Thursday, December 30, 2021

राज्यात येत्या 2 दिवसात कठोर निर्बंध ? राज्यात आज साडेपाच हजारच्या घरात सापडले रुग्ण... मुंबईत सापडले साडेतीन हजार...!

वेध माझा ऑनलाईन - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. राज्यात आज साडे पाच हजाराच्या घरात नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एकट्या मुंबईत साडे तीन हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात कठोर निर्बंध  लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना निर्बंधांसह, संभाव्य धोका आणि उपाययोजनांबाबत चर्चा झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी दिली आहे. तसंच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी जनतेला महत्वाचं आवाहन केलं आहे.

‘कठोर निर्बंधांबाबत आज, उद्यामध्येच निर्णय’
राज्यातील रुग्णवाढ ही चिंता वाढवणारी आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत महत्वाची चर्चा झाली. कठोर निर्बंधांबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. तो निर्णय आज उद्यामध्येच घेतला जाईल, अशी माहिती टोपे यांनी टास्क फोर्सच्या बैठकीनंतर दिली आहे. ‘हे नक्कीच आहे की गर्दी टाळलीच पाहिजे. गर्दी नको कारण त्यामुळे संसर्ग झपाट्याने वाढेल. टेस्टिंग संदर्भात एसजीटीएफ हे कीट आहे. त्यातून ओमिक्रॉनचं डिटेक्शन होतं. ते किट वापरलं जावं, त्यामुळे डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण किती आणि ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण किती हे समजेल. तर ट्रिटमेंटवर ‘मोनोपिरॅमिल’ हे केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील टास्क फोर्सनं मान्य केलेलं अॅन्टी व्हायरल ड्रग आहे. त्याची मागणी आणि पुरवठा याबाबत सविस्तर चर्चा झाली, अशी माहितीही टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

No comments:

Post a Comment