Saturday, December 18, 2021

फलटणमध्ये ओमायक्रॉनचे तीन रुग्ण आढळले

वेध माझा ऑनलाईन

कराड

जगभरात चिंतेचा विषय ठरलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉनव्हेरियंटने महाराष्ट्रातील  ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. शनिवारी साताऱ्यातील फलटणमध्ये ओमायक्रॉनचे तीन रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा अहवाल प्रतिक्षेत आहे. यामुळे साताराकरांची चिंता वाढली आहे. 


गेल्या काही दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त लोक विदेशातून आले आहेत. यामधील एकाच कुटुंबातील चार जण पॉझिटिव्ह आढळले होते. यांचे जीनोम सिक्वेन्सिंग तपासणीसाठी पुण्यात पाठवले होते. पुण्याच्या राष्टीय विषाणू संस्था यांच्याकडून शनिवारी अहवाल प्राप्त झाला. यामध्ये तीन जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने खडबडून जागे झालं असून संपर्कातील लोकांची तपासणी सुरु केली आहे. तसेच संशयित रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत

No comments:

Post a Comment