Saturday, December 25, 2021

पालिकेचे गटनेते राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत कराड शहरातील विविध रस्ते कामांचा शुभारंभ...

वेध माझा ऑनलाईन
कराड
नामदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून शहराच्या रस्ते कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे त्या माध्यमातून पालिकेचे गटनेते राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत येथील विविध रस्ते कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला...

यामध्ये  नेहरू चौक ते कराड नगरपरिषद पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे कामाचा शुभारंभ राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत करण्यात आला त्यानंतर श्रीराम चौक घाटे घर ते भांबुरे चौक ते मोरे घर या रस्त्याचा शुभारंभ झाला तसेच श्रीराम चौक घाटे घर ते भोई समाज मंदिर व श्रीराम चौक घाटे घर ते विठ्ठल चौक रस्ता डांबरीकरण करणे कामाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर धर्मवीर संभाजीराजे चौक आयवा ग्रुप चौक ते वास्के चौकातील रस्ता डांबरीकरण शुभारंभ पार पडला शुक्रवार पेठेतील महादेव मंदिरा जवळील घाट कामाचे उद्घाटन पार पडले त्याचप्रमाणे कार्वे नाका पाण्याच्या टाकी खाली पोस्टल कॉलनी व सुमंगल नगर या दोन ठिकाणी अंगणवाडीसाठी दोन खोल्या बांधणे या कामाचे भूमिपूजन पार पडले सुमंगल नगर गल्ली क्रमांक 3 महाडिक घर ते अमलानी अपार्टमेंट रस्ता डांबरीकरण करणे कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला वाढिव भाग येथील कार्वे नाका प्रियदर्शनी कॉलनी अर्बन बँकेपासून सहारा कॉलनीच्या कोपऱ्यापर्यंत चा रस्ता डांबरीकरण  करणे व सहारा कॉलनी मधील उत्तर कोपऱ्यापासून शेख यांच्या घरापासून उत्तरेस वेदपाठक घरापर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण करणे तसेच वाढिव विभागातील गाय मंदिर ते पूर्वेस गणेश नांगरे घरासमोरील रस्ता डांबरीकरण करणे अशा विविध कामांचा शुभारंभ देखील आज राजेन्द्र यादव यांच्या उपस्थितीत पार पडला

यावेळी बोलताना गटनेते राजेंद्र यादव यांनी शहरातील रस्ते चकाचक होऊन खड्डेमुक्त असतील अशी ग्वाही देत शहराचा विकासात्मक कायापालट करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असेही यावेळी सांगितले यावेळी यादव गटाचे सर्व नगरसेवक नगरसेविका  लोकशाही गटाचे नगरसेवक मोहसिन आंबेकरी तसेच कार्यकर्ते व स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते

No comments:

Post a Comment