Saturday, December 18, 2021

कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून सीएनजी पंप लवकरच होणार कार्यान्वित ; डॉ अतुल भोसले

वेध माझा ऑनलाइन
कराड
देशात नैसर्गिक वायू इंधन देण्याचे नियोजित करण्यात आले असून त्याअंतर्गत प्रदूषण कमी करण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. यासाठी देशभरात विविध ठिकाणी नैसर्गिक वायुचा वापर इंधनासाठी केला जाणार आहे. या भूमिकेतून कृष्णा कारखान्याचा सीएनजी पंप लवकरच कार्यान्वित होणार असून लोकांना याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. असे प्रतिपादन कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी केले.

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंप परिसरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या सीएनजी गॅस पंपाचे भूमीपूजन कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक वसंतराव शिंदे, संजय पाटील, जे.डी.मोरे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, माजी प स सदस्य संजय पवार,शेरेचे शंकर निकम पंच, पंकज पवार, बहेचे ग्रा. प सदस्य राजाराम थोरात, शशिकांत मोहिते, रणजित निकम आदी उपस्थित होते.

डॉ.अतुल भोसले पुढे म्हणाले, कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेशबाबा यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने सीएनजी गॅस पंप उभारणीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सीएनजी हा इंधनप्रकार केवळ स्वस्तच नसून स्वच्छ आणि सुरक्षित असून इतर इंधनप्रकाराच्या तुलनेत अधिक कार्यक्षम आहे. सीएनजी इंधनाची किंमत ही पेट्रोल व डिझेलपेक्षा खूप कमी असल्याने आणि किंमतीच्या तुलनेत मिळणारे मायलेज हे आकर्षक असल्याने सर्व सामान्य लोकांना याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. लवकरच कारखान्याचा सीएनजी पंप कार्यान्वित होणार आहे अशी ग्वाही डॉ.अतुल भोसले यांनी दिली.

No comments:

Post a Comment