कराड
येथील जयवंत शुगर्स कारखान्याच्यावतीने कारखाना कार्यस्थळावर ऊसतोडणीसाठी आलेल्या मजुरांसाठी नुकतीच कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम राबविण्यात आली. कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले, चेअरमन चंद्रकांत देसाई व प्रेसिडेंट चारुदत्त देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कारखाना प्रशासनासमवेत ऊसतोड मजुरांच्या प्रत्यक्ष खोपीवर जाऊन लसीकरण केले.
याप्रसंगी कारखान्याचे सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर, केन मॅनेजर नाथाजी कदम, चिफ अकौटंट आर. के. चन्ने, विशेष कार्यकारी अधिकारी आर. टी. सिरसाट, ई.डी.पी. मॅनेजर ए. एल. काशीद, मुख्य शेतकी अधिकारी आर. जे. पाटील, एच. आर. मॅनेजर एस. एच. भुसनर, स्टोअर किपर जी. एस. बाशिंगे, पर्चेस ऑफिसर पी. एस. जाधव, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर ए. बी. खटके, सुरक्षा अधिकारी जे. पी. यादव, एस. व्ही. शिद, केनयार्ड सुपरवायझर एस. एम. सोमदे, ए. एम. गोरे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment