वेध माझा ऑनलाईन - राज्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहे तर दुसरीकडे कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचे रुग्ण सुद्धा वाढत आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भ, मराठवाडा आणि नाशिकमध्येही ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे ओमायक्रॉनमुळे समुह संसर्ग सुरू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. आज राज्यात 198 रुग्ण आढळून आहे. तर एकूण रुग्णांची संख्या 450 वर पोहोचली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्ण आणि ओमायक्रॉनबाधित रुग्णांची माहिती दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी 198 रुग्ण आढळून आले. धक्कादायक म्हणजे, यामध्ये फक्त 30 जण परदेशातून आलेले आहे. त्यामुळे ओमायक्रॉनचा फैलाव होत असल्याचे समोर आले आहे.
No comments:
Post a Comment