वेध माझा ऑनलाईन
कराड
ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काळजी वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या विक्रमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ओमिक्रॉन रुग्णसंख्येनं नवा उच्चांक गाठला असून नव्या 31 रुग्णांची दिवसभरात नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 141 रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी 61 रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत.
मुंबईत सर्वाधिक रुग्ण!
ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहे. राज्यातील 31 पैकी 27 रुग्णांचं निदान एकट्या मुंबईत झालं आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात मुंबईतील कोरोना रुग्णवाढही चिंताजनक मानली जाते आहे. बीएमसीनं दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 922 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण 326 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत कोरोनाचे एकूण 4295 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबई गेल्या 13 दिवसांत झपाट्यानं रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आलेलं असतानाच ओमिक्रॉनसह पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचं आकडेवारीतून अधोरेखित होत आहे.
No comments:
Post a Comment