार्यक्रमस्थळी होती...

दरम्यान या रस्त्यांच्या उदघाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले कोरोना काळात महसूल कमी होता मात्र आता त्याची योग्य उपलब्धता आहे नगरपालिकेला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीं उपलब्ध करून शहरातील रस्त्यांची कामे होणार आहेत शहरासाठी जास्तीतजास्त विकासनिधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत

No comments:

Post a Comment