वेध माझा ऑनलाईन
वाढत्या ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येतच आता हिवाळी अधिवेशनातही कोरोनानं शिरकाव केलाय. भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात समीर मेघे यांची भेट घेतलेले इतरही आमदार आता धास्तावले आहेत. समीर मेघे यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. फेसबुक पोस्ट लिहीत त्यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं म्हटलंय.
उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
कोरोनाची लागण झाल्याचं कळताच समीर मेघे हे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले आहेत. नागपुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रकृती बिघडल्यानं समीर मेघे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, ऐन हिवाळी अधिवेशनात सभागृहातीलच एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं सगळ्याच आमदारांची चिंता वाढली आहे.
22 तारखेला समीर मेघे हे विधानसभा अधिवेशनासाठी सभागृहात हजर होते. यावेळी त्यांनी विधानसभेत इतरही आमदार आणि मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या आमदार, विधानसभेतील कर्मचारी वर्ग यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे. यातूनही इतरांना संसर्ग झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
No comments:
Post a Comment