Friday, December 24, 2021

कराड रोटरी क्लब आयोजित कै राजाभाऊ कोटणीस स्मृती जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद...

वेध माझा ऑनलाईन
कराड
रोटरी क्लब ऑफ कराड, रोटरी क्लब ऑफ कराड चारीटेबल ट्रस्ट, आणि कराड बॅडमिंटन क्लब ,आयोजित कै . राजाभाऊ कोटणीस स्मृती जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा नुकतीच पार पडली त्या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला 

 कराडचे पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संदीप कोटणीस ,रणजीत शेवाळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रकुमार डांगे ,सचिव अभय पवार, स्पोर्ट्स डायरेक्ट अजय भट्टड, कॉप्स चेअरमन शशांक पालकर,  किशोर कुलकर्णी, यांच्या हस्ते या सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण पार पडले 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत रोटरी क्लब कराडचे अध्यक्ष चंद्रकुमार डांगे यांनी केले सूत्रसंचालन प्रबोध पुरोहित यांनी केले तर सचिव अभय पवार यांनी आभार मानले .
जिल्हास्तरीय  स्पर्धेसाठी 293 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला इंटरनॅशनल पद्धतीच्या हुवा कोर्ट वरती शिवाजी स्टेडियम कराड येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या
स्पर्धा यशस्वी करण्याकरता निलेश फणसळकर, अतुल पाटील ओमकार पालकर ,प्रकाश गद्रे, रोटरी क्लबचे पब्लिक इमेज डायरेक्टर राजेश खराटे ,अभिजीत चापेकर, राजेंद्र कुंडले, जय राम सचदेव, सुहास पवार, अमित बुतकर , सदस्यांचे सहकार्य लाभले 

स्पर्धेतील विजयी स्पर्धक व त्यांचे गट पुढीलप्रमाणे....
 
10 वर्षाखालील मुली  1 अपूर्वा खाडिलकर ,2 श्रद्धा इंगळे 

13 वर्षाखालील मुली 1 गार्गी पाटील 2 रिया सावंत

15  वर्षाखालील मुली .1  गार्गी चव्हाण 2 जुलि घोरपडे 

17 वर्षाखालील मुली 1 रिया शहा 2 गार्गी चव्हाण 

19 वर्षाखालील मुले 1.  वेदांत शिंदे 2 सोहम बारटक्के 

10 वर्षाखालील मुले .1 ईशान देशमुख 2 भावेश  घोडके 
 
13 वर्षाखालील मुले 1  सोहम शिंदे 2 आदित्य पाटील 15 वर्षाखालील मुले ,1 आर्यन खाडिलकर  2 सोहम शिंदे 

17 वर्षाखालील मुले 1 वेदांत शिंदे 2, अथर्व शिंदे 

15 वर्षाच्या खालील दुहेरी मुले 1st सोहम शिंदे व ऋषिकेश जय देवकर 2 तनिष्क  केंजळे निशान वाळिंबे
 
19 वर्षाखालील दुहेरी मुले 1 जयेश निंबाळकर ,ओम पवार 2)राजेश्वर कानारी, ओमकार सावंत 
पुरुष एकेरी 1) ओमकार पालकर दोन))2 ) पुष्कराज कुलकर्णी पुरुष दुहेरी 1  ओमकार पालकर पुष्कराज कुलकर्णी 2 अतुल पाटील निलेश फणसळकर 

35 वर्षाच्या पुढे पुरुष दुहेरी 
 1) नीलेश फणसळकर अतुल पाटील
 2) जितेंद्र जाधव ,निलेश शिंदे 50 वर्षावरील 

पुरुष दुहेरी 
1) जितेंद्र जाधव सचिन देशमुख 
२) मिलिंद खामकर सायमन धनराज 

मिक्स डबल 
1) अभिषेक मोहिते, ईशा वेलणकर 
2) ओमकार पालकर यामिनी सुरवंशी 

महिला एकेरी
1) इशा वेलणकर 
2) आर्या घाडगे

No comments:

Post a Comment